कंटेंट रायटींग करून पैसे कमवा.
काहींना लिखाण करण्याचा, डायरी लिहिण्याचा छंद असतो, हा छंद किंवा तुमची आवड जर तुम्हाला पैसे मिळवून देत असेल तर कुणाला आवडणार नाही. ज्यांना घरातील जबाबदाऱ्यांमुळे घराबाहेर पडून काम करणे अशक्य असते. परंतु लिखाणाची कला अवगत असते मग ती स्त्री असो व पुरुष. त्यांच्यासाठी कंटेंट रायटींग हा एक घरबसल्या पैसे कमावण्यासाठी चांगला पर्याय आहे. यात त्तुमचे वय आडवे येत नाही. चला तर मग कंटेंट रायटींग करून त्यातून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेऊ.
1. कंटेंट रायटींग हे तुम्ही घरबसल्या, किंवा जर तुम्ही नोकरी करीत असाल तर तुमच्या फावल्या वेळात करू शकता. यात तुम्ही बक्कळ पैसा कमावू शकता.
2. जर तुम्हाला डॉलर मध्ये पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत असायला हवे. त्याशिवाय तुम्ही तुमच्या मातृभाषेतून सुद्धा लिखाण करून कमावू शकता.
3. तुम्ही तुमच्या देशाच्या कुठल्याही कानाकोपर्यात राहत असाल तर त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे लिखाण करून एखाद्या ग्राहकाला पाठवायचे असते. बस्स बाकी तो तुम्हाला तुमचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतो. यात तुमच्या एका एका शब्दावर पैसे ठरवले जातात.
कंटेंट रायटर हे कंपनी किंवा एखाद्या ब्रॅंड साठी लिखाण करतात. म्हणजे जाहिरात किंवा त्या कंपनी बद्दल माहिती सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर कंटेंट रायटर म्हणजे एखाद्या कंपनी किंवा ब्रँडचे कथाकार असतात. तुम्हाला माहीत आहे ना आपण एखाद्या कंपनी किंवा एखाद्या प्रॉडक्ट विषयी गूगल वर शोध कार्य करतो तेव्हा आपल्याला जी माहिती मिळते ती माहिती लिहिण्याचे काम कंटेंट रायटर करतो.
कंटेंट रायटरला एखाद्या ब्रँड साठी लिहायचे असेल तर तो ही त्यासाठी बरीच माहिती गोळा करीत असतो त्याकरिता त्यालाही गूगल करावेच लागते. या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून कंटेंट रायटर स्वतःच्या शब्दात व्यक्त होतो तो खरा कंटेंट रायटर नाहीतर नुसते दुसर्याचे लिखाण उतरवून काढले तर आपले वाचक ते वाचणार नाहीत. कारण ज्यावेळी तुम्ही कंटेंट रायटींग चे बेसिक ज्ञान अवगत कराल त्याचवेळी तुमहाला हे ही आत्मसात करून घ्यावे लागते की आपल्याला आपले लिखाण वेगळ्या ढंगात पेश केले पाहिजे.
कंटेंट रायटिंग संदर्भात बरेच कोर्सेस असतात त्यात सहभागी होऊन तुम्ही कंटेंट रायटींग शिकू शकता. हे कोर्सेस ऑनलाईन सुद्धा असतात. नाहीतर यू ट्यूब वरुन तुम्ही याची माहीती घेऊ शकता.
अस गृहीत धरू नका की अरे नुसतं लिहायचेच आहे ना. मग काय कसेही लिहू शकतो. तर नाही, त्यालाही काही मर्यादा आहेत नियम आहेत. उगाच कुठल्याही विषयावर काहीही फराटे मारणे म्हणजे कंटेंट रायटींग करणे नव्हे, तर ज्या चालू घडामोडी आहेत, ज्याच्यासाठी लोकांना जाणून घ्यावेसे वाटते अशाच विषयांवर लिहिणे, पण त्या विषयी अभ्यासपूर्ण लिहिणे म्हणजेच कंटेंट रायटींग.

यामध्ये तुम्ही लिखाण करणे आवश्यक आहे, मग जो विषय असेल त्याच्याशी निगडीत असणे आवश्यक. यात तुम्ही खालील प्रकारे लिखाण करू शकता-
1. स्क्रिप्ट लिहिणे, लेख लिहिणे, चित्रपटासाठी लेखन करणे.
2. एखाद्या लेखाचे एका भाषेतून दुसर्या भाषेत भाषांतर करणे, हे ही यातच येते.
3. एखाद्या पुस्तकाचे तुमच्या मातृभाषेतून भाषांतर करायचे असेल तर त्याला सुद्धा कंटेंट रायटरची आवश्यकता भासते.
कंटेंट रायटींगसाठी आपल्या लिखाणात पुढील गोष्टींची आवश्यकता आहे-
1. लिहिताना आपल्या वाचकांना आपल्या लिखाणात आणि आपल्या विषयात गुंतवून ठेवणे हे या लेखकाचे लेखन कौशल्या असते.
2. तुम्ही तुमचे लिखाण एखाद्या ब्लॉग वर, व्हिडिओ साठी यू ट्यूब चॅनल साठी, पॉडकास्ट इबुक्स कुणा साठीही लिखाण करून संपादित करू शकता.
3. कंटेंट रायटर हे सुद्धा एक ब्रँड असतात त्यांचे लिखाण हे जितके उत्कृष्ट आणि प्रभावी तितके त्याचे चाहते अधिक. त्यामुळे असे वेगवेगळे कंटेंट रायटरचे पैलू आहेत. प्रत्येक कंटेंट रायटरची शैली ही वेगवेगळी असते त्यामुळे त्याच्याकडे ग्राहक लगेच आकर्षित होतात. आणि त्याचेसाठी आपल्याला आपले लेखन प्रभावीपणे मांडणे अधिक गरजेचे आहे.
कंटेंट रायटर हे एक असे क्षेत्र आहे जे डिजिटल क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. कंटेंट रायटर चे काम हे प्रामुख्याने नवीन आणि युनिक कंटेंट हे काही ठराविक कामासाठी तयार करणे हे आहे. त्यामुळे बरेचसे वाचक हे त्यांच्या वेबसाइट किंवा ब्लॉग कडे वळतील. त्यामुळे त्या व्यवसायाचा उद्देश साध्य होईल आणि त्यांच्या प्रॉडक्ट विषयी त्यांच्या ग्राहकांना व्यवस्थित माहिती मिळू शकेल.
आपण जेव्हा कंटेंट लिहायला घेतो तेव्हा त्या विषयासंबंधित सखोल ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले लिखाण प्रभावी बनू शकते॰ एकदा लोकांचा तुमच्या लिखाणावर विश्वास बसला की ते तुमचे कंटेंट वाचायला प्राधान्य देतील. असे संशोधन करणे हे खूप जिकरीचे काम आहे त्यासाठी आपल्याकडे संयम आणि विश्लेषक कौशल्ये असावी लागतात.
तसेच कंटेंट रायटरने नियमित वाचन करणे गरजेचे आहे, नियमित वाचन केल्याने आपले लेखन कौशल्य सुधारण्याबरोबरच आपला शब्द संग्रह वाढतो. आपली आपल्या भाषेवरील पकड ही तेवढीच महत्वाची आहे. भाषेवरील पकड म्हणजे आपली भाषा आणि लिखाण हे अत्यंत सोपे आणि दुसर्याला सहज समजेल असे पाहिजे.
एसईओ चे उत्तम ज्ञान –
कंटेंट लिखाण करणार्यांची संख्या खूप आहे पण आपले लिखाण इतरांपेक्षा कसे उठून दिसेल ते कौशल्य आपल्या लिखाणात असेल तर तो एक चांगला कंटेंट रायटर बनू शकतो. तुम्ही कितीही लिखाण केले पण ते एस ई ओ चे नियमाला अनुसरून नसेल तर त्या लिखाणाची किमत शून्य आहे.
आता एसईओ म्हणजे काय? तर तुमच्या लिखाणाला योग्य शीर्षक असले पाहिजे. काही आकर्षक शब्दरचना असणे आवश्यक आहे. त्यशिवाय आपले लिखाण कुणी वाचत नाही.
आपले लिखाण आपण जितके सुधारू शकतो तितके त्याचे वाचक वाढतील. पण असे करताना आपल्याला आपल्या चुका दिसत नाहीत. पण ती सवय आपण स्वतःला लावली तर आपले लिखाण सुधारणे आपल्याच हातात आहे.
कंटेंट रायटींगसाठी आपल्याकडे काय सुविधा असाव्या?
1. आपला लॅपटॉप, डेस्कटॉप नाहीतर आपला फोन असावा लागतो.
2. इंटरनेट कनेक्शन असावे लागते.
3. कंटेंट रायटींग चे बेसिक ज्ञान असावे लागते.
बस्स वरील तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत बाकी सगळी आपली मेहनत आणि आपले संपर्क.
कंटेंट रायटींगसाठी कुठे काम करावे?
1. कंटेंट रायटींग तुम्ही घर बसल्या करू शकता. पण त्यासाठी एखादी वेळ ठरवून तेवढा वेळ लिखाणासाठी अवश्य द्यावा.
2. एखाद्या वेबसाईट काम करू शकता.
3. जर तुमचा मास मीडिया या विषय मध्ये शिक्षण झाले असेल तर तुम्ही एखाद्या पेपर साठी काम करू शकता.
4. यू ट्यूब चॅनेल, इ बुक, स्क्रिप्ट, सिरीयल, वेब सिरीज, चित्रपट यासाठीही तुम्ही लेखन करू शकता.
5. सध्या मतदानाचे वारे वाहत आहेत तर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षासाठीही लिखाण करू शकता.
तुम्ही कंटेंट रायटींगसाठी खालील प्रकारे काम करू शकता-
1. फ्री लान्स-
तुम्ही हे काम तुमच्या फावल्या वेळात कितीही कंपनी साठी काम करू शकता. फक्त आपला content त्यांनी दिलेल्या योग्य वेळात करून देणे आवश्यक असते.
2. ब्लॉग –
तुम्ही एखाद्या ब्लॉग साठी सुद्धा त्यांच्या विषय साठी लिखाण करू शकता. नाहीतर तुम्ही तुमचा स्वतः सुद्धा एक ब्लॉग तयार करून त्यासाठी लिहू शकता. तुम्ही यामध्ये ऑफिस मध्ये बसून सुद्धा त्यांच्या वेळे प्रमाणे काम करून देऊ शकता.
3. वेबसाइट –
तुम्ही वेबसाइट साथी सुद्धा तुमचे लिखाण पाठवू शकता. एखादा इंटरनॅशनल वेबसाइट असेल तर तुम्ही तुम्हाला इंग्रजी मध्ये लिहिणे आवश्यक असते.
या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक मार्गदर्शक लागतो. म्हणून एखाद्या नामांकित कंटेंट रायटरकडे एखादा कोर्स करून तुम्ही हे ज्ञान अवगत करून घेऊ शकता. तुम्हाला हा लेख वाचून कंटेंट रायटींग मध्ये करियर करायचे असेल तर इथे comment करा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल.
लेखिका – सपना कद्रेकर,मुंबई.
Important information
Thank you Mam
Good
Good information 👍
Thank you Mam