करिअरच्या वेगळ्या वाटा : फॉरेन्सिक अकाउंटिंग (न्यायवैद्यक लेखापरीक्षक)
१०-१२ चे रिझल्ट लागले की पालक आणि विद्यार्थी यांच्या मध्ये पुढे काय करायचे, कुठले करियर निवडायचे या बद्दल चर्चा सुरू होतात. पुर्वी ढोबळ मानाने हे ठरलेले असायचे की ९०% वर मार्क्स मिळाले की विज्ञान शाखेत जायचे, त्याहून जरा कमी मिळाले की वाणिज्य शाखेत. मग पुढे डॉक्टर किंवा इंजिनिअर किंवा मग सीए किंवा एमबीए हे ठरलेले धोपटमार्ग होते. परंतु आताच्या मुलांना हया रुळलेल्या मार्गांवरून जायचे नसते. त्यांना काहीतरी नवीन, हटके, एक्सायटिंग मार्ग निवडायचे असतात.
अशाच विद्यार्थ्यांसाठी आजचा हा लेख, जिथे आपण जाणून घेणार आहोत एका नवीन करिअर ऑप्शन बदल. Forensic Accounting हे गेल्या १-२ दशकात नव्यानेच उदयाला आलेले क्षेत्र आहे. त्यामुळेच त्याची म्हणावी इतकी माहिती किंवा जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंग, टेक्नॉलॉजी आणि इन्वेस्टीगेशन यांचा समन्वय.
- फॉरेन्सिक अकाउंटिंगचा उदय :
२००९ साली सत्यम घो*टा*ळा उघडकीस आला आणि भारतातील सर्वांना आर्थिक घोटाळ्यांबद्दल कळू लागले. या नंतर असे अनेक घोटाळे जसे कि कोळसा, थ्रीजी, आदर्श उघडकीस येऊ लागले. हे घो*टा*ळे उघडकीस आणण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली ते म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटंट्सनी.
प्रगत देशामध्ये फार पूर्वी पासून फॉरेन्सिक अकाउंटिंग हे क्षेत्र उदयाला आले होते. परंतु भारतात २००९ नंतर ह्या बद्दल जास्त चर्चा होऊ लागली. भारतात ज्यांनी ह्या क्षेत्राबद्दल जनजागृती केली ते म्हणजे पुणे येथे स्थित CA मयूर जोशी यांनी. त्यांनी सत्यम घोटाळा उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच २००५ साली त्यांनी इंडियाफोरेंसिक नावाची कंपनी चालू केली आणि या संस्थेतर्फे सध्या ७ विविध कोर्सेस चालवले जातात. म्हणूनच त्यांना भारतातील फॉरेन्सिक अकाउंटिंग चे आद्य प्रणेते मानले जाते.
फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय? (forensic accounting career in Marathi)
सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या आर्थिक घो*टा*ळ्याच्या किंवा अफ़रातफ़रीच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेणे आणि न्यायालयात सादर करता येतील असे पुरावे जमा करणे म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग होय. या मध्ये कंपनीच्या अंतर्गत होणारे व्यवहार, बाहेर होणारे व्यवहार असे दोन्ही येतात. एखाद्या घो*टा*ळ्यामध्ये कंपनीची कार्यपद्धती काय होती, कोण कोण माणसे जबाबदार होती, रक्कम किती होती, विम्याचा दावा करता येईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यात हे अकाउंटंट्स साहाय्य करतात. फॉरेन्सिक अकाउंटंट्स हे आकड्यांच्या पलीकडे जातात व लेखापरीक्षणाच्या कक्षेबाहेरील बाबींचा शोध घेतात. फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये अकाऊंट्सचे नियम व धोरणे यांवर जास्त भर न देता, वित्तीय गैरव्यवहारांची कुठलीही शक्यता पडताळून ती उघड करण्याकडे संपूर्ण जोर असतो.
- फॉरेन्सिक अकाउंटंट्सचे काम काय?
फॉरेन्सिक अकाउंटंट्स हे एक प्रकारचे CID असतात, जे वित्तीय गुन्हांचे परीक्षण करतात आणि त्या विरोधात पुरावे गोळा करतात. ते गुंतवणूकदारांच्या हितासाठी कंपनीच्या आर्थिक स्थिती ची वरचेवर तपासणी करतात, तसेच काही संभाव्य धोके आढळल्यास त्या संबंधी सखोल चौकशी करतात. याशिवाय जर कंपनी एखाद्या कंपनीला विकत घेणार असेल किंवा आपला व्यवसाय विकणार असेल तर अशा व्यवहारात कुठेच फ*सवणूक होत नाही ना याची काळजी फॉरेन्सिक अकाउंटंट्स घेतात. वित्तीय घोटाळ्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच मोठमोठया कंपन्या आजकाल कंपनी अंतर्गतच फॉरेन्सिक अकाउंटंट्सची नेमणूक करतात, जे कंपनीच्या अंतर्गत आणि बाह्य अशा सगळ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवतात. याशिवाय फॉरेन्सिक अकाउंटंट्स बँका, law firms, विमा कंपन्या यांसाठी सुद्धा काम करतात.
- फॉरेन्सिक अकाउंटंट होण्यासाठी पात्रता:
सहसा असा एक समाज आढळतो की फॉरेन्सिक अकाउंटंट होण्यासाठी सीए असणे आवश्यक आहे. बरेच सीए असलेले विद्यार्थी पुढे जाऊन फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये specialisation करतात. परंतु हा कोर्स करण्यासाठी सीए असणे आवश्यक नाही. खालील किमान पात्रता असलेले कोणतेही विद्यार्थी फॉरेन्सिक अकाउंटिंग चा कोर्स करू शकतात.
- कोणत्याही शाखेचा पदवीधर/ उच्च पदवीधर
- कोणताही फायनान्स क्षेत्रातील व्यावसायिक पदवीधर
- किमान तीन वर्ष फायनान्स क्षेत्रात अनुभव (जर विद्यार्थ्यांकडे कार्यानुभव नसेल तर त्यांना कोर्स करण्याआधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.)
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अकाउंटिंगचे सखोल ज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आणि नवीन गोष्टींचे कुतूहल असणे गरजेचे आहे.
- फॉरेन्सिक अकाउंटिंग साठी लागणारी कौशल्ये:
- नैतिक जबाबदारीची जाणीव: आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यानुसार निःपक्षपाती व्यवहार करणे. तसेच मोहाच्या क्षणांना बळी न पडता आपले काम योग्य प्रकारे आणि नियमानुसार करणे आवश्यक असते.
- विश्लेषणात्मक कौशल्य: कंपनीतील गुंतागुंतीची आर्थिक गणिते समजून त्याचे योग्य ते विश्लेषण करणे आवश्यक असते. तसेच दोन घडामोडींचा संबंध लावून योग्य ते अनुमान बांधणे आवश्यक असते.
- आत्मविश्वास : फॉरेन्सिक अकाउंटंट चे काम खूप धाडसाचे व जोखमीचे असते त्यामुळे त्यांना स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर विश्वास असणे गरजेचे आहे.
- तपशीलाकडे लक्ष : प्रत्येक छोटा तपशील लक्षपूर्वक तपासणे आणि बारकाव्यांकडे लक्ष देणे. एखादी माहिती किंवा कागदपत्र लहानसा समजून त्याकडे दुर्लक्ष करणे कधी कधी महागात पडू शकते.
- जिज्ञासा: एखाद्या गोष्टीबद्दलचे कुतूहल व त्याच्या अधिक खोलात शिरून जाणून घेण्याची इच्छा ही महत्त्वाची कौशल्ये आहेत. तपास आणि संशोधन हे फॉरेन्सिक अकाउंटिंग चा गाभा आहेत.
- सांघिक एकता: फॉरेन्सिक अकाउंटंटचे काम हे नेहमी टीम मध्ये होते. त्यामुळे टीम मध्ये इतर सदस्यांबरोबर समजूतीने व एकत्रितपणे काम करणे हे महत्त्वाचे असते.
- चालू घडामोडींबद्दल माहिती: फॉरेन्सिक अकाउंटंटला नेहमी जागतिक व देशात चालू असलेल्या ताज्या घडामोडींबद्दल माहिती असणे आवश्यक असते. त्याच्यातून त्यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली अनेक प्रकारची माहिती मिळते.
- सातत्य: आर्थिक घोटाळ्यांची माहिती सहसा सोप्या रीतीने मिळत नाही. तेव्हा धीर न सोडता सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे गरजेचे असते.
- भारतात उपलब्ध असणारे कोर्सेस:
भारतात फॉरेन्सिक अकाउंटिंग साठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. अनेक कॉलेजेस आणि संस्था हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी चालवत आहेत. या कोर्स चे नाव “Forensic Accounting and Fraud Detection” असे आहे. हे कोर्सेस सर्वसाधारणपणे सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा या स्वरूपाचे असतात. बहुतेक सर्व कोर्सेस हे ऑनलाईन स्वरूपाचे असतात. त्यांचा कालावधी आणि फी हि संस्थेनुसार वेगवेगळी असतात. परंतु खालील कोर्सेस हे सर्वत्र ग्राह्य मानले जातात.
- NSE: NSE ह्या संस्थेमार्फत Certified Forensic Accounting Professional Certification हा कोर्स चालवला जातो. ह्याचा कालावधी ३ महिन्याचा असून त्याची फी ही साधारपणे २०००० रुपये इतकी असते. ह्या कोर्स चे स्वरूप हे ऑनलाइन असते.
- ICAI: CA साठी असणाऱ्या ह्या संस्थे मार्फत देखील “Forensic Accounting and Fraud Detection” या नावाने सर्टिफिकेशन कोर्स चालवला जातो. ह्या कोर्सचा कालावधी ७ दिवसांचा असून त्याची फी १४००० रुपये + GST अशी आहे. हा कोर्स ऑनलाइन स्वरूपात सुद्धा उपलब्ध असून त्याचा कालावधी आणि फी वेगळी आहे.
या कोर्सेस बद्दल अधिक माहिती प्रत्येक संस्थेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
- फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये करिअरच्या संधी:
भारतात PWC, Delloite, KPMG आणि EY या ४ मोठ्या कंपन्या (बिग ४) आहेत ज्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय ७२ छोट्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या इंडियन बॅंक्स असोसिएशन अंतर्गत कार्यरत आहेत. तसेच काही वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय ही सुरु करू शकता.
फॉरेन्सिक अकाउंटंट झाल्यानंतर तुम्ही केंद्रीय गुप्तचर संस्थेचे विश्लेषक, बँकांसाठी गुन्ह्याचा तपास करणे, विमा कंपन्यांसाठी तपासनीस, खाजगी तपासनीस अशा विविध पदांवर काम करू शकता. याशिवाय भारताबाहेर अमेरिका आणि इतर प्रगत देशांमध्ये फॉरेन्सिक अकाउंटंट्स ना खूप मागणी असते.
- फॉरेन्सिक अकाउंटंटना मिळणारे मानधन :
फॉरेन्सिक अकाउंटंट ला सुरवातीला सरासरी ५-१० लाख रुपये पगार वर्षाला मिळतो. अनुभवाप्रमाणे ऑडिटर ला किती पगार मिळतो हे खालील तक्त्यात दाखविले आहे.
अनुभव (वर्षे) | सरासरी पगार |
अननुभवी (0-1) | रु. ५,००,००० |
सुरवातीची वर्षे (1-4) | रु. ६,४०,००० |
मधली काही वर्षे (5-9) | रु. १०,००,००० |
दीर्घ अनुभवानंतर (10+) | रु. १८,००,००० |
*हा तक्ता फक्त मार्गदर्शक म्हणून बघावा. प्रत्यक्ष मानधन हे तुमचे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तसेच कंपनीचे नियम यावर अवलंबून असते. साधारणपणे जेवढा जास्त अनुभव आणि कौशल्य तेवढे मानधन जास्त मिळते.
ह्या क्षेत्रात प्रगती करायला आणि शिकायला अनेक नवनवीन संधी उपलब्ध होतच राहणार कारण भारतीय अर्थव्यवस्था हि जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आणि जेवढी अर्थव्यवस्था मोठी तेव्हढी वित्तीय आव्हाने जास्त. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट्स आणि इन्वेस्टीगेशन मध्ये रस आहे आणि नवीन आव्हाने पेलायची इच्छा आणि ताकद आहे अशांनी ह्या वेगळ्या वाटेवरून प्रवास नक्कीच केला पाहिजे.
ह्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या सर्वांना मन्नपूर्वक शुभेच्छा !!
तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी
उपयुक्त माहिती
खूप खूप धन्यवाद!!
ह्याविषयी आजपर्यंत कधीच काही वाचले नव्हते. तुम्ही ह्या विषयावर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार.
खूप धन्यवाद!! अशाच नवीन विषयांवर लिहीण्याचा नक्कीच प्रयत्न राहील.
अतिशय सुंदर आणि पूर्ण माहिती सोप्या भाषेत आणि मुद्देसूद दिली आहे.
उपयुक्त लेख 👍🏼
Thank you Jyoti Tai!!
या नवीन कोर्स ची माहिती अतिशय सुंदर रित्या नेहा करंदीकर यांनी सांगितली आहे. मी आत्ता 73 वर्षांचा आहे त्यामुळे माझ्या ज्ञानात थोडी भर पडली. असे आणखीन बरेच कोर्सेस असतील जे अजून कोणाला माहित नसतील तर नेहाने त्याबद्त्द्दलही पुढे
माहिती देत राहावे. तिला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद. नक्कीच प्रयत्न राहील सर.
Very informative
Thank you so much!!
खूपच उपयुक्त माहीती आहे ताई.
खूप खूप धन्यवाद!!
छान आणि विस्तृत माहिती
Very useful information! I was not at all aware of this type of accountancy!
I’ll surely suggest my young friends and family people to go through this article and keep this career option in mind 👍
Thanks a lot Neha for such an informative article.