सूर्यनमस्कार आणि त्याचे फायदे

WhatsApp Group Join Now

  सूर्यनमस्कार आणि त्याचे फायदे

              पंचमहाभूतांमधील मानवाची एक शक्ति म्हणजे “अग्नि”. हि अग्नि प्रामुख्याने पृथ्वीच्या गाभाऱ्यापासून किंवा सूर्यापासून प्राप्त होते. असे मानले जाते उगवती गोष्ट ही प्रत्येकालाच प्रेरणा देत असते. उगवत्या सूर्याचे दर्शन घेतल्यामुळे घरातही उगवती येईल अर्थात भरभराट होईल असे मानले जाते. प्रात:काळी पूर्व दिशेकडे तोंड करून अत्यंत शांत मन करून एकाग्र चित्ताने, भगवान सूर्यनारायणाची स्तुती करत “सूर्यनमस्कार” घालण्याची परंपराही आहे. “सूर्यनमस्कार” म्हणजे भगवान सूर्यनारायणांना नमस्कार करणे. सूर्याला अर्घ्य चढविले तर सूर्याची जशी ताकद आहे तिच ताकद तिच स्फूर्ती आपणास मिळते. “सूर्यनमस्कार”अर्थात आपला अहंकार भाव त्यागून,संपूर्ण समर्पण भावनेने सूर्याला शरण जाणे होय.

 सूर्यनमस्कार करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना –

                  ध्येय:  सदा  सवित् मण्डलमध्यवर्ती 

                            नारायण :  सरसिजासनसन्निविष्ट : ।

                   केयूरवान  मकरकुण्डलवान्  किरीटी

                             हारी हिरण्मयवपुर्धूतशरवड़चक्र: ।

                सूर्यनमस्कार करताना विशिष्ट आसनांचा समावेश आहे जेणेकरून पूर्ण शरीराचा व्यायाम फक्त एका सूर्यनमस्कारामध्ये होतो. आता  जाणून घेऊयात त्या सर्व आसनांबद्दल. वास्तविक पाहता सूर्यनमस्कारामध्ये सुरूवात व शेवट नमस्काराने तर बाकीचे दहा आसने आहेत. सूर्यनमस्कार नेहमी स्वच्छ व मोकळ्या जागेत घालावेत. नाव जरी अवघड वाटत असेल तरी सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यामुळे जर आपली शरीरयष्टी जर बळकट करायची असेल तर अगदी लहानपणापासूनच आपण लहान मुलांना सुद्धा ते शिकवू शकतो.

1) प्रणामासन –

                या पहिल्या आसनामध्ये सूर्याकडे मुख करून सावधान या अवस्थेमध्ये ताठ उभे रहावे. दोन्ही हात जोडून अंगठे छातीला स्पर्श करतील असा नमस्कार करा. तोंड बंद ठेऊन श्वास आत रोखून धरावे.

 *फायदे – प्रणामासना मुळे घशाच्या सर्व तक्रारी दूर होतात शरीर व मन सुदृढ बनते  व आपण समर्पण भावनेकडे आकर्षित होतो.

2)हस्तउत्तासन –

                  श्वास आत घ्या. हात उंच करून मागील बाजूस खेचा. नजर आकाशाकडे असू द्या.

*फायदे – खांद्याचे स्नायु पूर्ण ताणले जातात. कंबरेच्या स्नायुंनाही व्यवस्थित ताण मिळतो.त्यामुळे कंबरेचा त्रास कमी होतो.

3)पादहस्तासन – 

           या चौथ्या आसनामध्ये श्वास बाहेर सोडून गुढघे न वाकवता खाली वाकून दोन्ही हातांची बोटे जमिनीलगत ठेवावे. दोन्ही हातांचे अंगठे पायाच्या दोन्ही अंगठ्यांच्या रेषेत ठेवा. सुरूवातीला हे अवघड जाईल परंतू नंतर सरावाने नक्कीच जमेल.

 *फायदे – पोटांच्या स्नायुंना ताण मिळाल्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. 

             पायांच्या बोटांच्या तक्रारी दूर होतात.

5)अश्वसंचालनासन –

               या आसनामध्ये श्वास आत घ्या. गुडघा,पायाची बोटे जमिनीला लागतील अशा प्रकारे उजवा पाय मागे घ्या. आता डाव्या पायाचा गुडघा हाताच्या पुढे न्या. यामुळे पोटावर व्यवस्थित दाब येईल. मग जेवढे शक्य तितके वर आकाशाकडे पहा.

*फायदे – या आसनामध्ये लहान आतड्यांना ताण मिळत असल्यामुळे मलावरोध यासारख्या रोगांपासून मुक्ती मिळते.

6)पर्वतासन –

              या आसनामध्ये श्वास बाहेर सोडा. आता डावा पाय मागे घ्या. डोके,कंबर व शरीराचा मागचा भाग ताठ ठेवा. शरीराचा सर्व भार हा हातांच्या पंजावर व पायांच्या बोटावर द्या.

*फायदे – या मुळे हात,पाय व गुडघ्यातील दुखणे थांबते.

7)अष्टांगनमस्कार –

              या आसनामध्ये श्वास रोखून धरा.दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. छातीही जमिनीवर टेकवा. पोट आत खेचून घ्या. नाक न टेकवता कपाळाचा वरचा भाग जमिनीला टेकवा. नंतर श्वास बाहेर सोडा. या आसनामध्ये आपले आठही अंग जमिनीवर टेकतात म्हणून या आसनास “अष्टांगनमस्कार”असे म्हणतात.

*फायदे – या आसनामुळे हातातील स्नायूंवर ताण येत असल्यामुळे हातातील ताकद वाढते.

8)भुजंगासन –

               यामध्ये श्वास आत घ्या. अष्टांगनमस्काराप्रमाणेच पाय,गुडघे व हातांचे पंजे ठेवावेत आणि हात सरळ ठेवावेत. कमरेत मागे वळवूण डोके शक्य तितके वर न्यावे.

*फायदे – डोळे तेजस्वि होतात.

             रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्याने चेहरा तेजस्वि होतो.

8)पर्वतासन –

            श्वास बाहेर सोडा. हात व पाय न हालवता गुडघे न वाकवता कंबर ताठ ठेऊन खाली वाका.डोके इतके खाली आणा की हनुवटी छातीला टेकेल..पोट पुर्णपणे आत घ्या. कंबरेचा भाग शक्य होईल तितका वर उचलण्याचा प्रयत्न करा.

*फायदे – या आसनामुळे संधिवात यासारखे आजार होत नाहीत.

9)अश्वसंचालनासन – 

               श्वास आत घेऊन हात उभे व ताठ ठेवा. डावा गुडघा दुमडून पुढे घ्या. पाचव्या आसनामध्ये पाय ज्या स्थितीत होता त्या स्थितीत ठेवा. शक्य तेवढा जास्त दाब पोटावर आणण्याचा प्रयत्न करा.आता डोके व मान मागे न्या व वर छताकडे पहा.

*फायदे – पायातील रक्ताभिसरण वाढते.

             पाठीचा कणा लवचिक बनतो.

10)पादहस्तासन –

               श्वास बाहेर सोडा.गुडघे न वाकवता पूर्णपणे खाली वाकण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात हातांची बोटे जमिनीलगत ठेवा. मान शक्य तितकी मागे न्या. हे आसन तिसऱ्या आसनाप्रमाणेच आहे.त्याचप्रमाणे त्याचे फायदेही

*फायदे – पोटांच्या तक्रारी दूर होतात

              शरीर बांधेसूद व सुंदर बनते.

11)हस्तउत्तासन –

                श्वास आत घ्या व हात उंच करून मागील बाजूस न्या आणि नजर वर असू द्या.

 *फायदे – खांद्याचे स्नायू बळकत होतात.

12)प्रणामासन –

                  श्वास बाहेर सोडा. सूर्यनमस्कारातील दुसऱ्या अवस्थेप्रमाणे सरळ,ताठ उभे रहा.दोन्ही हात जोडा. अंगठे एकमेकांना जुळलेले असू द्या.

*फायदे – शरीर व मन सुदृढ बनते.

          या सर्व आसनांबद्दल आपल्याला माहिती मिळाली. एका सूर्यनमस्कारामध्ये बारा आसने आहेत. याच बारा आसनांमुळे आपल्या शरीरातील एकन् एक स्नायूंना व्यायाम मिळतो. डोळेही सतेज बनतात. बारा आसनांचा एक सूर्यनमस्कार व पंचविस सूर्यनमस्कारांचे एक आवर्तन होते.

            बारा आसने करताना त्या बारा आसनांचे मंञोच्चारण सुद्धा आहे ते कोणते ते पाहूया.

1) प्रणामासन – ओम मित्राय नमः।

2) हस्तउत्तासन – ओम रवये नमः।

3)पादहस्तासन – ओम सूर्याय नम:।

4)अश्वसंचालनासन – ओम भानवे नम:।

5)पर्वतासन – ओम खगाय नम:।

6)अष्टांगनमस्कार – ओम पूष्णे नम:।

7)भुजंगासन – ओम हिरण्यगर्भाय नम:।

8)पर्वतासन – ओम मरीचये नम:।

9)अष्टांगनमस्कार – ओम आदित्याय नम:।

10)पादहस्तासन – ओम सवित्रे नम:।

11)हस्तउत्तासन – ओम अर्काय नम:।

12)प्रणामासन – ओम भास्कराय नम:।

  हे सूर्यनमस्काराचे फायदे आपण पाहिले. सूर्यनमस्कार केल्यानंतर नक्कीच कोणत्याही शारिरीक तक्रारी आपणास जाणवणार नाहीत कारण, सूर्यनमस्कारामध्ये प्रत्येक अवयवास ताण मिळतो व बांधाही सुडौल बनतो. पण काही अशा अवस्था आहेत की ज्यामध्ये सूर्यनमस्कार करणे कटाक्षाणे वर्ज्य आहे. त्या गोष्टी कोणत्या ते पाहूयात.

1)गरोदर स्रियांनी सूर्यनमस्कार करू नये.

2)ज्यांना उच्चरक्तदाब आहे त्यांनी करू नये.

3)ज्यांची नूकताच कोणती शस्ञक्रिया झाली आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्याशिवाय सूर्यनमस्कार करू नये.

4)ज्यांना हार्नियाचा ञास आहे त्यांनी सूर्यनमस्कार करू नये.

सूर्यनमस्कार कोठे व कधी करावे –

                सूर्यनमस्कारामध्ये आपण सूर्याला नमस्कार करतो म्हणूनच दररोज सकाळीच आपल्याला सूर्यनमस्कार करावे लागतात.प्रात: समयी म्हणजेच सूर्य उगवण्याच्या वेळी किंवा सूर्य उदयानंतर सूर्याकडे मुख करून सूर्यनमस्कार करावे.

                  सूर्यनमस्कार करण्याची जागा स्वच्छ व मोकळी असावी. ती जागा सपाट असावी जर चढ किंवा उतार असेल तर आसन व्यवस्थित करता येणार नाही.

                   समुद्रसपाटीवर किंवा एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात , शांत ठिकाणी सूर्यनमस्कार केला तर मन एकाग्र होण्यास मदत मिळते. जास्तीतजास्त अॉक्सिजन शरीरात गेल्यामुळे अशा ठिकाणी प्रचंड ताजेतवाणे वाटते.

आपण शरिरातील प्रत्येक स्नायुंना सूर्यनमस्कारामुळे कसा फायदा होतो ते पाहिले परंतू एकंदरीतच संपूर्ण शरीरावर त्याचा कसा फायदा होतो ते पाहूयात –

1)डोळ्यांची शक्ति सुधारते.

2)ऑक्सिजन जास्तीत जास्त शरीरात गेल्यामुळे दिवसभर ताजेतवाणे वाटते.

3)थकवा जाणवत नाही.

4)पचनशक्ति सुधारते.

5)संधिवात,गुडघ्याचे दुखणे बरे होते.

6)कंबरदुखी थांबते.

7)सर्वात महत्वाचे वजन कमी करण्यात सुर्यनमस्काराचा मोठा वाटा आहे.

8)केस काळे राहण्यास मदत होते.

9)फुप्फुसांची शक्ती वाढते.

10)कंबर ,मणक्यातील हाडे लवचीक होतात.

11)पायांचे स्नायु बळकट होतात.

12)सूर्यनमस्कारामुळे चेतापेशींना उत्तेजना मिळते आणि म्हणून आपले मानसिक संतूलन सुधारते.

13)शुगर,ब्लडप्रेशर सारख्या आजारांना नियंञण मिळते.

14)सूर्यनमस्कार करताना आपण श्वसन क्रिया भरपूर करतो त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते व कार्बन डायऑक्साइड्सचचे प्रमाण घटते त्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

15)आपण दिवसभर सुर्याप्रमाणे स्फुर्तिदायी राहतो.

आपण दिवसभर काहीना काही करत असतो. आपल्या शरीराकडे तसे आपले फारसे लक्ष नसते परंतु जेव्हा एखादी व्याधी आपल्याला सतवते त्यावेळी मात्र आपणास व्यायामाची आठवण होते. हे सर्व रोखण्यासाठी कोणतीही शारिरीक व्यथा जाणवण्या आधिच आपण उपाय केलेले बरे “PRECAUTION  IS  ALWAYS  BETTER  THAN  CURE ” हो ना? म्हणुनच व्यायाम करायचा कंटाळा सोडून जर आपण सूर्यनमस्कार केले तर फारच फायद्याचे ठरते. रोजच सुर्यनमस्कार करूया.

2 thoughts on “सूर्यनमस्कार आणि त्याचे फायदे”

  1. Ashvinee Rathod

    खूप छान आणि सोप्या भाषेत सूर्यनमस्काराची माहिती सांगितली.

  2. माधुरी इनामदार

    मी स्वतः गेले वर्षभर सूर्यनमस्कारांचा अभ्यास करत आहे.आता पर्यंत १०,०००/- पर्यंत संख्या पोचली आहे.मला ही त्याचा खूप फायदा जाणवला.एक ही पैसा खर्च न करता आणि तुमच्या सोयीच्या वेळे नुसार तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top