कैरी खावीशी वाटतेय तर जाणून घ्या तिचे काही गुणधर्म ?आणि काही अनोखे पदार्थ जे उन्हाळ्यात वाढवतील तोंडाची चव ?सोबतच जाणून घ्या कैरी चे महत्व कशी असते ती आपल्या शरीरासाठी भर उहाळ्यात कश्याप्रकारे मदतगार ठरेल ?
उन्हाळ्यातील कैरीचे( आंबा) महत्व आणि कैरी पासून तयार होणाऱ्या काही रेसिपीज:(Importance of mango and recipes)
उन्हाळा सुरू होतात आणि घरांमध्ये सर्रासपणे सेवन केले जाते ते म्हणजे कैरीचे. रोज कैरी खाल्ल्यास आपल्या शरीरात काय परिणाम होतील बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी बघा हा लेख…..
तर कैरी मध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. आणि ती गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह आहे त्यामुळे जठरा संबंधीचे रोग काढून टाकण्याची क्षमता एका कैरीत असते. कैरी खाल्ल्याने आरोग्याच्या विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम होतोच त्यामध्ये आढळणारे मॅगीफेरीन अँटिऑक्सिडंट म्हणून यकृतासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे विटामिन सी चे मुबलक प्रमाण ॲनिमिया यासारख्या रक्त विकारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यामध्ये असणारे कॅरोटीन नाइट्स चे उच्च प्रमाण डोळ्याचे आरोग्य आणि दृष्टी सुधारण्यास मदत करू शकतात.
कैरी मुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यास मदत होते मुळे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे किंवा स्कर्वी सारख्या आजारातून समस्यांचे निराकरण करण्यासही मदत होते. हे फळ पचना साठी बरेच फायदे करते त्यामुळे यात असणारे फायबर घटक आणि पाचन गुणधर्म पोटाचे संरक्षण करण्यासाठी मदतगार ठरतात. कैरी मध्ये विटामिन सी आणि पेक्टिन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासाठी फायदेशीर तर आहेच तोंड ,घसा आणि पचनसंस्थेमध्ये होणारा दाह कमी करण्यास मदत करते पण कैरी आपण जास्त प्रमाणातही खाऊ शकत नाही त्यामुळे जळजळ आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्यात बरेचदा सनस्ट्रोक त्रास अनेकांना सहन करावा लागतो. तर सनस्ट्रोक पासून वाचवण्यासाठी कैरी अत्यंत फायदेशीर ठरते त्याचबरोबर उन्हामध्ये जाणवणारी पाण्याची कमतरता ही भरून निघते. फेरीमध्ये आढळून येणाऱ्या विटामिन सी मुळे घरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहण्यासाठी मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात उलट्या होणे स्वस्थ वाटणे यासारख्या समस्यांचा सामनाही आपण या काळात कैरी मिठाबरोबर खाल्ल्याने आराम मिळू शकतो. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवण्याचे काम कैरी करते .त्यामुळे लठ्ठपणा आणि वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कैरी नकळतपणे आपल्याला मदत करते. आता जाणून घेऊया कैरीच्या काही सोप्या रेसिपीज(Recipies of mango)
1. कैरीचं पिठलं:(kairi pithale)
उन्हाळ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे प्रमाण फार कमी झालेले असते. त्यामुळे त्यांच्या दरात सुद्धा वाढ होते. तर अशा वेळेस नेमका केला जाणारा झटपट असा पदार्थ म्हणजे कैरीचे पिठले. थोडे आंबट चवीला छान जेवणाची लज्जत वाढविणारे…
सामग्री:
अर्धी कैरी, अर्धा कप बेसन, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद ,लाल तिखट, मीठ ,एक कांदा.
कृती:
कांदा व मिरच्या चिरून घ्याव्यात.कैरीची साल काढून छोटे-छोटे तुकडे करून घ्यावेत. कढईत तेल गरम करायला ठेवून त्यात मोहरी, जिरे आणि सर्व फोडणीचे साहित्य जसे की कांदा ,लाल मिरची ,कढीपत्ता , मीठ आणि कैरीच्या फोडी घालून मिक्स करावे आणि त्यात थोडे पाणी घालून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे शिजू द्यावे. रेखा भांड्यात बेसन घ्यावे त्यात एक कप पाणी टाकून छान पातळ मिश्रण तयार करावे आणि कैरीचे पर्यंत तर बेसनाचे ते मिश्रण कढई मध्ये घाला जर जास्त पातळ हवे असेल तर त्यात थोडे अजून पाणी घालू शकता. छान मिसळून घेऊन पाच मिनिटे आचेवर शिजू द्यावे नंतर कोथिंबीर घालावी. झणझणीत पिठलं बनवून तयार हे तुम्ही भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता.
2. कैरीची कढी:(kairi kdhi)
सामग्री:
दोन कैऱ्या, 100 ग्रॅम बेसन, 50 ग्रॅम गूळ, दोन हिरव्या मिरच्या, सात आठ कढीपत्ता, एक टीस्पून जिरे, एक टीस्पून मोहरी, पाच-सहा लसूण पाकळ्या, एक टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून, तेल.
कृती:
कैरी स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून साल काढून घ्याव्यात. त्यानंतर किसणीवर किसून घ्याव्यात. गॅसवर कढई ठेवून त्यात जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता , मीठ टाकून फोडणी घालावी. आता बेसन मध्ये थोडे पाणी घालून त्याची पातळ पेस्ट करून घ्यावी व ती फोडणीत ओतावी. उकळी आल्यानंतर त्यात गूळ आणि कैरीचा कीस टाकून पुन्हा उकळू द्यावे. नंतर मीठ व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
3. कैरीचे लोणचे:(kairi achar)
उन्हाळ्यात कैरीचे पदार्थ खाल्ल्याशिवाय मन भरत नाही एक पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे हा वर्षभरात साठीच्या साठवणीतल्या पदार्थ जरी असला तरी उन्हाळ्यात रोजच्या जेवणात लागतोच चला तर मग बनवूया कैरीचं लोणचं लोणचे बनवण्यासाठी असणाऱ्या कैरी या थोड्या कठीण आणि जाड असतात त्यांना हव्या त्या आकारात फोडून घ्यायचे.
साहित्य:
500g कैरी, एक वाटी तेल, मोहरीची डाळ, मेथी दाणे, धने-जिरे पूड, हळद, मीठ,बडीशेप, लवंगा, हिंग, चवीनुसार लाल तिखट.
कृती:
सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुऊन पुसून त्यांना फोडून घ्यावेत म्हणजे छोटे-छोटे तुकडे करावेत यात आता मीठ, हळद चोळून तशीच ठेवावी. त्यानंतर लोणच्यासाठी लागणारे सर्व साहित्य एका थाळीमध्ये काढून घ्यावे .बडीशेप आणि मेथीदाणे यांची जाडसर पावडर बनवून घ्यावी. त्यानंतर तेल गरम करून त्यात लवंगा, हिंग घालून थंड करण्यास काही वेळ बाजूला ठेवावे. आता मीठ आणि हळद लावलेल्या फोडींवर मोहरीची डाळ , मेथीदाणे – बडीशेपपावडर , चवीनुसार लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात गरम करून थंड केलेले तेल सोडावे. आणि हे पूर्ण मिश्रण चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत नीट भरून कापडाने बरणीस बांधून ठेवल्यास हे लोणचे वर्षभर टिकते. काढताना शक्यतो बरणीला ओलसर हात लावू नये.
4.कैरी खोबरे चटणी(mango and coconut chutney):
उन्हाळ्यात कैऱ्या यायला लागल्या की पहिला पदार्थ म्हणजे कैरीची चटणी ती प्रकृतीसाठी असते शितल म्हणून केली जाते. आणि खाण्यासही उत्तम. कैरी म्हणजे पचनास उत्तम त्यामुळे उन्हाळ्यात कैरीचा वापर हा उन्हाळ्यात जास्त व्हायला लागतो.
साहित्य:
अर्धा कप ओले खोबरे, अर्धा कप कैरी, अर्धा कप कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, एक टीस्पून जिरे, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ.
कृती:
वरील प्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये पाणी न जास्त घालता वाटून घ्यावेत. चटणी तयार आहे ही चटणी उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो तसेच इडली, कांदे भजे, वडे, थालीपीठ सोबतही खाण्यास लज्जतदार वाटते.
5. कैरीचे पन्हे:(kairi panhe recipe)
उन्हाळ्यात कैरीचे पन्हे म्हणजे शरीराला साठी एक वरदानच. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत तर होतेच पण अगदी रिफ्रेशिंग पेय म्हणजेच कैरीचे पन्हे .
साहित्य:
दोन कैऱ्या, अर्धा वाटी गूळ, थोडेसे काळे मीठ, वेलची पावडर, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती:
प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन कुकरमध्ये किंवा एखाद्या जाड बुडाच्या भांड्यात वाफवून घ्याव्या. त्यानंतर वाफवलेल्या कैरीचे साल काढून गर काढावा. बाऊलमध्ये असलेल्या या गरात वरील प्रमाणात गूळ, काळे मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून स्मॅश करावे. मिक्सरमध्ये फिरवू नये नाहीतर त्याचा रंग बदलतो. वरील मिश्रण बरणीत भरून जेव्हा लागेल त्यानुसार पाणी घालून कधीही कैरीचे पन्हे प्यायला हरकत नाही. गुळ ऐवजी साखरेचा ही वापर करायला हरकत नाही. हे पेय उन्हाळ्याच्या दृष्टीने आल्हाददायक आहे.
(Importance of mango and recipies)अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी किंवा आपल्या आवडीच्या माहितीसाठी आमच्याlekhakmitra.com या वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या. तसेच ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याwhatsapp channel भेट द्या. अशीच नवनवीन माहिती आणि उन्हाळ्यातील अशाच लेखन स्वरूपातील गमती जमती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद!!
शुभांगी चूनारकर, नागपूर.
Please check the article at least once before posting on the site