किचन स्वच्छ ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स l

WhatsApp Group Join Now

KITCHEN CLEANING TIPS AND TRICKS :स्वयंपाक करणे ही जशी एक कला आहे तशीच घर स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण घरातील प्रत्येक व्यक्तीला ही कला जमेलच असं नसते पण स्त्री आणि किचन एक असं नात आहे कि स्त्री ची दिवसाची सुरुवात ही किचन पासूनच होते आणि शेवटही किचन मध्येच होतो त्यानंतरच तिचा दिवस संपतो.

एक वेळेला नोकरी करणाऱ्या व्यक्तीला सुट्टी मिळेल पण स्त्रीला किचन मधून कधी सुट्टी मिळेल सांगता येत नाही त्यासाठी किचन कलेत स्वावलंबी होणे हा एक पर्याय उरू शकतो. घर स्वच्छ असणे सगळ्यांनाच आवडते. गोष्टी नीटनेटक्या ठेवणे सगळ्यांनाच आवडते पण हे काम मात्र खूप अवघड आहे अशा वेळेला काही क्लिनिंग टिप्स आपण लक्षात ठेवून त्याचा फायदा होऊ शकतो तसेच इतरांच्याही मदतीस आणू शकतो चला तर जाणून घेऊया काही खास क्लिनिंग टिप्स…..

घरगुती वापरातील काही मिश्रणे:(KITCHEN CLEANING TIPS AND TRICKS)

1. साबण आणि पाण्याचे मिश्रण: एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी आणि त्यात काही थेंब डिश वॉश जेल किंवा साबणाचे पाणी घालून मिश्रण तयार करा त्यात स्पंच किंवा मऊ कापड बुडवून किचन मध्ये डाग असलेल्या ठिकाणी घासा. या मिश्रणाने किचनचे सर्व बाजू आणि ड्रॉवर्स तसेच अडगळीची ठिकाणे स्वच्छ करा आता स्वच्छ पाण्याने एक कोरडा कपड्याच्या मदतीने पुसून टाका अशाप्रकारे आपण या मिश्रणाचा उपयोग करून किचन स्वच्छ करू शकतो.

2. विनेगर आणि पाणी: एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात व्हिनेगर घाला. हे मिश्रण अर्धे अर्धे असावे. यात कापड बुडवून किचनच्या त्या पृष्ठभागावर स्वच्छ करा जिथे तेलकट भाग किंवा डाग असतील. विनेगर तेलकट भाग आणि घाण सहज स्वच्छ करते त्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवून किंवा पुसून कोरडे करा.

3. लिंबाचा रस आणि पाणी: लिंबाचा रस आणि पाणी या द्रावणात कापड भिजवून किचन मधील डाग आणि घाल घालवू शकतो करण लिंबूवर्गीय आम्ल तेल किंवा घाण स्वच्छ करते त्या भागाला थोडा वेळ तसेच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने कोरड्या कापडाने पुसून घेतल्याने किचनचा पृष्ठभाग स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होईल.

4. मायक्रो फायबर कापड: मायक्रो फायबर कापड चा वापर करून आपण दूर करण्यास मदत होऊ शकते या कापडा मुळे चिकटपणा निघायला खूप मदत होते लगेच स्वच्छ होतो.

5. बेकिंग सोडा: स्वयंपाक घरातील खरकटी भांडी सिंक मध्ये टाकल्यानंतर भांडी स्वच्छ झाल्यानंतर सिंक दररोज स्वच्छ करणे महत्त्वाचे असते अशा वेळेस बेकिंग सोडा पाण्यात टाकून पूर्ण सिंक भर पसरवावा आणि छोट्या टूथ ब्रशने पूर्ण सिंग स्वच्छ घासून घ्यावा यामुळे सिंक मधील ग्रीस आणि घाण काही क्षणातच निघून जाते. बेकिंग सोडा मध्ये असलेल्या घटकांमुळे घाण ,चिकटपणा त्वरित साफ होतो.

6. ऑलिव्ह ऑइल: स्टीलच्या सिंक ला स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल चा वापर करणे लाभदायक ठरेल करण ऑलिव ऑइल स्पंज किंवा कापडावर लावून त्यावर थोडेसे गरम पाणी घेऊन सिंगला चांगले घासल्यास सिंक नवे कोरे दिसेल.

7. डिश वॉश लिक्विड: जर किचन चे सिंक खूपच घाणेरडे झाले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी स्पंज वर डिश वॉश लिक्विड घालून हवे तसेच स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्याने पूर्ण सिंक धुऊन घ्या सिंक स्वच्छ आणि निर्जंतुक होण्यास मदत होईल.

काही महत्त्वाच्या टिप्स:kitchen cleaning tips

1. फ्रिज मध्ये काही पदार्थांचा वास येऊ नये म्हणून त्यात लिंबू कापून ठेवावे.

2. आठवड्यातून एकदा तरी फ्रिजची स्वच्छता करावी. फ्रीजला आत मधून व्हिनेगार ने साफ करावे त्यामुळे कुठलाही प्रकारचा वास न येता त्यातील घाणही पटकन स्वच्छ होते.

3. रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा व गॅस स्वच्छ करूनच घ्यावे त्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत.

4. किचन मधील टाइल्स वरील जुने डाग काढण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावून ठेवावा आणि 15 मिनिटांनी कापडाने स्वच्छ करावे.

5. किचनचे सिंग तुंबले असेल तर मोकळं करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाकावे.

6. आठवड्यातून एकदा चॅपिंग बोर्ड ला व्हिनेगर लावून स्वच्छ करा.

7. किचनची स्वच्छता आठवड्यातून एकदा तरी करावी तसेच वरचेवर हात लागणाऱ्या वस्तू स्वच्छ करत राहाव्यात. हात लागतील असे डबे, पोळपाट लाटणे नियमित स्वच्छ करावे.

8. मॉड्युलर किचन मधील ड्रॉवर्स, रेक्स मायक्रो फायबर कापडाने स्वच्छ करावेत त्यामुळे ड्रॉवर्स ला चिरे पडणार नाहीत.

9. किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी लादी पुसताना त्यात थोडे मीठ घालावे.

10. किचन मधील लाकडी सामान आणि काही लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा विनेगर चा वापर करावा.

11. चाकू धारदार वस्तू नेहमी एकच ठिकाणी ठेवा नाही तर त्या गंज पकडून खराब होऊ शकतात.

12. किचन मधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ ठेवावा. नियमित धुवून निर्जंतुक करावा. कचरा पेटीत वापरण्यात येणारी पिशवी रोज बदला.

13. भाज्या चिरल्यानंतर वापरलेला चाकू किंवा वेळा स्वच्छ धुवूनच ठेवावा.

14. सर्व प्रकारचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन आणि कोरडे झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवावे

15. बऱ्याच वेळेला किचन आवरल्यानंतर अस्वच्छ कापड नळाखाली धुवून आपण सुकायला ठेवतो त्याऐवजी ते डिटर्जंट बार ने स्वच्छ करून मगच वाळवावे त्यामुळे कापड निर्जंतुक होऊन इतरत्र जंतू पसरत नाहीत.

16. अन्न शिजवलेली रिकामे किंवा खरकटी भांडी रात्रभर न घासता तशीच ठेवत असाल तर ती तात्पुरती विसळून पालथी घालून ठेवावी त्यामुळे किड्यांचा वावर कमी होण्यास मदत होते.

17. किचनचे बेसिन साफ करण्यासाठी आपण लिंबाच्या सालीचा ही वापर करू शकतो लिंबाची साल त्यावर वॉशिंग पावडर शिंपडून स्वच्छ करा आणि बेसिन ला घासले तर मेहनत थोडी कमी लागेल. आणि बेसिन चमकू लागेल.

18. ओली भांडी पुसण्यासाठी तसेच किचनची स्वच्छता करण्यासाठी आपण जे कापड वापरतो ते नियमित धुतले गेले पाहिजे.

19. भांडी घासण्यासाठी जो स्पंज वापरला जातो तोही रोज स्वच्छ केला पाहिजे त्यामुळे त्यावरील बॅक्टेरिया राहणार नाही तसेच ठराविक काळाने तो बदलला पाहिजे.

20. किचन मध्ये ठेवलेल्या मायक्रोवेव स्वच्छ करणे फार महत्त्वाचे आहे कारण आतील भागांमध्ये बॅक्टेरिया लवकर तयार होतात त्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घेऊन मायक्रोवेव ला चालू करून पाच मिनिटे ठेवा आणि आता मायक्रोवेव्ह बंद करून पेपर टॉवेलने आतमधील सगळे भाग स्वच्छ करा.

वरील टिप्सचा वापर करून आपण रोजच्या वापरातील स्वच्छता आणि घर नीटनेटके ठेवण्यास मदत होऊ शकते तसेच किचनची स्वच्छता ठेवू शकतो त्यामुळे आपला मूड ही फ्रेश राहण्यास मदत होईल. प्रत्येक वस्तू वेळेत आवरायला हव्यात नाहीतर स्वच्छता हाताबाहेर ही जाऊ शकते त्यामुळे वरील टिप्सचा अवलंब नक्की करावा.

(KITCHEN CLEANING TIPS AND TRICKS)अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी आणि माहिती नक्की तुमच्यापर्यंत पोहचवत राहु. त्यासाठी lekhakmitra.com या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत पोचवायला विसरू नका त्यासाठी आमच्याwhatsapp channel ला भेट द्या. धन्यवाद!!

1 thought on “  किचन स्वच्छ ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स l”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top