वात्सल्याची अंगाई गाणारी आईची प्रतिमा – पुस्तक परिचय

WhatsApp Group Join Now

“आई” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या अमोघ यशानंतर समीक्षा प्रकाशनगृहाने “आई” हाच विषय घेऊन आणखी एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह वाचकांच्या पुढ्यात ठेवला आहे. तो म्हणजे “आईची प्रतिमा”. जगातल्या प्रत्येक सजीवाला आई प्रिय आहे. या प्रियतेचे प्रतीक माणूस प्रत्येक घटकेत उभा करतो. त्याची प्रचीती साहित्यात स्पष्ट दिसते.  त्यातल्या त्यात कवितेततर अगदी ठसठसीत भेटते.    कविता वाचायला आपल्याला अवडतातच पण आई या विषयाच्या कविता आपल्याला अधिक जवळ घेतात. आपले लाड पुरवतात, माया करतात.  नवोदित कवयित्री प्रतिमा काळे यांनी संपादित केलेले पहिले काव्य संग्रह “आईची प्रतिमा” होय. मातृत्व विषयाचा आणि वात्सल्य धाटणीचा नवा कोरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशीत झाला.  यामध्ये केवळ शब्दांची गुंफण नसून भावनांची सरी पानापानात वाहते. शाळकरी मुलामुलीपासून ते तरुण, वृद्ध मंडळीपर्यन्त सर्वांना आवडेल अशी साहित्यकृती. 

लातूर येथील अखंडित कल्याणकारी काव्यसमूह यांनी आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्थरीय काव्य संमेलन पुण्यनगरीत पार पडले. हडपसर येथील धर्मवीर शंभुराजे संस्कृतीक भवन येथे जल्लोषात साजरे झाले.  संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर झिंगाडे यांनी भूषवले.  हरीभक्त परायण पुरुषोत्तम हिंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाची सांगता झाली. महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून आलेले, विविध शैलीचे, धाटणीचे आणि विषयाचे काव्य सादरीकर कवी मंडळींचे झाले. प्रमुख पाहुणे प्रा.  शरदचंद्र काकडे देशमुख यांची उपस्थिति लाभली. काव्य समूहाचे प्रमुख प्रा. कल्याण राऊत सर यांच्या परिश्रमाने हे संमेलन यशस्वी झाले.  दरम्यान कवयित्री प्रतिमाकाळे यांची आईची प्रतिमा या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते ल्हासात झाले. ९६ पानांच्या संग्रहात ७८ नामवंत आणि नवकविंनी यामध्ये योगदान दिले आहे. याचे वाचन करताना रसिक एक वेगळ्या जगात प्रवेश करतो. वाचता वाचता एक विलक्षण प्रवास घडतो. प्रेमाच्या जादूने मंत्रमुग्ध करून आईच्या अद्वितीय कृपेच्या मऊ मिठीत स्वतःला मुरवून ठेवतो.

मातेचे महन्मंगल गीत या बिरुदाने प्रा. हेमंत सुधाकर सामंत कवितेची प्रस्थावना करतात आणि वाचकांना आपसूकच खेचून घेतात.  संग्रहातील साऱ्या कविनी विषयाला न्याय दिल्याचे ते सांगतात. मुक्त छंदातील आणि वृत्तबद्ध कवितेचे स्वागत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. रेग्युलस तारा डॉ. माधुसुदन घाणेकर सरांनी हे प्रातिनिधिक काव्यसंग्रह अद्वितीय यश मिळवेल असा शुभाशीर्वाद दिला आहे. तसेच लेखक कवी श्री. विजय अभिमान वडवेराव यांनीही सदर संग्रह रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल असा अभिप्राय आपल्या शुभेच्छामधून दिला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांचे ब्लर्ब लाभले आहे. यामध्ये आई विषयीच्या भावना अगदी अंतरकरणापासून व्यक्त केल्या आहेत. कविता वाचकांच्या काळजाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात पाठराखण केली आहे.

अगदी थोड्या शब्दात खूप मोठा अर्थ सांगणाऱ्या रचनांचा आनंद यातून आपल्या मिळतो, कवयित्री तेजस्विनी राजेंद्र धमाळ यांच्या ‘आई प्रेमाचा सागर’ यातील एक भाग किती हळुवारपणे सांगतो, 

लुगड्याच्या झुल्यात झुलून मला

कधी करून हाताचा पाळणा

ममतेने हलवले तिने मला

फुलापरी जपले तिने मला

संस्कार छान लाभले मला

नाशिकच्या कवयित्री सौ. सुवर्णा दीपक वाणी यांनी आई या काव्यत वेळेच्या मर्मचे रुपक चित्रित केले,

आयुष्यभर पुरेल इतकी संस्काराची

शिदोरी देते आपल्या पदरात

सोडून गेली तरी कायम

राहते मनाच्या गाभाऱ्यात

यासारख्या एकापेक्षा एक दर्जेदार कवितेच्या केवळ प्रेमात न पडता आईच्या प्रेमळ स्पर्शाचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या विलक्षण कोमलतेचा स्वीकार करण्याचीही तयारी ठेवा.

आईची प्रतिमा याचे महत्व शब्दात मांडणे कठीणच. पण आपल मन हे नक्कीच जाणत आईचा आपल्या जीवनावर किती खोल परिणाम होतो.  धावपळीच्या जगात अनेकदा हा संग्रह म्हणजे एक विराम देणारीनूभूती देतो.  मातृत्वाचे मर्म परिभाषित करणारी मूक शक्ती देतो.  अमर्याद प्रेम आणि शाश्वत अनुग्रह यावर चिंतन करण्याचे बळ देतो.  पानांमधील प्रत्येक कविता म्हणजे पाहिलेले क्षण, शिकलेले धडे आणि मातृत्वाच्या दैनंदिन कृतींमध्ये दिसणारे सौंदर्य यांचे प्रतिबिंब आहे. वैयक्तिक अनुभव, सामूहिक कथा, शहाणपण आणि प्रेरणा रुजवणे हाच या संग्रहाचा उद्देश आहे.  माय हि केवळ क्षणिक नसून ती सार्वभौमिक प्रतिमा आहे. या पिढीने तो उत्साहात आनंदात आणि स्वतंत्र शैलीत बांधला आहे.  आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच आणि वाचकांना सांत्वन करणे, प्रेरणा देणे, जीवनाला आकार देण्याचे विलक्षण काम हे करते.  माउलीच्या रेशमी संबंधाची गहन भावना सामायिक करते.

आईची प्रतिमा वाचतानाच आपल्याला समजते की हा संग्रह एक स्वतंत्र वेगळे स्थान निर्माण करतो.   यामधील रचना मातृत्वाच्या वैविध्यपूर्ण छटा मांडून ह्रदयस्पर्शी गान निर्माण करतात. त्यातील एक एक घाटीके मार्मिकतेने गुंफून जाते सोबत वाचकालाही सोबत घेते. पहिल्या कडव्यापासून ते अखेरच्या पंक्तिपर्यन्त आईच्या आत्म्याच्या खोल सागराचा पुरावा आहे.  यामधील प्रत्येक ओळ न ओळ बारकायीने पहा मातृ भावनांचे गहन कोड्याची उकल करत असल्याचे जाणवेल.  हे पुस्तक मातृत्वाचे असंख्य पैलू उलगडते. प्रत्येक काव्याचा भावनिक अनुनाद वाचकांच्या मनाला भिडतो, सहानुभूती आणि समजूतदारपणाची भावना जागृत करतो.

कोपर गावच्या कवयित्री सौ. चंदन तरवडे आपल्या रचनेत त्यांना प्राप्त झालेल्या प्रेरणेच्या प्रकाशात आईकडे काव्यरूपी मागणी करतात,

तिचा राहो आशिर्वाद

तिची मिळावी प्रेरणा,

प्रगतीचा हो आलेख

उंच भिडवा गगना. . .

ममतेच माहात्म्य स्वशब्दात व्यक्त करताना ललिता टोके आपल्या कवितेची सुरुवातच सुंदररीत्या करतात, आईमुळेच घडले विश्वदर्शन. . . आणि शेवटी सांगतात,

माऊली जगती अमृतचा घडा

साहते – करते कष्ट रात्रंदिन

आई असते एक कल्पतरु

समृद्धी चे गाव उजळते जीवन. . .

माता कुणाचीही असो ती सदैव आदरणीय आहे. यश-अपयश, दुख-आनंद, प्रेम-द्वेष स्नेह-क्लेश यामधून निर्माण होणाऱ्या शक्तीची ती साक्षीदार असते. त्या शक्तीचे एक रंगीत चित्रण या प्रतिमेत उमटलेले दिसते.  हे पुस्तक मोकळेपणाला प्रोत्साहन देऊन मातृत्वाच्या आव्हानांभोवती भाष्य करते. तिचे अमूर्त सौंदर्य सक्षमरित्या स्वीकारते. चालत्या काळात सद्य शतकात आई कळणे सोपे आहे पण, आई उमजणे, आई जपणे हे नव तरूणांसमोरील नवी विचार प्रणाली असल्याचे दिसून येते. काळाच्या प्रवाहात, शहाणपणाच्या काळ्या पाण्यात हे अनमोल मोती वाहून तर गेले नसतील ना.  जर ते खरंच तस झाले तर त्याच्या शोध घेण्याची अक्कल या पिढिला आहे का?  हा एक मोठा प्रश्न समोर ठाकतो. अश्या समस्यावरील झालकलेले आवरण दूर करण्याच काम हा काव्यसंग्रह करतो.

उद्बोधक आणि प्रतीकात्मक प्रतिमांनी समृद्ध, हे पुस्तक केवळ साहित्यिक अनुभव नाही तर मातृत्वाचे सार जीवंत चित्राप्रमाणे टिपते. प्रत्येक पान एक कॅनव्हास आहे. ज्यात प्रेमाची ऊब, मायेची भूक आणि सामान्य क्षणांमध्ये आढळणारे सौंदर्य ओघवत्या रंगांनी रंगवलेले आहे.  पुस्तक वाचकांना त्यांच्या आईसोबतच्या नातेसंबंधांवर चिंतन करण्यास भाग पाडते. बिनशर्त दिलेल्या प्रेमाबद्दल सखोल समज आणि प्रशंसा वाढवते. मातृप्रेमाचे मर्म,  मधुर अंगाई, तिच्याशी होणारी हितगुज अन कुजबुज, आईच्या स्पर्शाच्या रचनेत विणलेली लवचिकता आणि मातृनात्याची परिवर्तनशील शक्ती वाचकांना अनुभवता येईल. संगोपन, त्याग आणि आनंद यासारख्या महत्त्वाच्या संज्ञा गीतात्मक शब्दसंग्रह तयार करतात. हे पुस्तकापेक्षा अधिकपटीने जास्त आहे.  आपल्या जगाला आकार देणार्‍या उल्लेखनीय महिलांचा हा एक उत्सवपूर्ण गौरव, एक शोध आणि आदरांजली आहे. या अविस्मरणीय प्रवासात आमच्यात सामील व्हा आणि या विलक्षण पुस्तकाची पाने मातृत्वाची व्याख्या करणार्‍या कालातीत आणि अमर्याद प्रेमाच्या प्रतिध्वनींनी गुंजू द्या असे आव्हान हा संग्रह करतो.  काव्य प्रांतात पदार्पण केलेल्या नव कविंच अभिनंदन आणि आईची प्रतिमा या संग्रहाच्या मुद्रित आयुष्याला हार्दिक शुभेच्छा ! 

पुस्तकाचे नाव – आईची प्रतिमा (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)

संपादक – प्रतिमा काळे, पुणे.

पृष्ठसंख्या – ९६

मूल्य – १५०/-

1 thought on “वात्सल्याची अंगाई गाणारी आईची प्रतिमा – पुस्तक परिचय”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top