हिंदू धर्मातील सोळा संस्कार हे हिंदू धर्माचे एक वेगळे आहे वैशिष्ट्ये आहे. गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत हे वेगवेगळे संस्कार केले जातात.हे सर्व संस्कार पुरोहित किंवा ब्राह्मण(गुरुजी) यांच्याकडून केले जातात. संस्कार हे व्यक्ती गुणवान तसेच संस्कारी बनावी त्यासाठी केले जातात. हिंदू धर्मातील सोळा संस्कार पैकी एक असलेला पंधरावा संस्कार आणि आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे विवाह संस्कार.या संस्कारांमध्ये विवाह करण्याची इच्छा असणाऱ्या मुला मुलींची विवाह हे त्यांच्या इच्छेनुसार लावले जातात. उपवर असणाऱ्या मुला मुलींचे विवाह हे अग्नि,ब्राह्मण व नातेवाईकांच्या साक्षीने लावले जातात. विवाह संस्काराच्या वेळी वधू ही तिच्यावर वरासोबत सात फेरे घेते यालाच “सप्तपदी” असे म्हणतात. या घेतल्या जाणाऱ्या सातही फेऱ्यांमध्ये खूप महत्त्वाचा असा अर्थ दडलेला आहे, चला तर मग आज आपण सप्तपदी बद्दल संपूर्ण माहिती
सात आकड्याचे महत्त्व-
सात हा आकडा शुभ मानला जातो, आठवड्याचे असलेले वार सात, इंद्रधनुष्यात असलेले रंग सात , सात तारे आणि एकूणच काय मानवी जीवनात सात या आकड्याला खूप महत्त्व आहे म्हणून लग्नाच्या वेळी सप्तपदी केली जाते. वधू आणि वर अग्नीभोवती जेव्हा सात फेऱ्या मारत असतात,त्या मारल्या जाणाऱ्या प्रत्येक फेरीमध्ये एक अर्थ दडलेला आहे. जसा जसा सप्तपदी चा विधी पूर्ण होतो तसा तसा वधू आणि वर यांच्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट बनतो, कारण या प्रत्येक फेरीमध्ये वधू आणि वर एकमेकांना वचने देत असतात आणि ही वचने त्यांनी आयुष्यभर पाळायची असतात म्हणूनच ही वचने अग्नीच्या साक्षीने घेण्याची आपली परंपरा आहे.
लग्न विधीच्या वेळी वधू आणि वर जेव्हा सप्तपदी करतात तेव्हा त्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाचा अर्थ आता आपण पाहु-
पहिले पाऊल(सप्तपदीतील पहिले पाऊल हे जबाबदारी आणि सहनशीलतेचे )- यात वर वधूला वचन देतो आता तू आणि मी एक झालो आहोत.तू आता माझ्या घराची अन्नपूर्णा हो आणि माझ्या घराला तृप्त कर.
वरमालाचा विधी झाल्यानंतर वधू आणि वर यांची सप्तपदी चालू होते. या सप्तपदीचे पहिले पाऊल जेव्हा वधू आणि वर सोबत टाकतात. तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पहिले पाऊल त्यांनी सोबत टाकलेले असते. या पहिल्या पाऊला चा अर्थ हा असतो की आता तू आणि मी एकरूप झालो आहोत, हेच वर वधूला सांगत असतो.
दुसरे पाऊल(सप्तपदी दुसरे पाऊल आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारामध्ये एकमेकांना साथ देण्याचे )- आता आपण सोबत दोन पावले चाललो त्यामुळे तू एक ऊर्जा म्हणून माझ्या आयुष्यात प्रवेश कर आणि एक शक्ती म्हणून माझी सदैव सोबत कर. आपण धैर्य आणि सामर्थ्याने आपला संसार सुखाचा करू हे वचन ते दोघे एकमेकांना देतात.
तिसरे पाऊल( सप्तपदीतील तिसरे पाऊल हे धनधान्य समृद्धीचे)- सोबत चाललेल्या या तिसऱ्या पावलांमध्ये वर आणि वधू हे एकमेकांना आपण दोघे मिळून आपल्या जीवनात संपत्ती आणि ज्ञानाची समृद्धी करू हे वचन देतात.
चौथे पाऊल(सप्तपदीतील चौथे पाहून वधूवरांच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःख वाटून घेण्याचे )- आता तू माझ्यासोबत चार पावली चालली आहेस तू सुखदायिनी हो आणि आपण दोघेही सुखात संसार करू हे वचन ते दोघे एकमेकांना देतात.
पाचवे पाऊल(सप्तपदीतील पाचवे पाऊल कुटुंब आणि संततीची काळजी घेण्याचे) – तू संतती वाढवणारी हो आणि आपण दोघे सद्गुनी सुसंस्कारी अशी संतती निर्माण करू असे वचन ते दोघं एकमेकांना देतात.
सहावे पाऊल(सप्तपदीतील सहावे पाऊस हे कायम एकत्र राहण्याचे)- तू प्रत्येक ऋतूमध्ये सुख देणारी म्हणजे हो म्हणजेच तू माझी कायम सोबत कर.
सातवे पाऊल(सप्तपदीतील सातवे पाऊल हे मैत्री आणि विश्वासाचे)- आपल्या कुटुंबाचे सुखदुःख आपण आपल्या हृदयात जतन करू हे वचन ते दोघे एकमेकांना देतात.
विवाह संस्कारावेळी केवळ दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे हे एकत्र येत असतात.या नव्याने तयार झालेल्या नात्याचे जतन कसे करावे हे देखील सप्तपदी मध्ये सांगितले जाते. सप्तपदीच्या विधी वेळी वरील विविध वचने देऊन वधू वर हे वचन बद्ध झालेले असतात. सप्तपदीच्या प्रत्येक पावला मागे एक चांगला उपदेश आहे, लग्नानंतर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव हे आपल्याला पहिले पाऊल करून देते, सप्तपदीमध्ये दुसरे पाऊल हे आयुष्यात सुखासोबत दुःखही येणार याची जाणीव करून देणारे आणि या प्रत्येक सुखदुःखामध्ये पती-पत्नीने कायम एकमेकांची सोबत करावी हे सांगणारे आहे, दोघे मिळून धन आणि समृद्धी यामध्ये वाढ करू हे सांगणारे तिसरे पाऊल आहे, वधू आणि वर एकमेकांना आयुष्यात येणारे सुखदुःख वाटून घेण्याचे वचन हे चौथ्या पावलांमध्ये देतात.
लग्नानंतर दोन्ही कुटुंब ही वधू आणि वर यांच्यासाठी सारखीच राहतील जसा तू माझ्या आई-वडिलांना आदर करशील तसाच मी देखील तुझ्या आई वडिलांचा आदर करेल हे वचन वर वधूला पाचव्या पावला दरम्यान देतो, सहावे पाऊल हे कायम एकमेकांची सोबत करण्याची आहे प्रत्येक ऋतूमध्ये आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखामध्ये तसेच संकटामध्ये कायम एकमेकांची सोबत करण्याचे आहे, सप्तपदीतील सातवे पाऊल हे वधू आणि वर यांच्यामध्ये असलेल्या मैत्री आणि विश्वासाचे आहे वधू आणि वर यांनी नवीन आयुष्याची सुरुवातच ही मैत्रीच्या नात्यापासून करावी. हा सप्तपदीचा विधी पूर्ण झाल्यानंतर विवाह संस्कार पूर्ण होतो वधू आणि वर यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते.
सध्या आपल्याकडे सुरू असणाऱ्या लगीनघाईच्या निमित्ताने लिहिण्यात आलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी,विवाह ठरलेल्या वधू-वरांसाठी व तुम्हा सर्वांसाठी देण्यात आलेली ही माहिती तुम्हाला आवडली का हे देखील सांगा.तुमच्या कमेंट्स आणि सूचनांचे स्वागतच राहील.अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लेखकमित्र वेबसाईटला नक्की भेट देत रहा
Adv.विनिता झाडे मोहळकर.