तुम्हाला तुमचे केस अनेकदा स्टाईल करायला आवडतात, नवनवीन केशरचना करायला आवडतात. तसेच या क्षेत्रात काम करायलाही आवडते तर हेअर स्टायलिस्ट हा करिअरचा उत्तम पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. यासाठी कुठल्याही उच्च शिक्षणाची गरज नसते. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तुम्ही लवकरात लवकर कमाईचे स्त्रोत म्हणून या करियर ऑप्शन कडे बघू शकता. यातही अनेक प्रकारची वैविध्यता दिसून येते ती सखोल माहिती जाणून घेऊया आजच्या लेखात……
हेअर स्टायलिस्ट हा एक महत्त्वाचा करियर ऑप्शन कसा असू शकतो?(CAREER IN HAIR STYLIST INDUSTRY )
विविध प्रकारचे हेअर स्टायलिंग ,फिनिशिंग तंत्राचा वापर करून आपण ग्राहकांच्या इच्छेनुसार त्यांना हव्या त्या प्रकारे लूक करून देऊ शकतो. त्यात ग्राहकांचे केस धुणे, कंडिशनिंग करणे,ब्लो-ड्रॉईंग करणे, स्केल मसाज, हेअर स्पा या प्रकारचे वेगवेगळे कटिंग आणि ट्रिमिंग करून ग्राहकांना वेगवेगळे लुक्स आणि स्टाइल करून देऊ शकतो. हेअर स्टायलिस्ट म्हणून आपण ग्राहकांना केस कापून देणे, ट्रिमिंग करून देणे, ड्रेसिंग करणे, हेअर कलरिंग करणे ,केसांची निगा राखणे, विविध प्रकारच्या केशरचना करणे, याबद्दलचा अनुभव आल्यास हॉटेल्स, सलून, स्पा अशा मोठमोठ्या आस्थापनांमध्ये काम करू शकतो.
हेअर स्टायलिस्ट काय करतो?
1. आपल्या आजूबाजूचा परिसर, आपले वर्कस्टेशन स्वच्छ आहेत की नाही ही खात्री करून घेणे.
2. ज्या साधनांचा आपण वापर करतो ती साधने निर्जंतुक करणे जसे की कात्री आणि विविध साहित्य व उपकरणे.
3. विविध प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर वापरून ग्राहकांचे केस स्वच्छ करणे व ते करत असताना हॅन्ड क्लोज घालूनच काम करणे.
4. ब्लो-कॉम्बिंग,ब्लो-व्हेविंग ,ब्लो-स्ट्रेचिंग अशा विविध तंत्राचा वापर करून केस कोरडे करून देणे, केस फ्रीजिंग करणे, केस सरळ करणे या प्रकारचे सेवा देऊ शकतो.
5. केस कापून ट्रिम करणे तसेच क्लब कटिंग, नॉचिंग , स्लाईसिंग, पॉईंट कटिंग, फीदरिंग, परमिंग यासारख्या वेगवेगळ्या तत्रांचा वापर करून विविध नमुने तयार करू शकतो.
6. हेअर जेल, क्रीम, लोशन, तेल विविध साहित्य वापरून केशरचना व केशभूषा करू शकतो.
7. हेअर मसाज, नेक मसाज, हेअर स्पा यासारख्या सेवा देऊ शकतो.
8. कायमस्वरूपी किंवा अर्ध कायमस्वरूपी केसांचे विविध प्रकार, केसांची कलरिंग, केसांना ब्लीचिंग किंवा टिं टिंग करू शकतो.
9. ग्राहकांना केसांची निगा, केसांची काळजी कशाप्रकारे राखू शकतो याबद्दल सल्ला देणे ,त्यांना शिक्षित करणे त्याच प्रकारे त्यांच्या भेटीचे वेळापत्रक तयार करणे, त्यांचा अभिप्राय घेणे ही सगळी कामे एक हेअर स्टायलिस्ट म्हणून करणे जरुरी आहे.
10. विविध केशरचना सुचवणे, केसांचा पोत बघून त्यांना उत्तम मार्गदर्शन करणे जेणेकरून त्यांचे केस योग्य कसे असतील तसेच विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स सुचवणे.
एक प्रशिक्षित हेअर ड्रेसर केसांच्या समस्यांची काळजी घेतो. हेअर केअर रुटीन मध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात जसे की Scalpe स्केअर, शाम्पू, Scalpe मसाज, Scalpeस्क्रब, डीप कंडिशनिंग, Scalpeमास्क, हेअर स्किपिंग मास्क,Scalpe टॉनिक,हेअर स्पा, हेड मसाज, हेअर कट ,हेअर कलर ,हेअर ट्रीटमेंट, हेअर स्टाईल, हेअर कलरिंग ,हेअर रिलॅक्स सिंग ,हेअर स्ट्रेटनिंग,न्यूट्रलआयझिंग ट्रीटमेंट तसेच स्वच्छता याबाबतही माहिती देण्याचे काम करतो.
त्याला केस कापण्याचे योग्य तंत्रज्ञान, स्टायलिश संबंधित माहिती तसेच केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक उत्पादनांची माहिती, केसांच्या संबंधित स्टाइल साठी संबंधित उपकरणे करलींग मशीन, स्ट्रेटनर,ब्लू ड्रायर, हॉट कॉम्ब ,टेल कॉम्ब इत्यादी प्रकारच्या उपकरणांचे योग्य ज्ञान, रासायनिक उपचार आणि केसांची काळजी बद्दल माहिती देणे आवश्यक असते. सर्व साधनांचे निर्जंतुकीकरण आणि सेफ्टी स्टॅंडर्ड बद्दल माहिती देणे तसा हा कोर्स 440 तासांचा असून तुमच्याकडे चांगले भाषण कौशल्य असेल तर व्यवसायासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
हेअर स्टायलिस्ट कसे बनावे? त्यासाठी पात्रता काय?
माध्यमिक शिक्षणानंतर असिस्टंट हेअर स्टायलिस्ट म्हणून NSQF चे लेवल-3 प्रशिक्षण करू शकतो.
माध्यमिक शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केले असेल तर हेअर ट्रेसर, स्किन केअर, बार्बर, हेअर कटर, ब्युटी कल्चर, हेअर अँड ब्युटी केअर या विविध व्यवसायातील आयटीआय प्रशिक्षणासाठी पात्र ठरू शकतो. तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून ही वेगवेगळ्या विषयात डिप्लोमा मिळवू शकतो. काही खाजगी संस्था आणि काही नामांकित सौंदर्य, वैयक्तिक काळजी घेणाऱ्या सेवा कंपन्या हेअर स्टाइलिंग, हेअर स्पा, हेअर ड्रेसिंग किंवा इतर गोष्टी संबंधात डिप्लोमा ऑफर करताना दिसतात.
या क्षेत्रांमध्ये डिप्लोमा इन हेअर इन्सेंटिव्ह, डिप्लोमा इन हेअर डिझायनिंग, डिप्लोमा इन ब्युटी हेअर अँड मेकअप, कोर्स इन हेअर ट्रीटमेंट, सायंटिफिक अप्रोच टू हेअर डिझायनिंग, ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन हेअर डिझायनिंग असे वेगवेगळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हेअर ट्रीटमेंट क्रॅश कोर्स, हेअर पार्ट टाइम कोर्स, फुल टाईम हेअर कोर्स या प्रकारचे वेगवेगळे कोर्सेसही उपलब्ध आहेत.
भारतात अशी अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठे आहेत जिथे हेअर स्टायलिस्टशी संबंधित अभ्यासक्रम करू शकतो त्यापैकी काही वुमन पॉलिटेक्निक दिल्ली, स्प्रेड अकॅडमी ऑफ हेअर डिझायनिंग बेंगलोर, भारती तनुजा ब्युटी अकॅडमी दिल्ली, VLCC दिल्ली, ज्यूस हेअर अकॅडमी मुंबई, नलिनी आणि यास्मिन सलून प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. जर या कॉलेजेस मधून कोर्स करू शकत नसाल तर तीन ते सहा महिन्याचे ट्रेनिंग कोर्स करू शकता. किंवा कॉस्मेटोलॉजी आणि बार्बरिंग करून त्यानंतर प्रशिक्षण मिळवू शकता.
अभ्यासक्रम पूर्ण करून करिअरची सुरुवात कशी करावी?(HOW TO LAUNCH CAREEAR AS A HAIR STYLIST)
अभ्यासक्रमानंतर एखादं महत्त्वपूर्ण प्रशिक्षण करणे, मोठमोठ्या सलून मध्ये सराव करणे, जर आपल्याकडे चांगले लेखन कौशल्य असेल तर मासिकासाठी लिहिणे, याशिवाय सलून खोलून चांगले पैसे कमावणे, जास्त गुंतवणूक शक्य नसल्यास फिल्म इंडस्ट्री क्षेत्रात किंवा टीव्ही शो मध्येही हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणे.
शैक्षणिक शुल्क: हेअर स्टायलिस्ट होण्यासाठी शैक्षणिक शुल्क वेगवेगळ्या संस्था कशाप्रकारे शुल्क आकारतात यावर अवलंबून असू शकतात. तरीही लहान संस्थांमध्ये 10,000 ते 50 हजार पर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. सोबतच त्याबद्दलचा डिप्लोमा किंवा प्रशस्तीपत्र मिळू शकते.
नोकरीच्या संधी:
आपल्या प्रशिक्षणाच्या आणि प्रमाणपत्राच्या आधारावरच आपण वेगवेगळ्या आस्थापनेत नोकरीसाठी प्रयत्न करू शकतो.
1. हेअर ड्रेसर
2. कलरिंग टेक्निशियन
3. असिस्टंट हेअर स्टायलिस्ट
4. न्हावी
काही सलून केंद्र जिथे आपल्याला नोकरी मिळू शकते:
1.VLCC
2.LACKMEE
3. यु सलून
4. गीतांजली सलून
5. नैसर्गिक सलून
6. जावेद हबीब
7. लॉरियल सलून
8.Amour युनि सलून
9. हेअर कट आणि स्टाइल सलून
किंवा बऱ्याचदा प्रशिक्षणासाठी आपण जवळच्या कोणत्याही पार्लर किंवा सलून मध्ये संपर्क साधू शकता. अनुभव आल्यानंतर मोठ्या नोकरीच्या संधी ही उपलब्ध होऊ शकतात.
हेअर स्टायलिस्ट चा पगार:
प्रशिक्षणार्थी किंवा शिकाऊ म्हणून सुरुवाती 3000 ते 5000 प्रति महिना अशी होऊ शकते.1-3 वर्षाच्या अनुभवानंतर सुमारे 8000 ते 10,000 प्रति महिना मिळू शकतो. पाच ते दहा वर्षाच्या अनुभवानंतर 12,000ते 25,000 किंवा त्यापेक्षा अधिक तसेच मोठे ग्राहक टिप्सही देऊ इच्छितात काही ठिकाणी ते स्वीकारण्याची ही परवानगी असते. आपले सलून प्रतिष्ठित असेल ग्राहकांमध्ये प्रतिष्ठा चांगली असेल तर 50,000 ते 70 हजार किंवा त्यापेक्षा अधिक महिना ही कमावू शकतो. आपण स्वतःचे सलून उघडल्यास कालांतराने होणारी कमाई चांगली असते. सेलिब्रिटी किंवा क्लाइंट साठी काम करणारे हेअर स्टायलिस्ट दरवर्षी लाखो कमावतात तसेच फिल्म इंडस्ट्री मध्ये अनुभवाने जाणारे हेअर डिझायनर त्यांचे पॅकेजेस वर्षाला लाखो रुपये असतात .त्यामुळे अशा नवीन करियरला आता आशेचा किरण दिसायला सुरुवात झाली आहे. हेअर स्टायलिस्ट म्हणून प्रशिक्षणार्थी पासून ते सहाय्यक हेअर स्टायलिस्ट पर्यंत एक-दोन वर्षात आपल्याला बराच अनुभव येऊन आपण वरिष्ठ हेअर स्टायलिस्ट ही होऊ शकतो किंवा स्वतःचे सलून देखील खोलू शकतो. कोरोना नंतरच्या काळात ही सेवा घरपोच देणे ही सुकर झालेले आहे त्यामुळे ते स्वतंत्रपणे सेवा घरपोच ही देऊन तुम्ही चांगली कमाई साध्य करू शकता आणि तुमचे काम वेगाने वाढवू शकता.
हेअर स्टायलिस्ट मध्ये इंडस्ट्रीत असलेले ट्रेंड:
हेअर स्टायलिस्ट ची मागणी संभाव्य काळात जास्त वाढलेली असून आजकाल वेलनेस इंडस्ट्रीज क्षेत्रात भरभरून वाढ झालेली येत आहे. 60% लोकांचे परिवर्तन झालेले दिसून येते ते म्हणजे ग्रूमिंग आणि हेअर स्टाईल क्षेत्रातच.FICCI आणि EY नुसार पुढल्या पाच वर्षात वेलनेस इंडस्ट्रीमध्ये12% च्या वर कंपाउंड एनुअल ग्रोथ रेट वाढताना दिसून येईल. 2020 नंतर तो 1.5 ट्रिलियन वर पोहोचलेला दिसून येतो यामुळे या क्षेत्रातील करियर करणाऱ्यांची संख्या वाढली असून करियर ग्रोथ रेट उज्वल भविष्य घडवून आणेल असे दिसते.
तरी या(HOW TO LAUNCH CAREEAR AS A HAIR STYLIST )क्षेत्रातील अधिक माहिती हवी असल्यास मला मेसेजच्या स्वरूपात नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन लेखासाठी आपल्या लेखक मित्र डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचे whatsapp channel ला भेट द्यायला विसरू नका. आणि वरील हा उपयुक्त लेख करिअरच्या नवीन शोधात असलेल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!!!
लेखिका :शुभांगी चूनारकर , नागपुर.