Whale fish Information 2024 in Marathi : गेल्या अनेक वर्षांपासून आपण “अनेकविध दिवस” वेगवेगळ्या स्तरावर साजरे होताना बघतो. तुम्हाला हे माहित आहे का?, आज म्हणजेच फेब्रुवारीच्या तिसऱ्या रविवारी “जागतिक व्हेल दिवस” (World Whale Day) जागतिक स्तरावर १९८० पासून साजरा केला जातो. ह्या महाकाय प्राण्याची भव्यता, सौंदर्य तसेच पृथ्वीसाठी त्याचे असणारे पर्यावरणीय मूल्य अबाधित राखण्यासाठी आणि त्या बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर आज ह्या निमित्ताने आपण देवमासा किंवा व्हेलची माहिती जाणून घेऊ.
व्हेल (Whale) हा “मासा” ह्या प्रकारात गणला जात असला तरी तो मूलतः एक मासा नसून एक सस्तन प्राणी आहे. त्याचे बाह्यरूप हे माश्याप्रमाणे असून पाण्यात राहू शकतो म्हणून तो जलचर सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. सस्तन प्राणी हे हवेचा श्वास घेतात. माणसाप्रमाणेच व्हेल, डॉल्फिन, पॉरपॉइज (Whales, Dolphins and Porpoises) हे सस्तन प्राणी देखील हवेचा श्वास घेतात.म्हणून त्यांना श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज असते. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे व्हेलमध्येही श्वसनासाठी फुफ्फुसे असतात आणि माशांना गिल असते.
व्हेल ला देवमासा ही म्हणतात. देवमासा हा सिटॅसिया (Cetacean) वर्गात येतो. सिटॅसिया वर्गात तीन उपवर्ग आहेत. – आर्किओसीटाय, ओडोन्टोसेट्स व मिस्टिसेटेस.
आर्किओसीटाय ह्या वर्गात सुमारे ३.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या लुप्त झालेल्या जातींचा समावेश आढळतो. आणि इतर दोन वर्गात सगळ्या जिवंत असणाऱ्या देवमाशांच्या जातींचा समावेश असतो.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार व्हेलच्या तब्बल ९१ प्रजाती आहेत. बालीन आणि दातदार अशा दोन प्रकारच्या ह्या प्रजाती असतात. ज्यातील ओडोन्टोसेट्स (odontocetes – toothed whales) म्हणजे दात असलेल्या व्हेल/ देवमाश्याच्या ७६ प्रकारच्या प्रजाती ज्या शिकार करण्यासाठी दातांचा वापर करतात आणि (mysticetes) मिस्टिसेटेस (बॅलीन व्हेल) च्या १५ प्रकारच्या प्रजाती आहेत ज्या पाण्याच्या स्तंभातून बॅलीन प्लेट्सचा वापर करत अन्नाची चाळण करत शिकार करतात.
देवमासा कुठे आढळतो?
सर्वच समुद्रात आणि महासागरात देवमासा आढळतो. काही खोल समुद्रात तर काही देवमासे हे किनाऱ्यालगतही राहतात.
देवमासे काय खातात?
इतर मासे ज्याप्रमाणे लहान माश्यांना खाऊन आपली उपजीविका करतात तसाच देवमासा ही करतो. पण देवमासा हा आक्रमक किंवा शिकारी प्रवूतीचा नसतो आणि तो पाठलाग करत नाही. एक देवमासा दुसऱ्या देवमाशाला कधीच खात नाही. त्यांना चावून खाता येत नाही, म्हणून ते ऑक्टोपस सारखे प्लवक जीव खातात. खाण्यासाठी ९० अंशाच्या कोनात आपले मोठे तोंड उघडून खाद्यासोबत सुमारे २०० टन पाणी तोंडात घेतो आणि जीभ उलटी करत खाद्य गिळतो आणि पाणी बाहेर काढतो. आणि म्हणूनच देवमासा हा अन्नसाखळीत सर्वात खालील क्रमांकावर आहे.
देवमाश्याचा आकार आणि वजन –
- व्हेल हा जगातील सर्वात महाकाय असा सस्तन जलचर प्राणी आहे. त्याची लांबी जास्तीत जास्त ३५ मीटर (अंदाजे१००फूट) एवढी आणि वजन १५० टनांपर्यंत असते. त्याच्या शरीराचा सांगाडा हा हाडांचा बनलेला असतो. मादी ही नर देवमाशा पेक्षा मोठी असते.
- देवमामाशाची गर्भधारणा ही ११ ते १५ महिन्यांची असते. मादी दरवेळेस फक्त एकच पिल्लाला जन्म देते. पिल्लू हे आईच्या शरीराच्या एक तृतीयांश असते.
देवमासा/व्हेलचे जीवन आणि काही वैशिष्ट्ये –
Life & features of Whales –
- समुद्र आणि महासागरात राहूनही देवमाश्याचे रक्त उबदार असते. तर बहुतांशी मासे हे एक्टॉथर्मिक (Ectothermic) म्हणजेच शीत रक्ताचे असतात. व्हेलच्या त्वचेखाली ब्लबरचा म्हणजेच चरबीचा जाड थर असतो. देवमाश्याला थंड पाण्यात टाकून राहण्यासाठी तसेच त्याचा अवयव गोठू नये म्हणून हा जाड थर असणे आवश्याक असते.
- व्हेल हा माणसाप्रमाणेच विविध भावना अनुभवत असतो असे मानतात आणि तो खूप हुशार जलचर आहे.
- देवमासाच्या अनेक प्रजाती ह्या त्यांच्या समुदायात गाणी तसेच आवाजाच्या आधारे संवाद साधत असतात. हा व्हेल वेगळ्याच पट्टीत गात असल्याचे आणि जवळपास ५०० किमी पर्यंत आवाज जाऊ शकतो एवढा तीव्र ध्वनी निर्माण करू शकतात असे ऐकीवात आहे आणि हे आवाज मानव विशेष उपकरणाच्या सहाय्याने ऐकू शकतो.
- व्हेलचे दोन वर्ग आहेत: दात असलेले व्हेल आणि बॅलीन व्हेल. दातांऐवजी, बॅलीन व्हेलच्या तोंडात तंतुमय प्लेट्स असतात ज्या त्यांना प्लँक्टन, क्रिल आणि क्रस्टेशियन्स सारख्या समुद्रातील वस्तू फिल्टर करण्यास मदत करतात. दात असलेल्या व्हेल मोठ्या शिकार जसे की स्क्विड किंवा मासे खाऊ शकतात.
देवमासा व्हेलचे प्रकार (Types Of Whales) –
व्हेलच्या अनेक प्रजातींपैकी सर्वात मोठे असणारे व्हेलचे काही प्रकार पुढीलप्रमाणे –
- ब्लू व्हेल Blue Whale
- फिन व्हेल Fin Whale
- स्पर्म व्हेल Sperm Whale
- बोहेड व्हेल Bowhead Whale
- हंपबॅक व्हेल Humpback Whale
- सेई व्हेलSei Whale
- ग्रे व्हेल Gray Whale
- ब्लू व्हेल (Blue Whale) – निळा देवमासा किंवा ब्लू व्हेल हा जगातला सर्वात महाकाय जलचर प्राणी आहे. हा देवमासा आर्क्टिक महासागर वगळता सर्वच महासागरामध्ये आढळतात. कोणत्याही प्रकारच्या डायनासोर पेक्षाही मोठा आहे. निळा देवमासा हा ३० मीटर लांब आणि तब्बल ८० टनापेक्षाही जास्त वजनाची वाढू शकते. म्हणजेच ते ४० हत्ती, ३० टायरानोसोरस रेक्स किंवा जवळपास २६७० सरासरी पुरुषांइतकेच आहे. ते खूप मोठ्या वासरांना जिवंत जन्म देतात; ज्यांचे ते सहा किंवा फेcसात महिने पालनपोषण करतात. कारण मादी तिच्या बाळांना दूध पुरवण्यासाठी जबाबदार असते, तिने अतिरिक्त ऊर्जा साठा ठेवला पाहिजे आणि परिणामी ती नरांपेक्षा मोठी असते.
- फिन व्हेल (Fin Whale) – फिन व्हेलला फिनबॅक व्हेल असेही म्हणतात. बलीन व्हेल प्रजातीतला हा व्हेल निळ्या व्हेल / ब्लू व्हेल नंतर सर्वात लांब असा सिटॅसिया वर्गातला दुसरा जलचर सस्तन प्राणी आहे. जे २६ मीटर पर्यंत वाढू शकतात आणि आत्तापर्यंत नोंदवलेल्या फिव्हेलचे जास्तीत जास्त वजन हे ७७ हजार – ८१ हजार किलो इतके आहे.
- स्पर्म व्हेल (Sperm Whale) – स्पर्म व्हेल हा दात असलेल्या व्हेलच्या प्रजातींमध्ये सर्वात मोठा व्हेल आहे आणि सर्वात मोठा दात असलेला जलचर आहे. फिसेटर वर्गातील जिवंत असलेला हा एकमेव सदस्य आहे. ह्याची लांबी १६ मीटर पर्यंत असते. जवळपास २२५० मीटर मपर्यंत डुबकी मारणारा हा जगातील तिसरा खोल डायव्हिंग करणारा सस्तन प्राणी आहे. जगभरात सर्वत्र आढळतो. ते आहार आणि प्रजनन करण्यासाठी हंगामी स्थलांतर करत असतात. मादी आणि तरुण नार देवमासे एका गटात राहतात. तर प्रौढ नर देवमासे हे विन हंगामात एकटे जीवन जगतात. मादी व्हेल ही दर चार ते वीस वर्षांनी पिल्लाला जन्म देते आणि एका दशकापेक्षा जास्त काळ पिल्लाची काळजी घेते. ७० वर्षांहून अधिक काळ जगणाऱ्या ह्या व्हेलचा मेंदू पृथ्वीवरील सर्वात मोठा म्हणजेच मनुष्यापेक्षा पाचपट जाड आहे.
- बोहेड व्हेल (Bowhead Whale) – बोहेड व्हेल किंवा बालेना मिस्टीसेटस ही बॅलीन व्हेल ची प्रजाती आहे. आणि बालेना कुलातील एकमेव जिवंत प्रजाती आहे. त्याच्या भव्य त्रिकोणी कवटीमुळे त्याचे नाव बोहेड असून ह्या कावतीचा वापर आर्क्टिक बर्फ फोडण्यासाठी करते. हा आर्क्टिक आणि उपआर्क्टिक समुद्रात आधळतो. हा सर्वात जास्ती काळ जगणारा म्हणजेच २०० वर्षांपेक्षा जास्त जगणारा देवमासा आहे. ज्याची लांबी ४ मीटर (१३ फूट) इतकी असते.
- हंपबॅक व्हेल (Humpback Whale) – हंपबॅक व्हेल(Megaptera novaeangliae) ही सुद्धा बालेन व्हेलची एक प्रजाती आहे. मेगाप्टेरा वर्गातील एकमेव प्रजाती आहे. ह्याची लांबी १४ ते १७ मीटर इतकी असून त्याचे वजन ४० मेट्रिक टन पर्यंत असते. ह्या देवमाश्याच्या कुबड्याला एक विशिष्ट आकार असतो. त्याच्या डोक्यावर लांब पेक्टोरल पंख आणि ट्यूबरकल्स असतात. जगभरातील महासागर आणि समुद्रामध्ये आढळणारा हा देवमासा दरवर्षी १६००० किमी पर्यंत स्थलांतर करतो. ते ध्रुवीय पाण्यात खातात, मुख्यतः क्रिल आणि लहान मासे खातात आणि प्रजननासाठी उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकाटीबंधीय पाण्यात स्थलांतर करतात.
- सेई व्हेल (Sei Whale) – सेई व्हेल ही सुद्धा बॅलीन व्हेल आहे. ही दहा रोर्कुल (rorqual) प्रजातींपैकी एक आहे. ब्लू व्हेल(Blue whale) आणि फिन व्हेल (Fin Whale) नंतर तिसरा सर्वात मोठा जलचर आहे. हा जपान आणि दक्षिण आफ्रिकेतील समुद्रात आढळतो. ह्याची लांबी १२ – १४ मीटर असते. जी जास्तीत जात १९.५ मीटर पर्यंत वाढू शकते. ह्याचा शरीरावर हलक्या राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात. त्याचे शरीर सामान्यतः गडद राखाडी रंगाचे असते.सेई व्हेल दरवर्षी उन्हाळ्यात थंड, उपध्रुवीय पाण्यापासून हिवाळ्यात समशीतोष्ण, उपोष्णकटिबंधीय पाण्यात 70 वर्षांच्या आयुष्यासह स्थलांतरित होते.
- ग्रे व्हेल (Gray Whale) – ग्रे व्हेल किंवा करडा देवमासा हा उत्तर पॅसिफिक महासागरात आढळतो. ह्या माशाची शिकार खूप मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने त्यांची संख्याही खूप कमी झाली आहे. परंतु आता इंटरनॅशनल वेलिंग कमिशनने त्यांना पूर्णपणे संरक्षण दिले आहे. हा मासा जास्तीत जास्त १३.५ मीटर इतका लांब असतो. त्याच्या शरीरावर करड्या रंगाचे ठिपके असतात.
- सर्वात लहान देवमासा म्हणजे पिग्मी राइट व्हेल जो ८ मीटर पर्यंत लांब असतो.
तर आजच्या लेखातली देवमासा किंवा व्हेलबद्दल ही माहिती (Whale fish Information 2024 in Marathi ) कशी वाटली? तुम्हाला व्हेल विषयी आणखी काय माहीत आहे का?, तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही माशांचे किंवा जलचर प्राण्यांचे विशेष वैशिष्ट्य माहीत असेल तर ते ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहे.
आपल्या मित्र परिवाराला हा लेख Whale fish Information 2024 in Marathi नक्की पाठवा. अशा अनेकविध विषयांवर सविस्तर माहितीपर लेखांसाठी, बातम्यांसाठी, नवनवीन कथांसाठी आपल्या ‘लेखकमित्र’ वेबसाईटला नेहमी नक्की भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप चॅनल ही फॉलो करा.
वाचक मित्रहो, खूप खूप धन्यवाद.
नाव – नंदिनी हाटकर, मुंबई.
खूपच उपयुक्त माहिती
विस्तृत माहिती.