“एरोनॉटिकल इंजीनियरिंग” 12 वी नंतर चा एक महत्त्वाचा आणि उत्तम पर्याय

WhatsApp Group Join Now

12 वी नंतर करियरची चिंता वाटते? तर हा पर्याय नक्कीच निवडा…..

12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश घेण्यात इच्छुक असतात. पण त्यांना प्रत्येक क्षेत्रातील सखोल माहिती नसते. बरेचदा आपली इच्छा नसतानाही आपण असं क्षेत्र निवडतो. त्याबद्दल आपल्याला त्याची सखोल माहिती नसते त्यामुळे मार्ग चुकत जातात. तर या लेखाद्वारे अभियांत्रिकीचा हा एक असा पर्याय ज्याबद्दल काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न.. चला तर जाणून घेऊया एरोनॉटिकल इंजीनियरिंग या विषयाशी संबंधित पूर्ण माहिती….

एरोनॉटिकल इंजीनियरिंग म्हणजे नेमकं काय?(What is Aeronautical engineering?)

हे असं अभियांत्रिकी क्षेत्र जे आतापर्यंतच्या क्षेत्रांपैकी सर्वात कठीण मानले गेले आहे. या क्षेत्रात विमान आणिअंतराळ यानाचा विकास यासंबंधी सखोल माहिती आणि अभ्यास असतो. एरोनॉटिकल या क्षेत्रात अभियांत्रिकीचे व्यापक स्वरूप असून एरोस्पेस ही इलेक्ट्रॉनिक्स संबंधात व्यापकता दर्शवते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात पाऊलही टाकत नाहीत. यातील अभ्यास थोडा आव्हानात्मक असून भविष्यात आपल्या येणाऱ्या संधीचे सोने करतो. यामध्ये नोकऱ्यांची उपलब्धता फार असून अवकाश संशोधन, संरक्षण, तंत्रज्ञान, क्षेपणास्त्रांची निर्मिती, लष्करी विमानांची निर्मिती याबद्दलची शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देते.

कोण करू शकेल एरोनॉटिकल इंजीनियरिंग?

एरोनॉटिकल इंजिनिअरिंग साठी आपल्याला 12 वी मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित या विषयात प्राविण्य मिळणे गरजेचे असून 60% च्यावर गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेले अधिकच चांगले. यामध्ये आपल्याला पदवी, पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट या पर्यंत पोहचू शकतो त्यासाठी वरील अटींची पूर्तता हवी. तसेच एरोनॉटिकल इंजीनियरिंग या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे झाल्यास त्यासाठी त्या संबंधित पदवी असणे आवश्यक असते. पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी देशातील मोठमोठ्या वैमानिक अभियांत्रिकी संस्था परीक्षा घेतात ती पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच आपण आपल्या गुणवत्तेनुसार प्रवेश घेऊ शकतो.

आजकाल अहवाल वैमानिक संस्थान सोबतच निमशासकीय वैमानिक संस्था ही कार्यरत आहेत. त्या जवळपासच्या मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एरोनॉटिकल इंजीनियरिंग या क्षेत्रा त सहज प्रवेश मिळू शकतो. एरोनॉटिकल अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजेच बी टेक हे सर्वोत्तम अभ्यासक्रमांत पैकी एक मानले गेलेले आहे.

एरोनॉटिकल इंजीनियरिंग या क्षेत्रातील नोकरीच्या संधी?(Jobs in aeronautical engineering)

एरोनॉटिकल इंजिनियर्स ना भारतातील आणि परदेशातील विमान कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात तसेच नॅशनल एरोनॉटिकल लॅब, संरक्षण संस्था, नागरी विमान वाहतूक विभाग, इस्त्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तसेच काही प्रायव्हेट वैमानिक संस्था यामध्येही उत्कृष्ट पगाराच्या नोकऱ्या मिळतात. यात सुरुवातीचा पगार 10-15 लाखापर्यंत असू शकतो.

प्रवेश प्रक्रिया काय असते?(Process of Aeronautical engineering)

पुढील प्रमाणे पूर्व परीक्षा देऊन आपण एरोनॉटिकल इंजीनियरिंग या अभियांत्रिकी क्षेत्रात पाऊल टाकू शकतो.

1. जेईई मेन्स

2. जेईई एडवांस

3. एमएचटी-सीईटी

4. बी आय टी एस टी

5. डब्ल्यू बी जेईई

आकलन क्षमता आणि कौशल्य?

1. विमान चालन आणि विज्ञानामध्ये रस.

2. तांत्रिक कौशल्य

3. संप्रेषण कौशल्य

4. सर्जनशील आणि पाहण्यास सक्षम अशी क्षमता

5. वेग आणि अचूक नियम

6. सुरक्षेची चिंता

7. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे तंत्रज्ञान

8 यांत्रिकी आणि गणित मजबूती चे कौशल्य

प्रवेश कसा घ्यावा?

एरोनॉटिकल इंजीनियरिंग मध्ये बॅचलर ऑफ एरोनॉटिकल इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा ऑफ एरोनॉटिकल इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यासाठी प्रवेश गुणवत्ता आणि प्रवेश परीक्षेच्या आधारे आपण प्रवेश घेऊ शकतो. भारतात काही मोजक्या संस्था आहे जग गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देतात आणि त्यांची मुख्य प्रवेश प्रक्रिया पूर्व परीक्षेद्वारे केली जाते. गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणे म्हणजे त्यांच्या कामगिरी नुसार त्यांची क्रमवारी लावली जाते. या रँक नुसार त्यांना समुपदेशन प्रक्रिया पार पाडावी लागते.

प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे शुल्कासह जमा करावी लागतात. त्यानंतर त्यांच्या क्रमवारी नुसार आपल्याला नंतरच्या प्रक्रियेसाठी पात्र व्हावे लागते. प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या कामगिरीवर आपल्याला या अभियांत्रिकी प्रवेशासाठी कोणत्या प्रकारची संस्था मिळेल हे निर्भर होते. पूर्व प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरून आज विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घेण्यास रँक मिळतो. जर काही कारणास्तव असे घडले नाही तर आपण निमशासकीय काही अशा संस्था आहेत ज्या वैमानिक अभ्यासक्रम राबवतात तर त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून सशुल्क प्रवेश मिळू शकतो. यानंतर काउंसलिंग म्हणजेच समुपदेशन प्रक्रियेच्या फेऱ्या होतात त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या रॅंक नुसारच कॉलेज आणि जागा उपलब्ध करून देतात. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा असून पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो.

भारतातील काही शीर्षक महाविद्यालयांची यादी:

1.आयआयटी बॉम्बे

2. आयआयटी मद्रास

3.आयआयटी खरगपूर

4. आयआयटी कानपूर

5. मनी पॉल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

6. के आय आय टी भुवनेश्वर.

7. आयआयटी चेन्नई.

8. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ,जालंदर.

9. यूपीएस ,देहरादून.

10. एमिटी यूनिवर्सिटी नोएडा.

11.झेन डीम टू बी युनिव्हर्सिटी.

12. कलर्स लिंगम अकॅडमी ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन.

13. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर.

तर वरील माहितीच्या आधारे आपण 12 वी नंतर चा हा एक उत्तम पर्याय(Aeronautical engineering information in marathi) म्हणून या कडे मार्गक्रमण करू शकतो. अशाच नवनवीन लेखासाठी आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. तसेच तुमचे काही प्रश्न किंवा लेख अपेक्षित असतील ते नक्की कळवा. आमच्या WHATSAPP चॅनलला विजिट द्यायला विसरू नका. धन्यवाद!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top