उन्हाळ्यात धान्याची साठवण कशी करावी? (How to store food grains in summer)

WhatsApp Group Join Now

बरेच लोक उन्हाळ्यात गहू आणि इतर धान्य साठवून ठेवतात काही शेतकरी देखील उरलेले धान्य घरी साठवतात त्यासाठी वर्षभर धान्य कशाप्रकारे साठवून ठेवावीत ते आपण या लेखात बघणार आहोत. गहू ,तांदूळ, डाळी या वर्षभर साठवून ठेवण्यासाठी नक्की काय उपाययोजना करावी तर ती व्यवस्थित राहतील तर महत्त्वाचं म्हणजे गहू आणि डाळी या चांगल्या प्रतीच्या उच्च दर्जाच्या खरेदी कराव्यात, तसेच हे धान्य ओलसर तर नाही ना याची खात्री करायला हवी त्यासाठी त्या चांगल्या उन्हात वाळवाव्यात. हे धान्य जर दमट असेल तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी चला जाणून घेऊया काही घरगुती उपाय ज्यामुळे आपली कडधान्य, धान्य कीटकांपासून सुरक्षित राहू शकेल… निर्णय आहे क्या

धान्य वाळवताना महत्त्वाचं म्हणजे काही धान्य दाताखाली चावून त्याचा कडकपणा जाणून घ्यावा दाना कसा फुटतो यावर त्याचा कडकपणा चा अंदाज येतो धान्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षा जास्त कधीच नसावे.

धान्य साठवण्यासाठी काही उपाय:-(tricks and tips to store food grains in summer)

1.उन्हात धान्य वाळविणे: धान्य उन्हात वाळवणे ही पूर्वापार चालत आलेली एक परंपराच आहे. आधी धान्य वर्षातून एकदाच खरेदी करत असायचे त्यामुळे त्याची सुरुवात मार्च ते मे पर्यंत असायची. त्यामुळे ती एकदाच घेतल्यानंतर चांगली उन्हात खणखण वाळेपर्यंत उन्हातच राहायची. आता मात्र वर्षभर धान्य दुकानात मिळत असल्याने आणि दोघेही नोकरीत व्यस्ततेमुळे धान्याची काळजी करू शकत नाही. पर्यायाने हा उपाय अवलंबल्या जात नाही. परंतु धान्य उन्हात वाळवणे हे आजही इतर पर्यायांपेक्षा सरस पर्याय आहे. चांगले तीन-चार दिवस धान्य उन्हात दाखवून मगच भरून ठेवावे. त्यामुळे धान्य लवकर खराब होणार नाही तांदळाला मात्र ऊन दाखवू नये ते घरातच मोकळ्या जागेत ठेवावे. गहू ,डाळी आणि कडधान्य मात्र उन्हात वाळू शकतो त्यामुळे कोणत्याही ऋतूत ते खराब होणार नाहीत.

2. धान्य खरेदी करताना रहा सावध: धान्य जास्त प्रमाणात खरेदी केले तर ते स्व या भ्रमात न राहता धान्याच्या गुणवत्ते कडे लक्ष देणे जरुरी असते. बऱ्याचदा अशा फसवणूक होण्याची शक्यता असते त्यामुळे खात्रीशीर दुकानातूनच खरेदी करावी आणि चांगल्या गुणवत्तेचे धान्य खरेदी करावे तरच ते वर्षभर टिकू शकेल. यासाठी नवीन धान्याची आपण खरेदी करतो ते धान्य काही महिन्यात साठवून ठेवल्यानंतर वापरासाठी काढण्यात येते त्यामुळे दमटपणा, ओलसरपणा धान्यांमध्ये नसावा आणि धान्य ठेवण्याची जागा ही हवेशीर असावी.

3. कडुलिंबाच्या पाल्याचा वापर: धान्य चांगले वाळवून घेतल्यानंतर ते लोखंडी किंवा प्लास्टिकच्या कोठीमध्ये आपण भरून ठेवतो तर त्यावेळेस भरताना कोठीचा व्यास लक्षात घेऊनच कडुनिंबाचा पाला वापरावा त्यामुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण तर फारच कमी होते. हा पाला टाकताना तो किडलेल्या तर नाही आणि तो सुका असावा. नवीन पालवीचा यावर जास्त परिणामकारक ठरतो. तसेच कोठीच्या एकदम बुडाशी मधल्या भागात असे दोन-तीन थर पाल्याचे वापरावेत.

4.बोरिक पावडर चा वापर: तांदूळ उन्हात वाळवता येत नाही त्यामुळे आपण तांदळासाठी बोरिक पावडर चा वापर करावा त्यामुळे तांदळात कुठल्या ही प्रकारचे जाळे किंवा अळ्या लागत नाहीत. तांदूळ साठवताना ते मोठ्या भांड्यात काढून हलक्या हाताने बोरिक पावडर चोळणे गरजेचे असते बाजारात मिळणाऱ्या 30 किलोच्या तांदुळाच्या गोणी साठी 100 ग्रॅम बोरिक पावडर पुरेसे ठरू शकते मात्र वापरताना दोन-तीनदा पाण्याने धुवूनच स्वच्छ करून नंतर वापरावेत. गहू ज्वारी आणि बाजरी साठी बोरिक पावडर वापरू नये कारण ते धान्य आपण सरळ दळून आणतो त्यामुळे ते धुणे शक्य नसते. बोरिक पावडर चा परिणाम झाल्यामुळे किडनी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

5. धान्यात(Fumigant) वायूचा वापर: आजकाल मेडिकल मध्ये धान्य ठेवण्यासाठी इंजेक्शन्स मिळतात. तर ते कसे वापरावे यासाठी धान्याच्या कोठीचा वरचा भाग हलकासा उघडून त्यात ती इंजेक्शन रोवली जातात. आणि कोठीला हवाबंद झाकणाने बंद करावे इंजेक्शन मधील रासायनिक द्रव्याचे वायूमध्ये रूपांतर होते आणि तो वायू पूर्ण कोठी मध्ये दळवळला जातो त्यामुळे कीड लागलेली असेल तेही मरून जाते आणि कीड मात्र होत नाही. मात्र ही पद्धत वापरणे त्याचा आहे कारण त्यामधून निघणारा वायू धान्यात शोषला जातो आणि पोटात जाण्याचा धोका असतो. आणि हा वायू शरीरासाठी घातक ठरला जातो.

याशिवाय बऱ्याचशा काही पद्धती वापरून आपण धान्य साठवण करू शकतो जसे की…….

(How to store grains in summer)

1. लसणाच्या पाकळ्या किंवा ओल्या अद्रकाचे कंद धान्यात ठेवणे.

2. साधे खडे मीठ वापरणे.

3. धान्य साठवणूक करण्यासाठी हळद वापरणे.

4. धान्यात कापराच्या वड्या ठेवणे.

5. तुळशीच्या बियांचा वापर धान्य साठवणुकीसाठी करणे.

6. धान्य साठवणुकीसाठी कडुनिंबाचे तेल, एरंडेल तेल सुद्धा वापरतात.

7. धान्याला कीड लागू नये म्हणून आगपेटीच्या काड्यांचा वापर केला जातो.

8. बऱ्याचदा लवंग आणि तेज पत्ता धान्याला कीड लागू नये म्हणून डाळींमध्ये, तांदळामध्ये ठेवला जातो.

9. वर्तमानपत्राचे बारीक तुकडे करून धान्यात ठेवू शकतो.

10. मोठमोठ्या धान्यासाठी, किंवा गोदाम मध्ये गोवरी च्या राखेचा उपयोग धान्याचे संरक्षण करण्यासाठी केला जातो.

धान्य साठवणुकीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे:(How to store grains in summer)

1. धान्य साठवण्यासाठी लोखंडी कोठी ऐवजी प्लास्टिकच्या कोठीचा वापर केल्यास ते हवाबंद असल्यामुळे विविध प्रकारच्या कीड त्यात लागू शकत नाहीत.

2. लोखंडी कोठीचा वापर करत असताना ती धुवून घेऊन दोन-तीन दिवस उन्हात सुकू द्यावी. त्यामुळे कोठी त लपून बसणारे कीटक मारले जातात.मगच त्यात धान्य भरावे.

3. कोठी त धान्य दाबून भरावे.

4. कोठीतून वरचेवर धान्य काढू नये.

5. धान्य काढताना ओलसर भांडे चुकूनही वापरायचे नाही.

6. धान्य साठवण्याची जागा अडगळीची नसावी. ती स्वच्छ आणि हवेशीर असावी.

दर पंधरा दिवसांनी धान्याची तपासणी करावी.

7. धान्य साठवण्यासाठी डबे किंवा इतर डबे वापरत असताना तिथे आसपास कोळसा ठेवल्याने हवामानातील आर्द्रता खेचून घेतली जाते आणि धान्याला वास लागत नाही.

8. मोठमोठ्या ठिकाणी धान्याच्या गोदामामध्ये, कोठी ला सतत हाताळत नाहीत. वारंवार हात लावल्यानेही धान्य खराब होऊ शकते. त्यामुळे हवेशीर ठिकाणी मुंगी किंवा कीटकांचा वावर होऊ नये म्हणून ती जागा निर्जंतुक करून स्वच्छ ठेवावी.

9. घरात आलेलं नवीन धान्य आणि जुने धान्य कधीच एकत्र ठेवू नये. केल्याने ही कधीकधी कीड लागण्याची शक्यता उद्भवू शकते.

10. प्लास्टिकच्या गोण्या मध्ये कधीही जास्त प्रमाणात धान्य ठेवू नये. जर त्यांचा पुनर्वापर करायचा असेल तर1% मेलोथियन च्या मिश्रणात 10 ते 15 मिनिटे हे पोते बुडवून नंतर स्वच्छ करून कोरडं करून घ्यावं त्यानंतर गहू किंवा धान्य साठवावी. त्यामुळे धान्याला किड लागण्याची शक्यता नसते.

…आता तर धान्य साठवणुकीसाठी काही आधुनिक पद्धती ही उपलब्ध झालेल्या आहेत जसे की सौरऊर्जेवर चालणारी सयंत्रे यांचा वापर करून आपण धान्य वाळवून ठेवू शकतो. धान्य रक्षणासाठी भाभा अनु संशोधन केंद्र गॅमा किरणावर चालणारी एक पद्धत विकसित केलेली आहे या किरणांचा वापर धान्यावर करून किरणांच्या तीव्रतेमुळे धान्य चार ते पाच मिनिटात तापले जाते जे तापण्यासाठी सात ते आठ तास सूर्यकिरण लागू शकतात. ते काम काही सेकंदामध्ये किंवा मिनिटात केले जाते. सौर शक्तीचा वापर करून आपण धान्य सुरक्षेचा मार्ग अत्यंत निर्धोक करू शकतो. अन्न उत्पादन ,अन्नसुरक्षा आणि अन्न उपलब्धता यांची एकत्र गुंफण करून आपण जगाच्या पाठीवर असलेल्या सजीवांना यातून जीवदान देऊ शकतो.

(How to store grains in summer) तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा त्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला जॉईन व्हा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top