35 ते 40 व्या वर्षीच खेळाडू खेळविश्वातून निवृत्त होतात किंवा जागतिक स्तरावरचे खेळ खेळण्याचे बंद करतात परंतु त्याहूनही जास्त वय असताना Age is just a number हे सिद्ध करत रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकून जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. वयाच्या 43 व्या वर्षी जागतिक स्तरावरील दुहेरी टेनिस स्पर्धा खेळत कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये राहणारा रोहन बोपण्णा सर्वात वयोवृद्ध असलेला प्रथम क्रमांकाचा टेनिस खेळाडू बनला आहे. 24 जानेवारी 2024 लायाने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जेतेपद पटकवून टेनिस चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रोहन बोणप्पा यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. Australian Open Rohan Bopanna
Rohan Bopanna बालपण आणि शिक्षण
रोहन बोपण्णाचा जन्म 4 मार्च 1980 रोजी बेंगळुरू येथे झाला. बोपण्णाने वयाच्या 11 व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. रोहनचे वडील एमजी बोपण्णा हे कॉफी प्लांटर आहेत आणि आई मलिका बोपण्णा या गृहिणी आहेत. रोहनला एक मोठी बहीण असून ती मुंबईत राहते. रोहनने एखादा वैयक्तिक खेळ खेळावाअसे त्याचे वडील एमजी बोपण्णा यांचे मत होते. लहानपणापासूनच रोहनला फुटबॉल आणि हॉकीसारख्या खेळांमध्येही रस होता. परंतु 19 व्या वर्षापर्यंत रोहन टेनिस हाच खेळ आवडीने खेळत असे. रोहन बोपण्णा याने आपले शिक्षण बेंगळुरु येथील जैन विद्यापीठांतर्गत येणाऱ्या श्री भगवान महावीर जैन महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. Australian Open Rohan Bopanna

Rohan Bopanna टेनिस खेळ आणि जागतिक क्रमवारी
म्हणतात ना, आपल्याला जे आवडतं ते इतकं छान करावं की त्या क्षेत्रात आपल्याइतकं उत्तम कामगिरी करणारं कोणीही नसेल. 11 व्या वर्षापासून टेनिस खेळणारा रोहन बोपण्णा याचं नेहमीच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅममध्ये विजयी खेळी करण्याचे स्वप्न होते. 2010 आणि 2023 मध्ये युएस ओपनमध्ये फायनलपर्यंत जाऊन माघार घ्यावी लागलेल्या बोपण्णाने यावेळेस त्याचे स्वप्न पुर्ण करुनच दाखवले.रोहन बोपण्णाचे कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग 2007 मध्ये एकेरीमध्ये आणि 2013 या वर्षात दुहेरीमध्ये 3 रा आहे. बोपण्णाने 2007 मध्ये असाम-उल-हक कुरेशीसोबत दुहेरीसाठी पार्टनर होता. ही जोडी इंडोपाक एक्सप्रेस म्हणूनही ओळखली जात असे. दोघांनी चार चॅलेंजर जेतेपद पटकावले आहेत. 2010 चा टेनिस हंगामाच तो दुहेरीच्या पहिल्या 10 संघात राहिला. त्या वर्षी तो विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आणि पाच ATP टूर स्पर्धांमध्ये उपविजेता देखील ठरला, ज्यामध्ये यूएल ओपनचा सुद्धा समावेश होता. याशिवाय त्याने जोहान्सबर्ग ओपनचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपण्णा हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 24 विजेतापदे जिंकली आहेत. Australian Open Rohan Bopanna
रोहन बोपण्णा सध्या जागतिक पातळीवरील टेनिस दुहेरी क्रमवारीत 14 व्या स्थानावर आहे. यापूर्वी 2010 मध्ये एसाम-उल-हक कुरेशीने असे केले होते. बोपण्णा, ज्याने आपल्या कारकिर्दीत 24 विजेतेपदे जिंकली आहेत, त्याचा एटीपी वर्ल्ड टूर आणि ग्रँड स्लॅम मुख्य ड्रॉ सामने आणि डेव्हिस कपमध्ये 482-359 (57.3%) असा विजय-पराजयचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे.
Rohan Bopanna बोपण्णाला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी 61 सामने लागले
ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपण्णाचा हा 61 वा सामना होता. आजतागायत त्याने 19 वेगवेगळ्या पार्टनरसोबत सामने खेळले आहेत. बोपण्णाने अमेरिकेच्या राजीव रामचा अनोखा विक्रम मोडला. पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद जिंकण्यापूर्वी बोपण्णा या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. राजीव रामला पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी 58 सामने लागले. तर बोपण्णाने आपल्या 61 व्या सामन्यात हे विजेतेपद पटकावले. याचा अर्थ त्याच्या प्रत्येक अपयशात तो त्याच्या विजयाकडे जाण्याचा मार्ग आखत राहिला. थांबला नाही की खचला नाही. त्याने लहानपणी पाहिलेले स्वप्न अखेर सत्य करुनच दाखवले. Australian Open Rohan Bopanna
Rohan Bopanna पराभवाच्या दिवसांतील अनुभव महत्त्वाचा
आपल्याला वाटतं कि पराभव झाला म्हणजे सगळंच संपलं, तसं नसतं. पराभव आपल्याला अनुभव देऊन जातो आणि हाच अनुभव जोडुन आपला विजय पक्का करायचा असतो. हे टेनिस खेळाडू आणि आजपर्यंतचा सर्वात जास्त वयाचा म्हणजे 43 वर्षाचा असलेल्या रोहन बोपण्णा यांने दाखवून दिले आहे. पराभवाचा अनुभव नहमीच विजयाकडे कुच करण्याच्या कामी येतो. खरं तर त्यानेच आपला विजयाकडे झेपावण्याचा मार्ग अधिक सक्षम आणि खरा बनत जातो.
Rohan Bopanna गुरुने दिलेली साथ मोलाची ठरली
रोहन बोपण्णा याने त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय देताना सर्वात आधी त्याचे कोच स्कॉट डेवीडऑफ यांचे आभार मानले आहेत. एक वेळ अशी होती की, सलग पाच महिने एकही सामना रोहन बोपण्णा यांना जिंकता आला नव्हता. आता आपलं करिअर संपलं कि काय असे वाटू लागलेले असतानच त्यांच्या कोचनी त्यांची साथ सोडली नाही. स्कॉट डेवीडऑफ यांनी त्यांच्या या लाडक्या आणि अथक परिश्रम घेणाऱ्या खेळाडूकडून सतत खेळाचे सराव करुन घेणे सुरुच ठेवले आणि त्याचे फलित आज आपण पाहतोच आहोत. अंधारातही योग्य वाट दाखवून ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यासाठी सतत पाठिशी असणारा गुरु लाभल्याबद्दल रोहन बोपण्णा यांनी देवाचे आभार मानले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन ओपन चे आयोजकांचे देखील त्याने खास आभार मानले आहेत कारण वेळोवेळी त्यांनी रोहन बोपण्णा यांना खेळासाठी बोलावले आहे.
पत्निच्या भावनिक आधारामुळे पराभवाच्या काळातही हिंमत राखता आली
व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असलेल्या पत्नीच्या भावनिक आधाराशिवाय हा विजय शक्य नसल्याचे देखील रोहन बोपण्णा यांनी सांगितले आहे. पत्निच्या भावनिक आधारामुळे टेनिस सोडण्याचा निर्णय बदलला असेही त्यांनी सांगितले आहे. रोहन बोपण्णा यांचे २०१२ मध्ये सुप्रिया अन्नियाशी लग्न झाले. दोघांनी प्रेमविवाह केला आहे. रोहन आणि सुप्रिया यांना त्रिधा नावाची गोंडस मुलगी देखील आहे. बोपण्णा यांचा विजय झाला तेव्हा वडिलांकडे गोड हास्य करीत धाव घेणारी तीन वर्षांची त्रिधा अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसून आली. रोहन बोपण्णा याने त्याच्या कुटुंबाला विजयाचा साथीदार मानले आहे. कारण “लहानपणापासून आई-वडिल आणि तरुणपणात पत्नीने दिलेल्या साथीमुळेच मी हे जगज्जेतेपद मिळवू शकलो” असेह त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. Australian Open Rohan Bopanna
Rohan Bopanna वयाला मागे टाकत शरिराची मजबूती वाढवणारी फिजिओथेरपी
रोहन बोपण्णा यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे कोच, कुटुंबिय आणि फिडिओथेरपी या वय वाढल्यानंतरही फिट राहण्यात फिजिओची महत्त्वाची भूमिका होती असे माध्यमांशी बोलताना बोपण्णा म्हणाले. टेनिस हा खेळ खेळताना स्नायूंची मजबूती अत्यंत महत्वाची असते. हाताचे स्नायू, पायांचे स्नायू मजबूत असतील तरच खेळाडू वर्षानुवर्षे उत्तमरित्या खेळू शकतो. मधल्या काही काळात रोहन बोपण्णा यांना हाताच्या मसल्सपेनचा त्रास उद्भवला होता, आणि डाव्या कोपराला मार देखील लागला होता त्यावेळी फिजिओशेरपीचे व्यायाम आणि उपचारांनी बोपण्णा यांना पुन्हा खेळण्यासाठी सक्षम बनवले. आणि आज त्यांनी टेनिस खेळातील 43 वर्षांचा खेळाडू म्हणून जगज्जेते पदही मिळवले आहे. Australian Open Rohan Bopanna
रोहन बोपण्णाला द्या विजयासाठी शुभेच्छा!
सध्या सगळ्याच भारतीयांच्या ओठांवर रोहन बोपण्णा याचे नाव आहे. रोहन नेहमीच त्याच्या इंस्टाग्रामच्या सोशल मिडिया हँडलवर ऍक्टिव्ह असतो. rohanbopanna0403 हा त्याचे इंस्ट्रा आयडी आहे. येथे जाऊन तुम्ही एक भारतीय म्हणून त्याच्या या जागतिक विजयासाठी शुभेच्छा देऊ शकता. 43 व्या वर्षी जागतिक पातळीवर टेनिस खेळात भारताचे नाव गाजवणाऱ्या आपल्या या खेळाडूला सर्वांनी प्रेममय शुभेच्छा द्यायला विसरु नका. Australian Open Rohan Bopanna
अशाच नवनवीन माहितीपूर्ण लेखांसाठी वेबसाईटला भेट देत रहा आणि आमचे लेख तुम्हाला कसे वाटले हे देखील कमेंट करुन सांगा. तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवर माहितीपूर्ण लेख वाचायला आवडतील हे देखील आम्हाला कळवा. तुमची दाद आणि प्रतिसाद हेच आमचे काम सुरु ठेवण्याचे इंधन आहे.
लेखिका – विशालाक्षी चव्हाण, मुंबई
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!!
लिहित रहा..
खूप छान लेख,
खुप छान