Search Engine Google : मंडळी, तुम्ही कधी गुगललाच गुगलबद्दल विचारलं आहे का? किंवा गुगलवर गुगलबद्दलच गोष्टी सर्च केल्या आहेत का? बरं, आपण काहीही माहिती हवी असेल तर पहिलं कुठे जातो तर.. गुगलवर किंवा कुणी काही विचारलं,काही अडलं तर आपण काय करतो?सगळ्या शंका कुशंका प्रश्न, माहिती, सर्च सगळ्यांची माहिती मिळण्याच ठिकाण म्हणजे ‘गुगल. हल्ली कुणीही काही विचारलं की आपण सहज म्हणतो, अरे गुगल कर ना..!
जगातील सर्वात जास्त वापर होणाऱ्या सर्च इंजिन पैकी गुगल (Google)हे एक आहे. आजच्या सर्च इंजिनच्या ऐकून मार्केट एरियापैकीं ऐंशी टक्क्यांहून अधिक मार्केट एकट्या गुगलने व्यापल आहे. आज कितीतरी हजारों व्यवसाय गुगलवर अवलंबून आहेत.दरवर्षी गुगलवर दोन ट्रेलियन पेक्षा अधिक सर्च केले जातात,म्हणजेच एका मिनिटाला तीन करोडपेक्षा जास्त सर्च केले जातात.
पण तुम्हाला माहिती आहे का याच गुगलचा शोध कसा लागला? गुगल हे नाव कसं पडलं?गुगल नेमकं कसं काम करत? आणि गुगलचा इतिहास काय आहे? तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील,त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
गुगल नेमकं आहे काय? (When was Google Started?)
गुगल(Google) हे एक सर्च इंजिन असून इंटरनेटसोबत जोडून लोकांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी काही क्षणात मिळवून देते.काही वर्षापर्यंत गुगल हे फक्त एक सर्च इंजिन म्हणूनच काम करत होत पण कालांतराने आज गुगलचे सत्तरहून अधिक प्रोडक्ट सेवा जगभरात आहेत.ज्यात प्रामुख्याने जीमेल(Gmail),गुगल मॅप(Google Map) इत्यादी.
तर जाणून घेऊया याच गुगलचा शोध नेमका कधी लागला आणि गुगलचा इतिहास काय आहे-
गुगलचा शोध( How Google got its Name?)-
तर आजही गुगलचा शोध असं सर्च केलं तर दोन नावे आपल्याला दिसतात,ती म्हणजे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन;पण खरंतर गुगलची संकल्पना या दोघांची असून,त्याबद्दल रिसर्च, प्रोग्रामिंग लिहून स्टॉक हसन ह्यांनी तयार केले होते, परंतु गूगल कंपनी चे रेजिस्ट्रेशन होऊन एक कॉर्पोरेट कंपनी बनण्याआधीच हसन ह्यांनी गूगल हा प्रोजेक्ट सोडला, कारण त्याला रोबोटिक्स मध्ये आपले करियर करायचे होते.
गुगलचा इतिहास काय आहे (History of Google)-
गुगलची सुरुवात 1996 मध्ये एका संशोधनाच्या दरम्यान झाली.लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटी कैलिफ़ोर्निया मध्ये पीएचडी करत असताना त्यांनी संकल्पना मांडली की एक असे वेब पेज असायला हवे ज्यात लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर झटपट मिळतील.ही संकल्पना लक्षात घेऊन हसन यांनी त्यासाठी प्रोग्रामिंग कोड तयार करण्यास सुरुवात केली.
त्याआधी पारंपारिक सर्च इंजिनच्या मदतीने वेब पेजवरून शोध किंवा निष्कर्ष काढला जायचा. त्याचवेळी लॅरी आणि सेर्गे यांना असं वाटतं होत की एक चांगली सर्च सिस्टीम तीच आहे ज्यात वेबपेजबद्दल सखोल माहिती दिली जात असेल.
त्यावेळी त्यांनी विकसित केलेल्या त्या नव्या तंत्राला पेज रँक (PageRank) असे नाव दिले. या तंत्राद्वारे वेबपेजची संख्या,त्याची योग्यता, अस्सलपणा यागोष्टी मोजल्या जायच्या.
लॅरी आणि सेर्गे यांनी सुरुवातीला आपल्या सर्च इंजिनच नाव ‘ बैकरब ठेवलं होतं.कारण हे सर्च इंजिन बॅकलिंक्सच्या आधारे साईट्सचे प्राधान्य ठरवत असे. शेवटी लॅरी आणि सेर्गे यांनी आपल्या सर्च इंजिनच नाव बदलून गुगल(Google) ठेवलं.खरंतर गूगल हे नाव Googol(गोगल)या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे.ज्याचा अर्थ एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.ज्याच्या चुकीच्या स्पेलिंगमुळे त्याचे नाव गुगल( Google)पडले आणि जगभर प्रसिद्ध झाले. गगुगलने फार कमी काळात प्रगतीचा उंचाक गाठला.
सुरुवातीच्या दिवसात गुगल चे पहिले व्हर्जन हे स्टैनफौर्ड युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वर प्रसारित करण्यात आलं होतं.सुरुवातीला गुगल जेव्हा इंटरनेटवर प्रसारित करण्यात आले होते तेव्हा त्याच्या डोमेनच नाव google.stanford.edu होत. त्यानंतर 1997 साली गुगलला स्टैनफौर्ड युनिव्हर्सिटीपासून वेगळं करण्यात आलं आणि त्याच स्वतंत्ररित्या प्रसारण करण्यात येऊ लागलं. google.com या नावाने रजिस्टर करण्यात आले.
गुगलचे स्वतंत्र डोमेन, स्वतंत्ररित्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचा कारभार देखील स्वतंत्ररित्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गुगलची रवानगी लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांच्या मित्राच्या गॅरेजमध्ये करण्यात आली,आणि तेच गुगलचे पहिले ऑफिस होते. 1998च्या शेवटापर्यंत गुगलमध्ये जवळपास साठ करोडपेक्षाही जास्त वेब पेज सामील झाली होती.ज्यामुळे गुगल एक वेगळ्या ताकदीच सर्च इंजिन म्हणून ओळखले जात होतं.
Google च्या स्थापनेपूर्वी, सन मायक्रोसिस्टम्सचे सह-संस्थापक अँडी बेचटोलशेम यांनी ऑगस्ट 1998 मध्ये Google ला एक दशलक्ष डॉलर्स निधी दिला होता.1999 च्या सुरुवातीला ब्रिन आणि पेज हे जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना वाटले की सर्च इंजिनवर ते खूप जास्त वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहेत, म्हणून त्यांनी ते विकण्याचा निर्णय घेतला आणि Excite चे CEO जॉर्ज बेल यांना 10 लाखात विकण्याची ऑफर दिली,त्यावेळी त्यांनी ती ऑफर नाकारली.काही काळानंतर excite कंपनीमध्येच एक मुख्य गुंतवणूकदार असणारे विनोद खोसला यांनी 7 जून 1999 रोजी या कंपनीमध्ये 250 लाख डॉलर लावण्याची घोषणा केली.
2004 मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे ही कंपनी सार्वजनिक झाली.2015 मध्ये, Google ची Alphabet Inc ची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून पुनर्गठन करण्यात
आली.अल्फाबेट इंक. ची स्थापना मुख्य Google व्यवसाय “स्वच्छ आणि अधिक उत्तरदायी” बनविण्याच्या इच्छेने प्रेरित करण्यात आली होती.Google Alphabet ची सर्वात मोठी उपकंपनी आहे आणि Alphabet च्या इंटरनेट गुणधर्म आणि स्वारस्यांसाठी एक होल्डिंग कंपनी आहे. अल्फाबेटचे त्यावेळचे सीईओ असलेले लॅरी पेज यांनी राजीनामा दिला आणि 2015 सुंदर पिचाई हे त्याचे सीईओ म्हणून रुजू झाले.
गुगलचे सध्याचे मुख्यालय हे अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे.आणि ऑगस्ट 2015 पासून सुंदर पिचाई हे गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
गुगलचे कोणकोणते प्रॉडक्ट आहेत (Google Products)-
गुगल निव्वळ काही माहिती सर्च करणे यापुरते मर्यादित नसून इतर सुविधाही गुगलने जगभर पसरवल्या आहेत.गुगलचे जवळपास 70 प्रॉडक्ट्स जगभर पसरलेले आहेत,ज्यात ईमेल (जीमेल), नकाशे(नेव्हिगेशन),वेब ब्राऊजर, गुगल डॉक(Google Doc),गुगल ड्राईव्ह ( Google Drive),गुगल असिस्टंट,गुगल चॅट,गुगल डिओ,गुगल लेन्स,गुगल मीट,गुगल वन, गुगल फोटोज,गुगल पे,गुगल प्ले,गुगल प्ले बुक्स,गुगल प्ले गेम्स,गुगल टीव्ही,गुगल न्यूज,फोटो स्कॅन,गुगल पिक्सेल,गुगल सर्च,गुगल शीट,गुगल स्लाईड,गुगल ट्रान्सलेट,गुगल ट्रॅव्हल,गुगल व्हॉइस,गुगल यु ट्यूब,गुगल ऍडसेन्स,गुगल अँड्रॉइड,गुगल ब्लॉगर,गुगल क्लाउड आणि असे अजून बरेच फीचर्स गुगलने जगापुढे आणून आपलं आयुष्य अजून सोपं सुटसुटीत केलं आहे.
2021च्या एका सर्वेनुसार गुगलचे जगभरात एकूण 1,39,995 इतके कर्मचारी आहेत. आणि जगभरात 219 हुन जास्त देशात गुगलचे ऑफिस आणि आउटलेट आहेत.
गुगल दरवर्षी किती पैसे कमावतो? (Google Earning )
गुगल केवळ एक सर्च इंजिन म्हणून नाही तर गुगल हे एक पेड सेवाही पुरवत.तसेच गुगलचे काही हार्डवेअर प्रॉडक्ट देखील बाजारात आहेत जसे की Pixelbook (लॅपटॉप) , pixel (मोबाईल), pixel buds (वायरलेस ईअर फोन) आणि अधिक. गुगल ऍड(Google Ads),गुगल शॉपिंग(Google Shopping) युट्युब(You Tube),गुगल मोबाईल(Google Mobile) यातून गुगलची सर्वाधिक कमाई होते.एका सर्व्हेनुसार 2021 मध्ये गूगल ने एकूण $1201 बिलियन डॉलर म्हणजेच 87.55 लाख करोड रुपये मिळवले होते.
गुगल बद्दलच्या या खास गोष्टी (unknown things about google)-
- 2023च्या सर्वेनुसार गुगलवर एका मिनिटमध्ये 6.दशलक्षच्या जवळ सर्च केले जातात.
- गुगल – Google हा शब्द आला Googol वरून. Googol म्हणजे ज्याचा अर्थ एकावर शंभर शून्य.
- असं म्हणल जात की गुगलचं हे मुख्यालय अतिप्रचंड मोठं आणि हिरवंगार आहे. पण इथलं गवत कापण्यासाठी कंपनी गवत कापायची यंत्रं वापरत नाही. तर त्याऐवजी बकऱ्यांना या कामी लावलं जातं,त्यांना तिथलं गवत खाण्यासाठी तिथे सोडण्यात येत.
- 2006मध्ये YouTube चा गुगलमध्ये समावेश केलं गेलं 1.5 अब्ज डॉर्लसपेक्षा जास्त किंमत मोजत गुगलने युट्यूबला विकत घेतलं. आजच्या घडीला सुद्धा दोन अब्ज पेक्षा जास्त लोक दर महिन्याला युट्युब वापरतात आणि जवळपास एका मिनिटाला चारशेहुन अधिक तासांचे व्हिडीओ तिथे अपलोड केले जातात.
- गुगलवर रोज शोधण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी 15% गोष्टी अशा असतात ज्या यापूर्वी कधीही शोधण्यात आलेल्या नसतात.
- गुगलवर अनेक लहान गंमतीजंमती करता येतात. उदाहरणार्थ जर गुगलवर ‘askew असं सर्च केलं तर मिळणाऱ्या उत्तरामध्ये सगळी उत्तरं तिरकी दिसायला आणि काहीशी घसरलेली दिसायला लागतात.
- अपोलो 11 च्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी जेवढी ‘कम्प्युटिंग पॉवर’ लागली होती, तेवढीच पॉवर एका गुगल सर्चसाठी वापरली जाते.
- गुगलवर काही महत्त्वाच्या घटना,नोंदी यासाठी गुगलने तयार केलेलं डुडल तर तुम्ही पाहिलं असेलच पण त्याची सुरुवात म्हणे, 1998 ला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. ज्यात आपण ऑफिसमध्ये नाही आहोत हे सांगण्यासाठी संस्थापकांनी एक डुडल तयार करून गुगलवर टाकलं होतं.तेव्हा त्याची प्रथाच पडली.
- 2009 मध्ये गुगलच्या एका प्रोग्रॅमरच्या चुकीमुळे इंटरनेट कोलमडलं. ‘/’ या खुणेचा समावेश गुगलच्या ‘ब्लॉक्ड वेबसाईट्स’च्या यादीत चुकून करण्यात आला.
- 10.स्टॅनफोर्ड येथील पहिला Google संगणक LEGO विटांपासून बनवलेल्या सानुकूल-निर्मित एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आला होता.
- इंटरनेटवर गुगल हे सर्वाधिक आवडीच आणि सहज वापरलं जाणार,अवघ्या काही सेकंदात उत्तरं मिळवून देणार ॲप असल्याने ते जगभरातील सर्वात आवडीचं ॲप म्हणून ओळखल जातं.
- 2004 मध्ये एप्रिल फूलच्या दिवशी गुगलने ईमेल-जीमेल सेवा देण्याचं जाहीर केलं होत.खरंतर त्यादिवशी 1 एप्रिल असल्याने लोकांना हा विनोद असल्याचं वाटलं होतं.पण खरंतर ही बातमी खरी असून आज आपण सगळे त्याचा सहज वापर करू शकतो आहे.
तर,मंडळी (History of Google, Success story of Google) कश्या वाटल्या गुगलबद्दलच्या या काही खास गोष्टी? गुगल तुमच्या किती उपयोगाच आहे?आणि हा लेख तुम्हाला किती माहितीपूर्ण आणि कसा वाटला?हे सगळं आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्रपरिवारा सोबत देखील शेअर करायला विसरू नका;आणि अशीच नवनवीन माहिती आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू.याचा लाभ घेण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला नक्की भेट द्या. तसेच आमचा WhatsApp ग्रुप हि जॉईन करा.
धन्यवाद !
लेखक- निलम घाडगे (पुणे)
Nice Information 👍
धन्यवाद.😊
Nice