जागतिक मानवशास्त्र दिवसl World Anthropology Day

WhatsApp Group Join Now

World Anthropology Day: Anthropology म्हणजे मनुष्यप्राणी आणि त्याच्या कार्याचा सर्वांगाने केलेला अभ्यास. या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी जागतिक मानवशास्त्र दिवस हा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने मानवशास्त्र (Anthropology) म्हणजे नक्की काय ते आज जाणून घेऊया. What is Anthropology?

Anthropology म्हणजे नक्की काय?

Anthropology हा शब्द सर्वप्रथम ग्रीक तत्ववेत्ता Aristotle याने प्रचलित केला. या शब्दाचा उदय “Anthropos” आणि “Logos” या दोन ग्रीक शब्दांच्या एकत्रीकरणातून झाला आहे. Anthropos म्हणजे मनुष्य आणि Logos म्हणजे अभ्यास. अनेक विचारवंतांच्या मते Anthropology म्हणजे मानवाच्या अस्तित्वापासून आत्ता पर्यन्त त्याची झालेली शारीरिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाढ आणि त्याचा त्याच्या वर्तनावर झालेला परिणाम यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. म्हणूनच सुरुवातीला केला जाणारा या शास्त्राचा “मानववंशशास्त्र” असा उल्लेख संयुक्तिक न वाटता सध्या केला जाणारा “मानवशास्त्र” हा जास्त योग्य ठरतो.  मानवशास्त्र हे मानवाच्या उत्क्रांतीपासून ते सध्याच्या युगातील प्रगत मानवजाती अशा सर्व मानव जातींचे अवलोकन करते. हे शास्त्र विशिष्ट एका काळापुरते किंवा जागेपुरते मर्यादित नाही आहे. 

मानवशास्त्रात शास्त्रीय व समाजशास्त्रीय अशा दोन्ही दृष्टिकोनाचे विश्लेषण केले जाते. 

उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील लोक दूधदुभत्याचे पदार्थ जास्त का खातात किंवा डोंगराळ भागात राहणारे लोक जास्त मांसाहारी पदार्थ का खातात असे विचारल्यास सहज उत्तर येते कि ते पूर्वापार असेच जगात आले आहेत. परंतु पूर्वीपासून हि संस्कृती अशी का होती ह्याचा अभ्यास मानवशास्त्र करते. आजूबाजूच्या भौगोलिक घटकांचा आणि पर्यावरणाचा माणसाच्या जीवनशैली वर काय प्रभाव पडतो आणि ती उत्तरोत्तर कशी बदलत गेली ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मानवशास्त्राच्या अभ्यासात मिळतात. तसेच हा अभ्यास आपल्याला भविष्यातील आराखडे बांधायला हि मदत करतो. 

मानवशास्त्राचे प्रकार: Types of Anthropology

मानवशास्त्राचे ४ उपप्रकार आहेत. 

  • पुरातत्त्वशास्त्र (Archeology): प्राचीन मानवाच्या जीवनाचा अभ्यास या विषयात केला जातो. मानवाच्या उत्पत्ती पासून ते आजपर्यंत त्याच्यात जे शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल झालेत त्याचा प्राचीन पुराव्यांच्या मदतीने अभ्यास केला जातो. 
  • जैव मानवशास्त्र (Biological Anthropology): पुरातत्त्वीय उत्खननात मिळणाऱ्या अवशेषांचा जीववैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे काम या शास्त्रात केले जाते. या शास्त्रामध्येही पुढे काही उपशाखा आहेत. 
  • भाषिक मानवशास्त्र (Linguistic Anthropology): विविध लोकसमूहाच्या प्राचीन, अर्वाचीन, लिखित, अलिखित इत्यादी स्वरूपातील भाषा, त्यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाण, बदल इत्यादींचा अभ्यास भाषिक मानवशास्त्रात केला जातो. भाषेचा उगम, त्याची रचना, ध्वनिउच्चर   याचा यात प्रामुख्याने अभ्यास केला जातो. 
  • सामाजिक- सांस्कृतिक मानवशास्त्र (Cultural Anthropology): समाजातील सामाजिक संबंधांचा व प्रक्रियांचा अभ्यास करून मानवाच्या आचारविचारांवर आधारित सिद्धांत मांडणे हे या सामाजिक मानवशास्त्र अंतर्गत केले जाते. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या या अभ्यासात  आदिवासी समाजाचा विचार अधिक केला गेला आहे.

जागतिक मानवशास्त्र दिवस कधी साजरा केला जातो? 

मानवाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात एकोणिसाव्या शतकापासून युरोपात झाली. परंतु २०१५ साली American Anthropological Association (AAA) ने पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचे ठरविले. तेव्हा हा दिवस National Anthropology Day म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. परंतु नंतर त्यांच्या असे लक्षात आले कि मानवशास्त्र हे फक्त अमेरिकेसाठी महत्वाचे नसून संपूर्ण जगासाठी ते मोलाचे आहे, म्हणून २०१६ पासून त्याचे नाव बदलून World Anthropology Day असे संबोधण्यात येऊ लागले. 

हा दिवस दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. या वर्षी हा १५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी जगभरात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीची थीम आहे “Connections and Collaborations” म्हणजेच संबंध आणि सहयोग. Celebration of world Anthropology Day

या दिवसाचे महत्व काय आहे? 

Anthropology या विषयाबद्दल समाजात अजून म्हणावी तितकी जागरूकता नाही आहे. म्हणूनच या संबधी लोकांमध्ये जागरूकता वाढावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. संशोधक या दिवशी आपली या क्षेत्रातील कामगिरी तसेच नवनवीन शोध समाजातील सर्व लोकांसमोर मांडतात. आणि त्याद्वारे लोकांमध्ये या विषयी उत्सुकता आणि आवड वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. 

या द्वारे लोकांना या क्षेत्राची माहितीही मिळते आणि तरुण मुलांना या क्षेत्रात येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळते. तसेच ज्यांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे अशा तत्ववेत्यांचा आणि संशोधकांचा सन्मान आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. Significance of World Anthropology Day

मानवशास्त्राचे आजच्या युगातील महत्व: 

मानवशास्त्र आपली भाषा, संस्कृती आणि समाज यांच्या अनुषंगाने आपल्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. हे शास्त्र सर्वांगाने मानवतेचा व्यापक अभ्यास करते. याच्या सखोल अभ्यासाने आपण आजच्या प्रगत युगातील काही अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू शकतो जसे कि,

  • सांस्कृतिक विविधता: जगभरात विविध देशात विविध संस्कृतीची माणसे राहतात. जर आपण सर्वांनी हे समजून घेतले कि प्रत्येक समाजची सांस्कृतिक मूल्ये हि वेगवेगळी आहेत. आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे. तर आपण जागतिक सहयोग नक्कीच साधू शकतो. 
  • जागतिक आव्हाने: आज जगासमोर पर्यावरणाचा ऱ्हास, वाढती लोकसंख्या, मर्यादित संसाधने, महामारी अशी अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. मानवशास्त्र आपल्याला एकत्रितपणे यावर उपाय शोधायला मदत करू शकते. याच्या मदतीने आपण प्रत्येक समाज मूल्यांना पूरक अशी उत्तरे शोधायचा प्रयत्न करू शकतो. 
  • सांस्कृतिक वारसा: आजच्या बदलत्या युगात अनेक संस्कृती आणि प्राचीन भाषा या हळूहळू लुप्त होत जात आहेत. परंतु मानवशास्त्र आपल्याला हा सर्व खजिना समजून घेण्यास आणि सांभाळून ठेवण्यास मदत करत आहे. Importance of Anthropology in modern world

Anthropologist कसे बनावे? How to become Anthropologist

Anthropologist बनण्यासाठी तुम्ही १२ नंतर Anthropology या विषयात B.Sc किंवा B.A करू शकता. मग पुढे जाऊन तुम्ही या विषयात मास्टर्स आणि P.hd सुद्धा करू शकता. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढील पदांवर काम करू शकता. 

  • संशोधक 
  • शिक्षक 
  • संग्रहालयात Curator 
  • सामाजिक कार्यकर्ते 
  • वांशिक शास्त्रज्ञ (Ethnographer)
  • मानव संसाधन व्यवस्थापक (HR manager)

हा दिवस कसा साजरा केला जातो?  

जगभरात विविध महाविद्यालयांमध्ये आणि वस्तुसंग्रहालयामध्ये या दिवशी या विषयातील तज्ञ लोकांची व्याख्याने ठेवली जातात. विविध कार्यशाळा किंवा वादविवाद स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. आजच्या online च्या युगात विविध webinars आणि social media campaign यांचे आयोजन केले जाते ज्याद्वारे जगभरातील Antropologist जोडले जातील व हा दिवस एकत्र साजरा करू शकतील.  तसेच Anthropologist समाजातील विविध गटातील लोकांशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी सर्वांना मान्य होतील असे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

जर तुम्हाला पण हा दिवस साजरा करायचा असेल तर तुम्ही तुमचा समाज,  त्यातील चालीरीती याबद्दल अधिक सखोल अभ्यास करू शकता. तसेच विविध संस्थामार्फत आयोजित केलेल्या व्याख्यानांना किंवा सामाजिक उपक्रमांना जाऊ शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशातील आणि जगातील भिन्न संस्कृती समजून घेऊन त्यांचा आदर करू शकता  आणि लुप्त होत चाललेल्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू शकता. World Anthropology Day

तुम्हाला ही माहिती World Anthropology Day कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

6 thoughts on “जागतिक मानवशास्त्र दिवसl World Anthropology Day”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top