BBC (British Broadcasting Corporation)इतिहास आणि त्याचे कार्य

WhatsApp Group Join Now

१०० वर्षांपेक्षाही जुनी ब्रॉडकास्टिंग सर्विस म्हणजे बीबीसी म्हणजे ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कोर्पोरेशन. याचे मुख्य कार्यालय लंडन, इंग्लंड येथे आहे. १९२२ साली ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने याची लंडन येथे स्थापना करण्यात आली. बीबीसी हे जगातील सर्वात मोठे आणि सार्वजनिक सेवा प्रसारक तसेच जगातील सर्वात मोठे एक्सटर्नल ब्रॉडकास्टर आहे.

आज आपण बीबीसीचा इतिहास आणि त्याचे कार्य जाणून घेणार आहोत.

बीबीसीचा उल्लेख काही ब्रिटिश श्रोते हा ‘बीब” असा करताना दिसतात हे टोपणनाव सर्वप्रथम पिटर सेलर यांनी गून शो (Goon Show) मध्ये घेतले होते. असेच आणखी एक टोपणनाव सुद्धा आहे जे आजकाल विशेष वापरले जात नाही आणि ते म्हणजे  (Aunty) “आंटी”. सुरुवातीच्या काळात लहान मुलांचे कार्यक्रम प्रसारित करणार्‍या एखाद्या शो वरुन हे नाव आले असावे असे  म्हणता येईल . काही लोक ही दोन्ही नावे एकत्र करूनही याचा उल्लेख करतात तो म्हणजे “आंटी बीब.” (BBC)

१८ ऑक्टोबर १९२२ रोजी बीबीसीची (BBC) स्थापना केली गेली. बीबीसीचे मुख्य उद्दिष्ट्य हे “माहीती, शिक्षण आणि मनोरंजन” हे होते. त्यांचे बोधवाक्य हे “Nation Shall Speak Peace Unto Nation” बीबीसी (BBC) ही स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे आणि बीबीसी ट्रस्ट द्वारे चालविण्यात येते. अशी संस्था ही राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या मुक्त असणे तसेच पारदर्शी असणे महत्वाचे असते. बीबीसीही जशी स्वायत्त संस्था आहे तशीच त्याची स्वायतत्ता सिद्ध करण्यासाठी  काही कठोर नियम आणि मानक सुद्धा आहेत. परंतु BBC वर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही.  

आता आपण BBC चालविण्यासाठी आर्थिक सहाय्य कुठून मिळते? याची माहिती घेऊ :-

ब्रिटन मध्ये टीव्ही बघण्यासाठी एक लायसेन्सची गरज असते. त्या लायसेन्स फी ची किम्मत १६८ पौंड इतकी आहे. त्यामुळे BBC साठी जे आर्थिक सहाय्य मिळते ते या लायसेंस फीज मधून आणि BBC Studioz आणि BBC Studioworks मधून घेतले जाते.  आणि काही पैसा एफसीडीओ म्हणजेच ब्रिटेनच्या विदेश मंत्रालयाकडून मिळतो. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे बीबीसीच्या कुठल्याही शो किंवा न्यूजमध्ये  जाहिरात दाखविली जात नाही म्हणजेच सरकारी जाहिरात मिळवून त्यातून पैसा बीबीसीकडे येत नाही.  

BBC हे जागतिक स्तरावर सर्वात मोठे आणि सर्वात प्रमुख टेलिव्हिजन नेटवर्क म्हणून ओळखले जाणारे तसेच इंग्रजी ही प्रमुख भाषा असलेले प्रसारण केंद्र आहे. तसेच इंग्रजी ही प्राथमिक भाषा असलेल्या विविध देशांना BBC हे बातम्या प्रसारित करीत असते. ग्रेट ब्रिटन मधील दूरदर्शन प्रसारण आणि रेडिओ प्रसारण यावर बीबीसीचा विशेष प्राधान्यक्रम आहे.  

BBC चा इतिहास: –

BBC ची स्थापना जॉन रिथ यांनी १९२२ मध्ये केली होती. १४ नोव्हेंबर १९२२ रोजी बीबीसी ने पहिले रेडिओ बुलेटीन प्रसारित केले. बीबीसीच्या बातम्या या संध्याकाळी सात नंतर प्रकाशित होत असतं कारण तशी गळ वृत्त प्रकाशकांनी सरकारला घातली होती.

१९२७ मध्ये ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी हे नाव बदलून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन हे नाव देण्यात आले.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल,१८ एप्रिल १९३० रोजी म्हणजे एकूण ९० वर्षापूर्वीचा काळ त्यावेळी “ आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही” ही ओळ बुलेटीनच्या निवेदकाने वाचली. आता आपल्याला विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट त्यावेळी घडली होती. त्यानंतर फक्त पियानोसंगीत वाजत होते. १८ एप्रिल १९३० च्या तुलनेत जर आजच्या २०२४ चा विचार केला तर आताचे जग किती वेगळ आहे. बातम्यांचा ओघ थांबतच नाही.  

त्याकाळात प्रसार माध्यम ही केवळ विश्वासावर आणि सरकारी घोषणावर चालू होती. आता मात्र त्यात किती बदल जाणवतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या एखाद्या फुटकळ ट्विट वरूनही आताचे चॅनल दोन दिवस पुरतील एवढे मथळेच्या मथळे भरून लिहिले जातात.  

१९३४ साली बीबीसीने स्वतःचे न्यूज ऑपरेशन सुरू केले. तरीही दुसरे महायुद्ध होईपर्यंत बीबीसी हे संध्याकाळी ६ च्या आधी आपल्या बातम्या प्रसारित करू शकत नव्हते.

१९४८ पासून बीबीसीच्या स्वतःच्या टेलिव्हीजन न्यूजरील कार्यक्रमांची निर्मिती केली गेली.  

२३ एप्रिल रोजी लहान मुलांचे साप्ताहिक नुयजरील सुरू करण्यात आले. टेलिव्हीजन बुलेटीन्स ची सुरुवात ही  ५ जुलै १९५४ साली सुरू केली गेली.

१९५३ साली राणी एलिझाबेथ (दुसर्‍या ) यांच्या राज्याभिषेकाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याचा योग्य परिणाम म्हणजे लोकांची थेट प्रक्षेपण आणि टेलिव्हीजन मधील रुचि वाढविण्यात झाला. युके मध्ये २७ दशलक्ष लोकांनी हा कार्यक्र्म बघितला. या सर्व घडामोडींमध्ये १९५५ पर्यन्त टीव्हीचे परवाने साडेचार दशलक्ष इतके झाले. त्यमुळे टीव्ही संच घेण्यासाठी मागणी वाढली.

१९५५ साली ऑन स्क्रीन न्यूज रीडरची ओळख करून देण्यात बीबीसी यशस्वी झाले. 

१९६० साली ग्रीन हे महासंचालक बनले. ग्रीन यांनी बीबीसीच्या रिपोर्टिंग मध्ये जे बदल केले त्यामुळे बीबीसीचे  प्रतिस्पर्धी आयटीएन (ITN) यांच्या दर्जाचे होते. आलेक्झेंड्रा पॅलेस मध्ये एक न्यूज रूम तयार करण्यात आली, त्यात स्वतःची स्क्रिप्ट व त्याला आवाज देण्याची संधी दिली गेली. २० जून १९६० रोजी बीबीसी न्यूजच्या पहिल्या महिला न्यूज रीडर म्हणून नन विंटन यांना मान देण्यात आला.

२३ सप्टेंबर १९७४ रोजी फक्त बातम्यांचा मजकूर वापरून टेलिव्हिजन स्क्रीनवर बातम्यांचा मजकूर आणण्यासाठी टेलिटेक्स्ट प्रणाली सुरू करण्यात आली. अभियंत्यांनी मूलतः बधिर प्रेक्षकांपर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी अशी प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली.  

१९९० च्या दशकामध्ये BBC one बुलेटीन, BBC World, BBC News 24 आणि BBC News online सुरू केले गेले. १९९६ मध्ये, ऑलिंपिक खेळ, १९९७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक आणि प्रिंसेस डायना यांचा मृत्यू यासारख्या प्रमुख बातम्यासाठी बीबीसी न्यूज ऑनलाइन लाँच करण्यात आली.

३८ वृत्तसंस्थांच्या ऑक्टोबर २०१८  च्या सिमन्स संशोधन सर्वेक्षणात बीबीसी न्यूजला अमेरिकन लोकांद्वारे चौथ्या क्रमांकाची सर्वात विश्वासार्ह बातमी संस्था म्हणून स्थान देण्यात आले . 

दुसर्‍या महायुद्धातील BBC चे योगदान :-

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी टेलिव्हीजन न्यूजचे प्रसारण पुर्णपणे बंद ठेवण्यात आले होते पण देशात शांति आणि उत्साह प्रस्थापित करण्यासाठी बीबीसी रेडिओ मात्र आपले काम करीत होता. जागतिक युद्धाच्या वेळी BBC रेडिओ च्या स्टुडिओचे स्थलांतर ब्रिस्टल आणि ब्रेडफोर्ड मध्ये केले गेले होते. १९४१ च्या जागतिक महायुद्धाच्या काळ्या दिवसात मात्र कैटरबरी आणि यॉर्क येथील आर्ट बिशप येथे प्रसारण करण्यासाठी सेंट पोल स्वतः आले होते.

युद्धाच्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ३३ भाषणे दिली होती आणि ती बीबीसी वर प्रसारित केली गेली होती.  

भारतात BBC ला काही वेळा बंद (BANNED) केले गेले आहे .:-

भारतात बीबीसीची सुरुवात १९४० साली झाली. २०२१ डिसेंबरच्या वार्षिक अहवालनुसार जगात BBC सेवा वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे.

२००८ मध्ये बीबीसी हिन्दीवर, मुंबई वर जो हल्ला झाला त्यावर “बंदूकधारी” म्हणून संबोधल्या बद्दल टीका केली गेली होती. मार्च २०१५ मध्ये भारतातील एका बलात्कारी व्यक्तीची मुलाखत घेणार्‍या बीबीसी स्टोरीविल डोकूमेंटरीसाठी बीबीसीवर टीका करण्यात आली होती. भारतीय उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतरही बीबीसी ने “इंडियाज डॉटर” हा महितीपट भारताबाहेर प्रसारित केला. या सर्वांमुळे BBC ला काही काळासाठी आपला गाशा गुंडळावा लागला होता.

बीबीसीला भारतामध्ये आधी दोनदा आपले कामकाज बंद करावे लागले होते १९७० आणि १९७२ मध्ये भारतातील कामगिरी खराब असल्याबद्दल दोन महितीपट प्रसारित केल्याबद्दल आणि एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात बीबीसीची हकालपट्टी केली होती.

आता आता तर गुजरात दंगली विरोधात एक डोक्युमेंटरी सादर केली गेली त्यावेळी मा. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यात काही विवादास्पद गोष्टींचे चित्रण केले गेले आहे. त्यामुळे ती फिल्म भारतात न दाखविण्याचे BBC ला आवाहन केले गेले आहे. त्यामुळे त्यावेळचे बरेच यू ट्यूब चॅनल ही बंद केले गेले आहेत. अशा काही विवादास्पद डॉक्युमेंट्रीमुळे फक्त भारतातच नव्हे तर इतर आणखी काही देशात BBC ला आपला बोर्‍या बिस्तर काही काळ स्थगित करण्यासाठी बजावलेले आहे.

असे काही विवाद सोडले तर बीबीसी हे विश्वासार्हतेच्या मुद्दयावर मात्र (BBC) १०० वर्षांपेक्षा ही जास्त काळ  टिकून आहे.

आपणास हे जाणून आनंद होईल की सध्याचे BBC चे अध्यक्ष हे भारतीय वंशाचे डॉक्टर समीर शहा हे  आहेत. त्यांनी गेली ४० वर्षे ब्रिटेन मध्ये मीडिया क्षेत्रात काम केले आहे. यासंबंधीची पुष्टी ही ब्रिटेनचे महाराज चार्ल्स (तिसरे) यांनी यावर मुहर लावली आहे.

मैत्रिणींनो तुम्हाला BBC म्हणजेच British Broadcasting Corporation याचा इतिहास आणि माहिती काशी वाटली? तुम्हाला ही माहिती आवडली का? तर हा लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.  तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवाआपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र‘ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.

1 thought on “BBC (British Broadcasting Corporation)इतिहास आणि त्याचे कार्य”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top