10 types of ladoos in Marathi : या वर्षी हिवाळा थोडा लांबला आहे. वातावरणातही बरेच बदल जाणवले. गेल्या काही दिवसात कधी तापमान वाढले, कधी कमी झाले तर कधी पाऊसही पडला. आता थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. अशा बदलत्या हवामानामुळे आणि सततच्या थंडीमुळे आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात. या दिवसात आपण आपल्या तब्येतीची जेवढी काळजी घेऊ तेवढी चांगली असते. अगदी घरच्याघरी स्वयंपाकघरात आढळणाऱ्या गोष्टींचा वापर करून आपण थंडीचा आंतर्बाह्य मुकाबला करू शकतो.
आज या लेखामध्ये आपण हिवाळ्यात खाण्यास पौष्टिक असे 10 लाडू 10 types of ladoos in Marathi जाणून घेणार आहोत; जे खाल्ल्याने आपल्याला स्वाद आणि आरोग्य दोन्हीचा लाभ होईल.
1. मेथी लाडू Fenugreek Ladoo
2. डिंक लाडू Dink Ladoo / Gum Ladoo
3. नाचणी लाडू Nachani Ladoo / Ragi Ladoo
4. अळीव लाडू Aliv Ladoo
5. तीळ लाडू Til Ladoo / Sesame Ladoo
6. जवस लाडू Javas Ladoo / Flax Seed Ladoo
7. खारीक लाडू Kharik Ladoo / Dates Ladoo
8. सुंठ लाडू Sunth Ladoo / Dry Ginger Ladoo
9. उडीद लाडू Urad Dal Ladoo
10. गव्हाच्या पिठाचे लाडू Wheat Flour Ladoo
10 types of ladoos in Marathi :
1. मेथी लाडू : मेथीमध्ये Vitamin A, B1, B2, C मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे थंडीमध्ये मेथी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ति वाढते. Fenugreek seeds Immunity Booster in winter. मेथी ही शरीरास ऊर्जा प्रदान करते. शरीराचे तापमान संतुलित राखते. मेथीचे लाडू बनवताना त्यात सुकामेवा, तूप, साखर आणि कणिक वापरतात. त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी कमी होते. मेथी ही कडूरसतत्वाची असल्याकारणाने अपचनाचा त्रास कमी होतो. तसेच मेथीमुळे हिवाळ्यात केस गळणे, केसात कोंडा होणे या समस्या दूर होण्यास मदत होते.
2. डिंक लाडू : ज्यांना मेथीचा कडवटपणा आवडत नाही अश्या लोकांसाठी डिंक लाडू हा एक चांगला पर्याय आहे. डिंकमध्ये भरपूर Calcium आणि Energy असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. थकवा जाणवत असेल, कमजोरी आली असेल ती दूर होते. प्रसूतीनंतर स्त्रियांना ताकद येण्यासाठी डिंक लाडू देतात त्यामागे हेच कारण आहे. डिंकाला स्वत:ची अशी काही खास चव नसते; त्यामुळे काजू, बदाम, खारीक, सुक्या नारळाचा कीस, गूळ वगैरे मिश्रणात योग्य प्रमाणात डिंक घालून लाडू बनवला जातो. साहजिकच या सर्व पदार्थतून मिळणारे प्रथिने, मॅग्नीशियम, लोह, ई जीवनसत्त्व, फायबर इत्यादींमुळे थंडीच्या दिवसात शरीरास योग्य पोषण मिळते.
3. नाचणी लाडू – नाचणी हे धान्य रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते त्यामुळे मधुमेह पीडितांसाठी वरदान आहे. हिवाळ्यात नाचणी, कणिक, तूप, गूळयुक्त लाडू खाणे यासारखा आनंद नाही. नाचणीच्या लाडूला थोडीफार चॉकलेट सारखी चव लागते. त्यामुळे लहान मुलांना थंडीच्या दिवसात पौष्टिक लाडू द्यायचा असेल तर नाचणी लाडू हा चांगला पर्याय आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फायबरयुक्त नाचणी थंडीच्या दिवसातील अपचनाची समस्या दूर करते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.
4. अळीव लाडू : कॅल्शियम, Iron, Folic Acid, ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्व, Proteins यांनी परिपूर्ण असे अळीव शरीरात प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे थंडीत अळीव लाडू खाल्ले जातात. नारळाचा रस, खोबरे, गूळ यांचा योग्य प्रमाणात वापर करून अळीवाचे लाडू बनवतात. अळीव पचन कार्य सुलभ करते, यकृत आणि पित्ताशयाच्या तक्रारीवर गुणकारी ठरते. थंडीमुळे कफ, खोकला, दम लागणे यावर अळीव लाडू हा एक चांगला उपाय आहे.
5. तीळ लाडू : थंडीचे दिवस आणि तिळाचे लाडू खाल्ले नाही असे होणे नाही. मकर संक्रांतीमुळे तिळाच्या लाडूचे विशेष महत्व आहे. मात्र एरवीसुद्धा तीळ हे आरोग्यकारी धान्य मानले जाते. तिळामध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन ई, लोह, कॅल्शियम, fibre, Omega-6 Fatty Acid, आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. तीळ हृदयसाठी अत्यंत उपयुक्त असते कारण ते Bad Cholesterol कमी करण्यास मदत करते. तीळ आणि गूळ हे चांगले फायबर स्रोत आहेत. त्यामुळे पचन कार्य सुधारते आणि आतडया मजबूत होतात. तीळ खाल्ल्याने रक्तातील पांढऱ्या पेशींची वाढ होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात रोगप्रतिकरक शक्ति वाढावी यासाठी तिळाचा लाडू अवश्य खावा.
6. जवस लाडू – तिळासारखेच जवस हे धान्यसुद्धा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. जवस हे उष्ण प्रकृतीचं असल्याने थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यावर गुणकारी आहे. जवसाचा लाडू करताना त्यामध्ये कणिक, बदाम, थोडे तीळ, गूळ, वेलची ई. साहित्य वापरतात. यामुळे शरीरास मुबलक प्रमाणात फायबर मिळते. जवसाच्या बियांची पूड करून दुधामध्ये घालून प्यायल्यास सांधेदुखी कमी होते. तसेच त्यामधील अॅंटी-ऑक्सिडेन्ट गुणधर्मामुळे थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, केसात कोंडा होणे या समस्यांसाठी जवसाचा लाडू खात्रीलायक उपाय आहे.
7. खारीक लाडू – खारीक हा उर्जेचा मोठा स्त्रोत आहे. संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की केवळ 2 खारीक खाऊन शरीरास जवळपास 110 कॅलरी ऊर्जा मिळते. पोटॅशियम, तांबे, जस्त, फायबर, व्हिटॅमिन सी, Carbohydrate, लोह यासारख्या पोषकद्रव्याने युक्त असे खारीक नियमितपणे खाल्ल्याने पोटाशी संबंधित व्याधी बऱ्या होतात. हाडे मजबूत बनतात. खारीक हे कडक स्वरूपात उपलब्ध असल्याने खाताना शक्यतो भिजवून खाल्ले जातात. तसेच लाडू बनवताना त्याची पूड करून त्यात खोबरे, गूळ, इतर सुकामेवा, वेलची वगैरे पदार्थ घालून लाडू वळले जातात.
8. सुंठ लाडू – चवीला तीव्र असलेली सुंठ Dry Ginger Powder खाण्यास तसे कोणी फार उत्सुक नसते. कधी प्रसाद स्वरूपात दिली तर थोडीशीच खाल्ली जाते. मात्र ही सुंठ अनेक औषधी गुणधर्माने युक्त आहे. थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवते. सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी आहे. पचन कार्य चांगले होते. आमवात, उलटी, पोटात जळजळ, गॅस होणे अशा तक्रारींवर त्वरित आराम देते. थंडीत भूक मंदावली असेल तर सुंठ लाडू खावा, त्याने भूक वाढते. सुंठपावडरमध्ये गूळ आणि तूप टाकून अगदी छोटे छोटे लाडू बनवतात. बरेचदा थंडीच्या दिवसात अन्य पौष्टिक लाडू बनवताना त्यात थोडीशी सुंठ टाकली जाते.
9. उडीद लाडू – उडीद डाळ ही शक्तिवर्धक आहे. थंडीच्या दिवसात तीचे सेवन केल्याने थकवा, कमजोरी दूर होते, ताकद मिळते. रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे हृदय चांगले राहते. उडीद डाळ भाजून तिची पूड करून सुकामेवा, गूळ, डिंक वापरुन लाडू बनवले जातात. हिवाळ्यात सांधेदुखी, कंबरदुखीवर मात करण्यासाठी उडीद डाळीचे लाडू नक्की खावे. शारीरिक व्याधीसोबत मानसिक ताण, तणाव, नैराश्य हलके करण्यासाठी उडीद लाडू नक्कीच मदत करते. Helps to reduce Mental Stress, Tension, Depression etc
10. गव्हाच्या पिठाचे लाडू – गव्हाचे पीठ, बेसन, डिंक पावडर, सुकामेवा, गूळ, वेलची, तीळ, खसखस, सुंठ पावडर, तूप असे दमदार घटक असलेले गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे लाडू बनवणे हे कौशल्याचे काम आहे. मात्र हा लाडू तेवढाच पौष्टिक आणि चवदार आहे हे नक्की! थंडीच्या दिवसात शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्यास ती कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठाचे लाडू खावेत.
एवढ्या सगळ्या प्रकारच्या लाडवांचे वर्णन ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल. वर उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व लाडूंमध्ये जे पदार्थ वापरतात ते आपल्या नेहमीच्या स्वयंपाकघरात आढळणारे आहेत. प्रत्येक घटक हा आरोग्यास उपयोगी असल्याने हे लाडू अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असतात.
थंडीमध्ये खाण्याचे पौष्टिक असे 10 लाडू 10 types of ladoos in Marathi ही माहिती आपणास कशी वाटली ते नक्की सांगा. विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख तसेच कथा वाचण्यासाठीमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला भेट देत रहा. माझा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाबद्दल काही सूचना करायच्या असतील तरी तुमच्या सूचनांचे स्वागत राहील. अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमचा wtsapp ग्रुप जॉइन करा.
Kavita Samant Nayak
धन्यवाद!