उन्हाळ्यातील तीव्र लाटेपासून स्वतःचे रक्षण कसे करावे How to protect yourself from Heatwaves in Summer

WhatsApp Group Join Now

जागतिक तापमान वाढत असल्याने, उन्हाळ्यात कडक उष्णतेच्या लाटांची समस्या आता जगभरात सर्वत्र दिसून येते आहे. ही उष्णतेची लाट आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करत आहे. उष्णतेच्या लाटांपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आपण या लेखात उन्हाळ्याच्या तीव्र लाटेपासून स्वतःचे रक्षण कसे करावे ते पाहणार आहोत.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उष्णतेची लाट म्हणजे उन्हाळ्यात तापमानात होणारी अचानक आणि तीव्र वाढ. या लाटेमुळे तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त असते आणि अनेक दिवस राहते. या वाढत्या तापमानासोबत वातावरणात दमटपणा असतो. यामुळे आपल्याला खूप उष्णता जाणवते. उष्णतेच्या लाटांमध्ये दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा तापमान खूप जास्त असते.

उष्णतेच्या लाटेचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाऊ शकते, तर काही ठिकाणी ते ३५ अंश आपल्या सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

वाढत्या तापमानामुळे आपल्या शरीरामध्ये आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकते जसे की:

·       निर्जलीकरण( Dehydration): डिहायड्रेशन तेव्हा होते जेव्हा आपल्या शरीर जेवढे द्रवपदार्थ घेते त्यापेक्षा जास्त द्रव गमावते. उष्णतेच्या लाटेत, जर आपण आपल्या शरीरात पुरेसे द्रव भरले नाही तर जास्त घाम येणे मुळे निर्जलीकरण होऊ शकते. अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, थकवा येणे, चक्कर येणे आदी निर्जलीकरण( Dehydration) चे लक्षणे आहेत॰

·       थकवा आणि कमजोरी: उष्णतेमुळे शरीरावर होणारा ताण सहन करण्याची क्षमता कमी झाल्यावर उष्णतेचा थकवा जाणवतो. अत्यधिक घाम येणे, कमजोरी, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळने  उलट्या होणे आदी लक्षणे आहेत॰

·       उष्माघात (Heat Storke): उष्माघात हा उष्णतेशी संबंधित आजाराचा सर्वात गंभीर प्रकार आहे. जेव्हा शरीराचे तापमान 103 अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त वाढते तेव्हा आणि ते नियंत्रित करणे शरीराला अशक्य होते. उष्णतेचा झटका हा प्राणघातक देखील ठरू शकतो, त्यामुळे तात्कालीन वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.शरीराचे तापमान खूप जास्त असने, वाढलेला हृदय गती, चक्कर येणे, गोंधळ आणि बेशुद्ध होणे ही लक्षणे आहेत.

उष्णतेमुळे आजार कोणालाही होऊ शकते. वृद्ध लोक, लहान मुले, गर्भवती महिला , दीर्घकालीन आजार असलेले लोकांना याचा जास्त धोका असतो. असे लोकांनी  उष्णतेच्या वातावरणात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक टिप्स

या कडक उन्हाळ्यात आपण आणि आपल्या प्रियजनां सुरक्षित राहवेत,  यासाठी आवश्यक टिप्स येथे दिले आहेत-

·       हायड्रेटेड रहा (Stay Hydrated): दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि निर्जलीकरणापासून दूर रहा॰ तहान लागण्याची वाट पाहू नका. दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहिले पाहिजे. पाण्याच्या पर्यायी निवडा , जसे की लिंबू सरबत (Limbu Sarbat), नारळ पाणी ( Coconut Water), ताक (Buttermilk) आदि हायड्रेटेड रहेणेसाठी मदत करते. तरबूज (Watermelon), खरबूज ( Muskmelon), संत्रा (Santra) यासारखी फळांचे सेवन  केलेने पाण्याचा चांगला स्रोत आपल्या शरीराला हायड्रेटेड राहणेसाठी उपयुक्त ठरूशकतो. कॅफीन आणि मद्य सारखे पदार्थ आपले शरीरातील पाणी कमी करतात, म्हणून उष्ण वातावरणात यांचे सेवन टाळे पाहिजे. आपण बाहेर जाताना किंवा प्रवास करताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेलिपाहिजे. यामुळे आपण दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहू शकतो. निर्जलीकरणचे लक्षणे दिसले वर किंवा वाढत असल्यास तात्कालीन वैद्यकीय मदत घ्याला पहिजे.

·       थंड राहा (Stay Cool):- उन्हाळ्यात थंड राहणे खूप महत्वाचे आहे. उष्णतेमुळे शरीराला त्रास होऊ शकतो आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतो. घरात किंवा कामाच्या ठिकाणी एरकंडिशनर किंवा पंखा वापरून थंड राहू शकतो. घरातून बाहेर पडताना सोबत छत्री किवा टोपी आणि गॉगलचा  वापर करायेला पाहिजे॰ दुपारच्या वेळी, जेव्हा उष्णता जास्त असते, तेव्हा थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे टाळावे. घरी राहणे किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्यावे॰ दिवसाच्या वेळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुम्हाला तात्कालीन थंडावा मिळू शकते.

·       योग्य कपडे घाला:- उन्हाळ्यात, आपण असे कपडे निवडले पाहिजेत जे आपल्याला थंड आणि आरामदायी ठेवतील जसे की सुती कपडे, लिनेन (Linen).  उन्हाळ्यात पांढरे  रंगाचे  किंवा हलके रंगाचे कपडे परिधान करणे कधी ही चांगळे कारण आसे कपडे उष्णता परावर्तित करतात आणि आपल्याला थंड ठेवण्यास मदत करतात. काळे किंवा गडद रांगा चे कपडे शयक्तों घालणे टाळावे. सैल आणि आरामदायी कपडे निवडावे जेणेकरून आपल्याला हालचाल करण्यास त्रास होणार नाही. जास्त घट्ट कपडे परिधान करणे टाळावे.  जास्त घट्ट कपडे गरम आणि अस्वस्थ करू शकतात.

·       कठीण व्यायामा करणे टाळावे :- उन्हाळ्यात अति उष्णतेमध्ये व्यायाम केल्याने आपल्या शरीरावर ताण येऊ शकतो आणि उष्णतेशी संबंधित आजार जसे की  थकवा किंवा उष्माघात होण्याचा धोका वाढायेची शक्यता असतो. आपण जर फिटनेस उत्साही असल्यास तर , घराबाहेर व्यायाम करण्याऐवजी योग, पिलेट्स किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारख्या इनडोअर ॲक्टिव्हिटी निवडू सकता.

·       आपल्या त्वचेचे रक्षण करा:- उन्हाळ्याच्या कडक सूर्यप्रकाशापासून स्वतःचे त्वचेचे रक्षण करणे खूप महत्वाचे आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे सनबर्न (Sunburn) होयू शकतो. यामुळे आपल्या शरीराचे तापमान  वाढू शकते आणि आपल्याला आणखी गरम वाटू शकते. घरा बाहेर पडणे आधी नेहमी आपल्या त्वचेला  उच्च SPF रेटिंग असलेले सनस्क्रीन लावावी यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेला रक्षण मिळतो. आपल्या चेहरा, मान, हात आणि पाय यासह सर्व उघड्या त्वचेवर सनस्क्रीन लावावी. आपल्या चेहरा आणि डोळे उन्हापासून वाचवण्यासाठी रुंद-काठी असलेली टोपी आणि सनग्लासेस घालावी.

·       आपल्ये प्रियजनांची काळजी घ्या:- उष्णतेच्या लाटेत काही लोकांना उष्णतेमुळे होणारे आजार होण्याचा जास्त धोका असतो॰ आपल्या घरा मध्ये जर कोणी वृद्ध लोक, लहान मुले, गर्भवती महिला आणि पाळीव प्राणी सकेल तर, त्यांच्या तबियती वर  नियमित लक्ष ठेवावे  आणि ते थंड आणि पुरेसे  पाणी पिले आहेत की नाही याची खात्री करायला पाहिजे॰ उष्णतेशी संबंधित आजाराच्या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि  आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्याला पाहिजे.

·       हवामान अंदाजाचे निरीक्षण करा:- हवामान विभाग उष्णतेचे सल्ले, चेतावणी किंवा उष्णतेच्या लाटेच्या  परिस्थितीची मौल्यवान माहिती देतात. हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन आणि उष्णतेच्या सल्ल्यांची, चेतावण्यांची आणि निरीक्षणांची माहिती समजून घेऊन आपण उष्णतेच्या लाटेशी सामना करण्यासाठी योग्य ती तयारी करू शकतो आणि अशा वेळी बाहेर पडणे टाळणे पाहिजे  आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करायला पाहिजे.

निष्कर्ष

उन्हाळा हा आनंददायी हंगाम असू शकतो, पण वाढत्या उष्णतेमुळे काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेसाठी योग्य तयारी करून आणि दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण आपल्या आणि आपल्या प्रियजनांचे आरोग्य सुरक्षित ठेयू शकतो. पुरेसे पाणी प्या, थंड रहा, बाहेरच्या क्रियाकलाप कमी करा आणि ज्येष्ठांची काळजी घ्या. वर वर्णन केलेल्या अति उष्णतेच्या लाटांची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या सोप्या उपाय योजनांचा अवलंब करून आपण उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकता आणि निरोगी राहू शकता.

तुम्हाला  “उन्हाळ्यातील तीव्र लाटेपासून स्वतःचे रक्षण कसे करावे How to protect yourself from Heat waves in the Summer” या बद्दलची माहिती कशी वाटलीते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. याचा लाभ घेण्यासाठी आमच्या लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

धन्यवाद !                 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top