Benefits of later school start times:शालेय जीवन प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. याच काळात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण विकास होत असतो.शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. “बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा” तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे प्रत्येकाला बालपण परत हवे असते. बालपणी कसलीही चिंता काळजी ही नसतेच फक्त शाळा अभ्यास आणि खेळणे. पण याच लहानपणीची प्रत्येक गोष्ट आपल्या विशेष परिणाम ही करत असतेच.
आपली “कर्मभूमी” जिथे आपण लहानाचे मोठे झालो ती शाळा. नुकताच शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व पूर्व प्राथमिक म्हणजेच इयत्ता चौथीपर्यंतची शाळा ही सकाळी नऊ नंतरच भरविण्यात यावी असा आदेश दिला आहे. राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी वर्ग हे सकाळी नऊ नंतरच भरविण्यात यावे असा आदेश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी काढला आहे.हा आदेश 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल.आता चिमुकल्यांची झोप पूर्ण होणार आणि प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत आनंदाने जाणार.
यावर्षी शाळेची घंटाही सकाळी नऊ नंतर वाजणार आहे. चला तर मग आपण या संपूर्ण आदेशा मागची कारणे पाहूया,
1) बदलती जीवनशैली-
2) अपूर्ण झोप-
3) नकारात्मकतेने दिवसाची सुरुवात-
4) उत्साह कमी-
5) अतिरिक्त ताण-
6)शारीरिक विकास-
7) मानसिक आरोग्य-
1) बदलती जीवनशैली-
बदलती जीवनशैली याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना आपल्याला दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणारे पालक,त्यातून मुलांना झोपण्यास होणारा उशीर आणि यातूनच सकाळी मुलांना होणारा शाळेला उशीर.पालकांची बदलती कामाची पद्धत ही मुलांच्या झोपेवर कळत नकळत परिणाम करत असते. या जीवनशैलीचा मुलांच्या झोपेवर परिणाम होतो आणि मुलंही पालकांचे अनुकरण करून रात्री उशिरापर्यंत जागताना दिसून येतात याचाच परिणाम म्हणून विद्यार्थी सकाळी शाळेला उशिरा पोहोचतात. विद्यार्थ्यांसाठी रात्री लवकर झोपणे आणि सकाळी शाळेसाठी लवकर उठणे अत्यंत महत्त्वाचे असते पण बदलत्या जीवनशैली विद्यार्थ्यांवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलताना आपल्याला दिसून येत आहे.
2) अपूर्ण झोप-
रात्री उशिरा झोपणाऱ्या विद्यार्थ्याला सकाळी लवकर उठून शाळेत जावे लागले तर त्यांची झोप ही पूर्ण होत नाही. या अपूर्ण झोपेतूनच मुलांच्या मनात एक नकारात्मकता तयार होते आणि ही नकारात्मकता त्यांच्या अभ्यासावर परिणाम करताना दिसते.मनात नकारात्मकता असणारी मुले ही अभ्यासात कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या मनात अभ्यासाबाबत न्यूनगंड तयार झालेला आढळून येत आहे. शाळेची वेळ ही वेगवेगळ्या दोन सत्रात असल्यास मुलांना सकाळचा नाहीतर संध्याकाळचा वेळ निवांत मिळणार आहे. त्यातूनच त्यांची झोप पूर्ण होऊ शकते. हा सगळा विचार करूनच शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
3) नकारात्मकतेने दिवसाची सुरुवात-
मनाविरुद्ध सकाळी लवकर उठणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात संपूर्ण दिवसाबाबत एक नकारात्मक ऊर्जा तयार होते. ही अशीच ऊर्जा घेऊन ती मुले दिवसभर शाळा करत असतील तर याचा परिणाम नक्कीच त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावरही झालेला आपल्याला आढळतो.प्राथमिक ते पूर्व प्राथमिक शालेय जीवनात मुलांचा शारीरिक विकास होत असतो.या विकासादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. जर प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी चिडचिड करून होणार असेल विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासात ही गोष्ट आडकाठी ठरू करू शकते म्हणूनच शाळेच्या दिवसाची सुरुवात ही एकदम सकारात्मक एनर्जीने होणे गरजेचे आहे.
4) उत्साह कमी-
वरील सगळ्या गोष्टींचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या उत्साहावर होताना दिसतो. मुळातच अपूर्ण झोप झालेला.विद्यार्थी हा दिवसभर आळसावलेला दिसतो शाळेतील कुठल्याच गोष्टीत त्याला रस राहिलेला दिसत नाही आणि यामुळे त्याचा उत्साह हा शाळेच्या बाबतीत कमी होताना दिसून येतो.विविध कारणांमुळे विद्यार्थी हे रात्री उशिरा झोपतात आणि याचा परिणाम त्यांच्या झोपेवर आणि आरोग्यावरही झालेला दिसून येतो. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असणे खूप गरजेचे असते कुठलीही नवीन गोष्टी शिकताना विद्यार्थी जर उत्साहात ती शिकत असेल तर ती तो पटकन शिकतो आणि उत्साहाने आत्मसात देखील करतो पण मुळातच उत्साह कमी असलेले विद्यार्थी कायमच मागे दिसतात.
5) अतिरिक्त ताण –
शाळेचा अतिरिक्त ताण सकाळी लवकर उठणे, आवरून शाळेला जाणे आल्यानंतर ट्युशन शाळेचा गृहपाठ इत्यादी करणे. शाळेत जाताना आणि घरी येते वेळेसचा प्रवास या सगळ्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना. शालेय शिक्षण विभागाला आढळून आले. या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थी हे आजारी पडतात.याकारणामुळे शालेय शिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे शाळेचे टाईम टेबल हे जर दोन सत्रात असेल तर विद्यार्थ्यांना कुठला तरी एक वेळ हा अभ्यासासाठी आणि आरामासाठी देता येईल. हा विचार करूनच शालेय शिक्षण विभागाने हा आदेश काढला आहे. पूर्ण अभ्यासाअंती आणि विविध तज्ञांशी केलेल्या चर्चा नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
6) शारीरिक विकास-
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास हा त्याच्या बालपणातच होत असतो.म्हणजे त्याच्या शालेय जीवनात. शारीरिक विकास होत असताना विद्यार्थी आनंदी असणे गरजेचे आहे. शारीरिक विकास होत असताना विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा ताण असणे हे त्याच्या शारीरिक विकासात अडथळा आणू शकते .एका तणावग्रस्त विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास हा अपूर्ण राहतो आणि याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर पुढे चालून होताना दिसतो. याउलट एक सुदृढ मनस्थितीचा विद्यार्थी हा तितकाच आनंदी उत्साही आणि फ्रेश आपल्याला दिसतो आणि अशा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासात व्यवस्थित वाढ होताना आपल्याला आढळून येते.
7) मानसिक आरोग्य-
शारीरिक विकासासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक विकास हा देखील शालेय जीवनातच होते.लहान मुले हे अगदी निरागस असतात, आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टी ह्या चांगल्या आहेत की वाईट याची त्यांना जाणीव नसते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी विद्यार्थ्याने मनातून तयार असणे अतिशय गरजेचे असते.मानसिक दृष्ट्या तयार असणारा विद्यार्थी कुठल्याही गोष्टी शाळेत पटकन शिकताना दिसून येतो तसेच मानसिक दृष्ट्या तयार असणारे विद्यार्थी अभ्यासात सतत पुढे असतात.विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हे चांगले असणे हे शिक्षकांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य ठीक नसणारे विद्यार्थी सतत चिडचिड करताना, उद्धटपणे बोलताना तसेच वडीलधाऱ्यांचा आदर न ठेवताना दिसून येतात. एक सुसंस्कारित विद्यार्थी घडणे हे गरजेचे असते आणि हेच विद्यार्थी पुढे आपले भविष्य असतात. बदलती जीवनशैली विभक्त कुटुंब पद्धती आणि आई-वडिलांचे बिझी शेड्युल याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होताना दिसून येतो यातूनच ही मुले एकलकोंडी आणि इतरांपासून विभक्त राहणे पसंत करू लागतात.
दिवसाची सुरुवात अगदी उत्साहात न झालेला विद्यार्थी दिवसभर ही त्याच अवस्थेत आढळून येतो.या विद्यार्थ्यांचा शाळेत खेळाकडे कल अतिशय कमी दिसतो यातूनच मुलांची शारीरिक वाढ ही खुंटते. शालेय जीवन म्हणजे तणावग्रस्त जीवन नसून शालेय जीवन हे एक उपभोगायचे किंवा मनसोक्त जगण्याचे दिवस आहेत आणि विद्यार्थ्यांनी हे आनंदाने जगलेच पाहिजेत.हे दिवस विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कारणे जी मुलाच्या विकासात कुठेतरी अडसर ठरत होती. शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असलेला विद्यार्थी हा अभ्यासातही सक्षम बनू शकतो म्हणूनच प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आज कालच्या धावपळीच्या जीवनात हा निर्णय पालकांसाठी एक वरदान ठरणार आहे.चढाओढ आणि स्पर्धेचे युग यातून विद्यार्थ्यांवर दिला जाणार अतिरिक्त ताण या निर्णयामुळे थोडाफार कमी होताना आढळून येईल. तसेच शाळेच्या बदलत्या वेळेचा उपयोग करून पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नवनवीन गोष्टी करू शकतील. शाळेतून आल्यानंतर अभ्यासाचे नियोजन ही व्यवस्थित करता येईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा सकारात्मक परिणाम हा आपल्या येणाऱ्या पिढीवरती नक्कीच होईल आणि यातूनच सक्षम पिढी ही नक्कीच तयार होईल.
तुम्हाला Benefits of later school start times कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप ही जॉईन करा.
Adv.विनिता झाडे मोहळकर.