“मी भाजी पोळी अजिबात खाणार नाही. मला एक चिप्स चे पाकीट आणि पिझ्झा हवा.”किंवा “रोज रोज वरण-भात काय खायचं ग आई?आज आपण संध्याकाळी चायनीज खायला जाऊ”असे संवाद घरोघरी आपल्याला ऐकायला मिळतात. साधारणतः बाल आणि तरुण मुलांकडून अशी वाक्ये आपल्या कानावर पडतात. यात मध्यमवयीन लोकं सुद्धा मागे नाहीत. त्यांना सुद्धा असे अन्न खायला खूप आवडते.
यांत पिझ्झा, बर्गर चिप्स, नूडल्स केक किंवा रेडी टू असे अन्नाचे पॅकेट्स, यांना जंक फूड असे म्हणतात. मग हे जंक फूड आहे तरी काय?
जंक फूड म्हणजे काय? What is junk food
ज्या अन्नामध्ये चरबी, मीठ आणि साखर जास्त प्रमाणात असते. व जे बाजारात तयार मिळते. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यासारख्या पोषक तत्त्वांचा अभाव असतो. त्याला जंक फूड असे म्हणतात. यामध्ये भरपूर उष्मांक असतात. या प्रकारचे अन्न खाताना खूप मजा येते. त्याची चव पण खूप छान असते. विशेषतः लहान मुलं आणि तरुण मुलं हे जेवण खूप आनंदाने खातात.
जंक फूडची गरज का पडली?
पूर्वी पारंपरिक पदार्थ खाल्ले जायचे जसे की पोहे, उपमा, थालीपीठ, पोळ्या, पराठे. त्या काळात स्त्रिया या घरी असायच्या त्यामुळे मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांनाच त्या गरम गरम पदार्थ करून देण्याकरता सदैव तयार असायच्या. काळ बदलला स्त्रिया पण नोकरी करू लागल्या. त्यामुळे त्यांना स्वयंपाक घरात जास्त वेळ देता येणे कमी झाले. म्हणूनच लवकर तयार होणारे आणि खाण्या साठी तयार असणारे असे अनेकविध अन्न बाजारात मिळायला लागले. अनेक कंपन्यांनी यामध्ये आपली भागीदारी नोंदवली व वेगवेगळ्या प्रकारचे जंक फुड मिळायला लागले ते दिसायलाही छान होते. त्याची वेष्टने निरनिराळया रंगात असल्या मुळे सगळ्यांनाच ते आकर्षित करू लागले. त्यामुळे त्याची मागणी पण खूप वाढली. पश्चिमात्य जगात विशेष करून जंक फुडचा वापर अमर्यादित आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन लोकांनी भरभराटीच्या काळात अधिक खर्च व खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपभोगवादाची संस्कृती फुलू लागली व या इच्छेचा परिणाम म्हणून बाहेर खाणे ही एक सामान्य घटना बनली. पारंपारिक कौटुंबिक रात्रीच्या जेवणाची जागा या खाण्याच्या वापराने घेतली. परिणामी अन्न तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी होत चालला आहे.

जंक फूड का आवडते? Why Junk Food tastes great?
हे अन्न लवकर बनते. जास्त किचकट पदार्थ नसतात. कोणीही ते बनवू शकत. लहान मुलं सुद्धा त्याला बेक करू शकतात. चवही त्याची चटपटीत असते. जंक फूडला कुठेही घेऊन जाता येते. कुठेही बसून खाता येते . पेपरमध्ये गुंडाळून पण खाता येते. तरुणाईला हे पदार्थ खूप आवडतात. पश्चिमेकडे कडून आल्यामुळे त्याची नावे सुद्धा वेगवेगळी आहेत.
. लहान मुलांना हे पदार्थ अतिशय आवडतात. यात चीज खूप प्रमाणात आढळते जे मुलांना खूप आवडते.
जंक फूड मध्ये आढळणारे मुख्य घटक—
या मध्ये सामान्यत: अनेक रसायने आणि सिंथेटिक घटक असतात. ते उष्मांकदृष्ट्या जास्त, अत्यंत चवदार आणि पौष्टिकदृष्ट्या शून्य असतात. अतिरिक्त कॉर्न सिरप, साखर, कृत्रिम गोड पदार्थ, मीठ, कलरिंग एजंट आणि इतर संभाव्य रोगास उत्तेजन देणारी रसायने असतात.
जंक फूडमध्ये लपलेले सर्वात विषारी घटक असतात
पोटॅशियम ब्रोमेट.प्रोपीलीन ग्लायकोल.TBHQ. खूप विषारी पदार्थ आहे.कॅल्शियम सल्फेट.फॉस्फेट एडिटीव्ह .इतके रासायनिक पदार्थ खाल्ल्यावर, अर्थातच शरीरावर शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक परिणाम होतच असणार. जुवेल फार्मर या अमेरिकन डॉक्टरांनी म्हटले आहे की “we have these mass weapons of destruction on every Street corner called as junk food ” आता आपण हे पदार्थ खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात ते बघूया—–
जंक फूडचे दहा दुष्परिणाम (10 bad effects of junk food in Marathi)
१) या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढते— या अन्नामध्ये मध्ये खूप जास्त प्रमाणात उष्मांक, साखर आणि कर्बोदके असतात. तसेच मेदयुक्त पदार्थ सुद्धा असतात. त्यामुळे हे पदार्थ खाऊन व्यायाम न केल्यास लहान वयातील मुलांचे वजन वाढते.
जंक फूड मध्ये शरीराला आवश्यक तत्त्वांचा अभाव असल्यामुळे चयापचयाचे कार्य बिघडू शकते. अन्न नीट पचना करता खनिजे ,पोषक तत्त्वे, प्रोटीन्स, जीवनसत्त्वे यांची गरज असते. यांचा अभाव असणारे अन्न खाल्ले की, शरीरावर मांस वाढू लागते व वजन वाढते. मुख्यतः पोटाभोवती खूप चरबी वाढते. आजकाल लहान वयातच खूप वजन वाढलेले अनेक लहान मुलं आढळतात. हे वजन सुद्धा सहजासहजी कमी होत नाही. अशा मुलांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
२) हृदय रोगाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात—
या अन्नामध्ये मैद्याचे प्रमाण व तसेच चीजचे प्रमाण पण खूप जास्त असते. तसेच ट्रान्स फॅट्स चे सुद्धा प्रमाण खूप असते. ते शरीराच्या कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणू शकते.त्यामुळे हृदयातील धमन्यांमध्ये ते साठले जाते व खराब कोलेस्ट्रॉल (LDL)पातळी खूप वाढते. लहान मुले याचे खूप जास्त प्रमाणात सेवन करतात. व हवा तसा व्यायाम करत नाही. त्यामुळे त्याचे पचन होत नाही. या अन्नाचे उष्मांक ही खूप जास्त असतात. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित अनेक प्रकारचे रोग व्यक्तीला होतात.
३) मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते—
या खाण्या मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे लहान वयातच मधुमेह होण्याची शक्यता असते. जास्त वयाच्या व्यक्तींनी जर ह्या अन्नाचे सेवन केले तर त्यांच्या रक्तात आधीच वाढलेली साखरेची पातळी अजूनच वाढू शकते. हे अन्न खाल्ल्यामुळे भूक तर दूर होते. पण शरीराला पोषण अजिबात मिळत नाही. या प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे इन्सुलिनच्या प्रतिकाराला चालना मिळते. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते व मधुमेह होतो. यात टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
४) त्वचेशी संबंधित रोग होतात—
अति प्रमाणात साखर आणि कार्बोहाइड्रेट यासारखे उच्च ग्लासेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमुळे त्वचेमध्ये तेलकट पदार्थ असलेल्या सीबम चे उत्पादन सुरू होते. जास्त सीबम उत्पादनामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि मुरूमांचा विकास होतो. त्वचेची जळजळ होते. झालेली मुरमे बरे होण्यास खूप त्रास होतो. त्यासाठी त्वचेच्या डॉक्टरशी संपर्क साधावा लागतो. त्वचेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या आहारात अजिबात नसतात. यामध्ये अस्वास्थ्यकारी चरबी, शर्करा, आणि प्रक्रिया केलेले घटक खूप असतात. त्यामुळे त्वचेचा दाह होतो.
५) मानसिक रोग जडतात–
जंक फूड मध्ये मोनोसोडियम ग्लूटामेटचा चा खूप वापर केला जातो. ज्याचा मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. हे प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यामुळे मुलांचा ताणतणाव वाढतो व ते निराश होतात. एकाच जागी बसल्यामुळे त्यांची विचार करण्याची प्रक्रिया खूप मंदावते. साखर आणि कर्बोदकांमुळे ऊर्जा खूप कमी होते. त्यामुळे मूड स्विंग्स तयार होतात. यामुळे डोपामाईन आणि आणि सेरोटिनीन ही आनंदी संप्रेरके तयार होणे थांबते. अशी मुले किंवा व्यक्ती खूप चिडचिड करतात.त्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. अतिक्रियाशीलता, आचरण समस्या, भावनिक समस्या, समवयस्क समस्या यासारख्या अनेक मानसिक समस्यांना या मुलांना सामोरे जावे लागते.
६) दात किडतात व ठिसूळ होतात– या पदार्थांमध्ये असलेल्या आम्लामुळे दात ठिसूळ बनतात. तसेच अतिरिक्त साखरेच्या वापरामुळे दात किडतात. या पदार्थात असलेल्या रसायनांमुळे जीभ आणि हिरड्यांवर परिणाम होतो. सोडा, कँडी आणि बेक्ड पदार्थांमुळे दात लवकर सडायला सुरुवात होते. हिरड्यांचा रक्तस्त्राव, सूज ,श्वासाची दुर्गंधी, दातात पोकळी वाढण्याचा धोका अशा अनेक समस्या जंक फूड खाणाऱ्या मुलांना होऊ शकतात.
७) भूक आणि पचन बिघडते—
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक कुटुंबांमध्ये पौष्टिक अन्न खाण्यापेक्षा जंक फुडला मान्यता दिली जाते. यात उच्च उष्मांक असलेले पदार्थ शरीरामध्ये गेले व शरीराची काहीही हालचाल नाही झाली तर भूक लागत नाही. चयापचयाची क्रिया मंदावते व खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. आम्ल पित्त वाढते. पोटात जळजळ होते.पचन नीट झाले नाही तर भूक पण लागत नाही.
८) मुलांची सर्वांगीण वाढ अपुरी होते–हे अन्न खाल्ल्याने मुलांची शारीरिक भावनिक आणि मानसिक वाढ अपुरी होते.या प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये पोषण मूल्य शून्य असतात. असे अन्न खाल्ल्यामुळे मेंदूला नीट पोषण मिळत नाही व मुलांची मानसिक वाढ अपुरी होते. तसेच पोषक तत्व अजिबात नसल्याने शारीरिक वाढ पण खुंटू शकते. फक्त वजन वाढतं. त्याचप्रमाणे मेंदूला पण पोषण न मिळाल्यामुळे त्यांची भावनिक वाढ सुद्धा होऊ शकत नाही. अशी मुले अपरिपक्व असतात.
९) प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो–बहुतेक परिणाम तरुण वयातील मुलींवर होतो. जंक फूड खाल्ल्यामुळे खूप वजन वाढते व पीसीओएस सारखी समस्या निर्माण होते. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊन प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. या अन्नामध्ये वापरलेले कृत्रिम रंग, अन्न संरक्षक, प्रक्रिया केलेले मांस, डेअरी उत्पादने गर्भधारणे दरम्यान वंध्यत्वाचा धोका वाढवू शकतात.
१०) उच्च रक्तदाब होतो—
या पदार्थात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांवर दाब येतो.आधीच रक्तदाब असलेल्या, जास्त वयाच्या लोकांनी या पदार्थाचे सेवन केले, तर तो खूप वाढण्याची शक्यता असते.
असे अनेक दुष्परिणाम जंक फूड खाल्ल्यामुळे शरीरावर होत असतात तेव्हा शक्यतोवर हे अन्न खाणे टाळले पाहिजे व सकस आहार घेऊन, आपली शारीरिक मानसिक आणि भावनिक वाढ होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरता पालक आणि स्वतः मुलांनी काळजी घेतली पाहिजे. तरच एक पुढची सक्षम पिढी तयार होईल.
वरील लेखात दिलेल्या रासायनिक पदार्थांबद्दल माहिती हवी असल्यास
रसायन शास्त्रात पारंगत व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
वरील रोग बरे करण्यासाठी किंवा त्याच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुपही जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका— वैशाली देव( पुणे)
Wow.. very informative… eye opener too.👌🏻👌🏻
Thank you so much 🙏
Good information..
Thank you so much 🙏
Kharach khup chhan lihile aahe, sarvanni yacha vichar karun Amal karayala pahije
Thank you so much 🙏
so informative
खूप छान उपयोगी माहिती आहे
धन्यवाद 🙏
Thank you so much
Real fact .. knowing the bad effects …must change the lifestyle !!!
धन्यवाद 🙏
Khup mahitipurvak hota he article! Very nice!
Thank you so much 👍
Very usefull, easy to understand and informative article. Must read.
Thank you so much 🙏
Thank you so much 👍
“Bunk” the Junk….. lifestyle changes are a must….Learn to say “NO” should be the mantra…nicely compiled information.A must read.
Thank you so much 👍
Nice information.
Young generation is also aware of it along withphysical excecise.
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली… 👌
सर्वांनाच उपयोग होईल अशी माहिती मिळाली 👌👌