Graphology म्हणजे काय? (What is Graphology in Marathi)

WhatsApp Group Join Now

Graphologist कसे बनावे? (Career Scope in Graphology)

Graphology म्हणजे आलेख शास्त्र. बऱ्याच जणांना वाटते कि ग्राफोलॉजी हे काहीतरी भूमिती किंवा गणितीय शास्त्र आहे. परंतु प्रत्यक्षात ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षराचा अभ्यास. कोणाचंही हस्तलिखित लिखाण किंवा अक्षर बघून त्यांचे व्यक्तिमत्व ओळखणारे एक्सपर्टस म्हणजे ज्योतिषी नव्हे,तर त्यांना म्हणतात Graphologist. भारतामध्ये हे क्षेत्र नव्यानेच उदयाला येत आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोर्स बद्दल ची अधिक माहिती. 

ग्राफोलॉजी म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी, लेखन शैली, अक्षरांचे वळण, शब्दांमधील अंतर यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या मानसिक स्तिथीचा अभ्यास करणे म्हणजे ग्राफोलॉजी होय. ग्राफोलॉजी तज्ञ हे दोन ओळींच्या लिखाणावरून सुद्धा हा सर्व अभ्यास करू शकतात. 

हे कौशल्य केवळ मानसआरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, मानसशास्त्रज्ञ किंवा HR साठीच आहे असं नाही तर हे आपल्या आत्म-निरीक्षण आणि आत्म-चिंतनासाठी चे एक उत्तम साधन आहे. आपण कसे वागतो, कसा विचार करतो, काय अनुभवतो, कृती करतो हे जाणून घेण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.  

ग्राफोलॉजी चा  उदय:

ग्राफोलॉजी हा विषय म्हणून १७ व्या शतकात पहिल्यांदा इटली येथे Bologna या शहरात शिकवण्यास सुरुवात झाली. मग १९ व्या शतकात फ्रान्स मध्ये हा विद्यापीठांमध्ये औपचारिक विषय म्हणून शिकवण्यात येऊ लागला. Jean-Hippolyte Michon हे इटालियन मानसशास्त्रज्ञ, यांना मॉडर्न ग्राफोलॉजी चा प्रणेता मानले जाते. त्यांनी १८७२ मध्ये पहिल्यांदा या विषयावर पुस्तक लिहिले होते. तसेच Dr.Ludwig Klages यांना “Father of Modern Graphology” असे संबोधण्यात येते. 

ग्राफोलॉजीच्या शाखा: 

ग्राफोलॉजी तंज्ञांमध्ये दोन महत्वाच्या आणि वेगळ्या पद्धती आहेत. त्या म्हणजे १) Trait Stroke Method आणि २) Gestalt Approach. 

  • Trait Stroke Method: या पद्धतीनुसार तुमच्या अक्षरांचे वळण हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अचूक भाष्य करते. हि पद्धत फ्रान्स मध्ये Jean-Hippolyte Michon यांनी पहिल्यांदा वापरली. Michon यांनी बनवलेली स्ट्रोक्स ची लिस्ट आजही जगभरात वापरली जाते. या पद्धती ला French Model असेही म्हटले जाते. 
  • The Gestalt Method: १८९५ मध्ये जर्मनी मध्ये या पद्धतीचा वापर होऊ लागला. Dr. Ludwig Klages हे या पद्धतीचे प्रणेते मानले जातात. जिथे stroke पद्धती एका अक्षरावर जोर देते तेथे Gestalt Approach पूर्ण शब्दावर किंवा लिखाणावर एकत्रित पाने जोर देतो. Gestalt हा एक जर्मन शब्द आहे ज्याचा अर्थच होतो एकत्रितपणे किंवा संपूर्णतः. 

भारतातील ग्राफोलॉजीचे  कोर्सेस:

तुम्हाला विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय असेल आणि मानवी मन किंवा व्यक्तिमत्व जाणून घेण्यात रस असेल तर तुम्ही ग्राफोलॉजिस्ट बनू शकता. त्यासाठी खालील प्रकारचे कोर्सेस भारतात उपलब्ध आहेत. 

  • फाउंडेशन कोर्स: हा कोर्स नव्यानेच ग्राफोलॉजी शिकणाऱ्यांसाठी आहे. हस्तलेखन विश्लेषण म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम प्रथम केला पाहिजे. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी मूलभूत स्तरावर इतर लोकांचे हस्ताक्षर वाचू व समजू शकतात.
  • डिप्लोमा कोर्स: फाऊंडेशन कोर्से केल्यानंतर जर तुम्हाला ह्या क्षेत्रात अधिक शिक्षण घ्यायचे असेल तर प्रोफेशनल ग्राफोलॉजिस्ट होण्यासाठी तुम्ही डिप्लोमा कोर्स करु शकता. डिप्लोमा कोर्सची  व्याप्ती खूप विस्तृत आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर ग्राफोलॉजिस्ट म्हणून करिअर सुरू करता येते. कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी ह्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात.
  • अ‍ॅडव्हान्स आणि स्पेशलायझेशन कोर्सेस: या कोर्स मध्ये विषयाची सखोल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही एवढ्या विशिष्ट शैलीचा किंवा पद्धतीचा सखोल अभ्यास करू शकता. आणि मग त्यात पुढे specialisation करू शकता. 

भारतातील काही महत्वाच्या संस्था:

  • इन्स्टिट्यूट ऑफ ग्राफोलॉजिकल रिसर्च, मुंबई
  • माइंड झोन इंस्टिट्यूट ऑफ ग्राफोलॉजी आणि वैयक्तिक विकास
  • इन्स्टिट्यूट ऑफ ग्राफोलॉजी अँड पर्सनल सक्सेस, पुणे
  • ग्राफोलॉजी स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर
  • हँड रायटिंग स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर
  • ग्राफोलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
  • इन्स्टिट्यूट ऑफ ग्राफोलॉजी, कोलकाता
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ ऑकल्ट सायन्स, नवी दिल्ली
  • ग्राफोलॉजी इन्स्टिट्यूट, हैदराबाद
  • स्कूल ऑफ ग्राफोलॉजी, दिल्ली 

ग्राफॉलॉजिस्ट काय काम करतात:

ग्राफॉलॉजिस्ट चे दैनंदिन काम काय आणि कसे असते ते जाणून घेऊया. 

  • लोकांकडून हस्ताक्षराचे नमुने घेणे 
  • अक्षरांचे नमुने, त्याची उंची आणि तिरपे अंश (Strokes) मोजणे. या कामासाठी ते भिंग आणि calibrated टेम्प्लेट  वापरतात. 
  • लेखकावर आलेले दडपण आणि त्याची भावनिक अवस्था समजणे आणि त्यानुसार निष्कर्ष काढणे. 
  • निष्कर्षांच्या स्पष्टीकरणासाठी विविध सिद्धांत लागू करणे. 
  • तपासाशी संबंधित पैलूंवर आपल्या ग्राहकांशी किंवा सरकारी नियंत्रणाशी संवाद साधणे आणि त्यांना अचूक माहिती उपलब्ध करून देणे. 

सहीवरून व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा?

  • बऱ्याचदा व्यक्ती जेव्हा सही करतात तेव्हा तीची दिशा हि वरच्या बाजूने असते. अशी सही करणारी व्यक्ती ही जीवनात खूप आशादायी आणि नेहमी प्रगती करणारे असतात. परंतु त्या उलट खालच्या बाजूने सही करणारी व्यक्ती हि खूपच निराशाजनक व दुखी असते असे निदर्शनास येते. 
  • ज्या व्यक्तींची सही स्पष्ट आणि सरळ असते अशा व्यक्ती नेहमी सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात. याउलट मोठ्या अक्षरांमध्ये सही करणाऱ्या व्यक्ती या गर्विष्ठ असतात. अशा व्यक्ती नेहमी बाकीच्या माणसांना कमी लेखतात. 
  • बरयाच व्यक्ती जेव्हा सही करतात तेव्हा त्यातील पहिले अक्षर मोठे काढतात व बाकीचे लहान काढतात. अशा पद्धतीने सही करणारे लोक हे स्वभावाने खूप दयाळू असतात. आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी ते खूप कष्ट घेतात व राजकारणामध्ये देखील ते अनेकदा उत्तम कामगिरी करू शकतात.
  • बऱ्याचदा लोक सहीच्या खाली लाईन काढतात अशी माणसे पक्क्या निर्धाराची व आत्मविश्वासाने भरलेली असतात. त्यांना नेहमी चारचौघात उठून दिसायचे असते. 

हे असे अंदाज सही वरून ढोबळ मानाने लावले जातात. पण अचूक आणि विस्तारित निष्कर्ष हे ग्राफॉलॉजिस्टच लावू शकतात. कारण ते सही बरोबरच ती कोणी आणि कुठच्या परीस्थितीत केली आहे ह्याचा ही सखोल अभ्यास करतात. 

ग्राफोलॉजी मधील करिअरचे पर्याय: (What is Graphology?)

ग्राफोलॉजीस्ट म्हणून खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात करिअर करता येते. त्यासाठी खालील संधी उपलब्ध आहेत. 

  • सल्लागार: मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनी मध्ये ग्राफोलॉजिस्ट ना सल्लागार म्हणून नेमले जाते. जेव्हा मुलाखतीला उमेदवार येतात तेव्हा त्यांच्या हस्तलिखितांचा अभ्यास करून हे ग्राफोलॉजिस्ट त्यांचे निष्कर्ष सांगतात. आणि मग त्या अनुषंगाने त्या उमेदवारांची निवड केली जाते. 
  • गुन्हे अन्वेषक: न्यायवैद्यक (Forensic) तपासणीमध्ये सुद्धा ग्राफोलॉजिस्ट ची खूप मदत होते. गुन्ह्याचा तपास करताना कोणी लिहिलेलं पत्र किंवा कागदपत्र, स्वाक्षरी अशा गोष्टींचा अभ्यास करायला ग्राफोलॉजिस्ट ची मदत घेतली जाते. याशिवाय न्यायालयीन खटल्यांमध्ये सुद्धा त्यांची मदत घेतली जाते. 
  • शिक्षक: शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होणे हा सुद्धा ग्राफोलॉजिस्ट साठी एक उत्तम पर्याय आहे. 
  • व्यक्तिमत्व विकास: तसेच जर कोणाला आपल्या व्यक्तिमत्वातील काही पैलू बदलायचे असतील तर ते सुद्धा ग्राफोलॉजिस्ट च्या साहाय्याने आपल्या हस्ताक्षरात बदल करून करता येतात. 
  • बालविकास: जर लहान मुलांच्या शारीरिक किंवा मानसिक वाढीमध्ये काही अडचणी येत असतील तर तिथे सुद्धा बालविकास तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्टची मदत घेऊ शकतात. 

ग्राफोलॉजिस्टना मिळणारा पगार:(What is Graphology?)

अजूनही भारतात या क्षेत्राबद्दल जास्त माहिती नसल्याने इथे काम करणाऱ्या तज्ज्ञांचे प्रमाण खूपच कमी आहे. आणि मागणी प्रचंड आहे. तसेच बदलत्या धावपळीच्या आयुष्यात ही मागणी वाढतच राहणार आहे. 

२०२४ च्या आकडेवारीनुसार ग्राफॉलॉजिस्ट ना भारतात सरासरी वर्षाला ७ लाख रुपये एवढा पगार मिळतो. तसेच जे लोक Freelancer म्हणून काम करतात त्यांना प्रत्येक कामाचे ताशी सरासरी ३५० रुपये मिळतात. परंतु हा पगार तुमचा अनुभव आणि तुमचे कौशल्य या नुसार ठरतो.

 तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

4 thoughts on “Graphology म्हणजे काय? (What is Graphology in Marathi)”

  1. माहित नसलेल्या विषयासंबंधी अतिशय सुंदर माहिती दिली आहे. अशाच माहित नसलेल्या विषयांची माहिती तुम्ही देत राहावी ही अपेक्षा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top