कथा युद्धविराची
वीरकरांच्या घरात गडबड चालू होती. त्यांचा धाकटा मुलगा नितीनचे लग्न ठरले होते.सुभद्रा कोल्हापूरची.अगदीच बेताची परिस्थिती असलेल्या या मुलीला मीना वीरकरांनी पसंत केली होती “आम्हाला फक्त मुलगी द्या नारळ पण नको”
नितीन सुशिक्षित व दिसायला चांगला होता.साताऱ्यामध्ये त्याचे व त्याच्या मोठ्या भावाचे मेडिकलचे मोठे दुकान होते. बंगला, गाड्या अशा सुखवस्तू कुटुंबातले हे स्थळ असल्यामुळे सुभद्राच्या मामाने मागचा पुढचा विचार न करता सुभद्रेला लग्नाला तयार केले होते.कुठेतरी तडजोड करावी लागते एक गोष्ट सोडली तर बाकी नावं ठेवण्यासारखे या स्थळात काहीच नव्हते.नितीन पाच वर्षाचा असताना त्याला पोलिओ झाला होता व त्यामुळे त्याची डावी बाजू अधू झाली होती. अनेक उपचार व व्यायामाने हातापायाची थोडीशी हालचाल तो करू शकत होता.नितीनचा मोठा भाऊ ,वहिनी व आई असे साताऱ्यात एकत्र कुटुंब रहात होते.
लग्नाच्या सहा-सात वर्षे होऊन पण नितीनच्या मोठ्या भावाला मूलबाळ होत नसल्यामुळे मीनाने सुभद्रेला लग्न करून आणताना “मला लवकरात लवकर नातवंडांचे तोंड पाहायचे आहे असे सांगितले होते.”थोडक्यात सुभद्राच्या गरिबीचा आपल्या अपंग मुलांबरोबर लग्न लावून एक प्रकारे व्यवहारच झाला होता…सुभद्राला खेळाची खूपच आवड होती. शाळेत असताना ती NCC मध्ये होती.मोठं होऊन पोलीस अधिकारी बनावे अशी तिची सुप्त इच्छा होती. आईसाठी ,मातृभूमीसाठी काहीतरी करावे असे तिला कायमच वाटायचे, पण गृहप्रवेशाच्या दिवशीच सासूबाईंनी ठासून त्यांची अपेक्षा सांगितल्यामुळे आता तिचे भविष्य ‘चूल व मूल’ एवढेच होणार होते.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सुभद्राने सासूबाईंना हवी असलेली खुशखबर दिली. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सुभद्रा व नितीनला पुत्ररत्न प्राप्त झाले. वीरकरांना कुलदीपक मिळाला.सुभद्राने हौसेने त्याचे नाव शौर्य ठेवले.शौर्य सर्व घरातल्यांचा खूपच लाडका होता.शौर्य नावाप्रमाणे धाडसी तसेच मनमिळावू स्वभावाचा होता. शाळेमध्ये धावणे, मल्लखांब, लाठी चालवणे हे त्याच्या आवडीचे खेळ होते.आपली अपूर्ण इच्छा शौर्यने पूर्ण करावी व त्यांनी पोलिसात जावे असे सुभद्रेला मनोमन वाटत होते.
नितीनला आईचा स्वभाव माहित होता. शौर्य घराण्याचा एकुलता एक कुलदीपक असल्यामुळे या गोष्टीला आई तयार होणार नाही हे त्याने पुरतेच ताडले होते.शौर्य तिसरीत असताना, त्याच्या शाळेच्या शेजारी असलेल्या झोपडीतल्या तीन वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने ह*ल्ला केला, त्या मुलीला वाचवण्यासाठी शौर्याने कौशल्याने लाठीचा वापर करून त्या मुलीला वाचवले. त्यावर्षी महाराष्ट्रातून शौर्यचे नाव “National Bravery Award” पुरस्कारासाठी पाठवण्यात आले. २६ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते शौर्यला गौरवण्यात आले.
शौर्यची बुद्धिमत्ता व त्याचा धाडसी स्वभाव आजीच्या जीवाला हुरहुर लावून जात होता.शौर्यला आता सातारा सैनिक स्कूलमध्ये शिकायचे वेध लागले होते. सैनिक स्कूलचे गाणे गुणगुणत त्याने पूर्व परीक्षेची तयारी केली “हम भारत के चांद सितारे खिले चमन में फुल, प्यारा सैनिक स्कूल हमारा प्यारा सैनिक स्कूल”आजीच्या हट्टापायी त्याला इयत्ता सहावीत सातारा सैनिक स्कूलमध्ये मिळालेली ऍडमिशन सोडून द्यावी लागली.शौर्यने परत एकदा नववीत आपण सातारा सैनिक स्कूलमध्ये जाऊ शकतो हे मनोमन ठरवले होते.हळूहळू त्याने आजीचा विश्वास संपादन केला तिच्या मनातली भीती त्याने समजून घेतली.कुठलाही अप*घात न होता सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी प्रदीर्घ चर्चा करून आजीचे मन वळवले.“अपघात काय कुठेही होतात म्हणून आपण जगणे तर सोडून देत नाही ना?शेवटी वेळ आली की व नशीबात जे असते तेच घडते”
शौर्यने दाखवलेली वैचारिक प्रगल्भता त्याच्या मजबूत व जिद्दी स्वभावाचे दर्शन देत होती.या दोन वर्षात त्याने आजीचे मन जिंकून नववीत सातारा सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवली. पुढे शौर्यने कोल्हापूर विद्यापीठातून पदवी घेतली. कम्बाईन डिफेन्स सर्विसेस स्पर्धा परीक्षा आणि IMA चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो सेकंड लेफ्टनंट म्हणून सैन्यात ‘१ मराठा युनिट’ मध्ये भरती झाला. जात्याच धाडसी स्वभाव व आईकडून देशसेवेचे आलेले बाळकडू शौर्यला स्वस्थ बसून देत नव्हते. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी स्वतःचे पोस्टिंग करून घेऊन त्यांनी त्याच्या नावाला साजेसे काम करून वरिष्ठांची मर्जी संपादन करून घेतली होती.
सुट्टीसाठी सांगलीला आलेल्या शौर्यला आजीने लग्नाविषयी विचारले. एका विशेष कामगिरीवर शौर्यची बदली होणार होती. ’ कुपवाडा ‘हे नाव ऐकले तरी एक दह*श*त मनात निर्माण होते अशा पोस्टिंग वर जीवावर उदार होऊनच काम करावे लागते. शौर्यला सर्व संभाव्य धोके माहीत असल्यामुळे त्यांनी आजी, आई व काकूची समजूत घालून अजून लग्नासाठी एक दीड वर्षाची मुदत मागून घेतली.सुट्टीचे दहा दिवस मजेत गेले. परत निघायच्या आदल्या दिवशी शौर्यने सगळ्यांसमोर ‘कुपवाडा’ मध्ये आपले पोस्टिंग होते आहे असे सांगितले.
कुपवाडामध्ये अनेक सैनिक शहीद झालेले.अनेकांचे रक्त सांडलेली ही भूमी.त्याच्या सैनिक शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक , जुन्या शाळेतले मित्र त्याला भेटायला व शुभेच्छा द्यायला आले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शौर्यसाठी काळजी दाटून आली होती.“येतो हं” म्हणत शौर्यने सगळ्यांना नमस्कार करून गळाभेट घेतली.या खेपेला सुभद्राच्या छातीत खूपच धडधडत होते.”तूच अशी घाबरली तर बाकीच्यांचे काय होणार? तू माझी प्रेरणा व शक्ती आहेस”शौर्यने आईला जवळ घेत समजावून सांगितले. “कोई भी जंग मर के नही लडके जीती जाती है!” शौर्यचा मित्र म्हणाला व सगळ्यांना एकदमच हसू फुटले. वातावरणात थोडासा हलकेपणा आला व शौर्य महत्त्वाच्या कामगिरीवर निघताना वातावरण निवळले.
पुढचे काही दिवस शौर्य दररोज घरी फोन करू शकणार नव्हता. त्याच्या कामाच्या स्वरूपा नुसार व वेळेनुसार त्यांनी आपली ख्याली खुशाली कळवायचे ठरवले.आता तो राष्ट्रीय रायफ*ल्स(RR )हा आतंकवादी घुसखोर यांच्या विरोधात लढण्यासाठी उभारलेल्या खास फोर्सचा भाग होता.कुपवाडा जिल्ह्यामध्ये फुटीरवादी व पाकधार्जीणी मानसिकता असलेली लोकं खूप होती, त्यामुळे सैन्याला खूपच जपून व काळजीपूर्वक काम करावे लागत होते.शौर्यने वेशांतर करून तिथल्या स्थानिक लोकांमध्ये मिसळायचे ठरवले. ही लोकं बेभरवशाची होती. त्यामुळे मिळालेली माहिती दहा दहा वेळा तपासून पहावी लागत असे.थंडीच्या दिवसात बर्फ पडू लागला की हाडे गोठवणारी थंडी आणि दाट जंगल असल्यामुळे एकदा घुसखोरी झाली की घनदाट जंगलात घुसखोरांना शोधून मा*र*णे खूपच अवघड होते. त्यांना सहाय्य करणारे काही फितूर गावकरी असल्यामुळे अशा प्रकारचे ऑपरेशन खूपच सावधानी बाळगून करावे लागते.
कुपवाडा हे गाव अगदी सीमेजवळ असल्यामुळे या इथे कायमच घु*स*खोरी होत असे. असेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक टोळी घुसल्याची खबर शौर्यला समजली.शौर्य व काही निवडक फौज या शोध कार्यासाठी निघाली. बर्फामुळे इथे चालणं मुश्किल होत होते. सोसाट्याचा वारा, हाडे गोठवणारी थंडी, सर्वत्र पसरलेलं धुक्याचं साम्राज्य,हलका हलका पाऊस, भुरभुरणारा बर्फ, गुडघ्यापर्यंत खोलवर बर्फात रूतणारे पाय, ओलसर कुजलेली झाडाची पाने त्यामुळे निसरडा झालेला रस्ता, डास व डंख मारणारे कीटक, घनदाट अरण्यात श्वापदांची भीती या सर्वातून पायी चालताना पाठीवर दारुगोळा, खांद्याला मोठी रायफल, किती दिवस लागतील हे माहीत नसल्यामुळे पाठीवर पाणी व रेशन या सर्व दिव्यातून जाताना श*त्रुचा नक्की ठावठिकाणा माहिती नसणे आणि त्यांना काही गावकऱ्यांकडून मिळणारी मदत हा भारतीय सेनेला मुख्य अडथळा होता.
अशा परिस्थितीत शौर्य व त्याचे सहकारी शत्रूला टिपण्यासाठी पुढे चालत होते.चढउतारांचे रस्ते बर्फात रुतणाऱ्या पायांमध्ये आता पेटके यायला लागले होते. शत्रु दबा धरून वरच्या बाजूला असल्यामुळे शौर्य व त्याच्या सहकाऱ्यांना अनेक दिव्यातून जावे लागत होते.सलग बहात्तर तास शोध मोहीम चालू होती.आता प्रत्येकाचीच दमछाक झाली होती.शौर्यला त्याच्या वरिष्ठांचा फोन आला “mission abort” करा ,नवीन ताज्या दमाची कुमक पाठवण्यात येईल.
शौर्य खूपच अस्वस्थ झाला. त्याला आपल्या सहकाऱ्यांची परिस्थिती माहित होती. इथे नसता हट्ट म्हणजे सैनिकांच्या जीवावरच बेतले असते.त्यांनी वरिष्ठांची आज्ञा पाळली व सर्व कुमक घेऊन तो परतीच्या मार्गाला लागला.परतीच्या मार्गावर त्याला त्याचा एक खबऱ्या भेटला त्यांनी दिलेली माहिती ऐकल्यावर शौर्यने वरिष्ठांशी संपर्क साधला “मला परवानगी द्या मी एकटाच जातो” मिळालेल्या माहितीप्रमाणे आ*तंक*वा*दी कुपवाड्याच्या जंगलात वरच्या बाजूला लपून बसले होते.दुसरी तुकडी येईपर्यंत तो त्यांचा पाठलाग करणार होता. आत्तापर्यंत त्यानी केलेली कामगिरी व घेतलेले अचूक निर्णय याबद्दल वरिष्ठांना खात्री होती. पण गावात खबर देणारी मंडळी ‘बिन बुडाच्या लोट्यासारखी कधी इकडे तर कधी तिकडे लुडकतात’ त्यामुळे त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा या संभ्रमात शौर्य व त्याचे वरिष्ठ अधिकारी होते.शौर्यने जीवाची बाजी लावून जंगलात शोध मोहीम सुरू केली. नवीन जवानांची तुकडी येईपर्यंत तो सरसर वरच्या दिशेने जंगलात जाऊ लागला. आ*तंक*वा*द्यांना पळता भुई थोडी करत दोघांना कंठस्नान घातले.
नवीन दमाच्या जवानांनी एका आतंकवाद्याला जिवंत पकडले.त्यानी दिलेल्या माहितीनुसार “जैश- ए- कवम्मद” संघटनेचे पाकिस्तानात सैनिकी प्रशिक्षण घेतलेले हे चार कडवे आ*तं*कवादी होते. काश्मीर दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान व मंत्र्यांच्या गाडीला स्फोटात उडवायचा कट करून ते आले होते.नवीन तुकडीतल्या काही जवानांना दोन आतंकवादी मृ*ता*वस्थेत सापडले . एक आतंकवादी बेपत्ता होता म्हणजेच शौर्य त्याच्या शोधात होता तर?अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली.
तिसऱ्याचा मागोवा घेता घेता कधी शौर्य LOC ला पोचला हे त्यालाही कळले नाही. शौर्यने तिसऱ्याही खातमा झाला, पण स्फोटात शौर्यही जखमी होऊन तिथे पडला.पूर्ण जंगलाची झडती घेऊन शौर्य कुठेही सापडला नाही हे समजल्यावर वरिष्ठांनी शौर्यच्या शोधासाठी एक पथक LOC ला धाडले.पाच ते सहा दिवस शौर्यचा कुठेही थांगपत्ता नसल्यामुळे त्याच्या घरी फोन करण्यात आला. शौर्य बेपत्ता असल्याची बातमी कळता आजी एकदमच कोसळून गेली तिने अंथरूण धरले. पूर्ण घरदार सैरभैर झाले.
तब्बल दोन महिन्यानंतर साताऱ्याला शौर्यच्या घरी फोन खणखणला. फोन आर्मी हॉस्पिटल मधून आला होता ,”ताबडतोब निघून या कुठलेही प्रश्न विचारू नका” हा निरोप ऐकून सुभद्रा मटकन खाली बसली. धडधडत्या अंतकरणाने तिने AH RR (Army Hospital Research And Referral) मध्ये प्रवेश केला.एक एक वॉर्ड पुढे जाता जाता तिला पाऊल उचलणे सुद्धा कठीण होत होते.तिथे असलेल्या एका अधिकाऱ्यांनी शौर्यच्या आईला बसवले व सांगितले,
“या दोन महिन्यात एका स्थानिकाने शौर्यची खूप मदत केली होती. आ*तं*क*वाद्याचा पाठलाग करत LOC च्या जवळ असलेल्या एका खेडेगावात तो पोचला होता व तिथेच तो जखमी अवस्थेत पडलेला होता. पहिले चार घुसखोर आतं*क*वादी भारतात आधीच घुसले होते व त्या तुकडीतले अजून दोन तीन कडवे आ*तं*कवादी या भागात लपून बसून घु*सखो*री करण्याच्या प्रयत्नात होते. शौर्यची नाजूक परिस्थिती बघता एका स्थानिकाने जीवावर उदार होऊन त्याला आपल्या घरात ठेवून घेतले.जोपर्यंत शौर्यच्या जखमा भरत नाहीत व संभाव्य धोक्यातून तो बाहेर येत नाही तोपर्यंत त्यांनी या गावात आश्रय घेऊन राहणे हेच योग्य होते.”
शौर्यला खात्री होती की भारतीय सेना त्याला शोधून काढेल व मदत करेल, तोपर्यंत आपला जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे काम होते.भारतीय सेनेने LOC ला पाठवलेल्या तुकडीला खबऱ्यानी शौर्य जिवंत व सुखरूप असल्याची माहिती कळवली होती.उरलेल्या तीन आ*तं*वाद्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालून मगच शौर्यला त्या भागातून बाहेर काढायचा निर्णय वरिष्ठांनी घेतला.अंगावर भाजलेल्या जखमा व गमावलेल्या एक डोळ्याने शौर्य आईकडे पहात होता. वॉर्ड समोर थांबून सुभद्राने आत पाहिले व ती एकदमच कोसळली.नर्सनी तीला आधार घेऊन उठवले .समोरचे दृश्य पाहून सुभद्राचा अश्रूंचा बांध फुटला. छातीवरचे मणाचे ओझे उतरल्यासारखे तिला वाटू लागले.पूर्ण बँडेज मध्ये कृष शौर्यचे शरीर पाहून आवेगाने ती त्याच्याजवळ पळत गेली. याही परिस्थितीत शौर्यने आईला दिलासा दिला. दोन महिने या अज्ञातवासात अनेक वेळा आई-बाबा, काका काकू, आजीच्या आठवणीने व काळजीने शौर्यचा जीव तळमळला होता.
सुभद्रा हे सर्व ऐकून गोठूनच गेली होती.शौर्यला सांभाळणाऱ्या त्या अज्ञात इसमाचे मनातच आभार मानत व त्याला खूप आशीर्वाद देत ही गोड बातमी तिने घरी कळवली.शौर्यला “वीर चक्राने” सन्मानित करण्यात आले. कुठल्याही योद्ध्याला मिळालेले पदक जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच त्याच्या अंगावरच्या जखमा, हे वीरांच्या शौर्याचे, बलिदानाचे प्रतीक म्हणून मिरवायचे असते.युद्धात जेवढा सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा वाटा असतो तेवढाच योग्य माहिती पुरवून एका मिशनला तडीस नेण्यासाठी लागणारा अनुभव ,भौगोलिक परिस्थितीची जाण, योग्य मदत देऊन, पडद्यामागून काम करणारे असंख्य हात जे कधी प्रकाश झोतात येतच नाहीत…. पण त्यांचं देशावर असलेलं प्रेम हे या गोष्टीची साक्ष देतात.
शौर्य आज सीमेवर तैनात नसला तरी PMO मध्ये एका जबाबदार पदावर काम करत अविरत देश सेवा करत आहे.*
लेखिका – सौ. वृषाली पुराणिक,पुणे
महत्वाची सूचना – (या मराठी कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. लेखकाने सदर मराठी कथा स्वतः वेबसाईटला दिली आहे .लेखकाच्या परवानगीशिवाय कथा कुठेही वापरू नये.)
खूप छान आणि प्रभावी !
खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नवीन लिखाणासाठी ऊर्जा देऊन जाते.
सुरेख वर्णन केले आहे. जय जवान 🙏🙏🌷🌷
खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नवीन लिखाणासाठी ऊर्जा देऊन जाते.
खूप छान. प्रत्येक गोष्टीचे सुंदर वर्णन केले आहे.
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया नवीन लेखनासाठी ऊर्जा देतात.
थोडक्यात मोठा आशय सांगणारी कथा! ओघावती रसाळ वाणी. उत्सुकता वाढवणारी आणि सध्याच्या काळाला अनुसरणारी गोष्ट आहे. म्हणून ती अधिक भावली.
लिहित रहा.
मोठी लेखिका हो हाच आशीर्वाद!
खूप खूप धन्यवाद.
आपल्या आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत.
खुप छान कथा आहे .👌🏼👌🏼
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया नवीन लेखनासाठी ऊर्जा देतात.
सहज सुंदर लेखन.उत्कंठा शेवटपर्यंत वाढवत नेणारं.
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया नवीन लेखनासाठी ऊर्जा देतात.
खूप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया नवीन लेखनासाठी ऊर्जा देतात.
अप्रतिम!
खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नवीन लिखाणाला ऊर्जा देतात.