Data Protection Day in Marathi: तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग अधिकाधिक जवळ येऊ लागलं आणि आपल आयुष्य खूप सोपं होऊन गेलं. पण त्याच बरोबर सायबर क्रा*ईम देखील तितक्याच वेगाने वाढत चालला आहे. तुमचा डेटा चो*रून तुमची फसवणूक करणाऱ्या अशा या डेटा हॅर..कर्स पासून आपला बचाव कसा करायचा हे बरेच जणांना माहिती नसते. त्यामुळे आजच्या लेखात हि माहिती समजून घ्या. तुम्ही सावध व्हाच पण यासोबत आपल्या जवळच्या माणसांसोबत सुद्धा ही माहिती शेयर करा.
इंटरनेटचा शोध आणि प्रसार :
1989 मध्ये बर्नर्स-ली या संगणक वैज्ञानिक टीमने सर्वात पहिल्यांदा वर्ल्ड वाइड वेबचा शोध लावला. 1993 मध्ये हे वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिकरित्या वापरासाठी उपलब्ध केले गेले. आणि मग यामार्फत अगदी सहजपणे माहितीची आदान प्रदान होऊ लागली. असंख्य माहितीचा खजिनाच हाती लागल्यामुळे हे लोकांमध्ये खूपच जास्त लोकप्रिय होऊ लागलं.
‘गरज ही शोधाची जननी असते’. माणसाच्या बदलत्या गरजेनुसार इंटरनेटच्या मदतीने विविध उपकरणांचा शोध लावला गेला. लँडलाईन फोनची जागा आता मल्टी टास्किंग करणाऱ्या स्मार्ट मोबाईल फोनने घेतली. इंटरनेट सामान्यांच्या खिशालाही परवडू लागल्याने अगदी सामान्य माणूस देखिल आता वेब सर्फिंग करत आहे.
आता घर बसल्या जगातला कानाकोपऱ्यातली माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. जेवण मागवणे, देशा-परदेशात पैसे पाठवणे, बिलं भरणे,पत्ता शोधणे, आरोग्याची नोंद ठेवणे, अभ्यास करणे अशा अनेक गोष्टींसाठी आपण दिवसभरात अनेक ॲप्स आणि वेबसाईट्सची मदत घेत असतो. लाईट, फॅन, टीव्ही अशी घरातली उपकरण चालू बंद करण्यासाठी सुद्धा आता जागेवरून उठण्याची गरज नाही. अलेक्सा, गुगल सारखे मदतनीस तर साध्या तोंडी दिलेल्या सूचनांनुसार सुद्धा जो ‘हुकूम मेरे आका’असं म्हणतात आपली छोटी मोठी कामे करत असतात.
अफाट बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसाने स्वतःचे जीवन सुखी आणि आरामदायी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. आणि आता याचाच पुढचं पाऊल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म. याचा वापर करून 14 विद्या आणि 64 कला आत्मसात केलेले निरनिराळे ॲप्स किंवा वेबसाईट्स आता आपल्या कल्पनेत साकारलेलं चित्र हुबेहूबपणे रेखाटने, एखाद्याच्या आवाजात गाणं गाणे, चित्रपट तयार करणे अशी कलात्मक कामे देखील अत्यंत सफाईतशीरपणे करतात.
इंटरनेटचा निष्काळजीपणाने वापर केल्याचे दुष्परिणाम :
परंतु जसं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपलं दैनंदिन जीवन खरंच सुखावह झालं असलं तरी त्याचा निष्काळजीपणे वापर केल्याने गु*न्हे*गारीचे प्रमाण वाढत चालल आहे. बऱ्याचदा निरनिराळ्या वेबसाईट्सट्स किंवा ॲप्सवर आपण कळत नकळतपणे आपली बरीचशी माहिती भरत असतो. सोशल मीडियावर आपलं वैयक्तिक आयुष्य इतरांसोबत शेअर करत असतो. मग समाजातील काही गु*न्हेगारी प्रवृत्ती असणारी माणसं या माहितीचा गैरवापर करून लोकांना लाखो रुपयांचा गं*डा घालतात. कित्येक उद्योजकांकडून त्यांनी फीड केलेला डेटा घेऊन तो परत मिळवण्यासाठी बरीच मोठी रक्कम मागितली जाते.
अशाप्रकारे काही समाज विघातक लोक एखाद्या राष्ट्रासाठी देखील धोकादायक ठरत चालले आहेत. आजकाल सरकारी कार्यालयीन कामकाज देखील ऑनलाईनच चालतं. देशाच्या संरक्षण, आर्थिक, सामाजिक प्रकल्पांचे डिजिटल स्वरूपातच जतन केले जाते.
‘Precaution is always better than cure’ डेटा चोरी झाल्यावर त्यावर कारवाई करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी जर लोकांना जागृत केलं तर त्यापासून होणारे नुकसान नक्कीच टाळता येईल.
डेटा प्रोटेक्शन डे (Data Protection Day in Marathi) :
डेटा चे महत्व ओळखून त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने 2007 मध्ये 28 जानेवारी हा दिवस डेटा प्रोटेक्शन डे म्हणून घोषित केला. वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी इंटरनेटचा वापर करणे ही एक अपरिहार्य बाब आहे. परंतु याचा वापर करताना आपलं नुकसान होऊ नये, यासाठी नागरिकांनी काय व कशी दक्षता घ्यावी. ऑनलाइन फ*सवणूक यामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये. याकरता या दिवशी सरकारकडून विविध कॅम्पेन्स, जाहिराती, मेसेजेस, ई -मेल्स यांच्या मार्फत नागरिकांना बरीच माहिती पुरवली जाते. तसेच त्यांना वेबसाईट किंवा ॲप्सचा वापर करताना स्वतःच्या डेटाबाबत कायम सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं.
तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी…
१. स्ट्रॉंग पासवर्ड :
प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पासवर्ड हा वेगवेगळे कॅरेक्टर्स, अप्पर केस, लोअर केस वापरून तयार केलेला असावा. शक्यतो आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या तारखा, फोन नंबर, घर क्रमांक याचा त्यात समावेश असू नये. कोणत्याही व्यक्तीला सहज लक्षात येईल इतका सोपा आपला पासवर्ड कधीच नसावा. तसेच आपला पासवर्ड आपण सतत बदलत राहिला पाहिजे.
२. ओटीपी शेअरिंग :
ऑनलाइन खरेदी करताना, पैसे पाठवताना अथवा कुठलाही फॉर्म भरताना आपल्याला जो ओटीपी म्हणजेच ‘वन टाइम पासवर्ड’ येतो तो कधीही कोणासोबत शेअर करू नये.
3. सोशल मीडिया :
सध्याच्या reels च्या जमान्यात सगळेजण real पेक्षा virtual जगातच जास्त रमतात. सोशल मीडियावर आपली रोजची जाण्या-येण्याची ठिकाण, नातेवाईक मंडळी, ट्रॅव्हल तिकीट अशी सर्व माहिती पोस्ट करू नये.
4. वेबसाईट :
लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी बनावट ई-मेल्स किंवा मेसेजेस पाठवतत. जे लोक अशा प्रकारच्या इमेल्स किंवा मेसेजला प्रतिउत्तर देतात, त्यांच्याकडून ते अजून जास्त वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा कोणताही ई-मेल उघडून वाचण्यापूर्वी तो कोणाकडून आलाय हे नीट बघून घ्या आणि संशय येणाऱ्या लिंक वर अजिबात क्लिक करू नका.
5. बॅक अप :
उद्योजकांनी किंवा वैयक्तिक पातळीवर देखील आपण आपल्या महत्त्वाच्या फाइल्सचा वेळोवेळी बॅकअप घेतला पाहिजे. त्यामुळे उद्या जरी कोणी आपल्या फाइल्स गेल्या तरी आपल्याकडे बॅकअप असल्यामुळे रॅनसमवेअरचा धोका टाळता येईल.
6. अपडेट्स :
आपले मोबाईल किंवा लॅपटॉप वेळच्या वेळी अपडेट्स करायला हवेत.
7. टू फॅक्टर ऑथेंटीकेशन :
बरेचदा आपण काही वेबसाइट्स वर फोन आणि लॅपटॉप अश्या दोन्ही डिव्हाईसेसने लॉगिन करतो. अशावेळी सेटिंग्स मध्ये टू फॅक्टर ऑथेंटीकेशन नेहमी ऑन ठेवावे. जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठल्याही दुसऱ्या डिव्हाईस मार्फत त्या वेबसाईटवर तुमच्या नावाने लॉगिन करत असाल त्यावेळी तुम्हाला एक कोड येईल. तुम्ही सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्या नावाने लॉगिन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते लगेचच कळून येईल.
8. स्कीम्स जाळे :
बऱ्याचदा ‘अमुक तमुक स्पर्धेत तुमचा नंबर आला आहे…. त्यासाठी तुम्हाला पैसे पाठवले आहेत’ असा फोन तुम्हाला येतो. नंतर तुमचा आधार नंबर, पत्ता, जन्म दिनांक, बँक अकाउंट नंबर अशी खाजगी माहिती तुम्हाला विचारली जाते. असा फोन आल्यास फसव्या स्की*म्सला न भुलता आपली खाजगी माहिती कोणालाही देऊ नका.
9 ऑनलाइन खरेदी :
वेळेची आणि पैशाची बचत व्हावी म्हणून आजकाल आपण सर्वजण ऑनलाईन खरेदीला जास्त पसंती देतो. परंतु अशी ऑनलाईन खरेदी करताना शक्यतो माहितीच्या आणि खात्रीशीर वेबसाईटवरूनच खरेदी करावी. नेहमीच्या शॉपिंग ॲप वरून खरेदी करताना देखील शक्यतो आपले क्रेडिट कार्ड रजिस्टर करून ठेवू नये. आणि जरी केले तरी त्याची ठराविक लिमिट लॉक करून ठेवावी जेणेकरून भविष्यात खूप जास्त नुकसान होणार नाही.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप हि जॉईन करा.
लेखिका -स्नेहल बाकरे, पुणे
फारच उपयुक्त माहिती 👍
Thank you