Paytm Success Story in Marathi: आजच्या डिजिटल भारतात पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. कुठेही बाहेर काही खरेदी केली कि सहज आपण काढतो आणि QR कोडे स्कॅन करून पेमेंट करतो. परंतु दोन दशकांपूर्वी कोणी हा विचारही केला नसेल कि भारतात पैशांशिवाय काही गोष्ट खरेदी करता येऊ शकते, तेसुद्धा अगदी ५-१० रुपयांची वस्तू सुद्धा. “Digital India” चळवळीत ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली ते म्हणजे PAYTM. आजच्या काळात PAYTM माहित नाही अशी व्यक्ती शोधणे कठीणच. परंतु याच PAYTM कंपनी वर सध्या संकटांचे सावट आले आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया PAYTM ची सविस्तर माहिती.
या लेखात आपण पुढील गोष्टी सविस्तर जाणून घेऊ::
- Paytm चा उदय
- Paytm चे प्रॉडक्ट्स/ सुविधा
- Paytm ला मिळालेले पुरस्कार
- paytm च्या अडचणी
- RBI ची कारवाई
- शेअर बाजारातील चढ – उतार
- भविष्याचा वेध
Paytm चा उदय (Paytm Success Story in Marathi):
PAYTM ची स्थापना २०१० मध्ये विजय शेखर शर्मा यांनी केली. हि कंपनी One97 कम्युनिकेशन या पालक कंपनी अंतर्गत स्थापन करण्यात आली. सुरुवातीला ही कंपनी प्रीपेड मोबईल आणि DTH रिचार्ज प्लॅटफॉर्म म्हणून काम करत होती. नंतर २०१३ मध्ये डेबिट कार्ड, पोस्टपेड मोबाइल आणि लँडलाइन बिल पेमेंट या सेवा सुद्धा सुरु करण्यात आल्या. हळूहळू पेटीएम ही ऑनलाइन पेमेंट मधील एक अग्रेसर कंपनी बनली. “ATM नही PAYTM करो !!” ही tagline आतापर्यंत सर्वांच्या परिचयाची झाली आहे.
विजय शर्मा हे उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दिल्ली येथील दिल्ली स्कूल ऑफ इंजिनीरिंग येथे प्रवेश घेतला. विजय यांनी १९९७ मध्ये कॉलेज मध्ये असताना Indiasite.net ही त्यांची पहिली वेबसाइट डेव्हलप केली. मग २००० मध्ये त्यांनी One97 कम्युनिकेशन ही कंपनी स्थापन केली.
२०१० मध्ये विजय यांनी पहिल्यांदा ऑनलाइन पेमेंट इकोसिस्टिम ची कल्पना बोर्ड समोर मांडली. परंतु ही कल्पना मान्य झाली नाही. तेव्हा त्यांनी स्वतःच्या Equity चा हिस्सा गहाण ठेऊन पेटीएम म्हणजेच “ Pay Through Mobile” ची सुरुवात केली.
Paytm च्या सेवा/ प्रॉडक्ट्स:
- २०१०: सुरवातीला पेटीएम फक्त प्रीपेड मोबईल आणि DTH रिचार्ज प्लॅटफॉर्म म्हणून काम करत होती. मग २०१३ मध्ये डेबिट कार्ड, पोस्टपेड मोबाइल आणि लँडलाइन बिल पेमेंट या सेवा सुद्धा सुरु करण्यात आल्या.
- २०१४: २०१४ पर्यंत पेटीएम ने आपले डिजिटल वॉलेट सुरू केला होता. जिथे गिऱ्हाईक या वॉलेट मध्ये पैसे भरून मग कुठच्या हि वेबसाइट वर शॉपिंग करू शकत होते. २०१४ मध्ये इंडियन रेल्वे आणि उबर यांनी पेटीएम वॉलेट चा पेमेंट साठी स्वीकार केला. २०१६ मध्ये नोटबंदी नंतर डिजिटल पेमेंट ला अधिकच चालना मिळाली.
- २०१५: २०१५ मध्ये पेटीएम ने त्याची QR स्कॅन कोड प्रणाली बाजारात आणली. यावर्षी RBI ने सुद्धा पहिल्यांदा भारतात Bharat QR सादर केले. QR मुळे पेमेंट करणे हे एकदम सोपे झाले.
- २०१६: २०१६ मध्ये पेटीएम ने मूवी, इव्हेंट्स तसेच विमान यांच्या तिकीट बुकिंग च्या सेवा सुद्धा अँप वर उपलब्ध करून दिल्या.
- २०१७: पेटीएम ने नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याच्या payment बँक ची स्थापना केली. पेमेंट बँक ही इतर कोणत्याही बँकेसारखी असते, परंतु ती लहान प्रमाणात कार्यरत असते. तसेच कर्ज वितरण किंवा क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही. ह्या बँका १ लाखांच्या वरच्या ठेवी (Fixed Deposit) स्वीकारू शकत नाहीत.
- २०१७: २०१७ मध्ये पेटीएम अँप १० कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले. हे भारतातील पहिले असे पेमेंट अँप होते जे सर्वाधिक डाउनलॊड झाले होते.
- २०१८: २०१८ मध्ये पेटीएम ने Gamepind हा मोबाइल गेमिंग अँप बाजारात आणला. तसेच त्यावर्षी पेटीएम ने Paytm Money आणि Paytm Gold हे दोन नवीन अँप लाँच केले. हे अँप शेअर बाजारात आणि सोन्यामध्ये निवेश करण्यासाठी वापरले जाऊ लागले.
- २०१९: २०१९ मध्ये पेटीएम ने Soundbox हे नवीन प्रॉडक्ट बाजारात लाँच केला. पेटीएम हि ऑडिओ पेमेंट अलर्ट भारतीय बाजारात आणणारी पहिली कंपनी होती. आणि हे पेटीएम Soundbox आपल्याला मग प्रत्येक दुकानाच्या कॅश काउंटर वर वाजताना ऐकू येऊ लागले.
- २०२०: कोविड महामारी च्या काळात स्टारबक्स ने पेटीएम बरोबर भागीदारी करत लोकांना ऑनलाइन ऑर्डर करणे सोपे केले.
- २०२१: २०२१ मध्ये पेटीएम ने त्याच्या एम्प्लॉयीस साठी Paytm Wealth academy सुरु केली. यामध्ये AI तंत्रज्ञान वापरून पैसे कसे manage करावे हे शिकवले जाते. Paytm Products and Services
Paytm ला मिळालेले पुरस्कार:
paytm ला गेल्या १०-१२ वर्षात अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्यातील काही महत्वपूर्ण अवॉर्ड्स:
- ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022 मध्ये पेटीएम ला सर्वोत्कृष्ट UPI ॲप आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक नाविन्यपूर्ण वापर हे पुरस्कार मिळाले.
- FORBES लीडरशिप अवॉर्ड्स 2016 मध्ये पेटीएम ला सर्वोत्कृष्ट स्टार्टअप ऑफ द इयर चा पुरस्कार देण्यात आला.
- २०१६ मध्ये Financial टाइम्स ने पेटीएम ला FT फ्यूचर ऑफ फिनटेक पुरस्कार प्रदान केले होते.
- २०१४ मध्ये पेटीएम ला MMA कडून मोबाइल अँप श्रेणीत “गोल्ड विनर” हा पुरस्कार मिळाला.
- पेटीएम ने २०२१ मध्ये इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे बेस्ट फिनटेक ग्रोथ स्टोरीसाठी IAMAI चा इंडिया डिजिटल पुरस्कार जिंकला. Awards won by Paytm
PAYTM समोरील अडचणी:
पेटीएम या कंपनीला सुरवातीपासूनच लहान मोठ्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
- २०२० मध्ये Paytm Mall वर मोठा सायबर हल्ला झाल्याची चर्चा जोरात सुरु होती. या माहिती नुसार सुमारे ३४ लाखांहून जास्त लोकांची खाजगी माहिती लीक झाली होती. परंतु कंपनीने या प्रकारच्या कोणत्याही माहितीचे समर्थन केले नव्हते. त्यांच्या मते सर्व युसर्स चा डेटा सुरक्षितच होता.
- १८ सप्टेंबर २०२० या दिवशी गुगल प्ले स्टोर वरून पेटीएम चे अँप हटवण्यात आले. गुगलच्या मते ऑनलाईन जुगार किंवा विविध खेळांवरील सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच इतर कोणतेही अॅप जे रोख बक्षिसे किंवा पैसे जिंकण्याबाबतची आश्वासन देतात, त्यांची जाहिरात गुगल करत नाही. परंतु काही तासातच पेटीएम अँप गुगल प्ले स्टोर वर परत आले.
- १ ऑगस्ट २०२२ ला phonepay कंपनी ने पोलिसांकडे अशी तक्रार केली कि पेटीएम च्या ३ कर्मचाऱ्यांनी phonepay चे QR कोड जाळले. परंतु पेटीएम ने हे स्पष्ट केले कि ते कर्मचारी आधी phoepay या कंपनीमध्येच कामाला होते आणि हा वाद त्या कर्मचारी आणि कंपनी मधला आहे.
RBI ची Paytm वर कारवाई:
पेटीएम पेमेंट बँक च्या समस्या या पेटीएम कंपनी च्या IPO नंतर (२०२१ मध्ये) लगेचच सुरु झाल्या. IPO नंतर अशी चर्चा सुरु झाली कि पेटीएम पेमेंट्स बँकेने अली बाबा या आपल्या भागीदार कंपनीला काही महत्त्वाची माहिती लीक केली होती. त्यावेळी RBI ने पेमेंट बँकेला तात्काळ नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोखलं होतं.
३१ जानेवारी २०२४ ला RBI ने पेटीएम पेमेंट बँक ला एक नोटीस जाहीर केली, त्यानुसार २९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेमेंट बँक त्यांच्या कुठल्याही अकाउंट मध्ये, वॉलेट मध्ये किंवा fastag मध्ये कुठल्याही स्वरूपातील ठेवी स्वीकारू शकत नाही. कस्टमर फक्त त्यांच्या खात्यात असलेले पैसे कधीहि काढू शकतात आणि वॉलेट मध्ये असलेले पैसे खर्च करू शकतात.
पेटीएमच्या पेमेंट्स बँकेत RBI ला अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. लाखो खाते धारकांची KYC म्हणजे ग्राहकांच्या ओळखपत्राची माहिती घेण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हजारो खात्यांमध्ये एकच पॅन क्रमांक देण्यात आला आहे. RBI ने या आधीही अनेक वेळा पेटीएम ला सूचना वजा इशारे दिले होते. परंतु पेटीएम ने त्यावर वेळीच लक्ष दिले नाही. मोठ्या प्रमाणात KYC उल्लंघन केल्यामुळे पेटीएमवर अवैध आर्थिक व्यवहार केला असण्याचा संशय निर्माण झाला आहे.
पेटीएम ज्या फिनटेक सेक्टरमध्ये काम करत आहे ते नियमांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजेच RBI ची तिथल्या घडामोडींवर बारीक नजर असते. फिनटेक कंपन्यांना RBI च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. पेटीएमने नियमांचं पालन केलं नाही आणि ते RBI च्या निगराणीखाली आले.
१६ फेब्रुवारी २०२४ रोजी RBI ने एक पत्रक जाहीर केले, त्यानुसार त्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी पेटीएम ला १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून आता पेटीएम १५ मार्च २०२४ नंतर कुठल्याही ठेवी स्वीकारू शकणार नाही. तसेच RBI ने अजून एक पत्रक स्वतःच्या वेबसाईट वर जाहीर केले असून त्यात सारख्या विचारल्या जाणाऱ्या (FAQ) प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. जर पेटीएम च्या कुठल्याही ग्राहकाला कुठला प्रश्न असल्यास ते जाऊन हे पत्रक वाचू शकतात. ह्याची लिंक लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे.
तसेच १९ फेब्रुवारी ला ED ने हे जाहीर केले की पेटीएमने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. RBI’s action on Paytm
शेअर बाजारातील चढ – उतार:
३१ जानेवारी ला RBI ने नोटीस जारी केल्यानंतर २-३ दिवसात पेटीएम चे शेअर्स जवळपास ४०% पेक्षा जास्त खाली घसरले. ६ फेब्रुवारी ला कंपनी ने पहिल्यांदाच आपली बाजू मांडल्यावर कंपनी चे शेअर्स ७% वर गेले. १३ फेब्रुवारी ला परत Macquire या ग्लोबल ब्रोकिंग फर्म ने पेटीएम चे रेटिंग्स कमी केल्यानंतर शेअर्स चे भाव ९% नी खाली घसरले. फेब्रुवारी महिन्यात रोज पेटीएमच्या शेअर्स चे भाव हे वर खाली होत आहेत. Paytm Share Movement
Paytm भविष्याचा वेध (Future of Paytm):
पेटीएमच्या संस्थापकांच्या म्हणण्यानुसार कंपनीने आधीच RBI च्या नियमांचे पालन करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. तसेच ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या UPI पेमेंट वर जास्त प्रमाणात होणार नाही असे कंपनी चे म्हणणे आहे. RBI च्या सूचनेनुसार कंपनी ने त्यांचे नोडल खाते सुद्धा ऍक्सिस बँकेत स्थलांतरित केले आहे.
परंतु जे दुकानदार किंवा ग्राहक आधी पेटीएम पेमेंट बँक चे खाते व्यवहारासाठी वापरात होते त्यांना आता आपले खाते दुसऱ्या बँकेत उघडावे लागेल. तसेच पेटीएम ला सर्व QR कोड आणि Soundbox हे नवीन अकाउंट्स प्रमाणे बदलून द्यावे लागतील. ह्या सर्व बदलांना सामोरे जाताना पेटीएम चे ग्राहक दुसऱ्या कंपनी कडे वळण्याचे प्रमाण वाढू शकते.
ब्रोकिंग फर्म मधील काही कंपन्या ह्या पेटीएम साठी सकारात्मक असल्या तरी त्यांचे प्रमाण कमी आहे. ह्या सर्व अडचणीच्या काळात पेटीएम चे ग्राहक त्यांच्या सोबत राहतात कि नाही आणि RBI शेवटी पेमेंट बँक वर काय निर्णय घेईल ते येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. परंतु तोपर्यंत ग्राहकांनी घाबरून न जाता RBI ची जाहीर नोटीस नीट वाचून आणि समजून घेऊन त्या प्रमाणे निर्णय घ्यावे.
तुम्हाला ही Paytm Success Story in Marathi बद्दल ची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशा अजून कुठल्या नवीन विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही आम्हाला कंमेंट मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
RBI लिंक:
https://www.rbi.org.in/commonperson/English/scripts/FAQs.aspx?Id=3573
लेखिका: नेहा करंदीकर – हुनारी, मालवण
खरोखर खूपच उपयुक्त माहिती. यापूर्वी यातील काहीही माहिती नव्हती. धन्यवाद
Thank you. या पुढे ही अशीच चांगली आणि नवीन माहिती देण्याचा सदैव प्रयत्न राहील.
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
इतक्या सोप्या भाषेत इतका गहन विषय हाताळल्या बद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन विषयांवर लिहित रहा.
धन्यवाद. असाच प्रयत्न सदैव चालू राहील.