एक अष्टपैलू व्यक्तिमत्व: आनंद महिंद्रा(BIOGRAPHY OF AANAND MAHINDRA IN MARATHI)
भारतातल्या प्रमुख 10 उद्योगपती मध्ये ज्यांचे नाव घेण्यात येते ते म्हणजे आनंद महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख. यांची चर्चा सध्याच्या काळात जास्त दिसते त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिंद्र ग्रुप मध्ये असलेला वाढता सहभाग चला तर मग जाणून घेऊया यांच्या जीवनपटाबद्दल. कशाप्रकारे त्यांनी आपला प्रवास एक प्रसिद्ध उद्योगपती पर्यंत आणून पोहोचवलाय…
एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, डिफेन्स, फायनान्स,आयटी, इंजिनिअरिंग इक्विपमेंट अशा अनेक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा ग्रुपचे नाव एवढे वाढवले की जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचे नाव दुमदुमले आहे आपल्या भारतात असलेल्या अनेक क्षेत्रात त्यांचा इतका सहभाग बघता जानेवारी 2020 मध्ये त्यांना “पद्मभूषण “पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

आनंद महिंद्रा यांचा जन्म:
जगदीश चंद्र महिंद्रा त्यांनी आपले बंधू कैलास चंद्र महिंद्रा यांच्यासोबत 1945 मध्ये महिंद्र ग्रुपची स्थापना केली. नंतर बरोबर दहा वर्षांनी 1 मे 1955 ला प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबात आनंद महिंद्रा यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव हरिश्चंद्र महिंद्रा आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा . त्यांचे तामिळ भाषेवर प्रभुत्व बालपणापासूनच आहे कारण प्राथमिक शिक्षण तमिळ भाषेतच झालेले आहे.
शिक्षण: (EDUCATION)
आनंद महिंद्रा यांचे प्राथमिक शिक्षण लॉरेन्स स्कूल येथे झाले असून 1977 मध्ये हॉवर्ड कॉलेज, अमेरिका येथून त्यांनी डिपार्टमेंट ऑफ विजुअल अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर हावर्ड बिझनेस स्कूल येथून त्यांनी आपल्या उच्च शिक्षण एमबीए पूर्ण केलेले आहे. आनंद महिंद्रा यांची आवड सुरुवातीपासूनच फिल्म मेकिंग या क्षेत्रात असलेले त्यांनी फिल्म मेकिंग मध्येही पदवी घेतलेली आहे. फोटोग्राफी, म्युझिक यातही त्यांना आवड आहे त्यामुळे ते दरवर्षी मुंबईला “महिंद्र ब्ल्यूज फेस्टिवल” कार्यक्रम करतात. जितके प्रभुत्व त्यांचे उद्योग क्षेत्रात आहे तितकेच प्रभुत्व त्यांनी संगीताने फिल्म मेकिंग चित्रातही ठेवले आहे हाच त्यांचा वेगळेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला रेखांकित करतो.
लग्न: (MARRIGE)
1977 ला हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर ते भारतात परत आले तेव्हा त्यांचा विवाह ” अनुराधा” यांच्याशी झाला त्या पेशाने जर्नालिस्ट आहेत. “Verve Men’s World” च्या त्या संपादक आहेत. तसेच ‘रोलिंग स्टोन’ च्या त्या एडिटोरियल चीफ आहेत. त्यांना दोन मुली आहे” दिव्या” आणि “अनिका”.
आनंद महिंद्रा यांचे उद्योग क्षेत्रात पाऊल:
1981 मध्ये त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले ते म्हणजे वित्त निर्देशक या पदावर. त्यावेळी महिंद्रा ग्रुप चे नाव महिंद्रा युजाइन स्टील कंपनी(MUSCO) असे होते. ती जिम्मेदारी त्यांनी चांगल्या प्रकारे निभावली. त्यामुळे आठ वर्षातच त्यांनी कंपनीला इतके उंचावर पोहोचवले की 1989 मध्ये त्यांना प्रेसिडेंट हे पद देण्यात आले त्यानंतर त्यांनी महिंद्रा ग्रुप ला वेगवेगळ्या क्षेत्रात पोहचवले.
1991 मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुप मध्ये डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर आणि ऑफ रोल वेहिकल बनवायचे. ऑटोमॅटिक क्षेत्रात आल्यानंतर त्यांचा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढतच गेला. दहा वर्षातच आनंद महिंद्रा यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली.
2002 मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ लॉन्च केली.महिंद्राSUV चे च नवीन मॉडेल असून त्यात भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्यावर जास्त भर देण्यात आला आहे.
2012 मध्ये आनंद महिंद्रा यांचे वाढते प्रभुत्व पाहता कंपनीने त्यांना चेअरमन या पदी बसविले. कृषी उपकरणे बनविण्यात महिंद्रा ग्रुप चे प्रथम स्थान आहे. ट्रॅक्टर उत्पादनात जगात प्रथम स्थान असून महिंद्रा ग्रुप ची संपत्ती बघता त्यांचे नाव टॉप टेन उद्योग क्षेत्रात घेण्यात येते.
महिंद्रा फायनान्स लिमिटेड चे को- प्रमोटर आनंद महिंद्रा आहेत. महिंद्रा फायनान्स लिमिटेड ही एक फायनान्स कंपनी असून आता या कंपनीला” कोटक महिंद्रा” या नावाने ओळखले जाते. एका बँकिंग क्षेत्रात ती अग्रगण्य बँक ठरलेली आहे.महिंद्रा ग्रुप वेगवेगळ्या देशात महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्रा बोलेरो, महिंद्रा SUV500, महिंद्रा स्कॉर्पिओ चे एक्सपोर्ट करतात. आनंद महिंद्रा हे महिंद्राऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया चे प्रमुख आहेत. यामधून त्यांनी कमी प्रदूषण निर्मित वाहनांची निर्मिती करण्यावर भर दिलेला आहे. महिंद्रा मोटर्स चांगले स्थान मिळवतोय.महिंद्राSUV500,Thar देशातल्या जास्तीत जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी आहेत. महिंद्राThar ने तर देशात एक अनोखे स्थान प्राप्त केलेले आहे. येलो मुळे मोठे मोठे क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे.
आनंद महिंद्रा यांची गगन भरारी:
2004 मध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती यांच्याकडून विशेष सन्मान प्राप्त झालेला आहे तसेच बिझनेस एक्सलन्स मुळे राजीव गांधी पुरस्काराचे ते मानकरी ठरले
.” नन्ही कली” या सामाजिक कार्याची सुरुवात करून आर्थिक दृष्ट्या कमजोर मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा त्यांनी प्रदान केलेली आहे.
कोविड-19 काळात महिंद्रालॉजिस्टिक ने ऑक्सीजन सिलेंडर देवाण-घेवाण साठी बोलेरो ट्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिलेले होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्य शहरात ऑक्सीजन सिलेंडरची देवाण-घेवाण करण्याचे कार्यमहिंद्रा ग्रुप ने पार पाडले.BIOGRAPHY OF AANAND MAHINDRA IN MARATHI
1985 मध्ये त्यांनी कोटक महिंद्रा मध्ये फक्त एक लाखाची इन्व्हेस्टमेंट केली होती आज ती1400 करोडच्या पुढे गेलेली आहे.
त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सगळ्या क्षेत्रात खुलून दिस ते. ट्विटर वर त्यांचे मनोरंजनात्मक ट्विट, महत्त्वाच्या घडामोडी, नोकरी संबंधीच्या बातम्या त्या आवर्जून शेअर करत असतात.
आनंद महिंद्रा यांचा संक्षिप्त जीवनप्रवास: (BIOGRAPHY OF AANAND MAHINDRA)
1.जन्म 1 मे 1955
2. 1977- हावर्ड कॉलेज केंब्रिज येथे डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये पदवी.
3. 1981- अवॉर्ड बिझनेस स्कूलमध्ये एमबीए पूर्ण.
4.1982- पत्नी अनुराधा यांच्याशी लग्न तसेच त्यांना असलेल्या दोन कन्यारत्न दिव्या आणि अनिका.
5. 1981- महिंद्रा युजाइन स्टील कंपनी(MUSCO)- वित्त निर्देशक पदावर स्थानापन्न.
6. 1989- रियल स्टेट डेव्हलपमेंट अँड हॉस्पिटीलीटी चे अध्यक्षपद भूषविले.
7. 1991- महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे उपप्रबंधक निर्देशक झाले.
8. 1997- महिंद्रा ग्रुप चे प्रबंध निर्देशक म्हणून जिम्मेदारी घेतली.
9. 2003-महिंद्रा ग्रुप ऑफ कंपनीचे व्हॉइस चेअरमन पद मिळाले.
10. 2003- कोटक महिंद्रा फायनान्सचे सह प्रमोटर आणि अग्रणीय बँक म्हणून नावारूपास आली.
11. 2004- भारतीय उद्योग परिसंघ चे अध्यक्ष मिळाले.
12.2004- रिसर्च ऑटोमॅटिक इंडिया चे निर्वाहन स्वीकारले.
13. 2012- महिंद्रा ग्रुप चे चेअरमन पद स्वीकारले.
14. 01 एप्रिल 2020 ला त्यांनी चेअरमन पदाचा राजीनामा घेऊन नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन हे पद सांभाळत आहेत.
15. 2004- फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार जाहीर
16.2004- व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल राजीव गांधी पुरस्कार जाहीर
17. 2005- पर्सन ऑफ इयर हा लीडरशिप अवॉर्ड जाहीर
18. 2006-CNBC आशिया बिझनेस लीडर म्हणून गौरव
19.2006- लुधियाना मॅनेजमेंट असोसिएशनचा उद्यामी पुरस्कार जाहीर
20. 2007- NDTV प्रॉफिट मध्ये ‘कॉर्पोरेट लीडर’ म्हणून गौरव
21. 2008-09- इकॉनोमिक टाइम्स पुरस्कार जाहीर
22. 2012-US- इंडिया बिझनेस कौन्सिल मध्ये ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड जाहीर
23. 2014- बिझनेस टुडे यामध्ये सीईओ ऑफ इयर पुरस्कार जाहीर
24. 2016- जगातल्या टॉप 30 CEO लिस्टमध्ये महिंद्रा ग्रुपचे नाव रेखांकित.
25. 2020- उद्योग क्षेत्रात भरभराटी साठी त्यांना “पद्मभूषण पुरस्कार” जाहीर.
आनंद महिंद्रा यांचे सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान आहे. हॉवर्ड यूनिवर्सिटी ला त्यांनी इंदिरा यांच्या नावे 100 करोड डॉलर देणगी स्वरुपात दिलेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आनंद महिंद्रा यांच्या संभाषणातला एक किस्सा मला नेहमीच आठवतो तो म्हणजे” नरेंद्र मोदी म्हणतात की आनंद जी की तरफ अंधेरा छाया है त्यावर आनंद महिंद्रा म्हणतात की मोदीजी उजाला तो आप की तरफ से आ रहा है” यावरून त्यांचे मृदूभाषी वक्तव्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व नजरेस भरते. अशीच महिंद्र ग्रुप ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो……
तसेच तुम्हाला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व: आनंद महिंद्रा(BIOGRAPHY OF AANAND MAHINDRA IN MARATHI) कसा वाटला हे नक्की कळवा. अशाच नवनवीन लेख आणि कथांसाठी आमच्या lekhakmitra.com ला नक्की व्हिजिट करा. आणि ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत पोहोचवायला विसरू नका त्यासाठी आमच्या wtsapp channel ला नक्की व्हिजिट करा. नमस्कार!!
लेखिका: शुभांगी चुनारकर, नागपुर.
खुपच सुंदर, सुटसुटीत आणि मुद्देसूद आहे लेख.