Indian Army Day2024 lभारतीय सेना दिवस का साजरा केला जातो ??

WhatsApp Group Join Now

भारतीय सेना दिवस का साजरा केला जातो ??
               

              15 जानेवारी भारतीय सेना दिवस म्हणजेच (Indian Army Day) . भारतीय सैनिकांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे अगदी अंत:करणातून स्मरण करण्याचा दिवस. प्रत्येक वर्षी भारतीय 15 जानेवारीला ‘ सेना दिवस ‘ साजरा करतात .

                 युद्ध असो वा देशात आलेल्या संकटावर सामना करण्यासाठी राबविले जाणारे रेस्क्यु ओपरेशन किंवा आपत्कालीन परस्थितीमध्ये गरजू लोकांपर्यंत मदत पोहचवणे आपले भारतीय जवान हजरजबाबी आणि निर्भयतेने यावर मात  करून भारतीयांसाठी उभे असतात.   यावेळी 15 जाने 2024 रोजी भारत आपला 76 वा ‘ सेना दिवस’ साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर  दुसऱ्यांदा  असे घडत आहे की सेना दिवस दिल्लीच्या बाहेर साजरा होत आहे.

भारतीय सेना दिवसाची वैशिष्ट्ये

    उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मध्ये 15 जानेवारी 2024 चा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात येत आहे.  त्यासाठी संपूर्ण शहर सजवण्याची व्यवस्था आणि जबाबदारी पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. या तयारीसाठी लखनौ मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग,उत्तरप्रदेश च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुध्दा सहभागी झाले.
पहिल्यांदाच AI कडून दिला जाणार अवॉर्ड   पहिल्यांदाच अस होत आहे की ‘ बेस्ट मर्चींग कॅटिजेट ‘ चा अवॉर्ड एखादा मनुष्य नाहीतर एक AI (artificial intelligence) च्या मदतीने देण्यात येणार आहे.यावर्षीच्या परेडमध्ये सेनेच्या 6 तुकड्या मर्चींग कॅटिजेट मध्ये सहभागी होणार आहेत.
           लखनौ आणि देशातील विभिन्न सैन्य मुख्यालयामध्ये सैन्य परेड, सेना आणि सांस्कृतिक प्रदर्शन ,सेमिनार यांसारखे कित्येक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दिवशी देशातील वीर,  शहीद सैनिकांना स्मरून आदरांजली दिली जाते.
                 या गोष्टी तर सर्वांनाच माहिती असेल, पण हा दिवस का साजरा केला जातो?  आणि तोही 15 जानेवारीलाच का साजरा होतो?  हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्हाला माहित नसेल तर नक्कीच तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, चला तर मग जाणून घेऊया याची पार्श्वभूमी…….

ऐतिहासिक पार्श्वभूमी

                   भारत आणि पाकिस्तान फा*ळणी नंतर भारतीय सैन्याचे नेतृत्व कोणाकडे असावे, याचा भारतीय तत्कालीन नेत्यांमध्ये संभ्रम होऊ लागला. कारण तेंव्हा भारतीय वरिष्ठ सैनिकांमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असे. भारत स्वातंत्र्यानंतर शेवटचे ब्रिटिश कमांडर 1949 पर्यंत जनरल फ्रान्सिस बूचर होते. यानंतर भारतीय सैन्याचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हा प्रश्न होता, तेंव्हा भारतीय लेफ्ट. जनरल नाथू सिंग राठोर यांनी फिल्ड मार्शल के.एम करीअप्पा यांचं नाव संबोधित केले.

CA म्हणजे काय ? क्लीक करून समजून घ्या


कोण होते के.एम. करिअप्पा?

               फिल्ड मार्शल कोडांडेरा मंडप्पा करिअप्पा हे भारतीय लष्करी अधिकारी होते जे भारताचे पहिले कमांडर – इन – चीफ (C in C ) होते. 1947 च्या भारत – पाक युध्दादरम्यान त्यांनी पश्चिम आघाडीवर भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. लडाखला भारताचा भाग बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली. 15 जानेवारी 1949 मध्ये त्यांची भारतीय लष्कराचे कमांडर – इन – चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली .

      भारतीय सेनेची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1 एप्रिल 1895 मध्ये केली  होती. जवळपास 54 वर्षानंतर (1949) प्रथमच एका भारतीयाला  भारताच्या सैन्याच्या अधिकारांची संपूर्ण जबाबदारी दिली होती.  म्हणून तेंव्हापासून 15 जाने हा भारतीय  सेना दिवस म्हणून साजरा करतात.

फिल्ड मार्शल के .एम. करिअप्पा व्यक्तिविशेष :

1)यांचा जन्म =  28 जानेवारी 1899( कूर्ग प्रांत, ब्रिटिश भारत .सध्याचे कोडागू कर्नाटक मध्ये) झाला.

2) त्यांचे वडील , मड्डप्पा महसूल विभागात काम करत होते.कारियाप्पा हे त्याच्या परिवारातील दुसरे अपत्य त्यांना एक मोठा भाऊ आणि दोन लहान बहिणी असा परिवार होता.

3) 1917 मध्ये सेंट्रल हायस्कूल मदिकेरी येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी प्रेसिडेंसी कॉलेज चेन्नई मध्ये शिक्षण पूर्ण केले.( याच कॉलेज मध्ये सी. व्ही.रमण यांचे शिक्षण झाले होते)
त्यानंतर त्यांनी आर्मी मध्ये प्रवेश केला.

4) करिअप्पा 1 डिसेबर 1919 मध्ये पदवीधर झाले. त्यांना तात्पुरते कमिशन म्हणून  नेमण्यात  आले. तोपर्यंत भारतात कायमस्वरूपी कमिशन मंजूर नव्हते.  9 सप्टेंबर 1922 रोजी त्यांना कायमस्वरूपी कमिशन नेमण्यात आले. जे ( 17 जुलै 1920) पासून लागू केले.

5) शालेय शिक्षण करत असतानाच त्यांना समजले होते की ब्रिटिशांनी भारतीयांना सैन्यात प्रवेशासाठी परवानगी दिली आहे, तेंव्हापासून त्यांनी मनाशी दृढ केले होते की त्यांना सैन्यात भरती व्हायचं आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिपाई प्रशिक्षणासाठी अर्ज केला 70 अर्जदरापैकी करिअप्पा 42वे होते. शेवटी त्यांना इंदूरच्या डेली  कॅडेट कॉलेज मध्ये प्रवेश दिला.

6)    करिअप्पा यांना 1923 मध्ये लेफ्टनंट , 1927 मध्ये कॅप्टन, 1938 मध्ये मेजर , 1942 मध्ये लेफ्टनंट कर्नल आणि 1946 मध्ये ब्रिगेडियर म्हणून पदोन्नती देण्यात आली. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली त्यांनी मध्य पूर्व (1941-42) आणि बर्मासह विविध पदांवर काम केले.

7)    स्वातंत्र्या नंतर करिअप्पा यांना मेजर जनरल च्या रँक सह जनरल स्टाफ चे उप प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले .
आणि जानेवारी 1949 मध्ये करिअप्पा यांना ब्रिटिश कमांडीग सर जनरल रॉय बुचर यांच्या जागी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ म्हणून नियुक्त करण्यात आले.

                 मित्रांनो, फिल्ड मार्शलची पंचतारांकित रँक धारण करणारे आजवर भारतामध्ये केवळ दोनच भारतीय सैन्य अधिकारी आहेत त्यापैकी पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (जानेवारी 1973). आणि दुसरे फिल्ड मार्शल के .एम.करिअप्पा (1986) हे आहेत. आयुष्यात येणाऱ्या अडचणी मध्ये आपण कित्येक जण काहीवेळा नैराश्येच्या गर्तेत सापडतो तर काहीवेळेस त्यातून पळवाटा शोधत असतो, पण अशी काही व्यक्तिमत्वे असतात ज्यांच्या कृतीने आणि निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रेरणा मिळते, आणि निर्णयावर ठाम राहायला शिकवते.

के.एम.करिआप्पा यांच्या आयुष्यातील प्रसंग असेच काहीसे आहेत,1965 ची गोष्ट. भा*रत – पाक  यु*द्धामध्ये   जेव्हा के.एम.करिआप्पा लष्करी सेवेतून निवृत्त होऊन कर्नाटक मध्ये वास्तव्यास होते तेंव्हा त्याचे सुपुत्र नंदा.करिआप्पा फ्लाईट लेफ्ट. म्हणून तैनात होते. भारत – पा*क यु*द्धाचा शेवटचा दिवस होता , नंदा.करिआप्पा. यांच्यावर फायटर प्लेन श*त्रूच्या  ठिकाणावर ह*ल्ला करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, फायटर प्लेन ला आग लागल्यामुळे इमर्जन्सी बटण दाबून नंदा.करिआप्पा पाकिस्तानच्या सरहद्दीत पडले त्यांना दुखापत झाली.  पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी के.एम.करिआप्पा यांचा मुलगा असल्याचे समजले तेंव्हा त्यावेळेचे पाकिस्तानचे राष्ट्रपती  आयुब खान होते ज्यांनी के.एम.करिआप्पा  यांच्या अंडर काम केले होते त्यामुळे ते के.एम.करिआप्पा यांचा खूप आदर करायचे .

रेडिओ पाकिस्तान मधून तेंव्हा घोषित केले , की फायटर. लेफ्ट.नंदा.करिआप्पा हे आमच्याकडे सुरक्षित आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रपती  आयुब खान यांनी भारतातील पाकिस्तानी अम्बेसेडर यांच्याकडून के.एम.करिआप्पा यांना प्रस्ताव पाठवला की आम्ही फा*यटर. लेफ्ट.नंदा.करिआप्पा यांची सुखरूप सुटका करू याबदल्यात आम्हाला काही नको, त्यावेळी अगदी विनम्रतेने त्यांनी दिलेले उत्तर की “नंदू माझा मुलगा नाही तर संपूर्ण भारतमातेचा सुपुत्र आहे , आणि खरंच तुम्हाला त्यांना सोडायचे असेल तर त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना सोडा . नाहीतर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत  जसे वागाल त्याच पदधतीने त्यांच्यासोबत वागा.”

                 ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी शिकण्यासारखी आहे की आपल्या परिवाराचा फक्त विचार न करता किंबहुना त्याहूनही अगोदर आपल्या देशाचा विचार सर्वप्रथम आपल्या मनात आणि कृतीत देखील हवा. यावर्षीच्या सेना दिन उत्सवाचा विषय अर्थात (theme) थीम  धैर्य, त्याग, कर्तव्य  याभोवती फिरते म्हणजेच “राष्ट्राच्या सेवेत” त्याप्रमाणे आपण देखील एक कृती राष्ट्राच्या सेवेसाठी करण्याचा निश्चय करू. आणि अभिमानाने म्हणू मेरा भारत महान .

तुम्हाला हि माहिती कशी वाटली ? जरूर कमेंट करा आणि अश्याच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top