काय सांगतो ग्राहक सुरक्षा कायदा? (Consumer Protection Act in Marathi)

WhatsApp Group Join Now

     Consumer Protection Act in Marathi : “जागो ग्राहक जागो”अगदी घराघरात पोहोचलेली  जाहिरात. ही जाहिरात म्हणजे ग्राहकांना ग्राहक सुरक्षा कायदा “Consumer Protection Act”या कायद्याने दिलेले अधिकार सांगणारी आहे. एखादी वस्तू खरेदी करता  ग्राहकांनी कसे चोखंदळ असावे आणि आपल्या हक्काचा कसा वापर करावा हे या कायद्यात आहे.

 ग्राहक आणि व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या व्यवहार हा पारदर्शक असावा यात कुठल्याही प्रकारचा दोघांच्याही मनात गैरसमज नसावा जर ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर समोरील व्यापाऱ्याने मलाही गोष्ट देऊन मलाही वस्तू देऊन माझी फ*सवणूक केली आहे,जसे की एखादी एक्सपा*यर झालेली वस्तू दिली आहे असेल,आयएसआय मार्क नसलेली वस्तू दिली असेल किंवा सदरील वस्तू घेताना ही वस्तू चांगल्या गुणवत्तेची नाहीये हे जर एखाद्या ग्राहकाच्या लक्षात आले आणि त्याला संबंधित दुकानदाराविरुद्ध जर तक्रार दाखल करायचे असेल करायची असेल.तर त्याने नेमके काय केले पाहिजे आणि आपले हक्क कसे मिळवून घेतले पाहिजे हे  आपण आपल्या आजच्या या लेखात पाहणार आहोत. एखादी तक्रार दाखल करताना तक्रारदार व्यक्तीच्या  मनात येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यात तुम्हाला आज मिळतील.

1) तक्रार कुठे दाखल करावी –

   a) जिल्हा ग्राहक  विवाद निवारण  मंच-

    b) राज्य ग्राहक विवाद निवारण मंच-

    C) केंद्रीय ग्राहक विवाद निवारण मंच-

2)  आर्थिक कार्यक्षेत्र-

3) तक्रारीतील मजकूर कसा असावा-

4) तक्रार किती दिवसात दाखल करता येते-

5) ऑनलाइन व्यवहारामुळे ग्राहक सुरक्षेचे बदललेले स्वरूप-

6) काय सांगतो ग्राहक सुरक्षा कायदा-

  1. आपल्या फसवणूकीची तक्रार कुठे दाखल करावी?-Consumer Protection Act in Marathi

                               ग्राहकाला आपली फ*सवणूक झाली आहे.हे लक्षात आल्यानंतर सदरील ग्राहक हा त्याविरुद्ध ची तक्रार ही आर्थिक कार्यक्षेत्र किंवा संबंधित भौगोलिक कार्यक्षेत्र असलेल्या ठिकाणी करू शकतो ही कार्यक्षेत्र नेमकी काय आहेत हे आता आपण पाहू

a) जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच-

                     फसवणूक झालेली व्यक्ती ही झालेल्या फ*सव*णुकीची तक्रार जिल्हा ग्राहक निवारण मंचाकडे करू शकते. एका जिल्ह्यामध्ये अनेक मंच अनेक तक्रार निवारण मंच देखील असू शकतात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे आपल्याला एक कोटी पर्यंत झालेल्या आर्थिक व्यवहाराची तक्रार दाखल करता येऊ शकते.

b) राज्य ग्राहक विवाद  निवारण मंच-

                 राज्य ग्राहक विवाद निवारण मंचाकडे एक कोटी ते दहा कोटी पर्यंतच्या झालेल्या आर्थिक व्यवहाराची तक्रार ही संबंधित  तक्रारदार व्यक्ती दाखल करू शकते.

c) केंद्रीय ग्राहक विवाद निवारण मंच-

                     केंद्रीय ग्राहक विवाद निवारण मंचाकडे दहा कोटी पेक्षा जास्त झालेल्या आर्थिक व्यवहाराची तक्रार ही तक्रारदार व्यक्ती दाखल करू शकते.

2) आर्थिक कार्यक्षेत्र-

तक्रार नोंदवताना ग्राहक निवारण आयोगाची कार्यक्षेत्र वस्तू साठी दिले जाणारे मूल्य यावर तक्रार कोठे दाखल करावी हे अवलंबून असते. तक्रार दाखल करताना आर्थिक कार्यक्षेत्र आणि भौगोलिक कार्यक्षेत्र या दोन विभागानुसार तक्रार दाखल करता येते

3) तक्रारीतील मजकूर कसा असावा-

                              आर्थिक फ*स*वणूक झालेल्या  एखाद्या व्यक्ती तक्रार दाखल करताना सदरील मालामध्ये किंवा घेतलेल्या वस्तूमध्ये असलेले दोष असलेला, किंवा कमतरता,गुणवत्ता आणि आर्थिक बाबी इत्यादी बाबत आपली कशी फसवणूक झाली आहे त्याचे सविस्तर वर्णन तक्रारी मध्ये करावे, सदर तक्रार दाखल करताना सदर तक्रारदार व्यक्ती ती तक्रार आपल्या अक्षरात लिहून ग्राहक मंचाकडे दाखल करू शकते किंवा तक्रार दाखल करताना ती टाईप करून दाखल केली तरी चालते.

                       तक्रार दाखल करताना वस्तूसाठी नमूद केलेल्या सेवेपेक्षा जास्त आकारलेली रक्कम तसेच दोष किंवा उणीवा असलेल्या वस्तू देणे किंवा वस्तू खरेदी झाल्यानंतर सुरक्षेची हमी न देणे किंवा सेवा कर जास्त आकारणे अशा प्रकारची या सगळ्या गोष्टीची वर्णन सदरील तक्रार दाखल करताना त्या व्यक्तीने करणे आवश्यक आहे.

4)  तक्रार किती दिवसात दाखल करता येते-

                        झालेली आर्थिक फ*सवणूक किंवा सहन करावा लागलेला तोटा याची तक्रार ही कारण उद्भवल्या नंतर तात्काळ किंवा दोन वर्षाच्या आत दाखल करता येऊ शकते. तक्रार दाखल करताना झालेल्या कारणाचा किंवा इमिजेट ॲक्शन घेण्याचा उल्लेख हा तक्रार व्यक्तीने करणे आवश्यक आहे.

5) ऑनलाइन व्यवहारामुळे बदललेले ग्राहक सुरक्षेचे स्वरूप-

                                 सध्या ऑनलाईन व्यवहारामुळे ग्राहक सुरक्षा हा महत्त्वाचा आणि गंभीर विषय बनला आहे. जेव्हा एखादा व्यवहार होतो तेव्हा समोरील व्यक्ती म्हणजेच व्यापारी आणि ग्राहक यांच्यात प्रत्यक्षात वस्तू आणि पैसे यांची अदलाबदल होते.पण सध्या ऑनलाईन व्यवहारामुळे प्रत्यक्ष ग्राहक आणि व्यापारी यांचा संबंध येत नाही किंवा हा व्यवहार हा आता समोरासमोर होत नसून ऑनलाईन होतो. पण असे व्यवहार करताना ग्राहकाने अतिशय चोखंदळ असणे आवश्यक असते.ऑनलाईन व्यवहारामुळे फ*सवले जाण्याची जास्त शक्यता असते ऑनलाइन व्यवहारामुळे सध्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. विकत घेतलेल्या प्रत्येक गोष्टीची  उपयुक्तता हा जसा महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच ती वस्तू कशी सुरक्षित आहे.याची गुणवत्ता ही ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना तपासणे गरजेचे आहे जसे की एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करताना हे ऑनलाइन खरेदी करताना, त्यामागे आपली फसवणूक होऊ शकते हे ग्राहकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन खाद्यपदार्थ खरेदी करताना त्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता तसेच खाद्यपदार्थाची एक्सपायरी याच्यासाठी ग्राहकांनी आग्रही असणे हे महत्त्वाचे आहे.अशा वस्तू वापरल्यामुळे जर काही शारीरिक नुकसान झाले तर याची भरपाई ही सुद्धा कंपनीला द्यावी लागते.

                एखाद्या घेतलेल्या उत्पादना ची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे तसेच ही माहिती जर एखादी कंपनी ऑनलाइन खरेदी करताना पुरवत नसेल. तर ग्राहकाने संपूर्ण माहितीची खात्री करूनच सदरील वस्तू खरेदी करावी अन्यथा झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी ग्राहक सुरक्षा कायदा याचा वापर करावा.

7) काय सांगतो ग्राहक सुरक्षा कायदा  Consumer Protection Act in Marathi –

                     24 डिसेंबर हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक सुरक्षा कायदा 1986 नुसार ग्राहकाला जे हक्क मिळाले आहेत आणि हे हक्क कोणते आहेत याची माहिती जर तुम्हाला असेल तर तुमची कोणतीही आर्थिक फसवणूक होणार नाही,

1) माहितीचा हक्क-

                 एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची संपूर्ण माहिती जसे की वस्तूची पॅकिंग डेट वस्तूची एक्सपायरी डेट आणि  आणि वस्तूची संपूर्ण माहिती इत्यादी जाणून घेण्याचा ग्राहकाला संपूर्ण अधिकार आहे. जर अशी माहिती पुरवण्यास एखाद्या व्यापाऱ्याने नकार दिला तर सदरील व्यापाराविरुद्ध तुम्ही ग्राहक सुरक्षा कायदा अंतर्गत तक्रार दाखल करू शकता आणि तुम्हाला हवी असलेली संपूर्ण माहिती मिळवू शकता.

2) सुरक्षेचा हक्क-

             एखादी वस्तू खरेदी करताना संबंधित व्यापारी जर तुम्हाला वस्तूच्या सुरक्षेची खात्री देत नसेल तर सदरील वस्तू खरेदी करू नये तसेच एखादी वस्तू आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहे का त्याची खात्री करूनच खरेदी करावी यामुळे  होणारे आर्थिक तसेच शारीरिक नुकसान हे कमी होऊ शकते.

3) वस्तूची निवड करण्याचा हक्क-

                 वस्तूची निवड करताना ग्राहकाने अतिशय चोखंदळ असणे आवश्यक आहे.म्हणजेच वस्तू खरेदी करताना जर व्यापारी तुम्हाला ह्या ब्रँडची वस्तू घ्या म्हणून आग्रह करत असेल. तर त्याला नकार  देऊन तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकता म्हणजेच वस्तूची खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आवडीची वस्तू घेण्याचा अधिकार या कायद्याने दिला आहे.

4) तक्रार करण्याचा आणि तक्रार निवारण करण्याचा अधिकार-

                    ग्राहक सुरक्षा कायदा 1986 नुसार प्रत्येक ग्राहकाला वस्तू खरेदी करताना असलेली तक्रार करण्याचा आणि संबंधित तक्रारीचे निवारण करण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे. तक्रार कितीही लहान असली तरी त्याची दाद ही मागता येऊ शकते.इत्यादी विविध अधिकार आपल्याला ग्राहक सुरक्षा कायदा 1986 नुसार मिळतात वस्तू खरेदी करताना ग्राहकाने आपले हक्क तसेच आपले कर्तव्य याचा ताळमेळ घातला तर आपली आर्थिक फसवणूक होऊ शकत नाही.ग्राहक सुरक्षा कायदा जसे आपल्याला हक्क देतो तसेच कर्तव्यही देतो.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा. Consumer Protection Act in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top