आंब्याचे लोणचे वर्षभर टिकण्यासाठी काय करावे?

WhatsApp Group Join Now

लोणचे हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. भारतीय लोकांचे जेवण हे लोणच्या शिवाय पूर्ण होतच नाही. तसे तर भारतात विविध प्रकारचे लोणचे बनवले जातात आणि खालले सुध्दा जातात,पण कैरीचे लोणचे सगळ्यात जास्त आवडीने खालले जाते. सध्या सुरू असलेला उन्हाळा आणि या ऋतूमध्ये मिळणाऱ्या कैऱ्या.साधारणता  आपल्याकडे याच महिन्यात घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग ती सुरू झाली दिसते वर्षभरासाठी लागणारे लोणचे याच ऋतूमध्ये तयार केले जाते. लोणचे बनवताना प्रत्येक गृहणीला पडणारा प्रश्न,”लोणचे वर्षभर टिकण्यासाठी काय करावे?” जर तुम्हीही लोणचे बनवणार असाल आणि वर्षभर टिकणारे लोणचे कसे बनवावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमचा हा ब्लॉग नक्की वाचा आणि लोणचे बनवताना तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे मिळवा, चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करू

1)आंबा लोणचे कधी बनवावे?

                     साधारणता मे किंवा जूनमध्ये म्हणजे एखादा पाऊस झाल्यानंतर लोणचे बनवावे भर उन्हाळा चालू असताना केलेले लोणचे हे दीर्घकाळ टिकणारे नसते. गरमी मध्ये केलेले लोणचे हे काही दिवसातच खराब होते. वातावरणातील बदलाचा लोणच्या वरती खूप परिणाम होतो त्यामुळे लोणचे करताना बाहेरच्या वातावरणाचा अंदाज असणे गरजेचे आहे. वातावरणातील उष्णता थोडीशी कमी झाल्यानंतर लोणचे केले तर ते टिकण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही किंवा त्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही.

2)लोणचे करताना कोणते तेल वापरावे?

                     लोणचे करताना लोणच्याला कोणते तेल वापरावे हा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो.तर या प्रश्नाचे उत्तर लोणचे करताना नेहमी “मोहरीचे तेल” वापरावे.मोहरीचे तेल याच्यासाठी की या तेलाला स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत, त्यामुळे हे तेल लोणच्यामध्ये मिक्स केल्यानंतर लोणचे जास्त दिवस टिकते व लोणच्याला उग्र असा वास देखील येत नाही. मोहरीचे तेल हे लोणच्याचा स्वाद देखील वाढवण्यास मदत करते. मोहरीचे तेल हे आरोग्यासाठी देखील चांगले असते.या तेलाचे आपल्या शरीराला कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. मोहरीचे तेल हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते, हे तेल हृदयासाठी देखील उत्तम असते, या तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यास मदत होते, मोहरीच्या तेलामध्ये विटामिन डी,इ,ए आणि के हे असतात, हे सर्वच विटामिन्स शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.(टीप- मोहरीचे तेल लोणच्यात घालताना तेल आधी साधारण गरम करून घ्यावे व लोणच्यात घालताना एकदम थंड झाल्यावर घालावे गरम तेल लोणच्यात घालू नये)

3) लोणचे करताना कोणते मसाले वापरावे?

                        मसाले हे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. रोजचे जेवण असू देत किंवा सणवार असू देत नाही तर वर्षभरासाठी टिकणारे लोणचे असू देत प्रत्येक ठिकाणी आपण भारतीय लोक भरमसाठ मसाल्याचा वापर करतात, प्रत्येक मसाल्याचे एक वेगळे असे वैशिष्ट्य असते प्रत्येक मसाल्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आढळतात या गुणधर्माचा योग्य ताळमेळ घातला तर लोणचे हे अधिक चविष्ट बनते. तसेच लोणचे तयार करताना कोणता मसाला वापरला पाहिजे याची आपण योग्य काळजी घेतली तर आपल्याला अधिक चांगले लोणचे तयार करता येते.  कैरीची टेस्ट मुळातच आंबट असते त्यामुळे कैरीचे लोणचे करताना जर आपण थोडे गोड पदार्थ म्हणजे गूळ,साखर घातली तर छान चवदार असे आंबटगोड लोणचे आपल्याला करता येते.तसेच घरगुती मसाल्यापासून अतिशय चवदार असे लोणचे तयार करता येते लोणचे तयार करताना त्यात  मेथ्या, मिरे, लवंग, मोहरीची  पावडर, घरातील,तिखट,मीठ,हळद गूळ,साखर व हिंग इत्यादी पदार्थ वापरून अतिशय चवदार असे लोणचे तयार करता येते.  जर लोणच्याला थोडीशी वेगळी चव आणायची असेल तर सध्या बाजारात उपलब्ध असणारे विविध तयार मसाले ही तुम्ही लोणचे करताना वापरू शकता. या मसाले पॉकेट वरती लोणचे कसे बनवावे याची सर्व रेसिपी दिलेली असते, तर तुम्ही देखील असे लोणचे मसाले आणून जरा हटके पद्धतीने बनवू शकता.

4) वर्षभर लोणचे टिकवण्यासाठी काही खास टिप्स-

1}लोणची तयार झाल्यानंतर  दररोजच्या वापराचे लोणचे हे एका वेगळ्या बरणीमध्ये काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला लोणच्याची बरणी नेहमीच उघडावी लागणार नाही, वरती सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या वातावरणाचा लोणच्या वरती लवकर परिणाम होतो आणि सतत हवेच्या संपर्कात येणारे लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते.म्हणून लोणचे वापरताना ही काळजी घ्यावी.

2} दीर्घकालीन स्टोरेज साठी लोणचे हे थंड आणि कोरड्या जागी ठेवावे.

3} लोणचे स्टोरेज करताना ते बरणीमध्ये किंवा सध्या बाजारात मिळत असणाऱ्या वेगवेगळ्या जारमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता.लोणचे बरणी मध्ये भरताना त्या बरणीचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.कारण लोणच्या वरती सूक्ष्मजीव लवकर हल्ले करतात आणि लोणचे हे नष्ट करतात.

4} लोणचे सतत झाकून ठेवावे.

5} लोणच्यामध्ये खरकटे हात किंवा खराब चमचे घालू नयेत.

6} लोणचे घातल्यानंतर सुरुवातीला ते दोन-तीन दिवस सलग हलवावे. नंतर आठवड्यातून एकदा लोणचे हलवून खाली वरी करून घ्यावे यामुळे लोणच्यामध्ये सगळा मसाला व्यवस्थित मुरला जातो आणि सगळे लोणचे हे चवीला देखील एकसारखे लागते.

भारतीय खाद्य संस्कृती आणि या खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे लोणचे. लोणचे कसे करावे इथपासून ते लोणचे वर्षभर कसे टिकवावे. याविषयीची देण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.तसेच तुम्हाला अजून अशाच काही किचन टिप्स हवे असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व अशाच महत्वपूर्ण गोष्टीसाठी आमच्या लेखकमित्र वेबसाईट भेट देत रहा

1 thought on “आंब्याचे लोणचे वर्षभर टिकण्यासाठी काय करावे?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top