10 Benefits Of Rising Early :सकाळी लवकर उठण्याचे १० फायदे

WhatsApp Group Join Now

लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्य, धनसंपदा लाभे”..अशी म्हण आहे. खरतर हे सगळ्यांनाच माहिती आहे पण ते आचरणात किती जण आणतात ते महत्वाचे आहे. 

10 Benefits Of Rising Early:पहाटे ४ ते ५.३० या वेळेला उठणे हे आरोग्यासाठी सगळ्यात चांगले मानले जाते. ही वेळ ब्रह्ममुहूर्तची मानली जाते. या वेळेत उठल्याने आपल्याला सौदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी, यश आणि आरोग्य मिळते. आपला संपूर्ण दिवस उर्जेने भरलेला जातो तसेच प्रत्येक कामात एक वेगळाच उत्साह जाणवतो त्यामुळे आपण आपली सगळी कामे अगदी वेळेत पूर्ण करू शकतो. 

10 Benefits Of Rising Early

उशिरा उठल्यामुळे आधी तर आपला आळसच लवकर जात नाही, दिवसाची सुरुवात उशिरा झाल्याने कामे कशी पूर्ण होतील याचे टेंशन येते आणि मग दिवसभर आपला वेळ कशात जातो तेच कळत नाही अगदी निरुत्साही वाटते शिवाय आपल्याला स्वतःसाठी असा मोकळा वेळ सुद्धा मिळत नाही खास करून स्त्रियांना कारण सगळा वेळ त्यांचा घरातील कामे आणि कुटुंबासाठीच जातो. मग चिडचिड वाढते आणि त्यामुळे तब्बेतीवर पण परिणाम होतो. म्हणूनच जर आपण लवकर उठलो तर नक्कीच वेळेचे नियोजन करून आपण स्वतःचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढू शकतो.

आपण सर्वजण दिवाळीला अगदी पहाटे लवकर उठतो. लवकर अंघोळ करून अगदी उत्साहाने सगळं आवरतो तेव्हा आपल्याला कसं एकदम उत्साही आणि आनंदी वाटतं अगदी तसेच आपण रोज पण लवकर उठून आपला प्रत्येक दिवस आपण उत्साही आणि आनंदी करू शकतो. दिवाळी पहाट सारखा आनंद आपण अगदी रोज घेऊ शकतो. खरे जीवन हे पहाटे तर सुरू होते. 

पहाटेच्या या शांत वेळेत आपण आपल्या स्वतःला वेळ देऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आपण पहाटेच्या वेळेत मन एकाग्र करून करू शकतो. जसे की दिवसभराच्या कामाचे नियोजन करू शकतो. जर तुम्ही वर्किंग किंवा व्यावसायिक असाल तर सकाळच्या या शांत वेळेत तुम्ही कामा संबधी काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात.

लवकर उठण्यासाठी आधी लवकर झोपणे पण तेवढेच महत्वाचे आहे. कारण जर तुमची झोप तेवढी पुरेशी झाली नाही तर लवकर उठल्यावर तुम्हाला उत्साही वाटणार नाही म्हणूनच तुमची झोपेची वेळ ही पण निश्चित असली पाहिजे. कमीत कमी ७ तास तरी शांत झोप झाली पाहिज. आदल्या रात्री स्वतःला बजावा की, आपल्याला पहाटे लवकर उठायचे आहे मग बघा आपोआप रोज तुम्हाला लवकर वेळेत जाग येईल ते सुद्धा गजर न लावता.

आपला दिनक्रम स्वास्थ्य निरोगीपूर्ण असला पाहिजे. आजारी पडणे हे आयुष्यातले सगळ्यात नकारात्मक दिवस असतात त्या वेळेत आपण शरीराने तर अस्वस्थ असतोच पण मनाने पण अस्वस्थ होतो. हळूहळू आपण तणावाखाली राहू लागतो. कश्यातच मन रमत नाही अगदी छोटा आजार हा मोठा आजार कधी हून जातो कळतच नाही आणि मग आपण कायम निरुत्साही जीवन जगत राहतो. म्हणूनच जर आपण पहाटे उठलो आणि नियमित सगळ्या गोष्टींचे पालन केले तर आपले आयुष्य निरोगी राहू शकते. आयुष्यभर जर निरोगी रहायचे असेल तर काही सवयी निश्चितपणे स्वतः आत्मसात करणे गरजेचे आहे.

10 Benefits Of Rising Early :सकाळी लवकर उठण्याचे १० फायदे

१. पहाटेची वेळ ही शांत आणि चैतन्य निर्माण करणारी असते त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते. शिवाय सकाळची हवा ही शुद्ध असते त्यामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस उत्साहात जातो आणि आपण उत्साहाने आपली दिवसभराची सगळी कामं पूर्ण करू शकतो.

२. पहाटे लवकर उठून नियमित ध्यान आणि व्यायाम केल्याने आपले मन आणि शरीर स्वस्थ आणि आनंदी राहते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तसेच बौद्धिक दृष्ट्या आपल्याला अधिक तंदुरुस्त राहता येते. जेवढे शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे तेवढेच मानसिक आरोग्य पण महत्वाचे आहे कारण जास्त रोग हे मानसिक अस्वस्थतेमुळेच होतात. म्हणूनच आपण जर मनाने निरोगी राहिलो तर आपोआप शरीराने पण निरोगी राहू शकतो.

३. पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो आणि दिवसभराचे कामाचे नियोजन करून ठेऊ शकतो. ज्यामुळे आपली महत्वाची सगळी कामे वेळेत पूर्ण होतात.

४. पहाटे लवकर उठून निसर्गाच्या सान्निध्यात एकटेच फिरायला जावे, ज्यामुळे आपल्याला उगवत्या सूर्याचे दर्शन होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अगदी शांत अश्या ठिकाणी बसून ध्यान करावे. सकाळचे वातावरण अगदी भरपूर उर्जा देणारे असते ज्यामुळे आपले मन प्रसन्न होते आणि मन प्रसन्न असेल तर आपोआपच आपण आनंदी राहतो आणि शरीर स्वस्थ राहते. 

५. पहाटे लवकर उठल्यामुळे आपली त्वचा देखील तजेलदार आणि सुंदर राहते. चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. ज्यामुळे आपल्याला त्वचेची वेगळी अशी काळजी घेण्याची गरज भासत नाही. चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळेच तेज दिसू लागते आणि चेहरा कायम फ्रेश दिसतो.

६. पहाटे लवकर उठून नियमित आणि शिस्तबद्ध जीवनशैली आचरणात आणून आपण जीवनातील आपली सगळी ध्येय पूर्ण करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. बरीच यशस्वी झालेली माणसं हे यशस्वी होण्या मागचे सगळ्यात महत्वाचे कारण हेच असते की ते पहाटे लवकर उठून आपल्या दिनचर्येची सुरुवात करतात.

७. पहाटे लवकर उठून आपण आपले छंद जोपासु शकतो. जसे की वाचन, लेखन, गार्डनिंग, गाणी ऐकणे, इत्यादी. या गोष्टी केल्या नंतर आपल्याला प्रसन्न वाटते आणि दिवसभर आपण आनंदी राहतो.

८. पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणामुळे आपण तणावमुक्त राहू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो तसेच असंख्य आजारांपासून दूर राहू शकतो. आजकाल सगळेजण कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त असतात पण जर तुम्ही पहाटे लवकर उठून नियमित सवयी स्वतःला लावून घेतल्या तर आपण कायम निरोगी आयुष्य जगू शकतो.

९. सध्या वजन कमी करण्यासाठी आपण काय काय उपाय करत असतो पण जर आपण लवकर उठून आपली जीवनशैली नियमित ठेवली, नियमित व्यायाम केला आणि समतोल आहार घेतला तर आोआपच आपले वजन पण नियंत्रणात राहते. त्यासाठी वेगळं असं D*iet करण्याची गरज नसते. 

१०. पहाटे लवकर उठण्याची सवय आपल्या बरोबर आपण आपल्या कुटुंबाला देखील लावून त्यांचे पण आरोग्य चांगले ठेऊ शकतो. शिवाय कुटुंबातील व्यक्तींना वेळ देऊ शकतो. आपण कुटुंबा सोबत मॉर्निंग वॉक ला जाऊ शकतो, एखादा खेळ खेळू शकतो ज्यामुळे आपण एकमेकांना वेळही देता येतो आणि व्यायामही होतो. कारण नंतर दिवसभर सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात आणि एकमेकांना वेळ देऊ शकत नाही.

“असे म्हणतात पहाटे उठून जे व्यायामासाठी वेळ काढत नाहीत, त्यांच्यासाठी आजारपण मुद्दाम वेळ काढते”.

म्हणूनच आपण आपले आरोग्य चांगले ठेण्यासाठी सकाळी उठून नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम कुठलाही असो जसे की योगा, चालणे, धावणे, स्विमींग करणे, इत्यादि पण तो नियमित सकाळी लवकर उठून केला तरच त्याचे फायदे आपणास मिळतात. व्यायामाने शरीराला आकार येतो आणि वजनही नियंत्रणात रहाते.

मन व शरीर निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी आपण पहाटे लवकर उठून आपले आयुष्य निरोगी ठेवू शकतो. पहाटे उठून नियमित ध्यान आणि व्यायाम करून आपण आपले आयुष्य सुखी आणि समाधानी करू शकतो. समाधानी आयुष्य हेच खरे आयुष्य. 

म्हणूनच पहाटेच्या वेळेचा चमत्कार सगळ्यांनी नक्की अनुभवायला हवा आणि आपल्या आयुष्यात आचरणात आणायला हवा ज्यामुळे जगण्याचा एक वेगळाच अनुभव घेता येईल.

मला खात्री आहे हा लेख( 10 Benefits Of Rising Early) वाचून नक्कीच तुम्हालाही पहाटे उठण्याचा उत्साह येईल आणि त्याचा नक्की तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी फायदा होईल.

तुम्हाला ही कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WatsApp ग्रुप ही जॉईन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top