What is Finance ? Types and Importance of  Finance in Marathi 2024

WhatsApp Group Join Now

What is Finance ? Types and Importance of  Finance in Marathi 

फायनान्स म्हणजे काय ? 2024 मध्ये महत्व आणि फायनान्सचे प्रकार

“ फायनान्स ” हा शब्द अलीकडच्या काळात खूप सहजतेने वापरला जातो . पण बरेचदा आपण वापरत असलेल्या शब्दांना मायभाषेत समजून सांगणे किंवा त्याचा तंतोतंत अर्थ सांगता येणे अवघड वाटते . यासाठी आजच्या या लेखामधून फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे महत्व , त्याचे  प्रकार , त्याचे एकूणच कामकाज कसे चालते हे बघूया. 

  1. “ फायनान्स ” म्हणजे काय ?
  • कुठलेही काम करताना किंवा सेवा – सुविधा देताना त्याच्या मोबदल्यात जी किंमत मोजली जाते ते म्हणजे वित्त !  याचे दृश्य स्वरूपाचा वापर आपण रोजच्या व्यवहारामध्ये करतो ते म्हणजे अर्थातच पैसे ( चलन ) . 
  • कुठलाही लहान व्यवहार असो किंवा अगदी दोन देशांमधील मोठा व्यवहार असो , आपल्याकडे किती पैसे आहे , ते कसे वापरले पाहिजे , शिल्लक रक्कम , बचत आणि गुंतवणूक या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणे म्हणजे आर्थिक व्यवस्थापन करणे होय .
  • थोडक्यात , पैशाच्या विनियोगाची आखणी करणे आणि त्या प्रमाणे अमलबजावणी करणे. 
  1. फायनान्स चे  प्रकार  : 
  • मुख्यतः फायनान्स चे तीन प्रकार आहे..कुठलाही प्रकार बघितला तर तुमच्या लक्षात येईल की स्वरूप लहान असो किंवा मोठे प्रत्येक प्रकारचे कार्य हे  एकाच साचेबद्ध पद्धतीने पूर्ण केले जाते. 

 ते कसे हे आता  सविस्तर समजून घेऊ . 

  • वैयक्तिक वित्त ( पर्सनल फायनान्स )
  • निगम वित्त ( कॉर्पोरेट फायनान्स )
  • सार्वजनिक वित्त ( पब्लिक फायनान्स ) 

वैयक्तिक वित्त ( पर्सनल फायनान्स ) : 

जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार करता स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वित्त व्यवस्थापनाशी निगडीत गोष्टींचा निर्णय घेते तेव्हा हे वैयक्तिक वित्त या प्रकारात येते.

  • यात व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैश्याची जुळवाजुळव करतो . त्यातील किती रक्कम  घरखर्च , मुलांचे  शिक्षण , आरोग्य , बचत , गुंतवणूक , आपत्कालीन परिस्थिती साठी बाजूला काढायची हे ठरवतो . त्याप्रमाणे पैशाचे नियोजन करून उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत असतो. 
  • त्याचप्रमाणे भविष्यातील तरतूद करणे आणि निवृत्ती नंतर चे आयुष्य सुखात जगता यावे यासाठी देखील प्रयत्नशील असतो. 
  • या सर्व महत्त्वाच्या गोष्टी वैयक्तिक वित्त म्हणजे पर्सनल फायनान्स मध्ये येतात. 

निगम वित्त ( कॉर्पोरेट फायनान्स ) : 

  • एक पायरी वर चढून विचार केल्यास , जेव्हा एखादी संस्था सुरू करण्यासाठी किंवा शाखा विस्तारासाठी कर्ज स्वरूपात निधी गोळा करते तेव्हा त्या रक्कमेचे व्यवस्थापन करणे हे सर्व निगम वित्त म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स मध्ये येते. 
  • संस्थेचे कामकाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचे व्यवस्थापन देखील तेवढ्याच क्षमतेने होणे गरजेचे असते . कर्ज मंजूर करण्यापासून ची सगळी प्रक्रिया ते कर्ज मिळाल्यानंतर त्या रकमेचा योग्य प्रकारे योग्य ठिकाणी वापर होणे ,संस्थेच्या सेवा – सुविधा योग्य प्रकारे ग्राहकापर्यंत पोहचत आहे का ? त्यातून होणारा नफा-तोटा याचे ठोकताळे बांधून उरणारी रक्कम कशात गुंतवणे याचा अभ्यास करणे
  • नवीन विस्तारासाठी  जागा , यंत्रे आदी उपकरणांचा खर्च याचा हिशोब ठेवणे . 
  • घेतलेल्या कर्जाचे व्याज वेळेत भरत राहणे अशा अनेक गोष्टींचे नियमित व्यवस्थापन म्हणजेच निगम वित्त होय.या व्यवस्थापनेसाठी मोठ्या हुद्दयावर तज्ञ व्यक्ती कार्यरत असतात. त्यांच्या सखोल ज्ञानाचा  उपयोग संस्थेला होत असतो. वित्त संबंधी सर्व निर्णय घेणे त्याच्या अभिप्रायाने घेतले जातात.   

मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यात फरक काय ? वाचा या लिंक मध्ये

सार्वजनिक वित्त ( पब्लिक फायनान्स ) : 

  • एखादा देश चालवण्यासाठी जेव्हा त्या देशाचे सरकार त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाचे आणि कर स्वरूपात जमा होत असणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन ज्या प्रकारे करत असते त्याला सार्वजनिक वित्त 

( पब्लिक फायनान्स ) असे म्हणतात . 

  •  देशाचे आर्थिक बजेट तयार होताना या सर्व बाबींचा बारकाईने विचार केला जातो .राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रांचा विस्तार आणि विकास यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक विभागाला पैशाचा योग्य पुरवठा होणे गरजेचे असते . 
  • देशाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण विकास महत्वाचा असतो यासाठी सरकारी सल्लागार नेमून दिले असतात. तज्ञ व्यक्ती आणि सल्लागार मिळून सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत असतात. 
  1. फायनान्स महत्व : 
  • पैशाचे महत्व आणि मोल जाणणारा प्रत्येक व्यक्ती आज धावपळ करतो , पैसा मिळावा म्हणून  अहोरात्र कष्ट घेतोय . मात्र या पैशाचे नियोजन , त्याचे व्यवस्थापन यामध्ये जर कोणी कमी पडत असेल तर केलेल्या कष्टावर पाणी पडल्यासारखे होईल. 
  • आज विविध आघाडीवर भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरण्याच्या प्रयत्नात आहेत , असे असताना भारताच्या प्रत्येक नागरिकांनी देखील खारीचा वाटा उचलत आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे गरजेचे आहे.
  • शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर राहण्याचे जसे असंख्य तोटे आहेत तसेच आर्थिकदृष्ट्या निरक्षर राहण्याचे देखील अनेक तोटे आहेत. 
  • पैसे मिळवणे , मिळालेल्या पैशाच्या खर्चा नंतर उरलेल्या पैशाची बचत आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक या आर्थिक व्यवस्थापनामुळे भविष्यात तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या स्वप्नाना तुम्ही हवा तो आकार देऊ शकतात. 
  • स्वतःच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आज शालेय शिक्षणात देखील पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन शिकवले जाते. 
  • आज शेअर मार्केट , म्युच्युअल फंड , सोने , जमीन , मालमत्ता असे गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत , या सर्व गोष्टींचे ज्ञान असल्याशिवाय यात पैसे गुंतवून नफा कसा मिळवायचा हे कसे कळणार ?  यासाठी प्रत्येकाला फायनान्स चे महत्व कळले पाहिजे .
  1.  वित्तीय संस्था – आर्थिक सल्लागार आणि त्यांचे कार्य   : 
  • आज विविध क्षेत्रात व्यवसाय किंवा संस्था स्थापनेसाठी अनेक वित्तीय संस्था उपलब्ध आहेत जे तुम्हाला भांडवल उभे करायला मदत करू शकतात. केंद्र सरकार नवनवीन योजने अंतर्गत कर्ज सवलतीच्या दरात उपलब्ध करायला मदत करते. 
  • वित्त उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचा , सहज आणि सोपा पर्याय म्हणजे बँक . 

बँक विविध प्रकारच्या कर्जाची सुविधा लोकपर्यंत पोहोचवते .

  1. कार्य   
  • पैशाचे व्यवस्थापन बघणे. खर्च कुठे होतो , किती पैसे शिल्लक आहे , शिल्लक पैशाचा वापर ठरविणे.  पैसे बचतीकडे कल वाढविणे. गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे.  
  • कर्ज उपलब्ध करून देणे. 
  • कर्जासाठी कमी दराने व्याज मिळवून देणे. 
  • महिला नवउद्योजकांसाठी आकर्षक कर्ज योजना राबविणे .
  • अशा वित्तीय संस्था देखील फायनान्स चे महत्व जाणून सर्वसामान्य लोकांना पैशाच्या व्यवस्थापणेसाठी मदत करत असतात.  
  • आर्थिक सल्लागार कायदेशीर रित्या सर्व गोष्टींची माहिती देतात . तज्ञ व्यक्ती अनुभव असल्यामुळे योग्य काय ? अयोग्य काय ? या व्यवस्थापनाच्या गोष्टी लोकापर्यंत पोहोचव्या यासाठी मदत करत असतात.
  1.    आर्थिक व्यवस्थापन आणि प्राधान्यता : 

आपण फायनान्स म्हणजे काय ? त्याचे प्रकार , महत्व हे सर्व वर जाणून घेतले , पण हे सर्व जरी जाणून घेतले तरी अति महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक व्यवस्थापन करताना प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. 

  • वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन करताना बऱ्याचदा पैसे अनावश्यक वस्तूसाठी खर्च केले जातात आणि गरजेच्या गोष्टी राहून जातात. असं तुमच्या सोबत होत असेल तर प्राधान्य ठरवा , उत्पन्नाचा स्त्रोत एकच असेल तर हात राखून खर्च करा. 
  • घराचे हप्ते ,मुलांचे शिक्षण , औषधोपचार , आरोग्य विमा ,जीवन विमा , आपत्कालीन खर्च या नंतर सुरू होते ती बचत , गुंतवणूक आणि मग हौस मौज !  मात्र काही जणांची इथेच गफलत होताना दिसते. आपल्या नकळत आपण अनावश्यक वस्तूवर खर्च करतो आणि आर्थिक व्यवस्थापणेचे गणित बिघडते . 
  • आपल्याला कुठे पैसे खर्च करायचे नाही हे देखील कळणे तितकेच महत्वाचे आहे !
  • उत्पन्न आल्यानंतर पैसे खर्च होण्याच्या अनेक वाटा आधीच तयार झालेल्या असतात. मात्र प्राधान्यता या तत्वावर काम केल्यास व्यवस्थापणेचा मार्ग सुकर होईल हे निश्चित !

4 thoughts on “What is Finance ? Types and Importance of  Finance in Marathi 2024”

    1. धन्यवाद. असेच चांगले आणि माहितीपूर्ण लेख नियमितपणे देण्याचा प्रयत्न राहील.

  1. तन्मय देशपांडे

    शब्दरचना उत्तम आहे.
    म्युच्युअल फंड बद्दल अधिक माहिती मिळेल का ?

    1. धन्यवाद.
      लवकरच नवीन विषय घेऊन येत आहे . तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करू .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top