मुंबई कोस्टल रोड या प्रकल्पाची संपूर्ण माहिती:(Full Information of Mumbai Costal Road)

WhatsApp Group Join Now

Full Information of Mumbai Costal Road :मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्प्यातला प्रवास

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड या प्रकल्पाचे 11 मार्च2024 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्या प्रकल्पाचा वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. मुंबईकरांची वेळेची व इंधनाची बचत व्हावी या हेतूने नरिमन पॉइंटपासून दहिसर- विरार अशा मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू होते त्यातील पहिला टप्पा म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट उडन पूल ते वरळी हा मार्ग 12 मार्च पासून मुंबईकरांसाठी खुला झाला. अवघ्या दहा मिनिटात हा प्रवास आता होऊ शकेल,सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे. यामुळे 34% इंधनाची अनेक 70% वेळेची बचत होणार आहे. नरिमन पॉइंट पासून दहिसर- विरार पर्यंत जाणून घेऊया कोस्टल रोड या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती….

कोस्टल रोड मुळे वाचेल वेळ :(MUMBAI COSTAL ROAD INFORMATION IN MARATHI)

सात बेटांनी तयार झालेला मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर-दक्षिण असा पसरलेला असल्यामुळे मुख्य मगाशी जोडले गेलेले दोन रस्ते उत्तर-दक्षिण यामुळे या भागात होणारीवाहतूक कोंडी ही दैनंदिन समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे लागणारा वेळ बघता या मार्गाने जाणारे प्रवासी फार त्रासदायक समस्येचा सामना करीत होते पण आता कोस्टल रोड मुळे वाहतूक कोंडी न होता वेळेचीही बचत होईल आणि मुंबईकर सुखकर प्रवास अनुभवातील. कोस्टल रोड मरीन ड्राईव ते वरळी हा 9.5km चा मार्ग जास्त वाहतूक कोंडीचा असल्यामुळे सकाळी आठ ते रात्री 8 यावेळी जास्त वाहतूक असते. वाहतुकीच्या पहिल्या टप्प्यातला हा मार्ग खुला केल्यामुळे प्रदूषणातही घट होईल तसेच वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. सुरळीत वाहतूक सुरू राहण्यासाठी वाहतुकीच्या वेळा ही ठरविण्यात आलेल्या आहेत तसेच शनिवार व रविवार हा मार्ग बंद असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होऊन त्यांचा वेळ वाचल्यामुळे जीवनशैलीत थोडा बदल जाणवेल.

कोस्टल रोड या प्रकल्पाची वैशिष्ट्ये:(MUMBAI COSTAL ROAD FEATURES)

हा प्रकल्प मुंबई दक्षिण किनारी मार्गावरून प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक च्या वरळी टोकापर्यंत असेल. 10.58 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून त्यात बोगद्याचा समावेश आहे दोन्ही बाजूला 6 मार्गी -का असून त्यांची लांबी जवळपास 4.35km असेल यात असणारा पूल 2.19km चा आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडी च्या लगत असणारे बोगदे 2.72km चे असून त्यांचा व्यास 11 mआहे. हे भारतातील पहिले भूमिगत स्वतंत्र जुळे बोगदे असून ती बोगदे तयार करण्यासाठी लागणारे भारतातील सर्वात मोठे मशीन ‘टी बी एम मावळा’ चा वापर करण्यात आला आहे. ही मशीन चार मजली इमारतीत की उंच असून या मार्गावर 80 किमी/ ताशी वेग, बोगद्यामध्ये 60 किमी/ ताशी वेग आणि इंटरचेंज च्या भागात 40 किमी/ ताशी वेग आशा मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या असून स्वतंत्र घेऊन मार्गीका देण्यात आल्या आहेत.तेथील भराव क्षेत्र 111 हेक्टर असून त्यातील अंतर बदल15.66km चे आहेत. 7.5km चे पदपथ बस वाहतुकीसाठी केलेले आहेत. 7.47km सागरी तटरक्षक भिंत असून समुद्री लाटांपासून बचाव करण्यासाठी त्याची निर्मिती झाली आहे. तसेच हाजी अली, वरळी, थडानी जंक्शन, अमर सन्स येथे पार्किंग ची सुविधा हे केली गेली आहे. हा प्रकल्प मे 2024 पर्यंत पूर्ण होणार असून त्याचे काम प्रगतीपथावर चालले आहे. बोगदा खननाचे काम 100% पूर्ण झाले असून समुद्र भिंत उभारण्याचे काम आटोपलेलेच आहे. तर पुलाचे काम 85% पूर्ण झाले आहे. जवळपास 14 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलाय. पण पूर्णत्वास आलेल्या खर्च 12,721 कोटी एवढा आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याची वैशिष्ट्ये:

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्याचे सुरुवात 2021 मध्ये करण्यात आली आणि अखेर 2022 मध्ये पूर्ण झाला तसेच दुसरा बोगदा खणण्याची सुरुवात एप्रिल 2022 मध्ये झाली असून हा बोगदा मे 2023 मध्ये पूर्णत्वास आला. या बोगद्याला 375mm जाड काँक्रीट लावण्यात आले असून त्यात अग्निप्रतिबंधक उपाययोजना साठी फायर बोर्ड लावण्यात आले आहे. भारतात प्रथमच सकार्डो  वायुविजन प्रणाली चा उपयोग केला गेला आहे. आपत्कालीन निर्वाचन साठी300m वर छेद बोगदे आहेत. यात युटिलिटी बॉक्स ची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची ही व्यवस्था करण्याच्या विचारांची संभाव्यता आहे.

कोस्टल रोड प्रकल्पामुळे होणारे फायदे: Benefits of Mumbai Costal Road

या प्रकल्पामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनाची बचत होईल त्यामुळे दरवर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन हरित क्षेत्र वाढून सुमारे 70% पर्यंत पोहोचेल. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवनमान बळकट होईल. या हरित क्षेत्रात सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रॅक, प्रेक्षक गृह या सुविधा प्रस्तावित असून सध्यातरी वाहतूक कोंडी कशाप्रकारे कमी होईल यावर प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर तसेच सुरक्षित होण्यास मदत होईल.

कोस्टल रोड प्रकल्पात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर:

भारतातील सर्वात मोठ्या डायमीटर चे टनल बोरिंग मशीन “मावळा”(TBM) वापरून दोन बोगदे खोदण्यात आलेले आहेत.सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीम बोगद्याच्या आत आली आहे. या प्रकल्पात समुद्रावर मोनो पाइल्स चा वापर करून पूल बांधण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाने विकसित युटिलिटी बॉक्स असून अद्यावत व्यवस्थापन प्रणालीची सुरुवात होईल अशी आशा आहे.

मुंबई कोस्टल रोड ची बांधकाम वेळ:

BMC च्या स्थायी समितीने संमती दिल्यानंतर पहिल्या टप्प्याचे बांधकाम सुरू झाले आणि चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी दिला गेला त्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी आणि वांद्रे ते कांदिवली अशा या दोन टप्प्यात बांधकामात सुरुवात केली गेली. एकाच वर्षाच्या कालावधीत अवास्तव खर्च झाल्याने पहिल्या टप्प्यातील मंजुरीचा प्रस्ताव BMC ने मागे ठेवला होता परंतु अशातच तीव्र इंधन वाढ, स्टीलच्या दरातही वाढ जैवविविधतेसाठी ठेवलेली राखीव रक्कम या सगळ्या बाजू बघता होस्टेल रोडच्या बांधकामासाठी काही नियम शिथिल करण्यात आले. आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटी यांनी रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी हा रोड तात्काळ सुरू करावा म्हणून प्रकल्पास सुरुवात केली आणि अखेर या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण वन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली.

मुंबई कोस्टल रोड ला होणारा विरोध:

शहरातील वाहतुकीची कोंडी पाहता या प्रकल्पाचे काम त्वरित चालू करावे असे सगळ्यांचे मत असले तरी उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात येईल असे मासेमारी समुदायाद्वारे म्हटले गेले आणि त्यावर विरोध झाला. 15 जानेवारी 2019 रोजी कोळीवाडा सहकारी सोसायटी या संस्थेने असे म्हटले की समुद्रातल्या माशांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी हा प्रकल्प विरोधाभास ठरेल आणि त्यांच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे या भागातील आधारस्तंभ हा 60m अंतरावर न करता 200 मीटर अंतरावर करावा अशी मच्छीमारांनी मागणी केली. या गटाने असा दावा केला की शहराच्या प्रख्यात स्काय लाईन वर प्रभुत्व मिळवणाऱ्या डोळ्या ऐवजी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या संकटात टाकणारा असेल यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होईलच पण मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात येणारा ठरेल.

मुंबई कोस्टल रोड चे तथ्य:

वेस्टर्न फ्रीवे साठी असणारा हा पर्याय आहे असे 2011 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समुद्री आणि किनारपट्टीचे रस्ते जोडण्याचे तर्क ज्ञान मांडले तेव्हा तज्ञांची संयुक्त तांत्रिक समितीने नेमणूक केली . पण जानेवारी 2012 मध्ये झालेल्या अहवालात सागरी रस्ते जोडणे ऐवजी एक तटीय रस्ता निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती त्यामुळे सार्वजनिक 120 अब्ज रुपये वाचतील असे संभाव्य निर्माण झाले होते त्यावेळेस जर कोस्टल रोड तयार करण्यात आला तर त्याला आठ लेन असतील- वाहनांच्या वाहतुकीसाठी सहा आणि कॉरिडोर साठी दोन या प्रकारे तो प्रकल्प असेल तसेच दोन भूमिगत भूकंप रोधक बोगद्याचा हे समावेश त्यात असेल त्यातील एक गिरगाव चौपाटी आणि दुसरा म्हणजे मलबार हिल अंतर्गत बोगदा. हे वक्तव्य 2012 चे असून ते अमलात आणण्याचे काम 2019 मध्ये झाले त्यातील 22% कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आणि उर्वरित 78 टक्के क्षेत्र हे सार्वजनिक सुविधेसाठी वापरले जाईल अशी ही घोषणा झाली काही टक्के निधी वाटप 4 फेब्रुवारी एकूण 2019 ला मुंबई नागरी संस्थेने दिला तसेच त्यात मेट्रोच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी निधी निश्चित करण्यात आलेला होता.

कोस्टल रोड प्रकल्पाची सद्यस्थिती: (MUMBAI COSTAL ROAD INFORMATION IN MARATHI)

डिसेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारला दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रेग्युलेशन अंतर्गत असणारी 14000 कोटी रुपयांची मंजुरी रद्द केली. न्यायाधीश एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या खंडपीठाने म्हटले की दिलेल्या आदेशाला 16 जुलै 2019 पर्यंत स्थगिती द्यावी असे आमचे मत आहे. त्यात असे म्हटले गेले की बृहन्मुंबई महानगरपालिकेत उत्तर भागात असणारे 8 लेन आणि कोस्टल रोड प्रकल्पासाठी असलेली जमीन पुन्हा मिळवू आणि सुरक्षित करू शकणार नाही जोपर्यंत कोर्टाचा पुढील आदेश येत नाही. त्यामुळे नागरी मंडळाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहित यांचे म्हणणे असे की तो राष्ट्रीय महामार्ग नसल्यामुळे सी आर झेड ची मंजुरी आहे पण पर्यावरणीय परवानगी त्यांना कोणत्याही मंजुरीची आपल्याला गरज नाही मुंबईला रस्त्यांची गरज आहे आणि हा रस्ता मुंबईच्या आत आहे.

त्यामुळे त्याच्या निकालाला अंतरिम स्थगिती देऊनही कायम होता मात्र मुंबई हायकोर्टाचा 2020 च्या सुनावणी असा दिला गेला की या निर्विवाद जागेवर सी आर झेड मंजुरी आहे. त्यामुळे सी आर झेड मंजुरी बाबत येणारा” गंभीर आभाव” आणि “योग्य वैज्ञानिक अभ्यास अभाव “असेही म्हटले गेले. उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले. तेव्हा शहरातील काही मच्छीमारांनी प्रस्तावित कोस्टल रोडच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे सर्वेक्षण केले त्यात वर असलेले समुद्री जीवन, त्याच्या अंतर्गत असलेली मासेमारी, मासेमारीचा या समुदायावर आणि मासळी प्रजननावर होणारा प्रतिकूल परिणाम या गोष्टींचा अभ्यास केला. तसेच शहरातील खाड्या आणि खारफुटी पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम या सगळ्या गोष्टी तपासूनच कोस्टल रोड बांधकामाची सद्यस्थिती अस्तित्वात आणली आम्ही अखेर चार वर्षांपूर्वी या प्रकल्पात सुरुवात झाली.

या प्रकल्पाची अद्यावत माहिती Full Information of Mumbai Costal Road तसेच कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातला प्रवास काही दिवसातच तुमच्या भेटीला घेऊन येऊ तेही लेखाद्वारे त्यासाठी आपल्या  या वेबसाईटला फॉलो करा. नवनवीन कथा आणि लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या whaapp channel ला फॉलो करा तसेच जॉईन व्हा. सगळ्या कथा आणि लेखांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेलच ही आशा……

धन्यवाद!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top