दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे नेमके काय ? l Long term investment plans in Marathi  

WhatsApp Group Join Now

Long term investment plans in Marathi : दीर्घकालीन गुंतवणुक करणे मग ती मालमत्तेमधील गुंतवणूक असो , गोल्ड मधील असो , शेअर्स मधील असो , म्युच्युअल फंड मधील असो फायदेशीर समजली जाते . 

अल्पकाळा करिता केलेली गुंतवणूक म्हणजे साधारण काही महिन्यांपासून सुरु होऊन ते काही वर्षांपर्यंत मानली जाते. जेव्हा की दीर्घकालीन गुंतवणूक ही साधारण सात ते दहा वर्षांसाठी किंवा त्यापेक्षा अधिक ही काळासाठी सुद्धा असू शकते.आजच्या या लेखामधून आपण काही मुद्दे बघणार आहे जे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यास मदत करतील.

गुंतवणुकीचे ध्येय ( investment aim ) : 

एखादी व्यक्ती त्याच्या आर्थिक गरजे प्रमाणे आणि ध्येयाप्रमाणे गुंतवणुकीचे गणित मांडत असते. आजकाल तरुण मंडळींना नोकरी लागते, तीच मुळात कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला. अगदी कॉलेज मधून बाहेर पडण्याआधी मुला-मुलींना कॉलेज कॅम्पस माध्यमातून नोकरी लागलेली असते , ती ही चांगल्या पगाराची. तेव्हा साधारण 22 किंवा 23 व्या वर्षी गुंतवणूकीचा विचार करून ध्येय निश्चित केल्यास करिअरच्या सुरुवातीपासूनच बचतीचा श्रीगणेशा होऊ शकतो. नवीन घर म्हणा किंवा चार चाकी गाडी म्हणा स्वतःची आणि आलिशान असावी असं प्रत्येकाला वाटतं , तेव्हा सात ते दहा वर्षाचा कालावधी लक्षात घेतला तर वयाच्या 30 किंवा 32 व्या वर्षांपर्यंत इतके पैसे हातात असू शकतील की तुम्ही घर किंवा गाडी चे डाऊन पेमेंट स्वतःच्या पैशाने भरू शकता. गुंतवणुकीसाठी ध्येयनिश्चिती असणे गरजेचे आहे. 

दीर्घकालीन गुंतवणूक कशाकशात केली जाते आणि कशी फायदेशीर होते हे आपण बघूया.

शेअर्स , म्युच्युअल फंड मधील दीर्घकालीन गुंतवणुक ( long term investment plans in shares, mutual fund , bonds )  : 

  1. शेअर्स  ( shares ) :
  • एखाद्या चांगल्या कंपनीचे समभाग (शेअर्स) जेव्हा जास्त कालावधीसाठी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवता तेव्हा तुम्ही जोखिम पत्करत असतात , सोबतच तुमचा संयम देखील तितकाच महत्वाचा असतो.
  • याचे तुम्हाला फायदे देखील मिळतात ते कसे तर समभागाचे मूल्य बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असते. बाजाराच्या पडत्या काळात समभागाचे मूल्य कमी असताना शेअर्स खरेदी केल्यास तुमच्या कडे अधिक संख्येने शेअर्स जमू शकतात. ज्याचा वर कंपनी ने डिव्हिडंट दिल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा तुम्हाला मिळू शकतो. हा देखील कमाई चा भाग समजला जातो. 
  • शिवाय सुरुवातीला शेअर्स विकत घेताना चढ्या भावाने घेतले असल्यास किंवा शेअर खरेदी करण्याची एन्ट्री चुकली असल्यास तुम्हाला सरासरी किंमत ( प्राईस अवरेजींग ) करता येऊ शकते. अर्थात यासाठी काही कालावधी जाऊ शकतो. 
  • दररोज शेअर च्या किमतीत चढ उतार असतात त्यामुळे फार काही परतावा तुम्हाला काही दिवसात किंवा काही महिन्यात पाहायला मिळत नाही. 
  • तेच वर्षानुवर्षे दीर्घकालीन गुंतवणुकी मध्ये ध्येय निश्चित करून चांगल्या कंपनीचे शेअर्स दुप्पट ,तिप्पट झालेले आपण बघतो. 

जाणून घ्या : शेअर बाजाराची माहिती मराठी मध्ये ( लिंक वर क्लिक करा.)

  1. म्युच्युअल फंड ( mutual fund ) : 
  • म्युच्यअल फंड देखील दीर्घकालीन गुंतवणुकी मध्ये फायदेशीर समजला जातो. यात विविध घटकांचा समावेश असल्यामुळे तुमची आर्थिक जोखीम कमी होते. अधिक परताव्याची शक्यता वाढते. 
  • दीर्घ कालावधी मध्ये गुंतवणूक म्हणजे तुमच्या होणाऱ्या खर्चात तुलनेने कमी कपात होते. 
  • कमी काळासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून अधिक परताव्याची अपेक्षा केल्यास हे शक्य नाही यातच गुंतवणूकदार पैसे काढून घेतो आणि त्यावरील लागणाऱ्या शुल्काला सामोरे जातो पर्यायाने स्वतःचे नुकसान करून घेतो. 
  • जसे जसे तुमचे युनिट वाढत जाणार तसे वाढत्या nav चा फायदा तुम्हाला अधिक मिळणार. 
  1. गोल्ड मधील गुंतवणूक ( gold investment ):
  • गोल्ड मधील दरवाढ आपण सर्वच वर्षानुवर्षे आपण पाहत आलेलो आहे .  वर्ष २००७ मध्ये गोल्ड म्हणजे सोन्याचा भाव Rs. 7,000  / 10  ग्रॅम होता . बापरे हे आता  Rs.7,000 हा आकडा अगदीच नगण्य वाटत असेल , हो ना ? पण अर्थात तेव्हा तो ही जास्तच वाटायचा त्यावेळी ! 
  • कुणास ठाऊक होता 2023 उजाडेल तेव्हा हाच भाव पर 10 ग्राम नाही तर पर 1 ग्रॅमच्या जवळ जाणारा असेल ! 2023 मध्ये सोन्याचा भाव साधारण अंदाजे  Rs.6100 /  ग्रॅम च्या आसपास होता. 
  • तेव्हा गोल्ड मध्ये गुंतवणूक केली असती तर आज खऱ्या अर्थाने दीर्घकालीन गुंतवणूकीचा अर्थ समजला असता.

खाली दिलेला एक तक्ता आपण बघू, यात साधारण 2000 नंतर पुढच्या प्रत्येक 5 वर्षांनी गोल्ड चा भाव कसा बदलत गेला हे पाहून थक्क व्हायला होईल. दीर्घकाळ गुंतवणुकीचा फायदा

वर्ष गोल्ड रेट / 10 ग्रॅम 
2005Rs. 7,000
2010Rs. 18,500
2015Rs. 26,343
2020Rs.48,651
2023Rs.65,330

रिअल इस्टेट मधील दीर्घकालीन गुंतवणुक  (long term investment plans in real estate ) :

  • पारंपरिक गुंतवणुकीचे आणखी एक उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर रिअल इस्टेट हा दीर्घ कालावधी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी चा पर्याय येतो. 
  • एक गुंतवणूक म्हणून तुम्ही जेव्हा घर विकत घेता तेव्हा भाडे तत्वावर त्याचा तुम्हाला मासिक उत्पन्नाचा एक भाग म्हणून परतावा मिळत राहतो. 
  • पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये घराच्या किमती गगनाला भिडल्या असताना , भाडे तत्वावर घर घेणारे देखील भरपूर कुटुंब असतात त्यामुळे घराचे भाडे देखील एक निश्चित उत्पन्न मिळत राहते. 
  • अर्थात ही गुंतवणूक म्हणजे करोडोच्या घरात जाऊ लागल्याने याचा गुंतवणूक म्हणून विचार करणारे लोक आजूबाजूला क्वचित पाहायला मिळतात.
  1. चक्रवाढ व्याज आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट (compound interest and long term investment) :
  • म्युच्युअल फंडामध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक चक्रवाढ व्याज पद्धतीने तपासून पाहिल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाची ताकद आणि पैशाचे महत्त्व कळेल. 
  • यात तुम्ही गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेवर परतावा मिळतोच मात्र तुम्ही दरमहा  करत असलेल्या गुंतवणुकीवर देखील तुम्हाला व्याज मिळत जातो आणि हा एकत्रित व्याज तुमचा फायदा वाढवतो.
  • तुम्हाला मिळालेल्या व्याजावर व्याज मिळत जाणे हे चक्रवाढ व्याज होय. 
  • तुम्ही सुरुवातीला काही रक्कम एकरकमी म्युच्युअल फंडामध्ये टाकली. तर तुम्हाला पहिल्या वर्षी त्यावर व्याज मिळणार ,बरोबर ? त्याच्यानंतर भविष्यात मिळणाऱ्या प्रत्येक व्याजाबरोबर तो वाढत च जाणार आहे.  
  • दीर्घकालीन गुंतवणुकीचा हाच फायदा  चक्रवाढ व्याजामुळे फायदेशीर ठरतो. 
  • उदाहरण घ्यायचे झाल्यास , म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही सुरुवातीला एकरकमी Rs. Rs.50,000 गुंतवले. 

कालावधी , अर्थातच दीर्घ कालावधी म्हणजे 10 वर्ष समजू .

व्याजदर 8 % वार्षिक पकडला तर आता बघा, चक्रवाढ व्याजामुळे येणारी रक्कम प्रिन्सिपल अमाऊंट ( principal amount ) Rs.50,000

मिळालेले व्याज  Rs.57,946

एकूण रक्कम  Rs.1,07,946

आणि हेच जर सरळव्याज दराने काढले तर प्रिन्सिपल अमाऊंट ( principal amount ) Rs.50,000

मिळालेले व्याज  Rs. 40,000

एकूण रक्कम Rs.  90000

म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये चक्रवाढ व्याज दराचा  फायदा लक्षात घ्यावा.

  1.  लार्ज कॅप इंडेक्स मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ( long term investment in large cap ) : 
  • लार्ज कॅप कंपण्यामद्धे गुंतवणूक ही तुलनेने कमी जोखीम युक्त मनाली जाते. यामागचे कारण या कंपनी स्थिरावलेल्या असतात त्यामुळे त्याचा परतावा स्थिर स्वरूपात गणला जातो. 
  • दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये तर याचा परतावा देण्याची क्षमता तुलनेने चांगली मानली जाते. 
  • मागच्या काही वर्षात लार्ज कॅप इंडेक्स चा परतावा जर पहिला तर या गोष्टी लक्षात येतील. 
  • मागच्या काही वर्षात इक्विटी फंड च्या लार्ज कॅप फंड मध्ये पैशाचा ओढा वाढतोय. 

मागील दहा वर्षांसाठी लार्ज कॅप इंडेक्स चा परतावा  पुढील प्रमाणे : last 10 years large cap index returns  ( long term investment)

  1. क्‍वांट फोकस्‍ड फंड –

या फंड (sip ) ने मागील 10 वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये  जवळपास 16.11 % इतका परतावा दिला आहे . 

  1. निप्‍पॉन इंडिया लार्ज कैप फंड – 

या फंड (sip ) ने मागील 10 वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये जवळपास 14.49 % इतका परतावा दिला आहे . 

  1. मिराए एसेट लार्ज कैप फंड – 

या फंड (sip ) ने मागील 10 वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये जवळपास 14.38 % इतका परतावा दिला आहे . 

तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा एक माहितीपर लेख घेऊन लवकरच भेटू. असेच माहितीपर लेख आणि कथा वाचण्यासाठी “लेखक मित्र” वेबसाईटला  भेट द्या आणि व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा.

धन्यवाद !

4 thoughts on “दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे नेमके काय ? l Long term investment plans in Marathi  ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top