INDIAN POLICE FORCE REVIEW IN MARATHI: स्वतःच जाळ्यात अडकले रोहित शेट्टी
नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झाली. आणि या नववर्षाला धमाकेदार सुरुवात केली आहे ती म्हणजे आगामी वेब सिरीज” इंडियन पोलीस फोर्स”. नववर्षाच्या सुरुवातीला थोडे ॲक्शन, थोडे थ्रील, थोडा सस्पेन्स आणि थोडा मिरची मसाला घेऊन आले आहेत रोहित शेट्टी तर बघूया या OTT च्या दुनियेत…..
काही प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार इंडियन पोलीस फोर्स ही वेब सिरीज न होता चित्रपट स्वरूपात असता तरीही एन्ट्री धमाकेदार असतीच त्यासाठी कारण नाही तसच आहे ते म्हणजे रोहित शेट्टींचा चित्रपट इतिहास. यात एकूण 7 एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड 35 मिनिटांचा याप्रमाणे तीन तास तीस मिनिटांचा वेळ प्रेक्षकांना लागू शकतो तर ONE TIME WATCH ही सिरीज नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.
आतापर्यंत चा दिग्दर्शक रोहित शेट्टींचा इतिहास बघता मुंबई पोलीस सोबतच सिंघम, सिंबा, सूर्यवंशी या चित्रपटां समवेत कॉप युनिव्हर्स मधील त्यांची सुरुवात बघायला मिळणार आहे. तर या OTT दुनियेत त्यांचा हा फॉर्मुला लोकांच्या पसंतीस उतरतोय आहे की नाही हेही बघायला मिळेल. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांचं प्रमुख ध्येय असतं ते म्हणजे “ॲक्शन”. चित्रपट कोणताही असो कॉमेडी, थ्रीव्लर पण त्यांची एक सिग्नेचर स्टाइल असतेच. “इंडियन पोलीस फोर्स” यात स्टाईल ॲक्शन हे दृश्य भरभरुन असली तरीही सिक्वेन्स मात्र शेवटपर्यंत टिकलेला आहे. म्हणून या सिरीज ला बघून काही प्रेक्षकांच्या असं नजरेत आलय की ते स्वतःच्याच जाळ्यात अडकलेत.
लेखनाच्या नजरेतून बघितलं तर तरीही सिरीज आउट डेटेड वाटते. कारण ही तसच की कथानकामध्ये काही नाविन्य न घेऊन येता एकच कथा वारंवार बघितलेली वाटत आहे यावेळेस त्यांनी दिल्ली पोलीस यांना नायकत्व दिलेल आहे. सुरुवातीचे काही एपिसोड कथानक विकसित करण्यावर भर देतात पण काही ॲक्शन चे प्रभुत्व जास्त दिसून येते. ही सिरीज थोडी ध्वनी मुद्रण केल्याप्रमाणे भासते. डोळे बंद करून जर आपण एपिसोड बघितले तर असं जाणवतं की आपण एक ऑडिओ स्टोरी ऐकतोय. पण घरबसल्या आपण रोहित शेट्टींचा एक रोचक अंदाज या सिरीजच्या माध्यमातून बघू शकतो.
काय आहे कथानक? INDIAN POLICE FORCE REVIEW IN MARATHI: स्वतःच जाळ्यात अडकले रोहित शेट्टी
सिरीज ची सुरुवात होते ती म्हणजे दिल्लीमध्ये होत असलेल्या एका सिरीयल बॉ*म्ब ब्ला*स्ट ला थांबून त्या आ*तं*कवाद्यांच्या मास्टर माईंड ला पकडणे हे त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आणि दिल्ली पोलीस जॉईंट सीपी(
विवेक ओबेराय) त्या पथकांच नेतृत्व करतायत. तसंच त्यांचं इन्वेस्टीगेशन सुद्धा त्यांच्याकडेच आहे. कबीर मलिक( सिद्धार्थ मल्होत्रा) हे मुख्य भूमिकेत दिसतायत. त्यांच्या टीम विक्रम चे ते प्रमुख या भूमिकेत दिसतायत. गुजरात एटीएस चीफ तारा शेट्टी( शिल्पा शेट्टी) ही दिल्ली ला आलेलीआहे ती म्हणजे अहमदाबाद मध्ये झालेल्या सिरीयल बॉ*म्ब*स्फोटाची जिम्मेदारी घेण्यासाठी मोठ्या मोठ्या शहरात बॉ ब्ला करण्याची ध*म*की दिलेली आहे ती म्हणजे 26 जानेवारीला तर या मागील प्रमुख हेतू जाणून घेण्याची जबाबदारी दिली विक्रम या टीमकडे यात मास्टर माईंड जरार( मयंक टंडन) आहेत. आणि हिंदुस्तानी आक्का रफिक( ऋतुराज सिंह) आहेत ही सगळी मंडळी सहकलाकार आहेत. मध्येच एन्ट्री होते ती म्हणजे प्रख्यात मराठी अभिनेते शरद केळकर यांची.
या घटनेत जबरदस्त गोळीबार होताना जरा आणि त्याचा छोटा भाऊ वाचतो. त्यानंतर जयपुर मध्ये सिरीयल बॉ*म्ब ब्ला*स्ट ऑपरेशन फेल झाल्यानंतर कबीरला फोर्स टीम मधून काढून कार्यालयीन कामकाज देतात. पण विक्रमला आपला मोठा भाऊ मानणारा कबीर हा जयपुर सिरीयल बॉम्ब ब्लास्ट ची माहिती काढण्यात यशस्वी होतो आणि हे बघता हेही काम जरार च आहे हे लक्षात घेतात. या घटनेनंतर पोलीस कमिशनर जयदीप बंसल( मुकेश ऋषी) प्रभावित होऊन कबीर ला पुन्हा फोर्स मध्ये घेतात. खाणारे सायकल खाणार आहेस का तरीही कबीरचा तपास चालू असतो आणि तो शेवटी गोवा मध्ये कबीरचा छोटा भाऊ सिक्को आढळतो. त्यानंतर त्यांची टीम गोवा पोहोचते आणि बॉ*म्ब ब्ला*स्ट ला थांबवण्यात यशस्वी ठरते. यात पोलीस टीम चे खडतर प्रयत्न नजरेस भरतात. तसेच जरा जरार चे जीवन, थोडसं प्रेमळदर्शन सुद्धा दर्शवलेल आहे.
कसा आहे कलाकारांचा अभिनय?
सिरीज मधील सगळ्या एपिसोड चे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सुशांत प्रकाश यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे सगळ्या प्रमुख पात्रांना मुख्य अभिनय देण्याचा. कॉस्ट्यूम सोबतच सगळ्यांचे सनग्लासेस वेगवेगळे वेगळा लुक पहावयास मिळतो. पात्रांची गंभीरता काहीही असो पण त्यांचा चष्मा घालण्याचा रोजच अंदाज स्लो मोशन मध्ये काही वेगळाच आढळतो. सिद्धार्थ मल्होत्रा यांना हे पात्र पुरेपूर फिट झालय.
त्यांच्या पात्रात एक वास्तविकता दिसून येते. पण मात्र शिल्पा शेट्टी ला बघून गुजरात एटीएस चीफ ची प्रमुख असेल असा अंदाज येत नाही. एका पोलिस ऑफिसर ची भूमिका विवेक ओबेरॉय यांना ठीक वाटते. आणि त्यांच्यासोबत सिद्धार्थची बॉण्डिंग ही चांगली दिसून येते. मयंक टंडन यांनी सुद्धा आतंकवादी जरा याचा अभिनय ठीक पार पडलाय. त्याचा तो निगेटिव्ह प्रयत्न चांगला दिसून येतो. सुरुवातीचे काही एपिसोड त्यांनी कथानक विकसित करण्यावर भर दिला पण काही एक्टर्स फोर्स फुल एक्टिंग करताना दिसतात. ॲक्शन तर आहेच सोबतच आहे ती म्हणजे फायटिंग हे सगळे अंदाज रोहित शेट्टी यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलेत असं मला वाटतंय. या सिरीज मधला महत्त्वाचा विषय महत्त्वाचं पात्र म्हणजे जरा र ची प्रेमिका नसीबा खान हे पात्र अगदी सहजपणे वैदेही परशुरामी यांनी निभावलय. त्या पत्राचा सगळा अंदाज त्यांनी अत्यंत सहजपणे प्रदर्शित केलाय. या कथानकात कमिशनर बनलेले मुकेश ऋषी यांनी आपला देशभक्ती वरच सगळं प्रेम अचूक मांडलय. अंतिम क्षणाला शरद केळकर यांची जी एन्ट्री होते ते कथानक आधीच्या त्यांच्या संभाषणावरून चित्रित होताना दिसते.
तर कशी वाटली इंडियन पोलीस फोर्स?
रोहित शेट्टीची ही सिरीज पुरेपूर दिल्ली दर्शन घडून आणते. सोबतच दिल्लीतले सगळे ऐतिहासिक ठेवे, इमारती, सिनेमॅटोग्राफी या सगळ्यांचे दर्शन सिरीज मध्ये बघायला मिळेल. यांच्या सिरीज मध्ये ॲक्शन चा जबरदस्त धमाका तर असतोच पण सुरुवातीच्या दोन भागांमध्ये ड्रोन धमाका आणलय तोच पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना दिसतोय असं वाटतंय. याप्रकारे एकच दृश्य रिपीट करताना दिसतात. जयपुर सिक्वेन्स मधले ऐतिहासिक किल्ले प्रेक्षकांच्या नजरेस भरतात तसेच तिथले एरियल व्ह्यू बघताना मजा येते. पूर्णतः “इंडियन पोलीस फोर्स” मध्ये
ॲक्शन चा धमाका ,स्टाईल, स्वॅग यात अवलपणा दिसून येतो तसेच लेखन आणि पात्र यात थोडी कमजोरी दिसून येते. तर आपण जर ॲक्शन बघण्यात इंटरेस्टेड असाल तर पुरेपूर या सिरीजचा फायदा घेऊ शकाल. एक सर्वसाधारण कन्सेप्ट म्हणू यावेळी सिरीज कडे बघू शकता . सगळे कलाकार आपला अभिनय मनावर न घेता करताना दिसतंय ते वातावरण जरा निराशा जनक करतात. ही सिरीज वन टाइम वॉच आहे आणि फॅमिली सोबतही बघायला काहीच हरकत नाही. फक्त आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस थोडा वाढवावा लागेल असं मला वाटतं कारण यात दिल्ली ही सामील झालय. कथानकाचा शेवट सस्पेन्स कायम ठेवण्यात जातो माझ्या मनाला असं वाटते की “इंडियन पोलीस फोर्स भाग 2 “प्रदर्शित करतील त्यासाठी त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला असावा. तर आपणही या सिरीजचा मनसोक्त आनंद घ्यावा. काही तुमच्या कल्पना असतील तर मला कळवा…..
तसेच आपली मते कमेंट्सद्वारे नक्की पाठवा…..
आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका….
नमस्कार!!
लेखिका – शुभांगी चुनारकर
खूप छान लेख
Thanks mam.