10 minutes Shivaji Maharaj Speech in Marathi :सर्वप्रथम रयतेचा राजा!शत्रूंचा कर्दनकाळ!जिजाऊंचा पुत्र! प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतास,श्रीमंतयोगी राजाधिराज योयीराज, अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय.!
सन्माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व रसिक,इतिहास साक्षी आहे असा एकमेव राजा आहे ज्यांनी अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केलं,ते टिकवलं.गनिमी कावा करत शत्रूंना पाणी पाजलं आणि समाजातल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळवून दिला. एकेकाळी हिंदुस्थानात परकीयांच राज्य होतं. गुलामगिरी होती,मुघल आपल्या मराठी सैनिकांवर अत्याचार करत होते,स्त्रियांवर आत्याचार होतं होते तर अनेक स्त्रियांचे कुंकू पुसले जातं होते, शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हता.
जनता सर्व अन्यायाने पिळवटून निघत होती.अशा काळात यो दिवस उगवला ज्या दिवशी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला.जो दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. जो रयतेचा राजा झाला,जाणता राजा म्हणून उदयास आला.शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. शिवनेरी गडावरील आई शिवाईदेवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
तोफा कडकडल्या, सनई चौघडे वाजले,साऱ्या आस्मानात आनंदाची उधळण झाली कारण जिजाऊंच्या पोटी रयतेचा राजा जन्मला. आजच्या जगात जिथे म्हणलं जातं, की ‘शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात’! अशात त्या काळी माँ जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवबावर उत्तम संस्कार करून त्यांना एक आदर्शवादी व्यक्तीमत्त्व घडवले.
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच स्वप्न पाहिलं आणि तशी घैडदौड देखील सुरू केली.शिवाजी महाराज लहानपणापासूनच खोडकर आणि धाडसी होते.जिजाऊ त्यांना शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ त्यांना सांगत, की शिवबा आपला जन्म हा सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नसून गोरगरिबांना,रंजल्या गांजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. जिजाऊंच हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरणा उभारले.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।
स्वराज्य निर्मितीच्या कार्यात महाराजांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं पण त्यांनी कधीही हार मानली नाही. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहाने त्याचा पराभव होऊ शकतो. यासगळ्या स्वराज्य निर्मितीत महाराजांना साथ लाभली ती त्यांच्या मावळ्यांची.तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, सूर्याजी, मुरारबाजी, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे असे अनेक मावळे त्यांना लाभले.10 minutes Shivaji Maharaj Speech in Marathi
जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता.
स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा
फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता!
शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गडकिल्ले जिंकले,त्यात तोरणा गड हा वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी जिंकलेला पहिला गड म्हणून ओळखला जातो.याशिवाय राजगड,लोहगड,विजयदुर्ग,रायगड, पन्हाळा, सिधुदुर्ग,मुरुड जंजिरा,प्रतापगड,सिंहगड असे अनेक गड आहेत.सिंहगड जेव्हा जिंकला त्यावेळी तानाजी मालुसरे यांना मात्र वीरमरण आले आणि त्यावेळीच महाराजांनी शब्द उच्चारले, ‘गड आला पण सिंह गेला.!महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ऐकून160 किल्ले जिंकले.
06 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि ‘छत्रपती हे पद त्यांनी धारण केले.छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा.याचवेळी त्यांनी राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आणि पदे आणि कामगिरी वाटून दिली.
शिवाजी महाराजांनी केलेली राजमुद्रा ही संस्कृत मध्ये आहे.आपली संस्कृती टिकावी,ती वाढावी हा त्यामागचा उद्देश असावा.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।
शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥
याचा मराठीत अर्थ असा होतो की,
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
शिवाजी महाराज फक्त राजेच नव्हते तर ते एक युगपुरुष होते,प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले,शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले.संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव,स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागणारे होते.शत्रूंसाठी कर्दनकाळ होते,अफजलखानाचा वध ही ठळक घटना आपल्या सर्वांना आठवत असेलच.याघटनेचे पोवाडे आजही आपल्या अंगावर शहारे आणतात.प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्या शामियान्यात अफजलखानाने भेटीदरम्यान केलेला दगा आणि त्यालाच प्रतिउत्तर म्हणून महाराजांनी घातलेल्या चिलखतातून काढलेली वाघनखे आणि त्याने बाहेर काढलेला अफजलखानाचा कोथळा.किंवा जेव्हा शाहिस्तेखानाने आपल्या सव्वा लाख फौजेला घेऊन स्वराज्यावर चाल केली.ही सर्व फौज लालमहाल घेरून होती,त्यातही महाराजांनी चाल करत शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
सगळ्या घटना आजही आपल्याला महाराजांच्या तल्लख आणि जागरुकतेची ग्वाही देतात.
सिंहाची चाल, गरूडाची नजर,
स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन,
असेच असाव मावळ्यांचे वर्तन,
हीच शिवरायांची शिकवण!!
शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासन हे महाराजांच्या स्वराज्याची प्रमुख वैशिष्ट्य होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड आयुष्य रयतेच्या सेवेत घातलं.महाराजांच्या आधीही राजे महाराजे होऊन गेले आणि तीनशे वर्ष उलटून नंतरही अनेक राजेमहाराज होऊन गेले पण असा कुशल प्रशासक, जाणता राजा आजही एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
आणि एक दिवस असा उगवला की 3 एप्रिल1680 रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आणि एक आदर्श, पराक्रमी, प्रजाहितदक्ष राजा काळाच्या पडद्याआड गेला. 50वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी जी कारकीर्द निर्माण केली त्याचे पुरावे आजही 300वर्षानंतर सुद्धा दिसून येतात.एकाच एवढ्या आयुष्यात पुढील हजारो लाखो वर्षे लोकांच्या मनात घर निर्माण करून राहणे हे कुणाचंही काम नाही त्यासाठी लागतात ते फक्त शिवछत्रपती. त्यांनी निर्माण केलेले गड,किल्ले आजही याचा पुरावा देतात.
महाराजांचे विचार आजच्या काळातही आपल्याला प्रभावित करतात,शत्रूला कमजोर समजू नका, तर त्याला खूप बलवान मानून घाबरू देखील नका. स्वराज्यनिर्मितीची प्रतिज्ञा,स्वराज्याचे तोरण,गड आला पण सिंह गेला,प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका,शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची माहिती सांगतात.
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुध्द लढण्याचा इरादा नेक होता, असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एकच होता.!
महाराजांचे विचार आजच्या काळात आपल्या प्रेरणा देतात जसे की सर्व प्रथम राष्ट्र,मग गुरु,मग आई-वडील,मग देव.. म्हणून आधी स्वतःकडे न बघता राष्ट्राकडे बघावे.!
आजच्या जगात ज्याची जास्त गरज आहे ती महाराजांच्या विचारांनी चालण्याची ना की फक्त त्यांच्यासारखी दिसन्याचा हट्ट करण्याची किंवा गाडीवर त्यांचा फोटो लावण्याची.महाराजांनी कधीही स्त्रियांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना माफ केलं नाही त्यांना योग्य ते शासन दिले,परस्त्री मातेसमान हीच त्यांची शिकवण होती.हिरकणीची गोष्ट आपल्याला माहिती आहेच ना.आजही जय भवानी जय शिवाजी म्हणताना छाती गर्वाने फुलून जाते,अंगभर ही घोषणा संचार करते.आजवर किती आले आणि किती गेले पण, इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर,विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती. असा राजा पुन्हा होणे नाही..
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आणि कार्य आपल्याला आजही प्रेरणा देतात.आजच्या तरुण पिढीने निव्वळ मावळा म्हणवून न घेता महाराजांचे हे विचार जर आचरणात आणले तर त्याच आयुष्य सोन्यासारख लखलखल्या शिवाय राहणार नाही.कारण महाराज फक्त पुजायची नाही तर जगायची गोष्ट आहेत.
आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला नमन करून माझे काही शब्द संपवत आहे. जाता जाता एव्हढच म्हणावंस वाटत आहे की,
राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस.!आणि दारात तुळस,राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ..!
धन्यवाद.! जय जिजाऊ.!जय शिवराय.!
जय हिंद, जय महाराष्ट्र.!
तर तुम्ही कशी साजरी करता शिवजयंती?तुम्हाला 10 minutes Shivaji Maharaj Speech in Marathi शिवजयंती विषयी काय वाटते ? आणि हे भाषण तुम्हाला कसे वाटले?हे सगळं आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका.अशीच नवनवीन माहिती आणि लेख,भाषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhtsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखक- निलम घाडगे (पुणे)
Khup Chan!
धन्यवाद.!😊
Very Nice Speech👍👌
Jay Shivray
धन्यवाद.!😊
जय शिवराय 🙏🚩
धन्यवाद.!😊
Great 👍
धन्यवाद.!😊
खूप छान भाषण. जय जिजाऊ 🙏🏻जय शिवराय🙏🏻
धन्यवाद.
जय भवानी जय शिवाजी माहिती छान आहे. जय महाराष्ट्र
धन्यवाद.!😊
धन्यवाद.!😊