औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग l 5 Ayurvedic Plants Information in Marathi

WhatsApp Group Join Now

“आजी मला अजिबात बरे वाटत नाही .मला औषध दे “असे रियाने आजीला सांगितले. आजी तिला म्हणाली “अग रिया प्रत्येक गोष्टीसाठी औषध घेतलेच पाहिजे असे नाही. आपल्या देशामध्ये अनेक वनस्पती आहेत. त्यांची पानं, फुलं ,रस अनेक गोष्टी औषध म्हणून वापरल्या जातात.”आजकालच्या पिढीला यावर अजिबात विश्वास नाही. चल इथे बैस. मी तुला याची सगळी माहिती सांगते.” असे म्हणून तिने रियाला समोर बसवले व खालील माहिती सांगितली.

निसर्गाचे आपल्याला लाभलेले वरदान-

भारतीय संस्कृतीने नेहमीच निसर्गसंपदेला महत्त्व दिलेले आहे. परमेश्वराने आपल्याला भरभरून निसर्ग संपदा दिलेली आहे.

यामध्ये झाडे, , पशु, पक्षी, प्राणी तसेच खनिजे, पाणी, माती यांचा समावेश होतो. यातील प्रत्येक गोष्ट मानवी जीवनाला अत्यंत उपयोगी आहे. त्यातील एकाही गोष्टी शिवाय मानवी जीवन अशक्य आहे. या निसर्गसंपदेचे रक्षण आणि संवर्धन मानव अनेक वर्षांपासून करत आलेला आहे. कारण यात त्याचा स्वतःचाच फायदा आहे.

वनस्पती आणि वृक्षसंपदा-

वने ही औषधी वनस्पतींची भांडारं आहेत. झाडे आपल्याला जीवन देतात. झाडांचे अनेक उपयोग आपल्याला माहितीच आहेत. त्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. सावली मिळते. तसेच अनेक रोग निवारण शक्ती असलेल्या वनस्पती निसर्गात आढळतात. प्राचीन काळापासून मनुष्य त्यापासून औषधीयुक्त पदार्थ बनवत आलेला आहे. त्यातूनच आयुर्वेदाचा उगम झालेला आहे. प्राचीन भारतात अनेक ऋषीमुनींनी यावर संशोधन करून अनेक औषध निर्माण केलेले आहे. त्यावेळी घनदाट अरण्यात अनेक वृक्षसंपदा सापडायची. चरक, पतंजली यासारख्या अनेक ऋषीमुनींनी वनस्पतींवर अनेक प्रयोग करून औषधे तयार केलेली आहेत. भारतात ८०० वनौषधींचा औषध तयार करण्यासाठी वापर केला जातो.

वनस्पती आपले अन्न हरितद्रव्यांच्या मदतीने तयार करतात. या चयापचय क्रियेमध्ये अनेक रासायनिक द्रव्य तयार होतात. त्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. हे रसस्त्राव वनस्पतीच्या मुळात, बी, फुल, खोड, फांद्या यामध्ये साठवले जातात. या भागांचा वापर मग औषध तयार करण्यासाठी केला जातो.

म्हणूनच झाडांकरता संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे

“अहो एषां वरं जन्म सर्वप्राण्युपजीवनम्

धन्या महिरूहा येभ्यो निराशां यान्ति नार्थिनः”

म्हणजेच संपूर्ण मनुष्य जातीवर उपकार करणाऱ्या या झाडांचा जन्म धन्य आहे. ते कधीच याचकाला निराश करत नाहीत.

आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती मधील ३३टक्के वनस्पती या वृक्षवर्गीय आहेत. २० टक्के वनस्पती झुडुप वर्गीय आहेत.३२टक्के या रोपवर्गीय आणि १२ टक्के वेल वर्गीय आहेत.

उदाहरणा दाखल—-

वृक्षवर्गीय वनस्पती–आवळा, वड, पिंपळ

झुडुप वर्गीय वनस्पती-पुदिना, कोथिंबीर, तुळशी

रोपवर्गीय—कढीपत्ता, कोरफड 

वेलवर्गीय वनस्पती—गुळवेल, कपाळफोडी

अशा अनेक गुणकारी औषधी वनस्पतींची ही नावे आहेत, जी आयुर्वेदामध्ये वापरली जातात.

आता आपण काही वनस्पतींची माहिती बघूया. ज्या वनस्पती, रोजच्या जीवनात सुद्धा औषध म्हणून वापरल्या जातात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांकरता त्यांचे वेगवेगळे उपयोग असतात.

१) आवळा-

वर्णन–आवळ्याचे झाड एक वृक्षवर्गीय वनस्पती आहे. आवळा हे त्याचे फळ आहे. आयुर्वेदामध्ये आवळा, धत्री फळ किंवा अमृतफळ म्हणून ओळखला जातो. आवळा हा साधारण हिरव्या रंगाचा असतो. त्याची चव तुरट असते. ते एक लहान आकाराचे गोल फळ असते. ज्याचे अनेक उपयोग आहेत. आवळा हा आजीबाईंच्या औषधी बटव्यात महत्त्वाचं स्थान घेतो. आवळा अतिशय मौल्यवान आहे. त्यात खनिजे, जीवनसत्त्वे व अनेक पोषक तत्वे असतात. आवळा हे झाड, जंगलांमध्ये किंवा बागांमध्ये आढळते.

आवळ्याचे उपयोग–

   १) रोग प्रतिकारशक्ती- यामध्ये विटामिन सी भरपूर असल्यामुळे एक आवळा रोज खाल्ल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.आवळा ऍंटीऑक्सीडेंट असल्यामुळे शरीरावरची सूज आणि लालसरपणा कमी करतो.

२) हृद*य निरोगी ठेवण्यासाठी- आवळा हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य राखतो. नियमित आवळ्याच्या सेवनामुळे रक्तदाब सुद्धा सामान्य राहतो.

३) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी- संशोधनानुसार आवळ्यातील काही घटक इन्सुलिन वाढवण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. त्यामुळे नियमित आवळ्याचे सेवन केल्यास, डायबिटीस असलेल्या लोकांची साखरेची पातळी नियमित राहते.

४) यकृ*ताच्या समस्येवर उपाय–संशोधनात आढळून आले आहे की आवळ्या तील काही घटक यकृतातील हानिकारक रसायन बाहेर काढतात. तसेच आवळा उत्तम अँटीऑक्सिडंट असल्या मुळे यकृताचे कामकाज नीट करण्यात खूप उपयोगी ठरतो.

५) आम्ल*पित्त कमी करण्यास उपयोग–आवळ्याचा रस प्यायल्याने छातीतील जळजळ कमी होते.

आवळ्याचे दुष्प*रिणाम पण आहेत. त्याचा जास्त उपयोग केला गेल्यास, उ*लट्या आणि म*ळमळ यासारखे पोटाचे विकार उद्भवू शकतात.

२) कोरफड

-वर्णन–कोरफड ही रोपवर्गीय वनस्पतीमध्ये येते. त्याचे पान म्हणजे एक मोठा मांसल जाड असा काटेरी दात असलेला दांडा असतो. कोरफड आलो नावाच्या कुळातील ५०० प्रजातींपैकी एक आहे. पाने अतिशय जाड असून त्यामध्ये एक प्रकारचा घट्ट रस असतो. त्याचाच उपयोग औषधी म्हणून केला जातो. ही वनस्पती पाण्याशिवाय सुद्धा अनेक दिवस राहू शकते. कोरफडीला संस्कृत मध्ये कुमारी आणि इंग्रजीमध्ये ॲलो असे म्हणतात. कोरफडीला लहान लहान पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुले येतात. कोरफडी पासून कुमारी आसव नावाचे औषध तयार केले जाते.

कोरफडीचे उपयोग–

१) कोरफडीच्या पानांमधील गर हा औषधी म्हणून वापरला जातो. चेहरा उजळ करण्यासाठी हा गर लावल्या जातो.

२) कोरफडीचा गर आपल्याला झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी खूप मदत करतो. ते एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. त्वचेच्या विकाराकरता कोरफडीचा गर लावणे हे एक उत्तम औषध आहे.

३) कोरफडी मध्ये अमिनो ऍ*सिड, B1,B6 आणि विटा*मिन सी, ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच त्वचेचे विकार व तोंडात झालेली फोडे ही कोरफडीचा गर तोंडात लावल्याने लवकर बरे होतात.

४) कोरफड घेतल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यामध्ये विटामिन बी असल्यामुळे वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते.

५) कोरफड खाल्ल्याने छातीतली जळजळ पण कमी होते व वाढलेली ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

६) रक्ता*तील शर्करा कमी करण्यास मधु*मेहींनी रोज कोरफडीचा रस घेतल्यास मदत होते.

कोरफड सुद्धा प्रमाणाबाहेर घेतली गेल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

३) तुळशी

–वर्णन–तुळशी ही झुडुप वर्गीय वनस्पतीमध्ये येते. तुळशीची लागवड सुगंधी आणि औषधी वनस्पती म्हणून केली जाते.

या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये औषधोपचारासाठी खूप उपयोग केला जातो. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला अतिशय महत्त्व आहे. खूप पवित्र म्हणून मानली जाते. हे एक बारमाही झुडूप आहे. त्याची उंची साधारणतः एक मीटर पर्यंत असते. त्याची पाने हिरवी किंवा काळपट जांभळी असतात. तुळशीच्या झाडाला मंजिरी येतात. या मंजिऱ्यांपासून असंख्य बिया तयार होतात. तुळशीचे झाड प्रचंड प्रमाणावर ऑक्सिजन देते. दिवसातून वीस तास ऑक्सिजन तर चार तास कार्बन डाय-ऑक्साइड देते. तुळशीच्या अनेक प्रजाती सापडतात.

उपयोग—

१) तुळशीच्या पानांचा काढा प्यायल्यास सर्दी व खोकला यापासून आराम मिळतो. तसेच तुळशीची पाने चावून चावून खाल्ल्याने जळजळ कमी होते.

२) तुळशीची पाने त्वचा आणि केस याकरता सुद्धा लाभदायी आहेत.

३) तुळशीच्या पानांचा रस सेवन केल्याने मुख दुर्गंधी सुद्धा दूर होते.

४) तुळशीचे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास पचन सुधारते.    हे विषारी पदार्थ पोटातून बाहेर टाकण्यास मदत करते.

५) तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे रक्तदाब आणि को*लेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

६) मुरूम आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या त्वचेच्या रोगांशी सामना करण्यास तुळशीची पाने प्रभावी ठरतात.

७) तुळशीचा उपयोग हृदय*विकार आणि ताप दूर करण्यास केला जातो.तुळशीचे असे अनंत उपयोग आहेत. म्हणून तिला ‘औषधांची राणी’ असे म्हटले जाते. अर्थात त्याचा अति उपयोग सुद्धा दुष्परिणाम करतो.

४)गुळवेल

-वर्णन–ही वनस्पती वेलीय प्रकारात येते. गुळवेलीला गुडुची सुद्धा म्हणतात. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात. या वेलीचे सत्व औषध म्हणून वापरतात. म्हणून याला गुळवेल सत्व असे म्हणतात. तिच्या पानांचा रस कडू असतो. गुळवेलीचा उपयोग करताना त्याचे खोड वापरले जाते. गुळवेलीला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. म्हणून त्याला अमृता असे म्हटले जाते. गुळवेली मध्ये अनेक रासायनिक घटक असतात, जे अनेक प्रकारचे रोग बरे करायला मदत करतात. या वनस्पतीमध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबक्युलोसिस व एस्केनेशिया कोलाय हे आतडे आणि मित्र संस्थेवर परिणाम करणारे रोगाणू व विषाणू,कृमी आदि नष्ट करण्याची क्षमता आहे.

उपयोग-_-गुळवेलींची पाने व खोड यांचा औषध तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

१) , कृमी , पोटदुखी, अतिसार, पोटातील मुरडा, यासाठी गुळवेल सत्व उपयोगी असते.

२) उन्हाळ्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी उपयोगी असते .मेथीच्या पानांप्रमाणे ही भाजी करतात.

३) गुळवेलीतील पोषक घटक द्रव्यांमुळे शरीरातील रक्तपेशीं ची संख्या वाढण्यास उपयोग होतो.

गुळवेल सत्त्वाचे जास्त दुष्परिणाम नाही. पण म*धुमेहींनी हे जर मधुमेहाच्या औष*धांबरोबर घेतले तर रक्तातील शर्करा पातळी कमी होऊ शकते.

५) कडुलिंब

वर्णन–हा एक भारतीय उपखंडात सापडणारा वृक्ष आहे. याची पाने कडू असल्यामुळे याला कडुलिंब असे म्हटले जाते. हा एक ३० ते ६० फूट वाढणारा वृक्ष आहे. नऊ ते पंधरा इंच लांब देठ असते.

देठावर २ते३ सेंटीमीटर असलेली, करवती सारखे दात असणारी आठ ते दहा पाने असतात. कडुलिंबाला लहान पांढरे फुले असतात. फळे हिरवी व नंतर पिवळी होतात. त्यामध्ये एक बी असते त्याला निंबोणी किंवा लिंबोळी म्हणतात. या वृक्षाची पाने, फुले, बिया, साल सगळचं कडू असतं. या झाडाची साल काळी व खडबडीत असते.

उपयोग—-

१) कडुलिंबाचे झाड हवा स्वच्छ करते. तसेच थंडगार सावली सुद्धा देते.

२) कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी वापरतात.

३) कडुलिंबाची पाने खोबरेल त तेलात उकळवून डोक्याला लावले असता त्याने केस वाढतात.

४) कडुलिंबाची साले उकळून त्याचे पाणी प्यायल्याने ताप उतरतो.

५) कडुलिंब उत्तम जंतुनाशक आहे. याच्या पानांची पूड शेतामध्ये पसरल्यास सगळे जंतू नाश पावतात.

६) अंगाला खाज सुटत असल्यास कडुलिंबाची पाने उकळवून त्याने आंघोळ केल्यास बराच फायदा होतो.

७) आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचा उपयोग — त्याची पाने, साल, बिया यांचा उपयोग विषमज्वर, जंतुनाशक, सापाच्या विषावर, कृमीनाशक, दाह, बाळंतरोग अशा अनेक रोगांच्या औषधांसाठी करतात.

 दुष्परिणाम फारसे नाहीत पण अतिशय कडू असल्यामुळे, त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केल्या गेल्यास जळजळ वाढू शकते.

यानंतर आजी रियाला म्हणाली की अशा अनेक, वनस्पती आयुर्वेदामध्ये आहेत, यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. फक्त ही सारी औषधे नित्य नियमाने घेतली गेली पाहिजे.पुढच्या पिढीने आता अशीच औषधे घेण्याचा आणि त्यांच्यामध्ये नवीन संशोधन करण्याचा वसा घेतला पाहिजे. हे सारे ऐकून रिया खूप खुश झाली.

हा लेख (5 Ayurvedic Plants Information in Marathi) कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये लिहा. असे माहितीपर लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेंट द्या. आपल्या मित्र परिवारासोबतसुद्धा शेअर करा. धन्यवाद.

वरील सर्व उपचार हे घरगुती आहेत. हे फक्त माहितीसाठी आहेत. कोणतेही उप*चार करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

22 thoughts on “औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग l 5 Ayurvedic Plants Information in Marathi”

  1. Sanjiwani Nande

    Very nice and informative article. Such articles can help readers to know about some hetbs which are pure and effective if used under proper guidance.

  2. Amita Deshpande

    Very informative and useful as well as very well written article.
    The article emphasis on medicinal properties of plants which are useful in daily life.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top