भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी 10 अँप l Top 10 apps in India 2024

WhatsApp Group Join Now

Top 10 apps in India 2024: रोजच्या आयुष्यात आपण इतके फोनशी जोडलेले गेलो आहोत की,आपल्या रोजच्या वापरात आता काही अँप ही रोजची झाली आहेत. ती इतकी झालीत की मोबाईल, लॅपटॉप मध्ये त्याचा वापर सर्वात जास्त केला जातोय, आज अश्याच टॉप दहा अँप बद्दल आपण जाणून घेणार आहोत जे आपले रोजच्या आयुष्यातले साथीदार आहेत.रोजच्या आयुष्यात वापरली जाणारे हे अँप्स आपण त्याच डाउनलोड आणि होणारा वापर यावर ही टॉप 10 अँप ठरवणार आहोत.

Top 10 apps in India 2024 :तर चला जाणून घेऊया या दहा अँप बद्दल.

  1. इन्स्टाग्राम (Instagram)-

सध्याच्या घडीला जगभरात आणि भारतात सुध्दा सर्वात जास्त वापरलं जाणार अँप म्हणजे इन्स्टाग्राम आहे. एका सर्व्हेनुसार इन्स्टाग्राम हे रोज वापरण्यात येणाऱ्या यादीत जगात तिसऱ्या आणि भारतात पहिल्या क्रमांकावर आहे.इंस्टाग्राम ॲप ला दोन लोकांनी म्हणून बनवले होते. Kevin Systrom आणि Mike Krieger. इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया अँप आहे ज्याच्या मदतीने आपण फोटो, रील्स एकमेकांसोबत शेअर करु शकतो,बऱ्याच लोकांचा व्यवसाय सुद्धा इन्स्टाग्रामवर चालू आहे.हे एक बिजनेस टूल सुद्धा बनलेल आहे.

इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त असलेले युजर्स हे वय वर्षे16 ते 30 या वयोगटातील आहेत.तर 80 टक्क्यांपेक्षा जास्त युजर्स हे इन्स्टाग्रामचा वापर त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी करतात,जसं की फोटो, व्हिडीओ,रिल्स अपलोड करणं यासाठी करतात तर उरलेले20 टक्के लोकं क्रियेटर आहेत आणि इन्स्टाग्रामचा वापर त्यांच्या व्यवसायासाठी करतात.हे एक आश्चर्य म्हणावं लागेल की इन्स्टाग्राम हे 06 ऑक्‍टोबर 2010 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी 25 हजार लोक त्याच्याशी जोडले गेले होते. जे की आतापर्यंतचे एक रेकॉर्ड आहे.इन्स्टाग्रामवर सगळ्यात पहिली पोस्ट ही इन्स्टाग्रामचे कोफाउंडर केविन (kevin) यांनी 16 जुलै 2010 ला केली होती आणि त्या पोस्टमध्ये केविन यांच्या पाळीव कुत्र्याचा फोटो होता.जगभरामध्ये एक मिलियन पेक्षा जास्त जाहिरातदार आहेत. जे की दररोज इंस्टाग्राम वर जाहिरात चालवतात. यातूनच इंस्टाग्रामची कमाई होते. इन्स्टाग्राम हे एक फॅशन, ब्यूटीसाठीही एक फेमस प्लॅटफॉर्म असून जगातील 96टक्के ब्रँड हे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इन्स्टाग्रामवर अकाउंट बनवतात आणि त्यामधून दरमहिना लाखो डॉलर कमवतात. सध्या जगातील सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोवर्स हे क्रिस्तियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूच असून त्याचे 600 मिलियन पेक्षा जास्त इन्स्टाग्राम फॉलोवर्स आहेत.

 तर भारतात इन्स्टाग्रामवर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे सर्वाधिक फॉलोवर्स 266 मिलियन इतके आहेत.2023 पर्यंत इन्स्टाग्रामचे भारतात 245 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. हे एक सोशलमीडियाशी जोडणार अँप असून 2010 रोजी फेसबुकने 1 अब्ज अमेरिकन डॉलरला विकत घेतले.

2. फेसबुक (Facebook)- 

फेसबुक हे एक अमेरिकन सोशल नेटवर्किंग साईट असून जगभरात प्रसिद्ध आहे.याचा वापर 13 वर्षांहून मोठ्या वयाच्या कुणालाही फेसबुकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते. एकमेकांना जोडून ठेवणार हे अँप असून,सदस्यांना आपल्या ओळखीच्या (व फेसबुक सदस्य असलेल्या) इतर व्यक्तींच्या खात्याशी ‘मित्र/मैत्रीण’ म्हणून जोडणी करता येते. याची स्थापना 2004 मध्ये मार्क झुकेरबर्ग याने केली असून सध्या फेसबुकवर अंदाजे 2.9 बिलियन लोकांच्या ऍक्टिव्ह प्रोफाइल आहेत.त्यातही भारतात 314.6मिलियन भारतातील प्रोफाइल आहेत.फेसबुकने चॅटिंगसाठी सोबतच एक वेगळं अँप दिल आहे ज्याच नाव फेसबुक मेसेंजर आहे आणि त्याचा वापर ही मोठ्या प्रमाणात होतो.

फेसबुक हे जगभरातील लोकांना एकत्र जोडण्यात येणार अँप म्हणून प्रसिद्ध आहे,तसेच यावर अनेक व्यवसाय केले जातात ज्यावर अनेकांना उत्पन्न मिळतं. या सगळ्यात फेसबुकची दरदिवशीची कमाई साधारण 1.4 बिलियन डॉलर इतकी आहे.

3.भीम (BHIM)- 

भीम अँप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती “नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव नावावरून या ॲपच नाव ‘भीम(BHIM)असं ठेवण्यात आलेलं आहे.

 आत्तापर्यंत हे ॲप 1 कोटी 40 लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. भीम हे अँप युनिफाईड पेमेंट इंटरफेस यावर आधारित आहे.भारतातील जवळपास 44 राष्ट्रीय आणि खाजगी बॅंक या अप्लिकेशनमध्ये समाविष्ट आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण 44 बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.हे अँप पैशांची देवाण घेवाण यासाठी वापरले जाते.

4.फोन पे (PhonePe)- 

फोनपे हे एक डिजिटल पेमेंट करण्यासाठी मोबाईल नंबरवरून जलदगतीने पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे यासाठी प्रसिद्ध आहे.हे एक UPI ( Unified Payment Interface)वर आधारित अँप आहे.या अँपची स्थापना 2015मध्ये बैंगलोर मध्ये झाली याचे संस्थापक हे राहुल चारी आहेत.2016 मध्ये UPI वापरून या अँपची डिजिटली जलदगतीने पैसे पाठवणे आणि स्वीकारणे सुरू झाले. एप्रिल 2016 मध्ये फोनपे ला फ्लिपकार्टने विकत घेतले. फोन पे अँप वरून पैसे पाठवणे,स्वीकारणे,मोबाईल रिचार्ज,मोबाईल बिल, गॅस बिल,डिश रिचार्ज, क्रेडिट कार्ड बिल भरणे अशी अनेक कामं करता येतात.

5.व्हाट्सएप -WhatsApp 

हे एक लोकप्रिय मॅसेज, फोन,व्हिडीओ कॉलसाठी प्रसिद्ध असलेल अँप आहे,ज्यातून आपण सहजरीत्या एकमेकांना कनेक्ट होऊ शकतो.

आज जगातील एकूण 7 अब्ज लोकसंख्येपैकी 2 अब्ज लोकसंख्या व्हॉट्सॲप चा उपयोग करत आहे, या अरूनच आपल्याला whatsapp ची लोकप्रियता समजून येते.व्हाट्सअप एक त्वरित मॅसेज (Instant Messaging) पोहचवणारे एक अँप आहे.ज्यात व्हाट्सएप वापरणारा एखादा टेक्स्ट(Text),फोटो(Photo) किंवा व्हिडीओ(Vedio),लोकेशन(Location) कागदपत्रे(Document) पाठवण्यासाठी करण्यात येतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळं वापरण्यासाठी व्हाट्सएप हे अगदी मोफत सुविधा देत फक्त यासाठी वापरकर्त्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे.

सध्या जगभरात 180 पेक्षा जास्त देशात व्हाट्सएप हे उपलब्ध असून 2 अब्जपेक्षा जास्त व्हाट्सएपचा यूजरबेस आहे.संपूर्ण जगात व्हाट्सअपचे 2 अब्जपेक्षा देखील अधिक युजर्स आहेत.व्हाट्सअपचा शोध Brian Acton आणि Jan Koum यांनी साल 2009 मध्ये लावला.फेसबुक कंपनीने फेब्रुवारी 2014 मध्ये 1600 करोड रुपयांमध्ये व्हाट्सअपला विकत घेतले. व्हाट्सअपवर दर मिनिटांना 29 दशलक्ष पेक्षा अधिक मेसेजची देवाणघेवाण केली जाते.

6.युट्युब (YouTube)- 

युट्युब हे सध्या अनेकांच्या कमाईच साधन बनलेल आहे.अनेकांना युट्यूब मधून रोजगार मिळाला आहे.युट्यूबची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 ला झाली ज्याला Steve Chain, Chad Hurleya आणि Javed Karim यांनी बनवले होते,हे तिघे तेव्हा PayPal मध्ये काम करत होते.

युट्यूब उदयास आल्यानंतर अवघ्या 18 महिन्यातच म्हणजे ऑक्टोबर 2006 ला गुगलने त्याला 1 अरब 65 डॉलरला विकत घेतले.जगभरात 2 अब्ज पेक्षा जास्त लोकं युट्यूब वापरतात तर प्रत्येक मिनिटाला युट्यूबवर जवळपास 400 तासांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. दररोज यूट्यूब वर 5 अब्ज पेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जातात.युट्युब जगातील दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. जे गुगल नंतर सर्वात जास्त वेळा पाहिले जाते.यूट्यूब वर काम करणाऱ्या लोकांपैकी 50% चॅनल असे आहेत जे वर्षाला 6 अंकामध्ये पैसे कमवतात.

7.मीशो (Meesho)- 

विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल यांनी 2015 मध्ये  Meeshoची स्थापना भारतातील बंगलोर या शहरात केली.केली. हे अँप मुख्यतः कमीत कमी गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या खास करून स्त्रियांसाठी असलेलं हे अँप मानलं जातं.मीशो एका अनोख्या बिझनेस मॉडेलवर कार्य करते जे सोशल नेटवर्किंगसह ई-कॉमर्सला जोडते.मीशोचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो उद्योजकांना शून्य गुंतवणुकीसह त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास अनुमती देतो. या सुलभतेमुळे भारतातील लहान शहरे आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने व्यासपीठावर सामील होण्यासाठी आकर्षित झाल्या आहेत.Meesho ने फॅशन, सौंदर्य, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही समाविष्ट असलेल्या विस्तृत उत्पादन कॅटलॉगचा दावा केला आहे. ही विविधता पुनर्विक्रेत्यांना ग्राहकांच्या विविध प्राधान्यांची पूर्तता करण्यास सक्षम करते.मीशोने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.अनेक महिलांना एक व्यासपीठ आणि कमाई करण्याच साधन मीशोने दिल असून अनेक स्त्रिया यावर कार्यरत आहेत.

मीशोवर एका दिवसात 5.35 दशलक्ष ऑर्डर नोंदवल्या जातात.

8.फ्लिपकार्ट (Flipkart)-

फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स कंपनी आहे. फ्लिपकार्ट चे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये केली.

सुरुवातीला कंपनीचा कल पुस्तकं विक्री करण्याकडे होता,पण आता फ्लिपकार्ट हे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठीं जास्त ओळखले जाते.याव्यतिरिक्त

कॉस्मेटिक्स, फुड्स,टॉईज, तिकीट्स, फर्निचर यासाठी प्रसिद्ध आहे.

 भारतामध्ये फ्लिपकार्ट खूप लोकप्रिय इ-कॉमर्स कंपनी आहे.फ्लिपकार्ट वर कोणतेही प्रॉडक्ट्स खरेदी करता येते. फ्लिपकार्ट भारतात प्रसिद्ध असण्याच एक महत्त्वाचे कारण म्हणजे,  फ्लिपकार्ट हे भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत सेवा देत आणि त्यामुळेच सर्व प्रादेशिक भाषिकांना आपल्या सोयीनुसार खरेदी करता येते.

फ्लिपकार्ट कंपनी ची दोन मित्रांनी केली होती. ह्या कंपनीची सुरुवात दोन रूम पासून झाली होती. Banglore मध्ये flipkart चे ऑफीस आहे. जवळपास 7000 कर्मचाऱ्यांना घेऊन आपले काम करते. फ्लिपकार्ट चे देशात वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस आहेत. वॉलमार्ट कंपनी ने फ्लिपकार्ट ला 77% हिस्सेदारी सोबत 16 अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले आहे.तसेच सणांच्या दिवसांमध्ये किंवा काही खास दिवशी फिल्पकार्टवर मोठ्या प्रमाणावर अनेक ऑफर आणि मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिला जातो. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे (Big Billian Days), बिग सेव्हिंग डे (Big Saving Days) हे सेल खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहेत.फ्लिपकार्टने 2023 मध्ये जवळजवळ 560 बिलियन रुपये इतका रिव्हेनू नोंदवला.

9.स्पॉटीफाय (Spotify)-

स्पॉटीफाय ही जागतिक पातळीवरची एक प्रसिद्ध म्युझिक सिस्टीम आहे.

कंपनी ह्याआधी जाहिराती दाखवून कमाई करत होती.सध्या ही कंपनी युजर्सकडून काही पैसे चार्ज करण्याचा विचार करत असल्याने याचे काही फीचर्स हे मोफत नाही आहेत त्यासाठी पैसे मोजावे लागतात.स्पॉटीफायने( Spotify) 2019 पासून काही फीचर्स मोफत दिले होते,पण एप्रिल 2023 मध्ये स्पॉटीफाय हे 26टक्क्यांनी मार्केट शेअरमध्ये भारतात सर्वात मोठं संगीतातील प्लॅटफॉर्म ठरलं होतं. त्याचे ऐकून 5 सब्सस्क्रिप्शन भारतात उपलब्ध असून ज्यात 7 रुपयांच्या एका डेली प्लॅनपासून सुरुवात आहे.तसेच 25रुपयांत एक आठवडाभर प्रीमियम वापरता येतं.

 119 रुपयांचा मासिक प्लॅन एका युजरसाठी आहे. तर दोन लोकांच्या मासिक प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. 179 रुपये दरमहिन्याला देऊन तुम्ही 6 युजर्सचा सपोर्ट असलेला स्पॉटीफाय फॅमिली प्लॅन देखील घेऊ शकता.डॅनियल एक आणि मार्टिन लोरेंटझोन यांनी 2006 मध्ये स्टॉकहोम, स्वीडन मध्ये स्पॉटिफायची स्थापना केली होती.कंपनीचे शीर्षक सुरुवातीला लॉरेंटझोनने ओरडलेल्या नावावरून चुकीचे ऐकले गेले. नंतर त्यांनी “स्पॉट” आणि “ओळखणे” चे एक पोर्टमॅन्टो हे तयार केले .पॉडकास्ट,ऑडिओ, विडिओ सॉंग यासाठी spotify हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.जवळपास 55 मिलियन भारतीय स्पॉटीफायचे युजर्स आहेत.Top 10 apps in India 2024

10.टेलिग्राम (Telegram) –

टेलिग्राम ॲप बद्दल तुम्ही नक्कीच कधीतरी ऐकले असेल. टेलिग्राम एक विनामूल्य, क्रॉस-प्लॅटफॉर्म, क्लाउड-आधारित इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग ॲप आहे.टेलिग्राम हे ॲप पूर्णपणे भारत द्वारा निर्मित आहे.14 ऑगस्ट 2013 मध्ये आयओएस साठी आणि ऑक्टोबर 2013 मध्ये अँड्रॉइडसाठी टेलिग्राम ॲप लॉन्च केले गेले होते.

टेलिग्राम ॲप ला सर्वात पहिल्यांदा 2013 मध्ये 2 भावांनी म्हणजेच NIKOLAI आणि PAVEL यांनी लाँच केले होते.टेलिग्राम मध्ये दोन प्रकारचे चॅनेल्स असतात : Public Channel आणि Private Channel.टेलिग्राम वर आपल्याला आपला जास्त वेळ खर्च करण्याची गरज नसते. कारण आपल्याला ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या विषयाशी संबंधित ग्रुपचे नाव टाकून त्यामध्ये सहभागी होऊ शकतो.टेलिग्राम ॲप अनेक लहान कंपन्या साठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.

टेलिग्राम हे जाहिरातींसाठी एक  चांगलं प्लॅटफॉर्म आहे. कारण त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित ग्रुप्स उपलब्ध असतात.जानेवारी 2021 मध्ये, टेलिग्रामने मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 500 दशलक्ष पार केली होती. टेलिग्राम ॲप सर्व वापरकर्त्यांसाठी एकदम मोफत आहे. आणि ते कायम मोफतच राहील असे त्यांच्या फाउंडरचे म्हणणे आहे.टेलिग्राम हे जगातील तिसऱ्या क्रमांकाच सर्वाधिक डाउनलोड केलं जाणार अँप आहे.टेलिग्राम हे जगभरात दरमहिना जवळपास 36.7मिलियन डाउनलोड केले जातं.

तर, हा लेख Top 10 apps in India 2024 तुम्हाला कसा वाटला?आणि तुम्ही यातले कोणते अँप्स रोज वापरता?हे सगळं आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत देखील शेअर करायला विसरू नका;आणि अशीच नवनवीन माहिती आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

      धन्यवाद !

2 thoughts on “भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी 10 अँप l Top 10 apps in India 2024”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top