दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे महागाई वाढत चालली आहे. सामान्य जनतेच्या खिशाला परवडेल असा एक पर्याय म्हणून सर्व जग इलेक्ट्रिक वेहिकल्स कडे पाहत आहे. आज आपण ह्या इलेक्ट्रिकल वेहीकल्स बद्दल जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक वाहनांचा इतिहास :-
आश्चर्य म्हणजे जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी ह्या इलेक्ट्रिक वाहनांचा शोध लावला गेला होता. यात कोणत्या एका व्यक्तीचे किंवा एकाच देशाचे नाव नाही घेऊ शकत कारण १८ वे व १९ वें शतक हे क्रांतीचे युग होते. याचं काळात बॅटरीचा शोध लागल्यामुळे पुढे अनेक प्रयोग केले गेले. हंगेरी, नेदरलँड, यूएसए, युके इथे छोट्या इलेक्ट्रिक कारचे शोध लागले होते. थॉमस एडिसन, फर्डिनांड पोर्शचे, हेनरी फोर्ड यांसारखे महारथी सुद्धा ह्या वाहनांच्या प्रेमात पडले. कमी अंतराच्या प्रवासासाठी त्याकाळातील महिलां मध्ये ह्या गाड्या जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. फक्त अडचण होती की ह्या वाहनांमूळे जास्त अंतराचा प्रवास करता येत नव्हता. आणि बॅटरी चार्ज कुठे करावी हा देखील मोठा प्रश्न होता. त्याच काळात इंधनावर चालणाऱ्या गाड्यांची क्रेज जास्त निर्माण झाली. १९७० पासून इंधन स्वस्त होते आणि नवीन टेक्नॉलॉजी नुसार लांब पल्ल्याच्या व स्वस्त कार आल्यावर ईव्हीं वाहनांचा कोणी वापर करेना. त्यांची डिमांड घटत गेली. पण आता ह्या २०२४ च्या काळात इंधनावर अवलंबून राहणे शक्य नसल्याने पुन्हा ईव्हीं वाहनावर लक्ष केंद्रित झाले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांची नवी सुरुवात:-
जपानने १९९७ सालात टोयोटा प्रियुस ही हायब्रीड इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणली. आणि सर्व जगात लहान मोठे जे कार मेन्यूफेक्चरर होते त्यांना यातून प्रेरणा मिळाली व मार्केट मध्ये एकसो एक इलेक्ट्रिक वाहने येऊ लागली. टेस्ला ने आपली पहिली लक्झरी इलेक्ट्रिक स्पोर्टस् कार २००६ मध्ये लाँच केली. एका सिंगल चार्ज मध्ये ही गाडी २०० मैल जायची.
इलेक्ट्रिक वाहनांचे प्रकार(What is Electric Vehicle and its benefits in Marathi ) :-
1. बॅटरी इलेक्ट्रिक वेहीकल (BEV)
बहुतेक BEV वेहिकल शून्य प्रदूषण, गॅस इंजिन विरहित, फक्त इलेक्ट्रिक बॅटरीवर अवलंबून असलेली लवकर चार्ज होणारी व लेव्हल २ चार्ज असलेली आहेत.
2. प्लग- इन हायब्रीड इलेक्ट्रिक वेहीकल (PHEVs)
ह्या वाहनांमध्ये गॅस टाकी व मोठी बॅटरी असते. L २ चार्जर ने चार्ज करता येते.
3. हायब्रीड इलेक्ट्रिक वेहीकल (HEVs):-
कमी प्रदूषण करणारी गॅस- पॉवर इंजिन असलेली वाहने यात इलेक्ट्रिक बॅटरी देखील असते.
4. इलेक्ट्रिक वेहिकल रेंज एक्स्टेंडर हायब्रीड (EVREHs):-
सर्वच इलेक्ट्रिक वेहिकल ह्या टेक्निकली
हायब्रीड नसतात. काही वेहिकलस मध्ये छोटे गेसोलिन इंजिन असते. ज्यावेळी ह्या गाड्यांची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होते तेव्हा या गेसोलिन इंजिनमुळे बॅटरी पुन्हा चार्ज करता येते. व अडचणीच्या वेळी उपयोगी येते.
दिवसेंदिवस पूर्ण जगात प्रदूषण, इंधनाची वाढती मागणी व अपुरा पुरवठा, भविष्यात इंधनाचा साठा संपणारा असल्यामुळे प्रत्येक देशापुढे पर्याय शोधण्याचे आव्हान आहे. आपल्या भारतीय सरकारचेही २०२४ साला तील नवीन धोरण आले आहे.
भारत सरकारचे नवीन धोरण:-
भारतामधील वाहतूक क्षेत्र हे हवेचे प्रदूषण करणारे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे भारत सरकारचे २०३० सालापर्यंत ३०% वाहने ही इलेक्ट्रिक असतील असे लक्ष्य ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी भारत सरकारने पुढील पावले उचलली आहेत.
• FAME ll
एप्रिल २०१९ साली ह्या प्लॅन नुसार दहा हजार कोटीचे बजेट ठरवले आहे. त्यानुसार ५,००,००० ई थ्री व्हीलर, ७००० ई बसेस, ५५,००० ई वेहिकल आणि लाखो ई टू व्हीलर यांना सपोर्ट करण्यात येईल.
• PLI Scheme
या योजेने अंतर्गत सरकार कमीत कमी किमतीमध्ये ev वाहने ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठी सबसिडी देण्यात येत आहे. जे ev वाहने बनवणारे विक्रेते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.
• Battery swapping policy
डिलिव्हरी व इंटरसिटी वाहतूक यांसारख्या अत्यंत संवेदनशील सेवा क्षेत्रामध्ये संपलेल्या बॅटरीच्या जागी पूर्ण चार्ज झालेली बॅटरी त्वरित बदलणे हे जास्त फायद्याचे ठरेल कारण डिस्चार्ज बॅटरी चार्ज करण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो. म्हणून बॅटरी स्विच केल्याचा उत्पादकांना फायदा होईल. ह्या पॉलिसी मुळे गाड्यांचे सुट्टे पार्टस देखील सहजरीत्या प्राप्त होतील.
• Tax reduction on EVs
बॅटरी बनवण्यासाठी लागणारे निकेल ऑक्साईड, कोबाल्ट, फेरो निकेल यांच्या कस्टम ड्युटी वर १० ते ७% सुट देण्यात येईल जे लिथियम आयन बॅटरी साठी आवश्यक आहेत. आणि बॅटरीच्या किमंती देखील कमी होतील.
इलेक्ट्रिक वाहन काम कसे करते (How Electric Vehicle works in Marathi )?
एक सायलेंट क्रांती म्हणून ev कडे बघितले जात आहे. सध्या भारतात ev वाहनांसाठी प्रचंड मागणी वाढली आहे. ही वाहने इकोफ्रेंडली, नॉनपॉल्युशन, स्वच्छ व शांत राईडचे प्रॉमिस करत आहेत. आता ७ गाड्यांपाठी १ ev वेहिकल आहे. लवकरच भारतात ही क्रांती फार लवकर घडून येईल पण त्यासाठी आपल्याला ह्या गाड्यांचे काम कसे चालते ते समजून घेतले पाहिजे.
इलेक्ट्रीक वाहनात इलेक्ट्रीक मोटार वापरली जाते. प्रत्येक इलेक्ट्रीक वाहनाच्या केंद्रस्थानी इलेक्ट्रीक पॉवरट्रेन असते. या इलेक्ट्रीक मोटार मुळे इलेक्ट्रीक एनर्जीचे रुपांतर मॅकेनिकल एनर्जी मध्ये होते.
जेव्हा मोटारच्या वायडिंग मधून वीज वाहते तेव्हा मॅग्नेटीक फिल्ड निर्माण होते. असे गोलाकार फिरणारे इलेक्ट्रीक मोटारचे रोटेशन चाक फिरण्यास मदत करते. त्यामुळे वाहनांचे स्मुथ फंक्शन मिळते.
इलेक्ट्रीक वाहनाचे तोटे (Electric Vehicle Disadvantages in Marathi)
• वाहन चार्ज करण्यासाठी खूप वेळ लागतो.
• इलेक्ट्रीक चार्जींगच्या सुविधा म्हणाव्या तश्या उपलब्ध झाल्या नाहीत.
• लॉंग रेंजच्या गांड्याची किंमत सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी नाही.
• भारताच्या उष्ण वातावरणात बॅटरीचे वय कमी होते.
• बॅटरी बदलणे ही एक खर्चिक बाब आहे.
• इलेक्ट्रीक वेहिकल वापरताना शून्य प्रदूषण होत असले तरी बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारी उर्जा ही प्रदूषण निर्माण करू शकते.
• नविन टेक्नोलॉजी असल्यामूळे ही वाहने दुरुस्त करण्यासाठी वेलट्रेन्ड मैकेनिक अजून म्हणावे तेवढे उपलब्ध नाहीत.
इलेक्ट्रीक वाहनाचे फायदे
• घरगुती सोलर एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रीसीटी ने बॅटरी चार्ज करू शकतो.
• इतर इंधनाच्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांचा मेंटेनन्स खूप कमी आहे.
• इलेक्ट्रीक वाहनांवर भारत सरकार कडून बर्यापैकी सबसिडी मिळत आहेत.
• सर्वात मोठा फायदा म्हणजे इलेक्ट्रीक वेहीकल इलेक्ट्रीसीटी वर चालत असल्याने कोणतेही वायू प्रदूषण होत नाही.
• ही वाहने चालवताना कोणताही आवाज निर्माण करत नाही.
भारतातील EV उत्पादक:-
भारतामध्ये टाटा मोटर्स, जेबीएम ऑटो, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, महिन्द्रां इलेक्ट्रीक मोबीलीटी, ओला इलेक्ट्रीक मोबीलिटी, अशोक लेलँड इलेक्ट्रीक, ह्युंदाई, हिरो इलेक्ट्रीक, मेंजा मोटर्स, लोहिया ऑटो, किया मोटर्स यांसारखे उत्पादक मार्केटमध्ये उतरले आहेत.
भारतातील EV मार्केट किंग:-
भारतातील सर्वात मोठे ऑटोमेकर किंग हे टाटा मोटर्स आहेत. इलेक्ट्रिक वाहनात त्यांचे मार्केट शेअर ७२% आहे. २०२३ सालात पहिल्या सहा महिन्यात ३४००० EV वाहने विकली आहेत. टाटा टिएगो, टाटा नेक्सॉन, टाटा टिगॉर हे प्रसिद्ध मॉडेल्स आहेत.
२०२४ च्या सालातील सर्वात हीट मॉडेल्स टाटा पंच EV, टाटा नेक्सॉन EV या आहेत.
भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे भविष्य (What is Future of Electric Vehicle in Marathi) :-
भारत हा जगातील ऑटोमोबाईल उद्योग जगतातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. २०३० पर्यंत भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश होईल. २०७० पर्यंत भारताचे निव्वळ शून्य कार्बन प्रदूषण गाठण्याचे ध्येय आहे. म्हणजेच नजीकच्या काळात Ev वाहनांची मागणी प्रचंड वाढणार आहे. योग्य पातळीची कार्यक्षमता आणि बेसीक सुविधांसह इलेक्ट्रीक वेहीकल घेण्याचे अनेक फायदे आहेत.
भारताकडे जगभरातील इलेक्ट्रीकल वाहनां चे मार्केट मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. असा सर्वे अमेरिका येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि बर्कले लॅब ने केला आहे. त्यामुळे जगात मेक इन इंडिया चा डंका वाजणार हे १०१% खर आहे.
प्रिय वाचकहो, आपल्याला हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमच्या watsaap ग्रुपला हि जॉईन करा.
लेखिका – वैदेही उदयकुमार बाबरदेसाई
अप्रतिम माहिती दि्याबद्दल आभार आपले. EV आता काळाची गरज बनली आहे.
Thank u
Very well explained 🤩
Thank u
Good article
Thank u
Explained very well in an efficient way, well structured and expressed
Thanks