आत्मविश्वास वाढविण्यासाठी या १० सवयी लावा l 10 habits to build self confidence

WhatsApp Group Join Now

10 habits to build self confidence:आजच्या या धावपळीच्या जगात सगळे एकमेकांशी स्पर्धा करत आहे पण या स्पर्धेत तुम्हाला टिकून रहायचे असेल आणि स्वतःला सिद्ध करायचे असेल तर तुमच्यात आत्मविश्वास (Self Confidence) असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपण या स्पर्धेत कायम मागेच पडत राहू. आज प्रत्येक जण काहीतरी मिळविण्यासाठी धडपड करत आहे खूप कष्ट करत आहे पण जे हवं ते प्रत्येकाला सहज मिळतच अस नाही. त्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न केले पाहिजे. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही सहज कुठलही काम करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात.

आत्मविश्वास असणे म्हणजे नक्की काय? चांगले कपडे घालणं, सुंदर दिसणं म्हणजे आत्मविश्वास असणं का तर नाही, सुंदर दिसण्या बरोबर तुमचं व्यक्तिमत्त्व हे उठावदार हवं म्हणजेच स्मार्ट हवं. तुमचं बोलणं, चालणं, तुमची वागणूक, तुमचा स्वभाव, तुमचा पेहरावा या सगळ्या गोष्टी चारचौघात उठून दिसल्या पाहिजे या गोष्टींमुळे आपला आत्मिश्वास वाढतो. गर्दीतही तुमचं व्यक्तिमत्त्व वेगळं दिसून येतं.

तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. यामुळे आपण कायम positive राहतो आणि मानसिक दृष्ट्या पण नेहमी तंदुरुस्त राहतो. यामुळे आपण कुठलही काम आत्मविश्वासाने सहज करू शकतो. म्हणून कायम positive लोकांबरोबर रहावे ज्यामुळे आपली विचारसरणी अजून positive होते. कोणाचे चांगले विचार आपण जर आत्मसात केले तर त्याचा नक्कीच आपल्या आयुष्यात फायदा होतो. म्हणून तर आपण कित्येक प्रसिद्ध व्यक्तींची पुस्तके वाचतो, यशस्वी झालेल्या व्यक्तींचे विचार आपण आत्मसात करतो ज्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ होते.

जर आपल्याला आयुष्यात यश मिळवायचे असेल आणि काहीतरी बनून दाखवायचे असेल तर त्यासाठी आपल्यात आत्मविश्वास असणे खूप गरजेचे असते. जर आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला कधी कुठलही काम सुरू करण्यात उत्साह वाटणार नाही कायम तुम्ही निराश होऊन आपलं आयुष्य जगत रहाल आणि या जगण्याला काहीच अर्थ नसतो. आज जग इतकं पुढे चाललं आहे की त्यात आपण कायम मागे राहून जातो. आत्मवश्वासाने आणि उत्साहाने कायम आपण सगळ्या अडचणींवर मात करू शकतो.

आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण खाली दिलेल्या १० सवयी स्तःला लावून घेतल्या पाहिजे.

10 habits to build self confidence

१. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे

आपण नेहमी सकरात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ज्यामुळे आपण जे काम करतो त्यात आपण लवकर यशस्वी होऊ शकतो आणि आपला आत्मविशवास वाढतो. नकारात्मक विचार मनात कधीच आणू नये. त्यामुळे आपल्याला अपयशाची भीती वाटते आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण सतत तणावाखाली राहतो. नेहमी चांगल्या लोकांची संगत ठेवावी त्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. कोणाचे चांगले गुण आणि चांगले विचार जर आपण घेतले तर त्यात काहीच कमीपणा मानू नये. आपल्यात जे गुण नाहीये ते आपण घेतले तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात बघायला मिळतो आणि आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होईल.

२. आत्मपरीक्षण करणे

आपण स्वतःचे परीक्षण करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यात काय गुण आहेत आणि काय दोष आहेत ते कळते तसेच आपण कुठे चुकत आहोत का ते पण कळते आणि आपण स्वतः मध्ये तसे बदल करू शकतो शिवाय आपण आपल्या मधे काय कमी आहे आणि ती आपण पूर्ण करू शकतो ज्याने आपला आत्मविश्वासात वाढ होईल.

३. ध्येय ठेवणे आणि ते पूर्ण करणे

आपण आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय हे ठेवलेच पाहिजे. जर आयुष्यात काही ध्येयच नसेल तर आयुष्याला काही अर्थच रहात नाही आयुष्य जगण्यात कुठलाच उत्साह वाटत नाही आणि जर आयुष्यात काही ध्येय असेल काही तुमची स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण जे परिश्रम करतो कठीण परिश्रम करून संघर्ष करतो त्यालाच आत्मविश्वास असे म्हणतात. हा आत्मविश्वास एकदा तुमच्यात निर्माण झाला तर तुमचं आयुष्य सुखी आणि समधनी होते.

४. स्वतःला अपडेट ठेवणे

आजकालच्या या बदलत्या काळात आपण स्वतःला अपडेट ठेवणे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण रोज नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आजकाल टेक्नॉलॉजी इतकी पुढे जात आहे की ज्यामुळे आपण सगळ्या प्रकारची कामे सहज घरी बसल्या पण करू शकतो पण त्यासाठी प्रत्येक गोष्ट शिकणे गरजेचे आहे त्याचा सराव करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला कधीच कुठले काम करायला अडचण येत नाही व आपला आत्मविश्वास वाढतो.

५. निरोगी जीवनशैली ठेवणे 

आत्मविश्वास वाढविण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे आपले आरोग्य चांगले असावे लागते. आरोग्य चांगले असेल तर आपण आपली कामे व्यवस्थित करु शकतो आणि तणावमुक्त व आनंदी जीवन जगू शकतो जसे की सकाळी लवकर उठून योगा करणे, ध्यान करणे, चालणे, धावणे व इतर कुठलही व्यायाम करणे, समतोल आहार घेणे, तणावमुक्त रहाणे अश्या प्रकारे आपण जर निरोगी जीवनशैली आचरणात आणली तर आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो. 

६. वाचन आणि लेखन करणे

वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी करणे खूप आवश्यक आहे. वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवे वळण मिळते. वाचनामुळे आपण लेखन पण अधिक चांगले करू शकतो. लिखाण केल्यामुळे आपले मनातील विचार आपण लोकांपर्यंत पोहचवू शकतो. आपण स्वतःसाठी काही लिहू शकतो आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.

७. स्वतःसाठी वेळ देणे

आपण नेहमी दुसऱ्यासाठी जगत असतो, दुसऱ्याचा विचार करत असतो कधीही स्वतःसाठी जगत नाही स्वतःसाठी वेळ देत नाही स्वतःचा विचार करत नाही ज्यामुळे आपण स्वतःचा आदर कधीच करत नाही. आपण नेहमी स्वतःचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या आरोग्यासाठी तर वेळ दिलाच पाहिजे पण आपलं दिसणं पण तेवढेच महत्वाचं आहे म्हणून आपण दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढला पाहिजे आणि स्वतःला कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवलं पाहिजे. एखादा छंद जोपासायला पाहिजे ज्यामुळे कायम आपण मनाने उत्साही राहतो. तसेच स्वाभिमानाने जगले पाहिजे. स्वाभिमानाने जगल्यामुळे आपोआप आपल्या आत्मविश्वासात वाढ होते.

८. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवणे

 आपण समाजात बघतो जे मोठे आणि यशस्वी लोक होऊन गेले त्यांची राहणी अगदी साधी पण त्यांचे विचार इतके उच्च असतात की ते आपल्या जीवनात आपल्यासाठी एक आदर्श असतात. त्यांचा हा आदर्श ठेऊन त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला आत्मविश्वास वाढू शकतो आणि आपण पण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. अशी बरीच उदहरणे आहेत पण त्यातील एक उदाहरण म्हणजे – भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि दुसरे उदाहरण म्हणजे – सुधा मूर्ति.

९. सगळ्यांना मदत करणे

आपण आपल्या रोजच्या जीवनात जे गरजू लोकं आहेत किंवा शेजारी पाजारी आहेत ज्यांना मदतीची गरज आहे अश्या लोकांना आपण नेहमी मदत केली पाहिजे ज्यामुळे आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो याचे मनाला एक समाधान मिळते आणि आपला आत्मविश्वास पण वाढतो आणि जर कधी आपण अडचणीत असलो तर लोकं पण आपल्याला मदत करायला धावून येतात.

१०. वेळेचे नियोजन करणे

आपल्या आयुष्यात वेळेचे महत्व आपल्याला असलेच पाहिजे त्यामुळे आपल्या रोजच्या कामाचे नियोजन करून आपण आपली सगळी कामे वेळेत पूर्ण करू शकतो. उगाचच वेळ वाया घालवून आपण आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. म्हणूनच वेळेचे अगदी व्यवस्थित नियोजन केले तर नक्कीच यश मिळते आणि आपल्या प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकतो आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास पण वाढतो. म्हणूनच जर आत्मविश्वास 10 habits to build self confidence दृढ असेल तर आयुष्यात तुम्ही कधीही अपयशी होणार नाही नेहमी यश तुमच्या पायाशी असेल आणि तुम्ही जगही जिंकू शकता.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली,ते नक्की कळवा. आपल्य मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhasApp ग्रुप ही जॉईन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top