जगातील  दहा मोठे गोड्या पाण्याचे सरोवरl Ten freshwater lakes in the world

WhatsApp Group Join Now

पृथ्वीवर पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पाणी म्हणजेच जीवन आहे. पाण्या शिवाय जीवन अशक्य आहे. म्हणूनच निसर्गाने विविध प्रकारचे पाण्याचे स्त्रोत तयार केलेले आहेत.पृथ्वीवर पिण्याचे पाणी विविध स्वरूपात आढळून येते. पिण्याचे पाणी म्हणजेच गोड्या पाण्याचे स्त्रोत अनेक ठिकाणी आढळतात. पृथ्वीवर फक्त समुद्राचे पाणी पिण्याकरता वापरल्या जात नाही, कारण ते खारे पाणी असते.गोड्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे मुख्यतः नदी हेच असते. त्यानंतर अनेक प्रवाह, तलाव ,नाले, सरोवर यामध्ये गोडे पाणी आढळते.

जगातील  दहा मोठे गोड्या पाण्याचे  सरोवर, Ten main freshwater lakes in the world या लेखांमध्ये आपण सरोवर म्हणजे काय व जगातले दहा मोठे गोड्या पाण्याचे सरोवर यांची माहिती पाहू.

सरोवर म्हणजे काय?–सरोवर हे नदी किंवा समुद्रापासून दूर असलेला मोठा पाण्याचा साठा होय. सरोवर हे निसर्गनिर्मित असतात. सरोवरे संपूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात. तळ्यांपेक्षा त्यांचा आकार मोठा असतो. सरोवर नेहमी संथ असतात. बहुतांश सरोवर गोड्या पाण्याचे असतात. पण काही सरोवर खाऱ्या पाण्याचे सुद्धा आहेत.

सरोवर कसे तयार होतात?–काही प्रवाही हिमनद्या जमिनीवर खनन कार्य करत पुढे जातात. अशा ठिकाणी मोठा खळगा तयार होतो. त्यात पाणी साठले की त्याचे सरोवर तयार होते.चुनखडी ज्या प्रदेशात असते तेथील चुना  पावसाच्या पाण्याच्या आम्लामुळे विरघळला जातो व तिथे काही गुहा तयार होतात. या गुहांचे छत कोसळले की तिथे मोठा खड्डा पडतो व पावसाचे पाणी साठून तिथे सरोवर तयार होतात.

नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्या खालच्या टप्प्यात उताराच्या ठिकाणी नागमोडी वळणे तयार होतात. यावेळी नदीने आपले पात्र बदलले की तिथे मोठा खड्डा तयार होऊन सरोवर तयार होते.भूकवचातील अनेक हालचालींमुळे सुद्धा सरोवर तयार होते.आता आपण जगातील दहा मुख्य गोड्या पाण्याच्या सरोवरांची माहिती बघूया.

१) लेक सुपेरिअर—पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार जगातील सगळ्यात मोठे सरोवर आहे. हे सरोवर कॅनडामध्ये आहे. अमेरिकेतील मिनीसोटा, विस्काॅन्सिन व मिशिगनच्या सीमेवर आहे. या सरोवरात जगातील सर्वात ताजे पाणी आढळते. हे सरोवर सेंट मेरीज नदीतून लेक ह्यूरोन मध्ये वाहून जाते. त्यातून सेंट लेग नदीद्वारे अटलांटिक महासागरात जाते. सरोवराचा बराच चा किनारा अनियमित आहे. त्यामुळे तिथे अनेक द्वीप तयार झालेले आहेत. सरोवराचा परिसर खडकाळ व अनेक नैसर्गिक संसाधनांनी उपयुक्त असा आहे. सरोवराच्या मिशिगन राज्यातील किनाऱ्यावर काही वालुकाश्म खडक भिंती सारखे उभे आहेत. सरोवराला २०० नद्या मिळतात.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–८२४०० किलोमीटर

सरासरी खोली–१४७मी

कमाल खोली –४०६मी

पाण्याची घनता–२९०० घन किलोमीटर

उंची –१८०मी

किनाऱ्याची लांबी-४३८५ किलोमीटर

२) लेक विक्टोरिया–हे सरोवर आफ्रिका खंडातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा साठा आहे. केनिया टांझानिया व युगांडा या देशांमध्ये हे सरोवर पसरलेले आहे… हे सरोवर आफ्रिकेतील पूर्व राज्यांना जोडणारे मुख्य वाहतूक केंद्र आहे. या सरोवरातील पाणी औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी वापरले जाते. जॉन हॅनिंग स्पीक यांनी हे सरोवर शोधून काढले व राणी विक्टोरिया चे नाव त्याला दिले. जगातील सर्वात मोठे उष्ण कटिबंधीय सरोवर आहे. हे सरोवर शेवटी नाईल नदीस जाऊन मिळते. या सरोवरा मध्ये 200 हून अधिक माशांचे घर आहे. जो आजूबाजूच्या लोकांसाठी उत्पन्नाचा स्त्रोत आहे.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–६८६०० किलोमीटर

सरासरी खोली–४०मी

कमाल खोली –८४मी

पाण्याची घनता–२७५० घन किलोमीटर

उंची –११३३मी

किनाऱ्याची लांबी-३४४० किलोमीटर

 ३) लेक मिशीगन—उत्तर अमेरिकेतील हे सर्वात मोठे सरोवर आहे. . मिशिगन, इंडियना इलिनॉय आणि विस्कॉन्सिन मधून पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरले आहे.त्याच्याभोवती शिकागो आणि मिलवॉकी हे शहर आहेत. मिशिगन सरोवराच्या उत्तर भागात अनेक वाळूचे ढिगारे आहेत. किनाऱ्या जवळच्या अनेक ठिकाणी वाळूचे ढिगारे सरोवराच्या पृष्ठभागापासून कित्येक फूट वरती येतात. अमेरिकेमध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान या ढिगार्‍यांची रचना दाखवण्याकरता तयार केलेले आहेत. इंडियन ड्यून्स नॅशनल पार्क, इलिनॉय स्टेट बीच पार्क, पॉईंट बीच स्टेट फॉरेस्ट असे अनेक पार्क तिथे तयार केले गेले आहेत. ग्रँड कलामाझू आणि सेंट जोसेफ या नद्या सरोवरात प्रवेश करतात. सरोवराच्या उत्तर टोकाला बरेच बेट आहेत. विविध कारणांमुळे या सरोवरांमध्ये पोहणे खूप कठीण आहे. त्याचा तळ असमान आहे.

क्षेत्रफळ–५८३०३ वर्ग किलोमीटर

 पाण्याची घनता–४८०० घन किलोमीटर.

सरासरी खोली–८५मी

कमाल खोली –२८१मी

उंची –१७६मी

किनाऱ्याची लांबी–२३०० किलोमीटर

४) लेक बैकल—हे जगातील सर्वात जुने आणि सर्वात खोल सरोवर आहे. हे सरोवर रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये आहे. . यात गोड्या पाण्याचा साठा२३६१५० घन किलोमीटर आहे. . पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आकारमानाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे सरोवर आहे. जगातील सर्वात जुने आणि सर्वात खोल असे हे सरोवर आहे. सोळाशे त्रेचाळीस सा*ली पहिला रशियन बैकल सरोवराजवळ पोहोचला. तोवर रशियाला त्याची माहिती नव्हती. बायकल सरोवरामध्ये १७०० प्रकारचे जीव जंतू आढळतात. जानेवारीपासून मे पर्यंत बायकल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. या काळामध्ये त्याच्या जाड थरावरून वाहनांना सुद्धा चालवता येतात. या सरोवराच्या पाण्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आहे.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–३१७२२ किलोमीटर

सरासरी खोली–७४४मी

कमाल खोली –१६४२मी

पाण्याची घनता–२२३६१५ घन किलोमीटर

उंची –४५५मी

किनाऱ्याची लांबी-२१००किलोमीटर

५) लेक ह्यूरोन– हे सरोवर उत्तर अमेरिकेत आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे.. या सरोवराचा काही भाग कॅनडामध्ये आहे. . लेक सुपेरिअर आणि लेक मिशिगन या सरोवरामधून ह्यूरोन मध्ये पाणी येते. एप्रिल ते डिसेंबर पर्यंत इथे जहाजांची ये जा चालू असते. या सरोवराच्या किनारापट्टीवर तीस हजारहून अधिक बेटे आहेत.

या सरोवराचे पाणी अतिशय स्वच्छ आहे व वेगवेगळ्या प्रकारचे मासे या सरोवरात आढळतात. सरोवराच्या उत्तर  भागात लहान लहान द्वीप पण आहेत. याचे मुख्य प्रवेशद्वार सेंट मेरीज नदी आहे. तर सेंट क्लेअर नदीमध्ये त्याचे पाणी जाते. या सरोवराचा पृष्ठभाग ५७७ किलोमीटर समुद्रसपाटीपासून उंच आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य मॅनीटोलिन बेट आहे.  जॉर्जियन खाडीला लेक ह्यूरोन पासून वेगळे करते ते जगातील एकमेव सरोवर बेट आहे. Ten main freshwater lakes in the world 

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५९६०० किलोमीटर

सरासरी खोली–५९मी

कमाल खोली –२३०मी

पाण्याची घनता– ३५४०घन किलोमीटर

उंची–१७६मी

किनाऱ्याची लांबी –६१५६ किलोमीटर

६) ग्रेट बेअर सरोवर—हे कॅनडामध्ये सर्वात मोठे सरोवर आहे. कॅनडाच्या बोरियल जंगलात ते सामावलेले आहे. जगात आठव्या क्रमांकावर आहे.सीमा नद्यांपासून हा तलाव तयार झालेला आहे. हे सरोवर आर्टिक सर्कल जवळील कॅनडाच्या वायव्य प्रदेशात स्थित आहे.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–३११५३ चौरस किलोमीटर

सरासरी खोली–७१.७मी

कमाल खोली –४४६मी

पाण्याची घनता–२२३४ घन किलोमीटर

उंची–१५६मी

किनाऱ्याची लांबी – २७१९किलोमीटर

या सरोवरातून ग्रेट बेअर नदी येथे पाणी वाहून जाते.

७) लेक मलावी–हे सरोवर आफ्रिका खंडात स्थित आहे. त्याला न्यासा असेही म्हणतात. आफ्रिकेतील तिसरे मोठे सरोवर आहे.आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर टांझानिया, मलावी आणि मोजंबीक यामध्ये पसरलेले आहे. या सरोवराला गौरवशाली इतिहास आहे. हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. या सरोवरात अनेक माशांच्या प्रजाती आढळतात. सागरी प्राण्यांचे जतन या तलावात केले जाते. या सरोवरातून 80 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. सरोवराचे पाणी खूप स्वच्छ असते. तसेच खारे असते.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–२९६०० चौरस किलोमीटर. 

सरासरी खोली-२९२मी

कमाल खोली–७०६मी

पाण्याची घनता–८४०० घन किलोमीटर

उंची–४६८मी

८) ग्रेट स्लेव लेक–हे सरोवर कॅनडातील दुसरे मोठे सरोवर आहे. कॅनडातील नॉर्थ वेस्ट टेरिटरी या भागातील दक्षिण बाजूला हे सरोवर आहे. सरोवराच्या दक्षिण भागात स्लेव्ह इंडियन्सचे वास्तव्य होते. त्यावरूनच या सरोवराला नाव देण्यात आले आहे. या सरोवरापर्यंत पोहोचणारे पहिली व्यक्ती होती सॅम्युअल हर्न. या सरोवराच्या आजूबाजूला फर व्यापारांची अनेक ठाणी होती. .त्यानंतर त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवसाय तयार करून देण्यात आला. अनेक नद्यांच्या माध्यमातून तलावाला पाणीपुरवठा होतो. येलो नाईस आणि स्लेम नदीतून या सरोवराला पाणीपुरवठा होतो. या सरोवराद्वारे आणि केंसी या दोन नद्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. वर्षात आठ महिने हे सरोवर गोठलेले असते. या सरोवरात मत्स्यव्यवसाय चालतो.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–२८,६०० चौरस किलोमीटर

सरासरी खोली-४१मी

कमाल खोली–६१४मी

पाण्याची घनता–१०७० घन किलोमीटर

उंची–१५६मी

किनाऱ्याची लांबी–३०५७ किलोमीटर

९) लेक टांगानिका–हे आफ्रिकेतील एक भव्य सरोवर आहे.

हे सरोवर बुरुंडी, टांझानिया कांगो व झांबिया या चार देशात विभागले गेले आहे.. या सरोवराच्या नावाचा अर्थ आहे सपाट पसरलेले महान सरोवर. सर्वात लांब गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर शेवटी कॉंगो नदीतून अटलांटिक महासागरात वाहून जाते. या सरोवरातील पाणी अल्कधर्मी आहे. या पाण्यामध्ये फारसा ऑक्सिजन नाही त्यामुळे मासे व इतर जलचर प्राणी सापडत नाहीत. सरोवराच्या पाणथळ प्रदेशात मगरींसारखे प्राणी आढळतात. माशांना खाणारी पाण्यातील कोब्रा्याची जात फक्त टांगानिका सरोवरात आढळते. आफ्रिका खंडातील सर्वात ताजे पाणी या सरोवरात आढळते.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–३२९०० चौरस किलोमीटर

सरासरी खोली–५७०मी

कमाल खोली–१४७०मी

पाण्याची घनता–१८७५० घन किलोमीटर

उंची –७७३मी

किनाऱ्याची लांबी–१८२८ किलोमीटर

१०) लेक एरी—हे उत्तर अमेरिकेतील, पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचे सरोवर आहे. या सरोवराचा सगळ्यात खोल बिंदू समुद्रसपाटीपासून उंचावर आहे. या सरोवरामध्ये खूप जैवविविधता आढळते. या तलावाचे पाणी उबदार आणि कमी खोलगट आहे. या तलावाच्या सीमा मिशिगन ऑहिओ, पेनिनसिल्विया न्यूयॉर्क आणि कॅनडामधील ऑन्टारिओ या भागाला जोडलेल्या आहेत. या तलावाच्या पाण्यामध्ये खूप खनिजे आढळतात. या सरोवरामध्ये जलविद्युत तयार केली जाते. यातून कॅनडा आणि अमेरिका देशाला वीज पुरवली जाते.

पृष्ठभागाचे क्षेत्रफळ–९९१० चौरस किलोमीटर

सरासरी खोली–१९मी

कमाल खोली–६४मी

पाण्याची घनता–४८० घन किलोमीटर

उंची –१७३मी

किनाऱ्याची लांबी–१२८६किमी

जगातील दहा मोठे गोड्या पाण्याचे सरोवर,Ten main freshwater lakes in the world,In Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला, हे नक्की सांगा. याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला जरूर भेट द्या व प्रतिक्रिया द्या. आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. आमचे व्हाट्सअप चॅनेल नक्की जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top