स्त्रियांसाठी 10 बिजनेस आयडिया l 10 business ideas for Woman

WhatsApp Group Join Now

10 business ideas for Woman to earn:नुकताच जगभरात जागतिक महिला दिन साजरा झाला. आजच्या स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्याही तितक्याच कष्ट आणि कमाई देखील मिळवत आहेत. अशात भारताचा विचार केला तर अजूनही लाखो महिला आहेत ज्या निव्वळ गृहिणी आहेत.खरंतर गृहिणी म्हणजे 24 तास ऑन ड्युटी असतात स्त्रिया. तरीही बऱ्याच स्त्रियांना आपल्या पार्टनरला आपली मदत व्हावी,आपल्या घराला आपला आर्थिक हातभार लावावा असं वाटतं असतं. अशा स्त्रिया घराबाहेर पडू शकत नसल्या तरी त्यांच्यासाठी असे काही व्यवसाय आहेत जे त्या घरी बसून करू शकतात.

खरंतर कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याची आधी संपूर्ण माहिती असायला हवी.तसेच त्यात होणारा नफा,तोटा याबाबत सजग असायला हवं. आपलं नेमकं कौशल्य काय आहे हे ओळखून व्यवसायात उतरायला हवं,ना की सगळे करतायत म्हणून आपण ही करूया या विचाराने. आपण जो व्यवसाय निवडतोय त्यासाठी लागणारा वेळ, जागा,गुंतवणूक, साहित्य आणि त्यात भविष्य किती आहे याचा एक किमान ठोकताळा बनवायला हवा.आपली आवड आणि ग्राहकांची मागणी यात ताळमेळ बसतोय का हेही जाणून घ्यायला हवं. व्यवसायाचे उद्दिष्ट क्लिअर असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जो व्यवसाय निवडतोय त्याच भविष्य किती आहे अंदाजे, त्याची किती गरज आहे लोकांना याचा अंदाज असायला हवा.

तर आज अशाच 10 व्यवसायाबद्दल (10 Business Idea For Woman to earn) आपण जाणून घेणार आहोत,ज्यातून स्त्रियांना त्यांच्या स्वतःची कमाई मिळू शकते आणि सोबत समाधानही मिळतं.

10 business ideas for Woman to earn

1.कोचिंग क्लासेस – (Coaching Classes)

हा एक असा व्यवसाय आहे जिथे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाधानासोबत पैसा देखील मिळवून देऊ शकतो.तुम्ही ज्या शाखेतून पदवीधर आहात,ज्याविषयात तुम्ही पारंगत आहात किंवा तेज आहात त्याचा वापर आपण मुलांच्या शिक्षणासाठी करू शकतो.अगदी घरबसल्या पहिली ते सातवी ते दहावी पर्यंत च्या मुलांची ट्युशन घरी आपल्या वेळेनुसार घेऊ शकता.काळानुसार विद्यार्थी संख्येत जितकी वाढ होत जाते तितकी कमाई सुद्धा वाढत जाते. हल्लीच्या वाढत्या स्पर्धेत प्रत्येक आईवडीलांना वाटत असते की आपल्या मुलाने चांगले गुण मिळवावे, यात ह्या क्लासेसचा खूप मोठा हात असतो आणि त्यामुळेच तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल आणि एखाद्या विषयात तुम्ही पारंगत असाल तर हा व्यवसाय तुम्हाला नक्की चांगली कमाई देऊ शकतो.

2.योगा क्लासेस- (Yoga classes)

हल्ली सगळेच जण जवळपास फिटनेस फ्रिक वैगेरे झाले आहेत.सगळ्यांना आपल्या आरोग्याविषयी काळजी वाटू लागली आहे आणि त्यात शरीर आणि मन नीट ठेवण्यासाठी योगाहून मोठा उपाय नाही, कारण हल्ली म्हणलं सुद्धा जातं, योगा सेही होगा।

अशात तुम्हाला योगसाधनेतील काही गोष्टी कळत असतील, किंवा तुम्ही त्यातील काही शिक्षण घेतलं असेल,जर तुम्हाला स्वतःला सुद्धा फिट राहायला आवडत असेल आणि तुम्ही स्वतः रोज योगसाधना करत असाल,आणि तुमच्या काही यातल्या महत्त्वाच्या टिप्स,गोष्टी इतरांना सांगू शकत असाल तर हा देखील एक व्यवसाय होऊ शकतो.कमी गुंतवणूकीमध्ये हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यातून चांगली कमाई होऊ शकते.यात जर तुम्हाला आवड असेल तर यातले काही कोर्सही इंटरनेटवर असतात,या कोर्सद्वारे तुम्ही यात अजून पारंगत होऊन योगाकडे व्यवसायिक दृष्टीने बघू शकता.

यासोबतच अजून,योगा करण्यासाठीच्या कपड्यांचा व्यवसाय, योगाचे ऑनलाईन क्लासेस असेही तुम्ही घेऊ शकता.

3.रेसिपी/पाककला क्लास- (Recipes classes)

यात तर 90%बायका पारंगत असतातच.जय गृहिणी आहेत,ज्यांना जेवण बनवायला आवडतं, त्यांच्या रेसिपीची घरात सगळे फॅन असतात अशा स्त्रियांना आपल्या या कौशल्याला व्यवसाय बनवता येऊ शकतो. आज अजूनही बऱ्याच स्त्रिया किंवा पुरुषही असे आहेत ज्यांना बेसिक स्वयंपाक सुद्धा येत नाही अशांसाठी किंवा काहींना निव्वळ रेसिपी व्हिडीओ बघुनही स्वयंपाक जमत नाही अशा लोकांसाठी हे क्लासेस महत्त्वाचे आहेत.यासाठी तुम्ही आधी आपल्या आजूबाजूच्या अशा लोकांना काही गोष्टी शिकवल्या तर अजून जास्त माऊथ पब्लिसिटी होते आणि तुम्ही याचे क्लासेस सुरू करू शकता.

4.डान्स/नृत्य क्लास चा व्यवसाय :(Dance Classes)

जर तुम्हाला कोणताही डान्स फॉर्म येत असेल, कथक,बॉलिवूड किंवा इतर काही आणि जर तुम्ही यात पारंगत असाल तुम्हाला नाचायला आवडत असेल तर हा तुमचा व्यवसाय बनू शकतो.आजकाल वाढदिवस, लग्न समारंभ, शाळेतील कार्यक्रम यात अनेक ठिकाणी डान्स केले जातात, त्यासाठी आधी ते शिकले जातात,यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता.यासाठी तुम्ही घरी काही क्लासेस घेतले,किंवा कालांतराने एखादा स्टुडिओ सुरू केला तर यात खूप जास्त कमाई आहे.

5.कंटेंट रायटिंग- (Content Writing)

हे चालूच जग फार टेक्नॉलॉजीने परिपूर्ण होत चाललं आहे.अशात तुम्ही अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कंटेंट रायटिंग करू शकता.एका वेळी अनेक क्लाइन्ट्ससाठी फ्रिलांस पध्दतीने कंटेंट लिहू शकता.या व्यवसायाला पुढच्या काळात खूप जास्त मागणी आहे. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईटस आहेत जय तुम्हाला हे फ्रिलांस वर्क मिळवून देऊ शकतात.यातही खूप चांगली कमाई आहे.

6.यूट्यूब चॅनल-(YouTube channel)

आजच्या घडीला याची फार हवा आहे.असे लाखो युट्युबर आहेत ज्यांचं संपूर्ण घराचा खर्च युट्युब चॅनेलवरच चालू आहे.याअंतर्गत अनेक गोष्टी करता येऊ शकतात.vloging हा एक त्यातला पर्याय आहे,तसेच तुम्ही फूड, ट्रॅव्हलिंग, DIY, टेक्नॉलॉजी अशी तुमच्या आवडीच्या विषयात चॅनेल सुरू करू शकता आणि यात अगदी पाच आकडी ते सहा,सात आकडी इतकी कमाई वाढू शकते. यात सातत्य आणि चिकाटी हवी बस.

7.डिजिटल मार्केटिंग – ( Digital Marketing)

आजकाल आपला कुठलाही व्यवसाय असेल तरीही त्यासाठी सगळ्यात जास्त गरजेच आहे ते मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. बऱ्याच जणांचा व्यवसाय असतो पण त्यांना मार्केटिंग करता येत नाही. अशावेळी तुम्ही जर त्यात तरबेज असाल आणि तुम्हाला आवड असेल तर यातही खूप जास्त कमाई आहे. यासाठी तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता किंवा लोकांना डिजिटल मार्केटिंग कस करायचं याचे ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेसही घेऊ शकता.

8.ड्रेस/साड्या विकणे-(selling Dress/Saree)

या व्यवसायाला तर मरण नाही मंडळी.आपल्या भारतात आजही जास्त प्रमाणात स्त्रिया ह्या साडी नेसतात. अशात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या जर मिळत असतील तर.घरी बसून होलसेल साड्या,ड्रेस यातून चांगली कमाई होऊ शकते. ड्रेस/साड्या हा स्त्रियांच्या खुप जवळचा विषय असतो.अशात तुम्ही जर सुरवातीला कमीत कमी गुंतवणूक करून काही नवीन ट्रेंड नुसार किंवा काही वेगळ्या पद्धतीने साड्या,ड्रेस आणले आणि आपल्या आजूबाजूला, ओळखीतून तसेच इंटरनेटवर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विक्री केली तर यातून नक्कीच नफा होऊ शकतो.

9.डे केअर- (Day Care)

हे एक थोडं काळजीपूर्वक, सांभाळून जर काम केलं तर यातही चांगली कमाई आहे.हल्लीच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना एक फार मोठी वाट मिळते यातून पुढे जात राहण्याची.अशात तुम्हाला लहान मुलं आवडत असतील,त्यांची काळजी घेणं आवडत असतील तर हा व्यवसाय तुम्हाला समाधानासोबत चांगली कमाई सुद्धा होऊ शकते, आणि हळूहळू याचा अवाका वाढवू शकता.

10. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय- (Candles Making)

हल्ली हॉटेल,रेस्टॉरंट, स्पा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्ती वापरल्या जातात,त्याची मागणी वाढती आहे. तसेच त्या बनवणं हे देखील फार सोपं आहे.अशात अनेक ठिकाणी स्त्रियांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.आजच्या मॉडर्न युगात मेणबत्त्यांचा वापर डेकोरेशन साठी अधिक किंवा खूप जास्त प्रमाणात केला जात आहे. मोठमोठे इवेंट मॅनेजमेंट कंपनी, हॉटेल्स, बर्थडे एवेंट्स, anniversary आणि रेस्टॉरंटमध्ये त्याची मागणी खूप वाढत आहे. मार्केट मध्ये हल्ली अनेक प्रकारच्या मेणबत्तीची मागणी आहे. वेगवेगळ्या शेप, साईज, कलर यातील रंगेबीरंगी मेणबत्ती फार आकर्षक दिसतात.10 business ideas for Woman to earn  या बनवण्यासाठी इंटरनेटवर अनेक ठिकाणी याच्या ऑर्डर मिळतात. तुम्हाला यातून खूप चांगली कमाई होऊ शकते.

तर,तुम्ही यातला कोणता व्यवसाय करता का?तुमच्या आसपास अशा स्त्रिया आहेत का ज्या घरबसल्या स्वतःच काही करू इच्छित आहेत,तर हा 10 business ideas for Woman लेख त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा आणि हा लेख तुम्हाला कसा वाटला?हे सगळं आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत देखील शेअर करायला विसरू नका;आणि अशीच नवनवीन माहिती आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

8 thoughts on “स्त्रियांसाठी 10 बिजनेस आयडिया l 10 business ideas for Woman”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top