पंजाबचा सिंह लाला लजपतराय यांची संपूर्ण माहिती। Lala Lajpat Rai full Information in Marathi

WhatsApp Group Join Now

आपल्या भारत देशाला अनेक वीर योद्धा लाभले. ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातीलच एक महान वीर होते “लाला लजपतराय“. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. ते भारतातील पंजाब येथील होते. त्यांना “पंजाब केसरी” असेही म्हणतात. २८ जानेवारी १८६५ मध्ये पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील धुडिके  या गावी एका सामान्य कुटुंबात लाला लजपतराय यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियन शिकवत होते. ते एक चांगले शिक्षक होते तर आईचं नाव गुलाब देवी अग्रवाल होते. त्या शीख परिवारातील होत्या. त्यांच्या जैन परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती. लाला लजपतराय हे लहानपणापासूनच हुशार आणि उदारमतवादी होते. त्यांना बालपणापासूनच देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची शपथ त्यांनी घेतली.रेवरी येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधा देवीशी झाला. त्यांनी देश सेवेसाठी आपले आयुष्य पणाला लावले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने केली. लाला लजपतराय यांनी यंग इंडिया, महान अशोक, लाला लजपतराय रायटिंग अँड स्पीचेस अशी अनेक पुस्तके लिहिली.

लालाजी इतिहासाच्या पानात, भारताच्या स्वातंत्र्यलढा मधील एक स्वातंत्र्य सेनानी होते. लालाजी जहाल नेत्यांमध्ये तीन प्रमुख नेत्यांमधील लाल बाल पाल यांच्यामधील एक होते.लाला लजपतराय यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र बाल यांच्यासोबत मिळून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक कार्य केले म्हणून त्यांना “लाल बाल पाल” म्हणून ओळखले जायचे. सन १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात त्यांनी प्रदर्शन केले होते. या प्रदर्शना दरम्यान झालेल्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय प्रचंड जखमी झाले होते.

Lala Lajpat Rai full Information in Marathi
Lala Lajpat Rai full Information in Marathi

ते पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.  सुरुवातीच्या आयुष्यात लाला लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्व वरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे निर्माण झाला. १८८० मध्ये लाला लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला.येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅजेटचे संस्थापक संपादक बनले.

हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नऊ जवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष होती.भारतीय उपखंडातील हिंदू जीवन पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या. १८८४ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतराय सुद्धा त्यांच्याबरोबर आले.१८८६  मध्ये ते वडिलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चुडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले. लहानपणापासूनच देश सेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. आणि म्हणूनच भारत देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. व त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार येथे शाखा स्थापन केली. तसेच बाबू चुडामणी, चंदुलाल दयाल  यांच्यासोबत लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी  अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले. १८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोर मध्ये दयानंद वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. १९४७ साली भारत – पाकिस्तान फाळणीनंतर लाहोर मधील याच विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.

१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन्स सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर  बहिष्कार घातला. कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयांचा समावेश नव्हता. या आयोगा विरुद्ध भारतभर निदर्शने झाली. 30 ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा आयोगाने लाहोरला भेट दिली तेव्हा त्याविरुद्ध मूकनिदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतरायांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स कोट यांनी  दर्शकांवर लाटी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊन सुद्धा लाला लजपतरायांनी या जमावा समोर भाषण केले. आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शेवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील असे मी जाहीर करतो हे त्यांचे यावेळचे उदगार होते.

निदर्शनाच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदयविकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले .स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू वाढवला असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संस्थेत संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा यात आपली काही भूमिका नव्हती असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सोंडर्स या साहाय्यक पोलीस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सोंद्रस वर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडले.या दोघांचा पाठलाग करणारा चरणसिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.

लाला लजपत राय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील लाल बाल पाल या त्रिकोणातील प्रसिद्ध लाला लजपतराय केवळ एक निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हे तर एक उत्तम लेखक,व्यक्ती ,समाज सुधारक आणि आर्यसमाजी देखील होते.

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एक चांगले वकील देखील झाले. त्यात त्यांचे मन रमले नाही. वकिली सोडून त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. पीएनबी आणि लक्ष्मी विमा कंपनीची पायाभरणी केली. बाल गंगाधर टिळकानंतर लाल लजपतराय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. ते काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित रहात असत. त्यांच्या कार्याला पाहता १९२० साली त्यांनी नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी संपूर्ण देशात स्वदेशी वस्तु स्वीकारण्याकरता एक अभियान चालविले. बंगाल विभाजनाचा कडाडून विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.ब्रिटिश सरकार विरुद्ध शक्तिशाली भाषण देत त्यांना हादरवून सोडणारे लाला लजपतराय यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पहाता त्यांना पंजाब केसरी आणि पंजाबचा सिंह देखील म्हटले जाते. सायमन कमिशनचा विरोध शांततेने करण्याची लालाजींची इच्छा होती. त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पॅनल मध्ये भारतीय राहू शकत नाहीत तर या कमिशनने भारतातून परत जावे. सरकार त्यांची मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. या अमानुष लाठीचार्ज मध्ये लालाजी गंभीर रित्या जखमी झाले आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हणाले,” माझा शरीरावर लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या मृत्यूचे कारण असेल“. पोलिसांकडून झालेल्या या लाठीचार्जमुळे १७ नोव्हेंबर १९२८ ला त्यांचा मृत्यू झाला. गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता लाला लजपतराय यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि शहीद झाले.ते एक शूर स्वातंत्र्यसैनिक आणि एक चांगले नेता होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अथक परिश्रम केले.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला आठवतो.त्यांनी भारताच्या तरुणांना आव्हान केले होते की, इतरांवर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकता कारण राष्ट्रे त्यांच्याच बळावर निर्माण होतात आणि दुसरे भूतकाळाकडे पाहणे निरर्थक आहे जोपर्यंत त्या भूतकाळावर अभिमान वाटेल असे भविष्य घडवण्यासाठी कार्य केले जात नाही.सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होईल.पराभव आणि अपयश हे कधी कधी विजयासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या असतात.

तुम्हाला ही माहिती Lala Lajpat Rai full Information in Marathi कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
      धन्यवाद !

2 thoughts on “पंजाबचा सिंह लाला लजपतराय यांची संपूर्ण माहिती। Lala Lajpat Rai full Information in Marathi”

  1. खूपच छान माहिती दिली..अगदी विचारपूर्वक आणि अचूक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top