आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात लोक ऑनलाईन शॉपिंगला (खरेदी/विक्री) पसंती देतात. तुमच्याकडे एखादी जुनी झालेली वस्तू (कपडे, स्मार्ट फोन, फर्निचर आणि इतर) पण सुस्थितीत आणि वापरण्यायोग्य असेल तर काही प्लॅटफॉर्मवर तुम्ही ती वस्तू विक्री करु शकता. अशा प्लॅटफॉर्मवर वस्तूची विक्री करून तुम्हाला भंगार भावापेक्षा नक्कीच जास्त किंमत मिळू शकते. त्यामुळे लोक अशा प्लॅटफॉर्मवर विक्री करायला प्राधान्य देतात.
तर अशा कोणकोणत्या वेबसाईट (ॲप्स ,प्लॅटफॉर्म) आहेत जिथे जुनी वस्तू विक्री करून तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते ते जाणून घेऊ. (Ways to stay safe while buying or selling online in Marathi)
OLX:– On Line Exchange
(ऑन लाईन एक्सचेंज) यांचे मुख्य कार्यालय नेदरलँड येथे आहे. हि एक लोकप्रिय ऑनलाईन वेबसाईट आहे.olx ची स्थापना २००६ साली झाली.या वेबसाईटवर आपल्याला खरेदी व विक्री दोन्ही करता येते.olx वर उपकरणे,वाहन, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू,कपडे(फॅशन)आणि बरंच काही विक्री करता येते. तसेच या वेबसाईटवर आपल्याला नोकरीच्या संधी ही उपलब्ध असतात.
(Quikr):- ही एक भारतीय ऑनलाईन वर्गीकृत ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बंगलोर भारत यथे आहे. क्विकर ची भारतातील १००० हून अधिक शहरांमध्ये मोबाईल फोन , घरगुती वस्तू, वाहन, रिअल इस्टेट, नोकऱ्या ,सेवा प्रदान करते. येथे तुम्ही खरेदी व विक्री दोन्ही करू शकता.क्विकरची स्थापना २००८साली झाली.
(Cashify):- हया कंपनीचे मुख्य कार्यालय गुडगाव येथे आहे. येथे तुम्ही जुन्या वस्तू खरेदी व विक्री करू शकता. या कंपनीचे स्थापना २००९ रोजी झाली. हि रिकॉमर्स व इकॉमर्स अशी खाजगी कंपनी आहे. यांचे काही मापदंड पूर्ण केल्यावर वस्तूची किंमत ठरवली जाते .जर ग्राहक त्यांनी दिलेल्या सेवेत संतुष्ट असेल तर २४ ते ४८ तासांत तुमची प्रक्रिया पूर्ण होते.
(Coutloot ):- हया कंपनीची स्थापना २०१६ मध्ये झाली. मुंबई (भारत) यथे यांचे मुख्य कार्यालय आहे. ही एक ई – कॉमर्स कंपनी असून कपडे,फॅशन इत्यादी बाबतीत कार्य करते.
(Zamroo) :- या कंपनीची स्थापना २०१८ साली झाली . यांचे कार्यालय नवी दिल्ली ही एक ई-कॉमर्स कंपनी असून वापरलेल्या वस्तू कार, घर, बाग उत्पादने, मोबाईल इत्यादी वस्तूंची खरेदी व विक्री होते.
(Ebay ): – हया कंपनीची स्थापना १९९५ साली झाली. ही पण ई – कॉमर्स कंपनी आहे.यांचे कार्यालय सनजोस कॅलिफोर्निया युएस येथे आहे.
अशा वेगवेगळ्या वेबसाइटवरून आपण शॉपिंग करत असतो. मात्र त्यात बऱ्याचदा फ*सवणू*क होते व फार मोठे नुकसान सोसावे लागते. फ*सवणुकी*चा हा प्रकार प्रत्यक्षात घडून यामध्ये सुशिक्षित नागरीकही बळी पडतात. सामान्य लोकांना नवीन ॲपची पेमेंट सेवा व UPI ची समज नसते त्यामुळे फसवेगिरी करणाऱ्याला झटपट पैसे कमवण्यास मदत होते.कसे ते पाहुयात.
बंगळुरू मध्ये एका आय.टी.इंजिनिअर युवका सोबत हि घटना घडली आहे.३९ वर्षाचा या युवकाने आपला जुना बेड विकायला काढला होता. त्याने तशी जाहिरात जुने सामान विक्रीच्या साईटवर टाकली होती.लगेच संध्याकाळी त्याला एका व्यक्तीचा फोन येतो.आपले फर्निचरचे दुकान असून आपण तो बेड घेण्यास उत्सुक आहोत असे सांगतो. दोघांमध्ये वस्तूची किंमत ठरते आणि युवकाला त्या बेडचे १५००० मिळणार होते .पेमेंट करण्यासाठी व्यक्तीने यूपिआय आयडी घेतला . ” तुमच्या खात्यात पैसे जात नाहीत, तुम्हीच मला पाच रुपये ट्रान्स्फर करा ” असे त्या भामट्याने सांगितले. त्यावर त्याने ( गंडा घालणाऱ्याने) १० रुपये त्या तरुणाला पाठवले .काही वेळाने त्या भामट्याने पुन्हा फोन करून ”मला तुम्हाला पैसे पाठवण्यात अडचण येत आहे तुम्ही मला ५००० रुपये पाठवा. ” त्यावर तो भामटा त्या युवकाला १०००० रुपये पाठवतो. त्या दरम्यान त्याने युवकाला संभाषणात गुंतवून पैसे ट्रान्स्फर होत नाहीत असे सांगून ७५०० दुसऱ्या अकाउंटला टाकायला सांगितले आणि १५००० परत करतो असे म्हणाला. असे करता करता त्या युवकाने ८ लाख रुपये ट्रान्स्फर केले. तुमचे सगळे पैसे परत करतो असे भामट्याने सांगून लिंक क्लिक करायला सांगितली व वारंवार ओटीपी शेअर करण्यास लावत थोडी थोडी रक्कम मिळून एकूण ६८ लाखांना फसविले.या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत.
अशी फसवणूक झाल्यास काय खबरदारी घ्याल:
१ ) कोणतीही वस्तू ऑनलाईन विकायची असेल तर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटूनच व्यवहार करावा.
२ ) अपरिचित व्यक्ती कडून पेमेंट घेऊ नये.
३ ) अश्या व्यक्तीला समोरून एक रुपया ही ट्रान्स्फर करू नये कारण इथूनच फसवणुकीला सुरुवात होते.
४ ) अपरिचित व्यक्तीने पाठवलेल्या लिंकला क्लिक करू नये, असे केल्यास तुमचे बँक खाते ‘ हॅक ‘ होईल.
५ ) बँक खात्यात मोठी रक्कम ठेऊ नये.
६ ) ‘ओटीपी ‘ची विचारणा केल्यास त्या व्यक्तीला टाळा.
७ ) कुठल्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास स्पष्ट नकार द्या.
८ ) जुन्या वस्तूपासून पैसे मिळविण्यापेक्षा एखाद्या गरीब ,गरजवंताला मोफत द्या.
फसवणूक तक्रार कुठे कराल ? :
१ ) तातडीने १५५२६० किंवा १९३० या नंबर वर संपर्क साधावा.
२ ) https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी .तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवू शकता.
ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
‘शॉपिंग ‘हा सगळ्यांचा आवडीचा विषय पण हल्ली ही शॉपिंग घर बसल्या ऑनलाईन एका क्लिक वर होते. सणासुदीला खरेदीला उधाण येते. आकर्षक सवलती दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकाला मोह आवरता येत नाही. काय घेऊ आणि काय नको असे अनेकांना होऊन जाते. ऑनलाईन खरेदीसाठी भरपूर वेबसाइट्स आहेत.
त्यातील काही सर्वोत्तम वेबसाइट्स पाहू.
(Amazon):– आज अमेझॉन चे नाव जगप्रसिद्ध आहे.
अमेझॉन ची स्थापना १९९४ साली झाली. अमेझॉन भारता मध्ये ”बेस्ट ऑनलाईन शॉपिंग” साठी ओळखला जातो.ह्या प्लॅटफॉर्म वर रोज नवनवीन पर्याय अपडेट करण्यात येतात.
(Flipkart):–
‘flipkart ‘ ची स्थापना २००७ साली झाली.हे हिंदी ,मराठी असे अनेक भाषांमध्ये वापरता येते.जीवनातील आवश्यक वस्तुंसाठी हा उत्तम पर्याय आहे.
(Myntra):
ऑनलाईन कपडे खरेदी करावयाचे असल्यास myntra सारखे दुसरे प्लॅटफॉर्म नाही.याची स्थापना २००७ साली झाली. हे ऑनलाईन फॅशन शॉपिंग प्लॅटफॉर्म कपड्यांसाठी उत्कृष्ट आहे.
(snapdeal):-
snapdeal ची स्थापना २०१० साली झाली. हे भारतातील मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे.
(Nykaa):-
Naykaa ची स्थापना २०१२ साली झाली. कॉस्मेटिक प्रॉडक्ट साठी Naykaa भारतात टॉप वर येते. या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर साबणापासून ते चैनी च्या वस्तू पर्यंत यांच्या कडे सर्व प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.
ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकाना फसवणुकीला तोंड द्यावे लागते.यामध्ये उपलब्ध आसणारे पर्याय घेऊन घरबसल्या मनसोक्त खरेदी करता येते. यामध्ये अनेकदा गरज नसलेल्या वस्तूंची ही भर पडते. कधी कधी निकृष्ट दर्जाची वस्तू माथी पडते. कित्येवेळा वस्तू तुमच्यापर्यंत पोहचतच नाही.ऑनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.यासाठी पुढील गोष्टी पडताळून पाहा.
ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी:
१ ) सुरक्षित वेबसाईटचा वापर करा:- काही साईट्स या बनावट असतात .अशा साईट्स अधिकृत व सुरक्षित आहेत का ते तपासा. सुरक्षित वेबसाईट यांचे( URL) https:// या चिन्हांने सुरू होते. ज्या साईट्स ची सुरुवात http:// या चीन्हांने सुरू होतात त्या बनावट असू शकतात. अशा साईट्स ग्राहकांची माहिती चोरी करण्यासाठी त्याचा वापर करतात. येथे खरेदी केल्याने तुमचे खाते ‘ हॅक ‘होऊ शकते.
२ ) कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय ठेवा:- “कॅश ऑन डिलिव्हरी “म्हणजे ग्राहकाला वस्तू डिलिव्हरी झाल्या नंतर ग्राहक वस्तूचे पैसे देतो. सध्या यु पी आय(UPI) आधारित पेमेंटस करण्यात प्रचंड वाढ झाली आहे .त्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.तसेच डिलिव्हरी बॉय समोर बॉक्स ओपन करावा. बॉक्स ओपन करताना एखादा व्हिडिओ बनवावा असे केल्यास तुमची फसवणूक झाल्यास तुमच्या कडे पुरावा राहू शकतो.
३ ) डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ची पिन देऊ नये सर्व माहिती स्वतः भरावी.
४ ) ऑनलाईन वस्तू खरेदी करताना वस्तूची कंपनी कडून गॅरंटी व वॉरंटी दिली जाते का हे तपासून घ्या.
५ ) खरेदी झाल्या नंतर आलेले ई- बिल तपासून घ्या.
६ ) ऑनलाईन खरेदी करताना किमान हे नियम जरी पाळले तरी तुमची फसवणूक होणार नाही.
ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी कुठे तक्रार कराल:
१) ऑनलाईन फसवणूक झाल्यास घाबरु नका तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर सपोर्ट शी संपर्क करू शकता
२ ) जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी .
३ ) राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन वर ही आपल्याला तक्रार नोंदवता येते. अधिकृत फोन क्रमांक १८००११४००० किंवा १४४०४ येथे तुम्ही सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत संपर्क करू शकता.
४) किंवा आपण ८१३००९८०९ या क्रमांकावर मेसेज करू शकता.
५) ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला https://consumerhelpline.gov.in या साईट वर जावे लागेल त्यानंतर आवश्यक ती माहिती भरून लवकरच तुमच्या तक्रारी ची कारवाई केली जाईल.(Ways to stay safe while buying or selling online in Marathi)
या प्रकारात ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.
जागो ग्राहक जागो.
लेख आवडला असल्यास मित्रपरिवारात नक्की शेअर
करा.असेच नवनवीन साहित्य वाचण्यासाठी लेखकमित्र
या वेबसाईटला भेट द्या.लेख कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
लेखिका –सौ.आकांक्षा निरळकर
Nice 👍
Thank u Rohan
Mast very nice
Thank u Mr.Arvind
Wah chan
Thank you dear
खूप छान माहिती आहे
Thank you tai
Nice information
Thank you dada
Nice 👌👌
Thank you vahini
“Amazing write-up!” mrss. Akansha
Awesome writing. This information is useful for buying and selling the product
Mast chan
अप्रतिम लेखन मॅडम
खूप सुंदर mahiti
Useful info