Filmfare 2024 awards Marathi: भारतीय सिनेसृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार.एखादा चित्रपट बनताना अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो जसे की चित्रपटाच्या तांत्रिक बाजू,चित्रपटाचे लेखन,चित्रपटाचे संगीत, चित्रपटांमधील कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील कलाकारांची वेशभूषा,चित्रपटातील सेट बनवणे,कलाकारांचे मेकअप आर्टिस्ट इत्यादी अनेक हात एक चित्रपट बनण्यामागे रात्रंदिवस मेहनत करताना आपल्याला दिसून येतात.या सर्व कॅटेगिरी चा विचार करून टाइम्स ग्रुप फिल्मफेअर हा पुरस्कार सोहळा आयोजित करते. फिल्मफेअर ची ट्रॉफी मिळणे म्हणजे एखाद्या कलाकाराला त्याने केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटते. यंदाचा म्हणजेच 2024 चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा नुकताच गुजरात मध्ये पार पडला सलग दोन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्याची सुरुवात 27 जानेवारी 2024 रोजी झाली आणि या सोहळ्याची सांगता ही 28 जानेवारी 2024 वार रविवार या दिवशी झाली. यावर्षीचा हा टाइम्स ग्रुप आयोजित 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होता. फिल्मफेअर पुरस्कार मिळणे म्हणजे एखाद्या कलाकारासाठी एक स्वप्न असते. प्रत्येक जण त्या “ब्लॅकलेडी” ला म्हणजेच फिल्मफेअर ट्रॉफीला घरी नेण्यासाठी उत्सुक असतो. चला तर मग आज आपण या भव्यदिव्य अशा पुरस्कार सोहळ्याची सुरुवात भारतामध्ये नेमकी कधी झाली आणि या पुरस्कार सोहळ्याचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता याची माहिती पाहूया,
१) फिल्फेअर अवॉर्ड ची सुरुवात कधी झाली?-
२) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कोण करते?-
३) फिल्मफेअर पुरस्कार हा एकूण किती कॅटेगिरी मध्ये देण्यात येतो?
४) फिल्मफेअरच्या ट्रॉफीची रचना-
५) फिल्मफेअर सोहळ्यातील विजेत्यांची निवड कोण करते?-
६) सर्वात जास्त फिल्मफेअर पुरस्कार कोणाला मिळाले आहेत?-
१) फिल्मफेअर अवॉर्डची सुरुवात कधी झाली?-
भारतीय सिनेसृष्टीमध्ये सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्काराची सुरुवात इ.स.1954 साली झाली. त्यावेळी या पुरस्कार सोहळ्याचे नाव द क्लेयर हे होते. टाइम्स ऑफ इंडिया चे समीक्षक क्लेयर मेंडोसा यांच्या नावावरून ते देण्यात आले होते, नंतर एका नियतकालिकेवरून चित्रपटसृष्टीशी साधर्म्य असलेले असे नाव म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड हे नाव देण्यात आले. जेव्हा फिल्म फेअर पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा हा मुंबईतील एका थेटरमध्ये ऑर्गनाईज करण्यात आला होता.1954 साली या सोहळ्यामध्ये फक्त पाच कॅटेगिरी मध्ये पुरस्कार देण्यात आले होते. 1954 सालचा म्हणजे पहिला फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट “दो बिगा जमीन” या चित्रपटाला मिळाला होता. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा “दिलीप कुमार” यांना मिळाला होता.पहिला फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा “मिनाकुमारी” यांना मिळाला होता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार बिमल रॉय यांना मिळाला होता आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक बैजू बावरा यांना मिळाला होता. पहिला फिल्म फेअर पुरस्कार सोहळा आणि या सोहळ्याचे हे पाच ऐतिहासिक विजेते यांनी हा इतिहास 1954 साली आपल्या नावावर करून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली. यावर्षी या सोहळ्याला 69 वर्ष पूर्ण झाली.
2) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या आयोजन कोण करते?-
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हे टाइम्स ग्रुप दरवर्षी करते. या सोहळ्यात अनेक रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते.हा पुरस्कार सोहळा हा प्रत्येक कलावंतासाठी अविस्मरणीय असतो.या पुरस्कार सोहळ्या दरम्यान वेगवेगळ्या कलावंताचे नृत्य प्रदर्शन होते. टाइम्स ग्रुप या पुरस्कार सोहळ्याचे खूप भव्य असे आयोजन करते.अगदी ऑस्कर सारखी रेड कार्पेट एन्ट्री सुद्धा असते विविध मीडिया वाले ही बातमी कव्हर करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावतात. १९५४ साली जेव्हा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,तेव्हा पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावेही लोक मतानुसार ठरवण्यात आली होती. त्याकाळी जवळपास 20 हजार लोकांनी या सोहळ्यासाठी आपले मत दिले होते.
3) फिल्मफेअर पुरस्कार हा एकूण किती कॅटेगिरीत देण्यात येतो?-
फिल्मफेअर पुरस्कार हा एकूण 44 कॅटेगिरी मध्ये देण्यात येतो यात कलात्मक,व्यवसायीक आणि तांत्रिक बाबीचा समावेश असतो. पडद्यावर झळकणारा कलाकार आपल्याला प्रकर्षाने दिसतो. पण त्या मागील सगळ्यांचीच मेहनत ही तितकीच महत्त्वाची असते हेच लक्षात घेऊन फिल्मफेअर वेगवेगळ्या 44 कॅटेगिरी मध्ये कलाकारांना पुरस्कार प्रदान करते. सिने क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आणि या कलाकारांना त्यांच्या विविध कॅटेगिरी नुसार देण्यात येणारे पुरस्कार हे फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे एक विशेष आकर्षण आहे.पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि कलाकार हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करतो.
4) फिल्म फेअर ट्रॉफीची रचना-
फिल्मफेअर सोहळ्यातील ट्रॉफीची रचनाही अगदी कलात्मक दृष्टीने करण्यात आलेली आहे. या सोहळ्यासाठी विजेत्यांना देण्यात येणारी ट्रॉफी ही एका स्त्रीरूपात बनवण्यात आलेली असून तिने नृत्य प्रकारातील एक मुद्रा करत आपले दोन्ही हात उंचावलेले दिसून येतात. या ट्रॉफीची रचनाही कांस्य धातू मध्ये करण्यात आलेली आहे. या ट्रॉफीला ब्लॅकलेडी ट्रॉफी असे देखील म्हणता येईल. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा,जेव्हा या पुरस्कार सोहळ्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाली.तेव्हा टाइम्स ग्रुपने या पुरस्कार सोहळ्याची ट्रॉफी ही चांदीची बनवली होती आणि या पुरस्कार सोहळ्याला जेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाले तेव्हा ही ट्रॉफी सोन्यामध्ये घडवण्यात आली होती.गेली 69 वर्ष ही ट्रॉफी कलाकारांना कांस्य या धातूंमध्ये देण्यात येते.
5) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची निवड कोण करते?-
सिनेसृष्टीच्या दृष्टीने सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्म फेअर पुरस्कारातील विजेत्यांची निवड ही कोण करत असेल बर,हा सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न तर या सोहळ्यातील विजेत्यांची निवड ही कमिटी मेंबर्स मार्फत आणि पब्लिक वोटिंग नुसार करण्यात येते.आपला आवडता अभिनेता किंवा आवडता चित्रपट इत्यादी यांना मत देऊन या सोहळ्यात सहभागी होऊ शकतो आणि आपल्या कलाकाराला जिंकून सुद्धा देऊ शकतो टाइम्स ग्रुपने या सोहळ्यासाठी नेहमीच जनतेच्या मताला प्राधान्य दिले आहे.
६) सर्वात जास्त फिल्मफेअर पुरस्कार कोणाला मिळाले आहेत?-
अभिनेते दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना आज पर्यंत सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेते दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांना पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी-
सर्वोत्कृष्ट चित्रपट -12th फेल या चित्रपट
सर्वोत्कृष्ट अभिनेता-रणबीर कपूर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-अलिया भट.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-विधु विनोद चोप्रा
सर्वोत्कृष्ट संवाद-12th fail
सर्वोत्कृष्ट कथा-OMG2 अमित रॉय आणि जोराम साठी देवाशीष माखीजा.
सर्वोत्कृष्ट गायक- भूपेंदर चित्रपट ऍनिमल
सर्वोत्कृष्ट गायिका- शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट गाण्यातील बोल-तेरे वास्ते अमिताभ भट्टाचार्य.
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले-12th fail.
सर्वोत्कृष्ट डायलॉग- चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी
इशिता मोईत्रा इत्यादी.
यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 12th फेल या हिंदी चित्रपटाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला या चित्रपटाला विविध कॅटेगिरी मध्ये अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. तांत्रिक आणि सिने सृष्टीतील उद्योग अशा विविध कॅटेगिरी साठी फिल्मफेअर हा एक मानाचा सन्मान समजला जातो. दुहेरी मतदान पद्धती असणारा हा एक पुरस्कार सोहळा ज्यामध्ये लोकमत आणि कमिटी मेंबर यांचे मत विचारत घेऊन कलाकाराला त्याच्या कलेचा सन्मान म्हणून हा पुरस्कार टाइम्स ग्रुप देते. नवोदित कलाकार यांच्यासाठी सुद्धा टाइम्स ग्रुपने एक राखीव कॅटेगिरी ठेवली आहे यामध्ये नवीन येणाऱ्या कलाकाराला या पुरस्कारामुळे एक आत्मविश्वास मिळतो. सध्या कला विश्वामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडीत गुजरात मध्ये झालेल्या फिल्मफेअर सोहळा सर्वांसाठी नक्कीच खास असणार आहे.
फिल्मफेअर 2024 आजचा लेख कसा वाटला, हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहे. आपल्या मित्र परिवाराला हा लेख नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या आणि whatsapp ग्रुपही जॉईन करा.