अंबानी यांचे वनतारा प्रोजेक्ट काय आहे ? l Vantara Full Information in Marathi

WhatsApp Group Join Now

Vantara Full Information in Marathi :देशात सर्वत्र सध्या अनंत अंबानी यांच्या प्रोजेक्ट वनतारा बद्दल चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. प्राण्यांसाठी जगातील सर्वात मोठे रेस्क्यू सेंटर उभे करणे हे अंबानी यांचे एक स्वप्न होते ते आज वन ताराच्या निमित्ताने पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. महत्त्वकांक्षी असलेला हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट मागे असलेली अनंत अंबानी यांची प्रचंड हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर वनतारा हे नेमके काय आहे हे समजून घेऊया.

वनतारा म्हणजे काय ? what is Vantara

वनतारा म्हणजे स्टार ऑफ द फॉरेस्ट, वन तारा या शब्दामागे या प्रकल्पाची व्याप्ती लपलेली आपल्याला दिसून येईल.  वन्यजीवाप्रती असलेले प्रेम,करुणा आणि काळजी यातून तयार झालेली ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना. अनंत अंबानी यांना लहानपणापासूनच प्राण्यांविषयी विशेष प्रेम आणि आकर्षण होते. प्राण्यांसाठी आजही ते दिवसातील दोन तास राखून ठेवतात. प्राण्यांप्रति असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा ड्रीम प्रोजेक्ट उभारला आहे.

Vantara Full Information in Marathi

जखमी झालेला एखादा प्राणी देशात असो वा परदेशात त्याला तात्काळ उपचार मिळून त्याचा येणाऱ्या नैसर्गिक संकटापासून बचाव व्हावा हा उद्देश या प्रकल्पाचा आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये वनतारा हा प्रोजेक्ट मंजूर करण्यात होता.या प्रोजेक्ट अंतर्गत रिलायन्स फाउंडेशन अँड रिलायन्स इंडस्ट्रीज प्राण्यांच्या कल्याणासाठी Vantara Full Information in Marathi विविध उपाययोजना तयार  करताना आपल्याला दिसून येईल. सुमारे 3000 एकर वर पसरलेल्या या प्रोजेक्टसाठी अनंत अंबानी यांनी प्रचंड मेहनत केल्याची दिसून येते.  या पण प्रकल्पांतर्गत वन्य प्राण्यांचा बचाव उपचार आणि पुनर्वसन करता येईल वन्यप्राण्यांच्या हिताच्या सर्व गोष्टी या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जखमी वन्य प्राण्यांना औषध उपचार तसेच त्यांची विशेष देखभाल ही घेतली जाणार आहे.

वनतारा हा प्रकल्प नेमका कुठे आहे? l Where Vantara situated?

जामनगर  {गुजरात} येथे  हे सर्वात मोठे प्राणी पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आजपर्यंत या प्रकल्पांतर्गत २०० हून अधिक हत्तींना रेस्क्यू करून उपचार केल्याचे  सांगितले जात आहेत,हजारो पक्षी,सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्याची सुटका ही वनतारा या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. वनतारा या   प्रोजेक्टच्या अनेक भक्कम बाबी आपल्याला पाहायला मिळतील, हत्ती केंद्र वनतारा या प्रोजेक्टमध्ये स्पेशल असे हत्ती केंद्र उभारले गेले आहे.

हत्ती वरती उपचार करून  त्यांची योग्य ती काळजी इथे घेतली जाते.हत्ती केंद्रासाठी जवळपास 500 प्रशिक्षित कर्मचारी येथे नेमण्यात आले आहेत. हत्ती वरती उपचार करताना आयुर्वेदिक पद्धतीचा उपयोग ही केला जातो.हत्तींच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी इथे विशेष अशी डॉक्टरांची टीम देखील उभारली गेली आहे.सर्वात मोठा शाकाहारी प्राणी असलेला हत्ती.हत्तीसाठी विशेष खाद्य पदार्थही तयार करण्यात येतात. या प्रकल्पा अंतर्गत हत्तींवरती उपचार तसेच हत्तींसाठी हायड्रोथेलेपीथेरेपी पूल ची देखील स्थापना करण्यात आली आहे.

वन्य प्राण्यांवर  होणाऱ्या  विशेष ऑपरेशनची सुविधा (Facility in Vantara )-

यानंतर या प्रोजेक्टमधील  दुसरी जमेची बाजू म्हणजे या प्रोजेक्ट अंतर्गत  बिबट्यांना होणारा दृष्टीदोष दूर करण्यासाठी बिबट्यांवरती शस्त्रक्रिया करण्याची देखील सोय करण्यात आली आहे. वयोवृद्ध बिबट्यांमध्ये होणारा दृष्टीदोष म्हणजेच चेरीआय नावाचा आजार या आजारावरती उपचार करण्यासाठी एक तज्ञ प्रशिक्षित डॉक्टरांची टीम या प्रकल्पाने नेमलेली आहे ही टीम बिबट्यांची विशेष काळजी घेऊ त्यांच्यावरती उपचार करण्याचे काम करेल.

  वनतारा टीमने आत्तापर्यंत 200 बिबट्यांना रेस्क्यू करून त्यांच्यावरती योग्य उपचार देखील केले आहेत.जखमी प्राण्यांवरती उपचार तसेच संकटात सापडलेल्या प्राण्यांची सुटका करून त्यांची विशेष काळजी या प्रकल्पांतर्गत घेतली जाईल. या प्रकल्पांतर्गत वन्यजीवांचे संवर्धन देखील केले जाईल. वाढत्या शहरीकरण याचा तोटा हा वन्यजीवांना सहन करावा लागतो.त्यामुळे अनेक वन्यजीव हे त्यांचे नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीकडे धावताना सध्या दिसून येत आहेत. या प्रकल्पातील जवळजवळ 3000 एकर जमीन ही केवळ वन्यजीवांच्या आदिवासासाठी संपादित करण्यात आलेली आहे.या विशाल अधिवासाचा फायदा घेऊन बरेचसे वन्यजीव येथे राहताना आपल्याला भविष्यात दिसून येतील.

 वनतारा प्रकल्प किती मोठा आहे ? –

       वनतारा या प्रकल्पातील जवळपास सहाशे एकर क्षेत्र हे केवळ हत्तीसाठी ठेवण्यात आले असून हा 600 एकरचा परिसर हत्तींचा नैसर्गिक अधिवास राहील. या परिसरात जखमी हत्तींना आणून त्यांच्यावरती उपचार करणे तसेच त्यांची काळजी घेणे इत्यादी कामे या ठिकाणी केली जातील. कोविड काळात एक प्राणी उपचार केंद्र अनंत अंबानी यांनी जामनगर येथे सुरू केले होते.यात उपचार केंद्रांतर्गत प्राणी शास्त्रज्ञ आणि तज्ञ डॉक्टरांची टीम जखमी प्राण्यांवरती उपचार करत होती. या आत्याआधुनिक उपचार केंद्रात,रेस्क्यू सेंटर,पेशंट वार्ड,प्राण्यांसाठी एम. आर .आय मशीन,सिटीस्कॅन सेंटर देखील उभारले आहेत. तसेच या रेस्क्यू सेंटर मध्ये रोबोटिक सर्जरी मशीन आणि लॅब देखील आहेत.या ठिकाणी एकूण सहा शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत.आत्तापर्यंत जवळपास 2 हजारहून अधिक जनावरांची सुटका वनतारा या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली आहे.

                           याशिवाय वन तारा या प्रोजेक्टमध्ये मगरी गेंडा या प्राण्यांच्या पुनर्वसनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वनतारा या प्रोजेक्ट अंतर्गत तमिळनाडू येथून 1000 मगरींना रेस्क्यू करून आणून या केंद्रात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.. जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वन्यजीव राहणे हे लोक वस्तीसाठी धोकादायक ठरू शकते या गोष्टीचा देखील या प्रकल्पाने विचार करून त्यावर उपाययोजना देखील राबवल्या आहेत. एक वन्यजीव बचाव केंद्र  आणि त्या केंद्राची असलेली व्याप्ती ही किती विशाल असू शकते हे या प्रोजेक्ट कडे पाहून आपल्याला लक्षात येईल. या प्रोजेक्टमध्ये देशांतर्गत प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेतच पण सोबत एखादा जखमी प्राणी जर देशाबाहेर असेल तर त्यालाही रेस्क्यू करून त्याच्यावरती योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी घेतली जाणार आहे.

विद्यापीठाची स्थापना –

या प्रकल्पांतर्गत लवकरच एका पशूधन संशोधन विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल. प्राण्यांवरती उपचार पद्धती तसेच वन्यजीवांचे संरक्षण आणि वन्य प्राण्यांची काळजी इत्यादी विविध विषयांवरती अध्यापन होताना दिसून येईल.  जंगल तोडीचा परिणाम हा आता होताना दिसून येत आहे.जंगल तोडीमुळे बरेचसे वन्य प्राणी  हे भटकताना दिसून येतात कधी कधी ते इतके भटकतात की प्रसंगी जखमी होऊन मृत्यू देखील पावतात. वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी अनेक लोक त्यांच्याजवळ जायला घाबरतात आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बरेचसे वन्य प्राणी मरणही पावतात.  वनतारा या प्रकल्पाचे हेच उद्दिष्ट आहे की जखमी वन्य प्राण्यांना वेळेवर उपचार मिळणे तसेच त्यांची योग्य ती काळजी घेणे.

वनतारा भारतातील राष्ट्रीय प्राणी शास्त्र उद्यान नागालँड प्राणीशास्त्र उद्यान आसाम राज्य प्राणी संग्रहालय आणि सरदार पटेल उद्यान इत्यादींना सहयोग करत आहे.

प्राण्यांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याची अनंत अंबानी यांची ही पद्धत  खरेच विचार करायला लावण्यासारखी आहे. प्राण्यांच्या संगोपनासाठी संवर्धनासाठी एक मोठे योगदान रिलायन्स इंडस्ट्रीज अँड रिलायन्स फाउंडेशन दिलेले आहे. वन्यप्राणी संवर्धन तसेच रक्षण ही काळाची गरज बनली आहे वन्य प्राण्यांना वेळेवर उपचार मिळाले तर अनेक जीव वाचू शकतात. वन्य प्राण्यांना होणारे विविध आजार आणि त्यांच्यावरची वेळेवर उपचार न होणे यातूनच बऱ्याचशा वन्यजीवांच्या जाती ह्या नष्ट होताना आज दिसत आहेत. वनतारा रेस्क्यू सेंटर मध्ये एकूण 2100 कर्मचारी नेमलेले आहे. हे सर्व कर्मचारी वनतारा मध्ये रेस्क्यू करण्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेताना आपल्याला दिसतील.सर्व प्रशिक्षित कर्मचारी या प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

अनंत अंबानी यांच्या या ड्रीम प्रोजेक्ट चा वन्यजीव संवर्धनासाठी नक्कीच फायदा होईल हे नक्की.या प्रकल्पामुळे अनेक वन्य प्राण्यांना त्यांचे हक्काचे असे नैसर्गिक अधिवास मिळेल.वनतारा बद्दल Vantara Full Information in Marathi दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सोबतच वनतारा प्रोजेक्ट कसा रंजक आहे तिथे तुम्हाला जायला आवडेल का हे ही नक्की सांगा. तुम्ही सांगितलेल्या सूचना आणि कमेंट चे स्वागतच राहील.

3 thoughts on “अंबानी यांचे वनतारा प्रोजेक्ट काय आहे ? l Vantara Full Information in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top