Sudarshan Setu full Information:केंद्रीय समुद्रकिनारा, महामार्ग आणि रस्ते बांधणी मंत्री नितीनजी गडकरी यांनी तटबंदी क्षेत्र ओखा आणि बेट द्वारका यांना जोडणारा सी- लिंक बांधण्याच्या प्रस्तावाला 2016 ला मान्यता दिली. तसेच नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोंबर 2017 रोजी ओखा आणि बेट द्वारका दरम्यानच्या पुलाची रूपरेषा आखली. त्याचे कारण असे की हा पूल या बेटांवर राहणाऱ्या सुमारे 8500 लोकांना आणि भगवान श्रीकृष्णाचे मंदिर असलेल्या द्वारका येथील 20 लाख यात्रेकरूंना सेवा देतो.
गाव ओखा ते तीर्थक्षेत्र बेट द्वारका यांना जोडणारा हा पूल 25फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदीजीं च्या हस्ते उद्घाटन करण्यात आला. या पुलासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांचा अंदाजे खर्च करण्यात आलेला आहे. 2.75 किलोमीटर लांबीचा हा पूल असून आत्ता पर्यंत फक्त बोटींची सुविधा उपलब्ध होती परंतु आता नवीन प्रतिष्ठित सागरी सुदर्शन सेतू मुळे द्वारके चा मार्ग सुकर झाला आहे. मोदीजीं च्या हस्ते प्रकल्पाची संकल्पना आधीच देण्यात आली होती त्यामुळे लाखो भाविकांना प्रवास करणे सहज शक्य होईल. भारतातील सर्वात मोठ्या या केबल स्टेड पुलाचे पूर्वीचे अधोरेखित नाव म्हणजे” सिग्नेचर ब्रिज”.
सुदर्शन सेतुची वैशिष्ट्ये (Sudarshan Setu Features):
1. सुदर्शन सेतू 2320 मीटर लांबीचा असून त्यात 900m लांबीचा केबलचा भाग आहे.
2.ओखा आणि बेट द्वारका येथे 2452 मीटर लांबीचा अप्रोच रोड देखील असणार आहे.
3. सुदर्शन सेतूचा मुख्य भाग जो भारतातील सर्वात जास्त म्हणजे 500 मीटर लांबीचा आहे.
4. पोखा येथे पार्किंग साठी स्वतंत्र जागा तयार केलेली आहे.
5. फुलाच्या मुख्य भागात दोन तोरण आहेत.
6. या चौपदरी पुलाची रुंदी 2.2 m आणि फूटपाथ रुंदी 2.50 m आहे.
7. फुटपाथ वर असलेले सोलर पॅनल्स मुळे एक मेगावॅट वीज निर्माण होऊ शकते त्याचा रात्रीच्या वेळेला पुलावर प्रकाश टाकण्यासाठी होईल त्यामुळे विजेची गरज भागवता येईल.
8. पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी, निसर्गरम्य दृश्य तयार केली गेली आहेत.
9. सुदर्शन सेतूवर सायंकाळच्या वेळी सजावटीची रोषणाई करण्यात आलेली आहे.
सुदर्शन सेतूची रचना:
भारतातील हा केबल आधारित पूल 2.32 किलोमीटर लांबीचा असून सगळ्यात जास्त लांबीचा आहे. हा पूल किनाऱ्यावरील ओखा ते बेट द्वारका पर्यंत असेल. आधी या पुलाला” सिग्नेचर ब्रिज”असेही म्हटले जात होते. पण आता सिग्नेचर ब्रिज हे नाव बदलून “सुदर्शन सेतू” असे केले गेलेले आहे. नवीन सुदर्शन सेतूच्या फुलाची विशेषता म्हणजे दोन्ही बाजूला भगवद्गीतेचे श्लोक लिहिलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे वर्णन आहे. या पुलाला मोदीजींनी ‘आश्चर्य जनक परियोजना ‘असे म्हटलेले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथ वरील भागावर सौर पॅनल लावले गेलेले आहेत त्यामुळे दररोज एक मेगावॅट ऊर्जेची निर्मिती होऊ शकते.
हा पूल चौपदरी असून लांबी 27.20 मीटर आहे दोन्ही बा द्वारका मंदिरामध्ये जाणाऱ्यांसाठी आताजूला 2.50 मीटर फुटपाथ आहेत. 900 म पर्यंत एक डबल पेन केबल असून दोन भागांमध्ये विभागलेले आहेत. दोन 130 m आकाराचे तोरण असून प्रत्येक तोरणाला 300 m त्रिज्या असलेला एक आधारस्तंभ आहे. सुदर्शन सेतू मुळे या क्षेत्रातली कनेक्टिविटी वाढली असून देवभूमी द्वारका येथे जाणाऱ्या पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. यामुळे पवित्र द्वारकाधीश मंदिरात जाण्यासाठी भक्तांना आणि रहिवाशांना होणारा पाच तासाचा प्रवास कमी होऊन आता तीन तासात पूर्ण होऊ शकेल.ऑक्टोबर 2017 ला मोदीजींनी सुदर्शन सेतूच्या निर्मितीला प्रारंभ करण्यास अनुमती दिली पण आता ती आता सुविधा जनक प्रतिकृती निर्माण झाली असून या मार्गाने होणारी देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. गुजरातच्या इतिहासात सांस्कृतिक स्थापत्य कलेला चालना मिळाली आहे.
सुदर्शन सेतू तयार करण्यास लागणारा कालावधी:
ओखा आणि बेट यांना जोडणारा सुदर्शन सेतू 2320 mलांबीचा असून यासाठी हाक क्रेनचा वापर करून 38 खांब उभारण्यात आले होते. हा पूल निर्माण करणारी कंपनी S.P. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी 979 करोड बजेटची प्रावधान करून कामाला सुरुवात केली . हा सेतू कच्छचे आखात आणि अरबी समुद्र यांना पार करू शकेल. कमीत कमी 34 घाटांचा यात समावेश झालेला असून जास्तीत जास्त वापर काँक्रेट आणि स्टीलचा वापर केलेला आहे. 900 m पर्यंत केबलची संरचना केलेली आहे.7 ऑक्टोबर 2017 मध्ये या फुलाची पायाभरणी केली.ऑक्टोबर 2023 पर्यंत 92% काम पूर्णत्वास आले. या संरचनेत 30 महिन्याचा कालावधी लागेल असे राज्य सरकारकडून कळवण्यात आले होते. आणि शेवटी 25 फेब्रुवारी 2024 या दिवशी माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सुदर्शन सेतू दळणवळणासाठी खुला केला गेला.
सुदर्शन सेतूची दळणवळण क्षमता:
गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील बेट द्वारका आणि ओखा यांना जोडणाऱ्या अरबी समुद्रावरील सुदर्शन सेतूचे काम बांधकाम पूर्ण झालेले आहे. या पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वी त्यावर 48 ट्रक ठेवून त्याची वाहन क्षमता तपासण्यात आली. 44 हजार 700 किलो वजन या ट्रक मध्ये ठेवण्यात आलेले होते अशा अनेक चाचण्या या पुलाची दळणवळण क्षमता तपासण्यासाठी करण्यात येत होत्या. आतापर्यंत तिथले तीर्थक्षेत्र बेट द्वारका येथे बोटीनेच प्रवेश करता येत होता परंतु या नवीन प्रतिष्ठित सागरी सेतू मुळे बेट द्वारकेला जाणे सहज शक्य झालेले आहे.
तशी या प्रकल्पाची संकल्पना नरेंद्र मोदीची यांच्या हस्ते झालेली होती त्यामुळे लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच सुदर्शन सेतू स्वागतार्थ काही बोटींना बेट द्वारकेला जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच काहींकडे लाईफ जॅकेट नसेल तर त्यांना दंडाला सामोरे जावे लागत आहे. यांचा दंड ₹50 शुल्क असून प्रति प्रवासी आठ रुपये आहे. पण यानंतर 4 लेन चा मार्ग असल्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासही मदत होईल.Sudarshan Setu full Information
बेट द्वारका सौंदर्यीकरण:
गुजरात बेट विकास प्राधिकरणाने मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली आजूबाजूच्या सर्वांगीण विकासासाठी बेट द्वारका विकास प्राधिकरण आणि द्वारका औद्योगिक संस्था तसेच सागरी कौशल्य प्रशिक्षण केंद्र यांनी जामनगर वरील या बेटाला निसर्गाशी संबंधित उपक्रम विकसित करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे दरम्यानच्या बेटावर पक्षी निरीक्षण स्थळांचा समावेश केला. ओहोटी आणि भरती च्या दरम्यान होणारे सादरीकरण बघता 18 कोटी खर्चून द्वारका बेट पट्ट्याचे सौंदर्य कायकरण करण्यात आले.
लहान-मोठ्या बेटांच्या विकासासाठी गुजरात मध्ये बेट विकास प्राधिकरणाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. बेट द्वारका एक समुद्रात असलेले जलमग्न द्वारका नगर आहे चे भव्यता आणि समृद्धीचे केंद्रबिंदू असून भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडले गेले आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळालेली आहे तसेच भारताच्या प्रगती पथावर एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. दरवर्षी सुमारे 20 लाख पर्यटक आणि भाविक यात्री करू या सुदर्शन सेतूचा नक्कीच लाभ घेतील यात तीळमात्र शंका नाही.
तुम्हाला ही माहिती Sudarshan Setu full Information कशी वाटली ते नक्की कळवा अशाच माहितीपर लेख आणि कथासाठी आमच्या लेखक मित्र डॉट कॉम या वेबसाईटला नक्की विजिट द्या. आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचवायला विसरू नका त्यासाठी आमच्या WHSAPP ग्रुपला ही जॉईन व्हा. तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत……..
धन्यवाद!!!
लेखिका: शुभांगी चुनारकर, नागपूर.