स्वित्झर्लंड मधील दहा फिरण्याची ठिकाणे

WhatsApp Group Join Now

स्वित्झर्लंड हे पृथ्वीवरील नंदनवन आहे. जवळपास प्रत्येकाच्या मनात ही सुप्त इच्छा असतेच, की एकदा तरी ह्या स्वप्नगरीत फिरायला जायचचं. अत्यंत सुंदर, मनमोहक, विलोभनीय, आनंददायी, विलक्षण निसर्गरम्य अशी ठिकाणे म्हणजे स्वित्झर्लंडची शान आहेत. स्वित्झर्लंडचा उल्लेख जरी झाला, तरी हिरवीगार शेत, हिरव्या रंगांच्या अनेक छटा असलेली झाडं, त्यामधून डोकावणारी रंगीबेरंगी फुलं आणि अवतीभोवती बागडणारी विविध जातीची फुलपाखरं, सुंदर सुबक रस्ते, बर्फाच्छादित पर्वत शिखरे, आकर्षक घरे, चमकणारे तलाव, धबधबे, दऱ्या, संग्रहालये, चर्च, वाईन, चीज आणि हो कमालीची स्वछता हे दृश्य डोळ्यांसमोरुन तरळून जाते. या सर्वांमुळेच तर या देशास स्वर्गाची उपमा दिली आहे.

हा देश त्याच्या नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे, समृद्ध इतिहास आणि उच्च दर्जाचे जीवन यासाठी प्रसिद्ध आहे. स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित आहे. स्वित्झर्लंड जगातील प्रत्येक प्रवाशाला एक अविस्मर्णीय अनुभव जरूर देते. चला तर जाणून घेऊया स्वित्झर्लंडमधील प्रेक्षणीय, निसर्गरम्य अशी १० सर्वोत्तम स्थळांची माहिती.

१) झुरिच –

झुरिच हे स्वित्झर्लंडमधील एक महत्वाचे ठिकाण आहे. हे स्वित्झर्लंडचे एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र आहे. स्वित्झर्लंडची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे, झुरिच हे एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे. झुरिचच्या ऐतिहासिक जुन्या शहरातून फेरफटका, झुरिच तलावावर बोटीतून प्रवास, आल्हाददायक हवेसाठी झुरिचच्या पर्वतांना भेट, आर्ट गॅलरी, डोल्डरबन माउंटन रेल्वे आणि बहनहोफस्ट्रासे बुटीक, अगदी आवर्जून पाहाच. आणि अर्थातच, शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या लिंड हाऊस ऑफ चॉकलेटला भेट दिल्याशिवाय आणि चवदार चॉकलेट चाखल्याशिवाय झुरिचची कोणतीही सहल पूर्ण होत नाही. साहसी उत्साही लोकांसाठी माउंट टिटलिस आणि माउंट पिलाटस केबल कार राइड हा उत्तम पर्याय आहे. 

झुरिचमध्ये भेट दयावी अशी दहा ठिकाणे  –

  • झ्युरिच तलाव
  • जेरोल्ड कुची छत्री
  • Uetliberg पर्वत
  • झुरिच म्युझियम ऑफ आर्ट
  • झुरिच प्राणीसंग्रहालय
  • राइन फॉल्स
  • ग्रॉसमुन्स्टर चर्च
  • माउंट रिगी
  • माउंट टिटलिस
  • लिंड चॉकलेट फॅक्टरी

२) इंटरलेकन –

झुरिचहून ट्रेनने फक्त दोन तास आणि जिनिव्हाहून तीन तासांच्या ड्राईव्हवर इंटरलेकन ही स्वित्झर्लंडची साहसी शहर आहे. हे शहर दोन पर्वत आणि दोन तलावांमध्ये वसलेले आहे; आणि हार्डर कुल्म, आयगर आणि जंगफ्राऊच्या बर्फाच्छादित आवरणांनी वेढलेले आहे. इथे युरोपातील सर्वात सुंदर पर्वत आहे. चालणे, चढणे यासह कॅनयनिंग, पॅराग्लायडिंग आणि स्कायडायव्हिंगसारखे इतर अनेक खेळ इथे उपलब्ध आहे. इथे बॉलिवूडच्या  अनेक रोमँटिक चित्रपटांच शुटींग झाले आहे.

 ३) जिनिव्हा –

जिनिव्हा हे पश्चिम स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसलेले आहे. इथे रेड क्रॉस , WHO (World Health Organization), WTO (World Trade Organization) चे मुख्यालय देखील आहे. स्वित्झर्लंडमध्ये भेट देण्यासारखे हे सुंदर ठिकाण रस्ते, ट्रेन आणि फ्लाइटद्वारे इतर भागांशी जोडलेले आहे. जिनिव्हा हे जेट डील ( जगातील सर्वात उंच पाण्याच्या कारंजेंपैकी एक), आणि इतर प्रतिष्ठित प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे .

जिनिव्हातील पर्यटन स्थळे –

  • पॅटेक फिलिप म्युझियम
  • एरियाना म्युझियम
  • म्युझियम ऑफ मॉडर्न अँड कंटेम्पररी आर्ट
  • पॅलेस डेस नेशन्स 
  • सेंट पीटर कॅथेड्रल  
  • मोलार्ड टॉवर

४) झर्मेट –

स्वित्झर्लंडमधील स्वित्झर्लंडमधील झर्मेट हे शहर आवर्जून भेट देण्याच्या ठिकाणांपैकी एक आहे. झर्मेटला पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ट्रेनने कारण हे कार-मुक्त शहर आहे. झुरिच आणि जिनिव्हा विमानतळांवरून झर्मेटसाठी थेट ट्रेन आहेत ज्या दर तासाला धावतात. येथील मुख्य सार्वजनिक वाहतूक बस आहे. झर्मेटकडे सौर आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेसचा एक छोटा ताफा आहे, ज्या तुम्हाला शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जातात. हे सुंदर ठिकाण घोडागाडी, इलेक्ट्रिक कार, गोंडोला किंवा पायी चालत देखील फिरता येते. 

५) जंगफ्राऊ –

येथे युरोपमधील सर्वात उंच रेल्वे स्टेशन (3,454 मीटर) आहे. तेथे जाण्यासाठी तीन मार्ग आहेत – केबल कारने, कॉगव्हील ट्रेनने ग्रिंडेलवाल्ड किंवा लॉटरब्रुनेन-वेन्जेन मार्गे. येथे पाहण्यासारखे एक आकर्षण म्हणजे आइस पॅलेस. आइस पॅलेसचे तापमान सतत -3°C वर राखले जाते.

जंगफ्राऊ मध्ये  चार नयनरम्य शहरे आहेत – 

  • ग्रिंडेलवाल्ड 
  • मुरेन
  • लॉटरब्रुनेन 
  • वेन्जेन

६) मॉन्ट्रो –

हे एक नंदनवन आहे. तुम्ही स्वित्झर्लंडमधील कोणत्याही शहरातून ट्रेनने मॉन्ट्रोला पोहोचू शकता. मॉन्ट्रो हे लेकसाइड शहर आहे जे जिनिव्हा सरोवराच्या किनाऱ्यावर पसरलेले आहे. मॉन्ट्रोमध्ये वार्षिक मॉन्ट्रो जॅझ महोत्सवासारखे अनेक आंतरराष्ट्रीय-प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या शहरातील जास्त भेट दिलेली ऐतिहासिक इमारत म्हणजे शॅटो डी चिलॉन, हा १३व्या शतकातील किल्ला आहे. मॉन्ट्रोच्या सर्वोत्तम आकर्षणांपैकी एक म्हणजे 2,050 एकरांपर्यंत पसरलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ.

७) लुसर्न –

लुसर्न शहरात सुंदर तलाव आणि पर्वत, प्राचीन चर्च आणि गजबजलेले चौक आहेत. झुरिच विमानतळावरून, ल्युसर्नला जाण्यासाठी ट्रेनने अंतर एक तासाचे आहे. येथील चॅपल ब्रिजला पर्यटणासाठी प्रसिद्ध आहे. ल्युसर्नमध्ये भव्य रिगी, पिलाटस आणि टिटलिस पर्वत शिखरे आहेत. पिलाटस पर्वतावर जाणे हे एक साहसच आहे. येथील सर्वात उंच कोगव्हील रेल्वेवरील राइड प्रसिद्ध आहे. येथील ग्लेशियर गार्डन हे एक अद्भुत प्रदेश आहे जे तुम्हाला परत हिमयुगात घेऊन जाईल. ल्यूसर्नमध्ये भेट देण्याच्या इतर ठिकाणांपैकी हॉफकिर्चे आणि जेसुइट चर्च हे आहेत. 

८) बासेल –

हे शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर-पश्चिम सीमेवर स्थित आहे. बासेलचे प्रसिद्ध आकर्षण म्हणजे १०व्या शतकातील बेसल मिन्स्टर ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्याची रोमन आणि गॉथिक-प्रभावित वास्तुकला. बासेल प्राणीसंग्रहालय हे स्वित्झर्लंडमधील सर्वात जुने आणि सर्वात मोठे आहे, येथे भारतीय गेंडा, फ्लेमिंगो, आफ्रिकन हत्ती आणि पँथर यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांच्या 600 हून अधिक प्रजाती आहेत. बासेल हे स्वित्झर्लंडचे सांस्कृतिक केंद्र आहे, जे मैफिली, उत्सव, कला कार्यक्रम आणि ओपन-एअर सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. हे ‘संग्रहालयांचे शहर’ म्हणून देखील ओळखले जाते, येथे 40 हून अधिक संग्रहालये आहेत ज्यात जगप्रसिद्ध गॅलरी, चित्रांचे संग्रह आणि कलाकृती आहेत. 

९) लुगानो –

लुगानोला ‘स्वित्झर्लंडचा मॉन्टे कार्लो’ म्हणून गौरवले जाते कारण ते सेलिब्रिटींना आकर्षित करते.  हे शहर लुगानो तलावाजवळ वसलेले आहे . हे शहर बर्फाच्छादित पर्वत, नद्या यासाठी प्रसिद्ध आहे. सरोवरे, उष्णकटिबंधीय हवामान आणि युनेस्कोच्या बेलिंझोना या जागतिक वारसा स्थळांमुळे कोणत्याही हंगामात लुगानोला भेट देणे आकर्षक आहे. लुगानोचे मुख्य आकर्षण म्हणजे मैदानी मनोरंजन. लुगानोचे नयनरम्य लेकसाइड शहर सर्वांनाच आवडते. 

१०) बर्न –

बर्नला पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फ्लाइटने आणि तेथून बर्नला जाण्यासाठी ट्रेन. दर 30 मिनिटांनी ट्रेन आहेत आणि प्रवासाला सुमारे 1 तास लागतो. ओल्ड टाऊनमधील वेस्टर्न सिटी गेट येथे मार्कटगासेमध्ये १२व्या शतकातील घड्याळाचा टॉवर आहे. या टॉवरमध्ये एक सुंदर खगोलशास्त्रीय घड्याळ आहे. बर्न हि स्वित्झर्लंडची राजधानी आहे. इथल्या रस्त्यांवर खूप सारे कारंजे आहेत्, म्हणून हयाला ‘कारंज्याचे शहर’ असेही संबोधले जाते. कलाप्रेमी बर्न म्युझियम ऑफ आर्ट (कुन्स्ट म्युझियम) आणि झेंट्रम पॉल क्ली या गॅलरींना भेट देऊ शकतात, ज्यात या प्रसिद्ध कलाकाराच्या कलाकृतींचा सर्वात मोठा संग्रह आहे.

स्वित्झर्लंड मध्ये फिरण्यासाठी वरील माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी होईल.

3 thoughts on “स्वित्झर्लंड मधील दहा फिरण्याची ठिकाणे”

  1. खूप छान माहिती! स्वित्झर्लंड ची सफर करून आल्यासारखं वाटलं. 👌👍

  2. समृद्धी ठाकूर

    खुप छान माहिती ह्या लेखात दिलेली आहे. हा लेख वाचून स्वित्झर्लंडला न गेलेल्या माझ्यासारख्या अनेकांना तेथे जाण्याची इच्छा नक्कीच मनात जागृत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top