
E Book Diwali Ank 2024
नमस्कार वाचकहो, महाराष्ट्रात मराठी दिवाळी अंकाला १०० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. प्रत्येक वर्षी ही साहित्यिक मेजवानी वाचक मनाला आनंदच देत असते.आमच्या नवदीप दिवाळी अंकातही तुम्हाला अशीच साहित्यिक मेजवानी अनुभवयास मिळणार आहे. कथा, कविता, ललित,लेख, अलक ,चारोळ्या, शब्दकोडे असा वैविध्यपूर्ण साहित्यिक फराळाचा आनंद तुम्ही यातून घेऊ शकता.
‘नवदीप’ची कल्पना जेव्हा आली, तेव्हा हेच मनात होतं की नवनवीन लेखकांना लिहायला एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. त्यामुळे यामध्ये तब्बल ५० हून अधिक लेखकांनी आपल्या लेखणीने एक सुंदर कलाकृती जन्माला घातली. भाषाव्यवहार जेवढा समृद्ध, तेवढी संस्कृती समृद्ध. दिवाळी अंकांच्या निमित्ताने हे साहित्यिक आपला सांस्कृतिक वारसा जतन करणार आहेत. दिवाळी अंक हे वर्षभरातल्या उत्तम साहित्याचं शिखर मानलं जातं. त्यामुळे यामध्ये असणारे साहित्य हे प्रत्येक लेखकाचे सर्वोत्कृष्ट लेखन असणार आहे. खदाखदा हसवणारे लेख, प्रवास वर्णन, कवितांमधून उलगडत जाणारी अस्वस्थ मनं, भावनांचा ठाव घेणाऱ्या कथा, माहितीचे भांडार असणारे लेख, काळजाला चिरा पाडणाऱ्या अति लघु कथा आणि प्रेमात पाडणाऱ्या चारोळ्या असा हा परिपूर्ण असणारा अंक तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे.
सौ.शीतल अजयकुमार दरंदळे (संस्थापक, संपादक)
E-book Purchase करण्यासाठी खाली दिलेल्या Google Pay नंबर वर Payment करा किंवा QR Code Scan करून सुद्धा Payment करू शकता.
