पुस्तक प्रकाशन कसे करावे? l How to Publish book in Marathi

WhatsApp Group Join Now

How to Publish book in Marathi lलेखन करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण लिहिलेल्या कथा,कादंबऱ्या, कविता इत्यादी अनेक साहित्य पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध व्हावे, अशी सुप्त इच्छा असतेच. जर तुम्ही नवीन लेखक असाल आणि तुम्हाला तुमचे पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर प्रकाशनासाठी काय करणे आवश्यक असते.

 पुस्तक प्रकाशनाचे कोणकोणते टप्पे (प्रक्रिया)असतात?प्रकाशकाची निवड कशी करावी?पुस्तक प्रकाशनाचा खर्च काय असतो? पुस्तक कसे प्रकाशित करावे? हे माहीत असणे आवश्यक असते.तर आज आपण या लेखातून हे जाणून घेणार आहोत.

How to Publish book in Marathi

पुस्तक कसे प्रकाशित करावे? l How to Publish book in Marathi

भारत हे पुस्तक प्रकाशन उद्योगाचे घर आहे. ज्यात प्रकाशकांच्या विविध श्रेणी, वेगवेगळ्या शैली प्रेक्षकांना पुरविल्या जातात. पुस्तक प्रकाशित करण्यामध्ये पुस्तक प्रकाशक निवडण्यापासून,पुस्तक लिहिण्यापासून ते मुखपृष्ठ आतील रचना तयार करणे, ISBN आणि कॉपीराईट मिळवणे आणि शेवटी पुस्तक प्रकाशित करणे अशा अनेक पायऱ्यांचा समावेश होतो. पुस्तक प्रकाशित करण्याची प्रक्रिया ही एक मोठी आव्हानात्मक प्रक्रिया आहे. परंतु संयम,चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाने आणि तुम्ही तुमचे स्वप्न नक्कीच साकार करू शकता.तर कोणकोणत्या पायऱ्या आहेत ते पाहू.

1.तुमचे पुस्तक लिहा

सर्वप्रथम पुस्तक प्रकाशित करण्याची पहिली पायरी म्हणजे अर्थातच ते लिहिणे. पुस्तक लिहिताना तुम्हाला आवड असलेल्या विषयाची तसेच वाचकानाही वाचायला आवडेल अशा विषयाची निवड करावी. एकदा तुमचे चांगले पुस्तक लिहून झाले की, ते प्रकाशित होण्याच्या पुढच्या पायरीत पोहचते.

2. संपादित करून त्यात सुधारणा करा

तुमचे पुस्तक लिहून तयार झाले की, त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत किंवा तुम्ही ज्या भाषेत लिहिले आहे ती बरोबर आहे का? या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला प्रूफरीडर किंवा व्यावसायिक संपादक यांची गरज भासू शकते.तसेच हे काम तुम्हीही करू शकता. अशा तऱ्हेने तुमच्या लिखाणातल्या चुका काळजीपूर्वक तपासून तुम्ही तुमचे पुस्तक संपादित करावे. यामुळे प्रकाशक शोधण्याची व वाचकांना आकर्षित करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

3 कव्हर आणि इंटीरियर डिझाईनिंग

पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पुस्तकाचे बाहेरील मुखपृष्ठ व आतील भागाचे डिझाइनिंग याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वरील मुखपृष्ठ व आतील इंटिरियर डिझाइनिंग जेवढे आकर्षक असेल तेवढे वाचक आकर्षित होतात. यासाठी तुम्ही व्यावसायिक डिझाइनिंग तज्ञांची मदत घेऊ शकता किंवा काही चांगल्या ॲप्स द्वारे तुम्ही स्वतः डिझाइन करून आकर्षक बनवू शकता. त्याचप्रमाणे पुस्तकाचे स्वरूप व मांडणी तसेच पुस्तकाची अंतर्गत रचना दिसावयास व वाचावयास सुलभ असावी.

4 ISBN आणि कॉपीराईट

तुमचे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी तुम्हाला ISBN (आंतरराष्ट्रीय मानक पुस्तक क्रमांक) आणि कॉपीराईट प्राप्त करणे आवश्यक असते. जेणेकरून हे सुनिश्चित केले जाते की तुमचे पुस्तक वैयक्तिक असून कॉपीराईट कायद्याअंतर्गत सुरक्षित आहे. अशा रीतीने तुम्ही तुमच्या कॉपीराईटचे कायदेशीर अधिकार मिळवता. तुम्ही भारतीय ISBN एजन्सी द्वारे ISBN क्रमांक मिळवू शकता. तर कॉपीराईट नोंदणी भारताच्या कॉपीराईट कार्यालयातून केली जाऊ शकते. या दोन्ही गोष्टी पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक असते. लेखकासाठी जेव्हा त्याचे पुस्तक प्रकाशित होत असते तेव्हा त्याला सर्व कायदेशीर अधिकार आणि आवश्यक मान्यता मिळविता येते.

5 प्रकाशन

तुमचे पुस्तक कसे प्रकाशित करायचे हे शेवटी तुम्हाला ठरवावे लागेल. भारतात पारंपारिक प्रकाशन, स्वयं-प्रकाशन, विनामूल्य प्रकाशन आणि संकरित किंवा भागीदारीत प्रकाशन (हायब्रीड प्रकाशन) यासह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकाशनांचे कार्य कसे असते ते थोडक्यात पाहू.

A) भारतातील पारंपारिक प्रकाशन ( Book Publishing Process)

भारतातील सर्वोत्कृष्ट पारंपारिक प्रकाशन हे लेखकांना नाव,प्रसिद्धी आणि मान्यता मिळवून देणारे मानले जाते.

भारतातील पारंपरिक प्रकाशन सामान्यतः रॉयल्टी आधारित मॉडेलवर काम करतात. जिथे लेखकाला पुस्तकाच्या विक्रीची टक्केवारी रॉयल्टी म्हणून मिळते.

B) भारतातील स्वयं-प्रकाशन (Self publishing Book)

अलीकडच्या काळात भारतात स्वयं-प्रकाशन अधिकाधिक लोकप्रिय झाले आहे. यामुळे लेखकांना त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवता येते. तसेच भारतातील स्वयं-प्रकाशन पर्याय दररोज वाढत आहेत.

C) संकरित / भागीदार प्रकाशन

हे प्रकाशन पारंपारिक प्रकाशन आणि स्वयं-प्रकाशन यांचे एकत्रित मिश्रण आहे असे म्हणू शकतो. यामध्ये लेखक पुस्तकाची मालकी राखून ठेवतो आणि विपणन आणि जाहिरातीसाठी जबाबदार असतो.तर प्रकाशक संपादन,डिझाईन आणि वितरण सेवा प्रदान करतात.

वरील दिलेल्या सर्व प्रकारात तुम्ही प्रकाशकाची निवड कशी कराल हा प्रश्न निर्माण होतो. प्रकाशकाची निवड करताना काय खबरदारी घ्यावी लागते हे आपण पाहू.

 प्रकाशकाची निवड कशी कराल? (How to select Publisher)

प्रकाशकाची निवड करताना, लेखकाने आपल्या लेखनाशी मिळती जुळती पुस्तके म्हणजे( कथा, कादंबऱ्या, कव्यसंग्रह, नाटक, चरित्र इ.) गेल्या एक-दोन वर्षात कोणत्या प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत याचा शोध घ्यावा. शोध घेतल्यानंतर आपणास योग्य अशा प्रकाशकांची निवड करून अशा प्रकाशकांकडे आपल्या लेखनाबद्दल चौकशी करावी.

प्रकाशकांस विचारणा चालू असताना एखाद्या प्रकाश काकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर लेखकाने त्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित करण्यासंदर्भातील त्या प्रकाशकाच्या नियम व अटी काय असतील? म्हणजेच लेखकास किती व कसे मानधन मिळेल, पुस्तक प्रकाशित होण्यास किती कालावधी लागेल, आवृत्ती किती प्रतींची असेल? लेखकास किती प्रति मिळतील? पुस्तकांच्या वितरणाची व्यवस्था कशी असेल? इ. गोष्टींचा स्पष्ट खुलासा करून घ्यावा.

प्रत्येक प्रकाशकाचे आर्थिक गणित वेगवेगळे असते. जसे लेखकांकडून थोडेसे आर्थिक सहकार्य घेऊन पुस्तक काढणारे प्रकाशक असतात तसेच लेखकांना कमी अधिक मानधन देणारे प्रकाशकही असतात.अगदी लेखकाकडून सर्वच्या सर्व खर्च घेऊन पुस्तक प्रकाशित करणारेही प्रकाशक असतात. अंतिम प्रकाशक निवडण्यापूर्वी खबरदारी म्हणून ज्या लेखकांची पुस्तक प्रकाशित केलेली असतील त्या लेखकांशी संवाद साधून त्यांना त्या प्रकाशकाचा,एकूण पुस्तक निर्मितीचा अनुभव कसा आला हे जाणून घेऊ शकता. अशाप्रकारे नीट माहिती व खबरदारी घेऊन जेव्हा तुम्ही अशा प्रकाशकाकडे आपले साहित्य द्याल तेव्हा तुमच्या लेखनाचा पुस्तक निर्मितीकडे होणारा प्रवास तुमच्यासाठी निश्चित आनंददायी ठरू शकतो.

6पुस्तक विपणन आणि जाहिरात (Book Marketing and Promotion)

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुस्तकाचे मार्केटिंग करावे लागेल. तुम्हाला तुमच्या पुस्तकाचा अधिक प्रचार करणे आवश्यक असते.वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही तुमच्या पुस्तकाची जाहिरात करू शकता. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे यातूनच तुमचे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचते.

7. पुस्तक प्रकाशन रॉयल्टी

तुमच्या पुस्तकाची रॉयल्टी किती असेल हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी प्रकाशकाशी ठरवून घ्यावे. एकदा पुस्तक प्रकाशित झाले की, रॉयल्टी किंवा इतर कोणतेही अधिकार किंवा करार याबाबत असा काही प्रश्न निर्माण झाला तर लेखकाचेच नुकसान होते. आणि प्रकाशकाचे यात फारसे नुकसान होत नाही. पुस्तक प्रकाशित करण्यासंदर्भात सर्व करार काळजीपूर्वक वाचा. न वाचता कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. पुस्तकाशी संबंधित सर्व अधिकार तुमच्या हातात ठेवा जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.

पुस्तक प्रकाशित करण्याचा खर्च काय असतो? (What is the cost of publishing a book?)

पारंपारिक प्रकाशन मध्ये लेखक विशेषतः प्रकाशनगृहांना त्यांची हस्तलिखिते सादर करतात जे नंतर पुस्तकाचे संपादन ,कवर डिझाईन,छपाई,वितरण आणि विपणन या गोष्टी हाताळतात. विविध प्रकाशन संस्थांकडून भारतातील पुस्तक प्रकाशित करण्याची सरासरी किंमत INR 10,000/- पासून INR 50,000/- पर्यंत असते किंवा यापेक्षा जास्तही असू शकते. संपादन, कव्हर डिझाइनिंग, फॉरमॅटिंग, प्रिंटिंग, मार्केटिंग आणि अतिरिक्त सेवा यासारख्या घटकावर अवलंबून पुस्तक प्रकाशनची किंमत बदलू शकते. या घटकांचा प्राथमिक खर्च असतो जो आपल्या पुस्तकाची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक असतो. परंतु स्पष्ट बजेट आणि खर्च समजून घेऊन प्रक्रियेकडे जाणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही काही स्तोत्रंद्वारे या घटकांचे काम आधीच पार पाडले असेल तर अनेक विनामूल्य पुस्तक प्रकाशन कंपन्या देखील आहेत च्या तुम्हाला थेट प्रकाशित करण्यास मदत करतात. काळजीपूर्वक नियोजन करून आणि माहितीपूर्ण निवड करून लेखक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करू शकतात. आणि होणारा खर्च प्रभावीपणे व्यवस्थापित करून वाचकांसाठी एक गुणवत्तेचे पुस्तक तयार करू शकतात.

शेवटी प्रकाशन मार्गाची निवड ही लेखक म्हणून त्यांच्या विशिष्ट गरजांवर व इच्छेवर अवलंबून असते. तुमची उद्दिष्टे व ध्येय साकार करण्यासाठी पुस्तक प्रकाशन प्रवासाला आजच सुरुवात करा.

पुस्तक प्रकाशन How to Publish book in Marathi कसे करावे याबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करू नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, माहितीपर लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या “लेखक मित्र “या वेबसाईटला नक्की भेट द्या व आमचा व्हाट्सअप ग्रुप ही जॉईन करा.

                       धन्यवाद!

8 thoughts on “पुस्तक प्रकाशन कसे करावे? l How to Publish book in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top