आर्टिकल ३७० मुव्ही रिव्ह्यू l Article 370 Movie Review in Marathi

WhatsApp Group Join Now

हृतिक रोशनच्या “फायटर” वर यामी गौतमीचा “आर्टिकल ३७०” पडला भारी.! जाणून घ्या कसा आहे चित्रपट.! Article 370 Movie Review in Marathi

चित्रपट रिव्ह्यू :- “आर्टिकल ३७०”

लेखक :- आदित्य धर, मोनल ठाकूर.

दिग्दर्शक :- आदित्य जांभळे.

कलाकार :- यामी गौतमी, प्रियामणी, अरूण गोवील, किरण करमरकर, इरावती हर्षे, वैभव तत्ववादी.

निर्माता :- आदित्य धर, लोकेश धर, ज्योती देशपांडे. 

रेटिंग :- ३.५ / ५ 

        गेल्या वर्षी प्रेक्षकांना भावलेला आणि प्रचंड उलटसुलट चर्चेत आलेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षक विसरत नाही तोपर्यंत लगेच आता त्याच धाटणीचा “आर्टिकल ३७०” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने बघायला हवा असं आवाहन खुद्द मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केलं आहे. आता ते का बरं, ते जाणून घेऊ या रिव्ह्यू मधून. 

       आजपर्यंत हिंदीमध्ये काश्मीर आणि तेथील द*ह*श*त*वा*द यावर कैक चित्रपट प्रदर्शित झाले. काश्मीर आणि द*ह*श*त*वा*द म्हटलं की पाकिस्तानच्या कारवाया, अ*ति*रे*की हल्ले हे सगळं आपण आतापर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलं आहे.  परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का.? की “काश्मीर”च का.? तर त्याचं उत्तर आहे तिथे याआधी लागू असलेलं “कलम ३७०”. हे कलम का लागू करण्यात आलं होतं याची झलक काही महिन्यांपूर्वी आलेल्या सॅम बहादुर या चित्रपटात पहायला मिळाली होती. 

     या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्य म्हणून दर्जा मिळाला होता. भारताच्या राज्यघटनेमध्ये काश्मीर चा सामावेश नसून काश्मीर ची स्वतंत्र राज्यघटना करण्याची अनुमती या कलमामुळे मिळाली होती. आणि याचमुळे तिथे द*ह*श*त*वा*द आणि अ*ति*रे*की संघटना फोफावत गेल्या. आणि हे थांबविण्यासाठी हे कलम रद्द करणं गरजेचं होतं. आणि शेवटी डिसेंबर २०२३ मध्ये हे कलम रद्द करण्यात आलंय असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. परंतु हे इतकं सहज सोपं नव्हतं. ते रद्द होण्याआधी आणि नंतर बऱ्याच घडामोडी, राजकारण घडलं. आणि याचाच मागोवा घेणारा चित्रपट आर्टिकल ३७० हा सध्या बराच चर्चेत आहे. सत्यघटनेवर आधारित असला तरीही सिनेमॅटिक आणि क्रिएटिव्ह लिबर्टी चा पुरेपूर वापर केल्यामुळे बऱ्याच दिवसांनी एक चांगला दर्जेदार चित्रपट बघायला मिळत आहे. (Article 370 Movie Review in Marathi)

      आदित्य जांभळे दिग्दर्शित “आर्टिकल ३७०” या चित्रपटाची कथा अर्थातच हे ३७० कलम लागू केल्यामुळे जम्मू काश्मीर मधील परिस्थितीचं चित्रण करणारी आणि ते रद्द करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा यावर आधारित आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटना, तेथील तणाव, दगडफेक या सगळ्यामागे कोण आहे, हे सुरूवातीला बघायला मिळतं. तिथलेच स्थानिक राजकारणी, बिझनेसमन हे सगळे आपल्या फायद्यासाठी आणि सरकारकडून मिळणाऱ्या फंडींग साठी कसे काश्मीर च्या शांततेचा भंग करत असतात हे बघायला मिळतं. 

      अजय देवगण याच्या आवाजात चित्रपटाची सुरुवात होते. आर्टिकल ३७० बद्दलची पार्श्वभूमी सांगत कथानक सुरू होते. आणि मग दमदार एन्ट्री करत यामी गौतमीने जे काही अभिनयाचे षटकार लगावायला सुरूवात केली आहे ते शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आहेत. यामीने झूनी हक्सर ही भूमिका साकारली आहे. ती एक गुप्तचर विभागातील फिल्ड अधिकारी असून सुरूवातीलाच तीचे काही ॲक्शन सीन्स बघायला मिळतात. तीथे चालत असलेल्या अ*ति*रे”की कारवायांची तिला मनस्वी चीड असते. आणि याच रागातून आपल्या वरिष्ठांच्या आदेश डावलून झूनी ही एका अ*ति*रे*की संघटनेच्या बुरहान वानी या म्होरक्या ला कंठस्नान घालते आणि या सगळ्याने वातावरण अजून तापतं, तणाव वाढतो. याचा परिणाम म्हणून अनेक आंदोलने होतात, विरोध होतो. अर्थातच यामुळे तिची बदली थेट दिल्लीत करण्यात येते. आणि इथुनच खऱ्या चित्रपटाला सुरुवात होते. हे साधारण २०१६ मध्ये घडताना बघायला मिळतं. 

    त्यानंतर काळ दाखवला आहे तो २०१९. पुल*वामा ह*ल्ल्यानंतर भारत सरकार अनेक ठोस पावलं उचलतं. काश्मीर साठी सुद्धा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तेव्हाच दिल्लीत भारत सरकारचे प्रयत्न चालू असतात. तसेच हे कलम ३७० कसं रद्द करता येईल यासाठी अनेक योजना आखल्या जात असतात. याचवेळी पंतप्रधानांची सचिव राजेश्वरी स्वामिनाथन(प्रियामणी) ही झूनीला हेरते आणि एका खास मिशन साठी तिला पुन्हा काश्मीर मध्ये पाठवते. मिशनचा हेतू हाच असतो की तिथे चालू असलेला द*ह*श*त*वा*द आणि आ*तं*क*वा*द यांचा कायमचा बंदोबस्त करावा. जेणेकरून काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आणता येईल आणि एकीकडे अतिशय गोपनीय आणि पद्धतशीर मार्गाने संसदेत कलम ३७० रद्द होण्यासाठी प्रयत्न करता येतील ज्यामध्ये अर्थातच राजेश्वरी हीला प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळत असते. 

      आता चित्रपटात हे सगळं इतक्या नाट्यमय पद्धतीने दाखवण्यात आलं आहे की एक मिनिट सुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही. मधे मधे बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. मध्यांतरा नंतर चित्रपट जास्त रंजक आहे. फक्त ॲ*क्शन सीन्स नाही तर कलम रद्द होऊ नये यासाठी सुद्धा किती अडचणी आल्या, संसदेत उठणारा गदारोळ हे सुद्धा सुंदररित्या दाखवण्यात आलं आहे. एकुणच कलम लागू झाल्यानंतर ते रद्द होईपर्यंतचा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो. 

      दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेला “उरी : द सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. अशा सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवणे ही जणू आदित्य यांची खासियत आहे. या चित्रपटात सुद्धा इतक्या महत्त्वाच्या विषयाची मांडणी अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने केली आहे. संसदीय राजकारण, काश्मीर मधील परिस्थिती , कलम रद्द करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न हे सगळं अतिशय कलात्मक पद्धतीने दाखवलं आहे. 

      चित्रपट सत्य घटनेवर आधारित असला तर स्क्रीन प्ले जास्त महत्वाचा ठरतो. आदित्य धर आणि मोनल ठाकूर यांनी ही जबाबदारी उत्तम पार पाडली आहे. इतका महत्त्वाचा ऐतिहासिक विषय चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर मांडताना खूप गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी कथानक चांगलं गरजेचं असतं. जे या चित्रपटात नक्कीच आहे. काही काल्पनिक दृश्यांची आणि प्रसंगांची जोड देत संपूर्ण कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आहे. विशेष म्हणजे कुठेही ते संथ किंवा रटाळ वाटत नाही. 

        चित्रपटाचा आत्मा म्हणाल तर यामी गौतमी. ज्या पद्धतीने तिने अभिनय केला आहे त्यामुळे चित्रपटाला चार चांद लागलेत हे नक्की. जबरदस्त अभिनय, उत्कृष्ट संवादफेक आणि साजेसे एक्स्प्रेशन या सगळ्यांच कॉम्बिनेशन म्हणजे यामी गौतमी. त्याचसोबत प्रियामणी हीने सुद्धा राजेश्वरी ही भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत अरुण गोविल अतिशय फिट बसले आहेत. तर गृहमंत्री म्हणून दिसलेले करमरकर यांनी सुद्धा चांगला अभिनय केला आहे. वैभव तत्ववादी हा सुद्धा आपली चमक सोडून गेला आहे. इरावती हर्षे यांनी सुद्धा नेहमी प्रमाणे उत्तम अभिनय केला आहे. 

       चित्रपटाचं संगीत म्हणावं तेवढं प्रभावी नाही. परंतु सिनेमॅटोग्राफी, ॲ*क्शन सीन्स, स्क्रीन प्ले, कास्टिंग आणि एकंदर चित्रपटाचा फ्लो हे सगळंच लाजवाब आहे. या चित्रपटाबद्दल सुद्धा बरीच चर्चा, उलटसुलट मत मतांतरे आहेत परंतु एक कलाकृती म्हणून मेकर्स नी एक उत्तम कलाकृती निर्माण केली आहे हे नक्की. माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी साडेतीन स्टार. 

    एक उत्तम ॲ*क्शन पट, एक उत्तम पॉलिटिकल ड्रामा, आणि यामीचा अभिनय बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सुद्धा आर्टिकल ३७० म्हणजे काय? आणि ते रद्द करण्यासाठी आपल्या भारत सरकार ला काय काय करावं लागलं हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच बघा. आणि अजिबात घाबरू नका, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे परंतु ती आखाती देशांमध्ये. इराक, ओमान, कतार यांसारख्या देशांत या चित्रपटावर बंदी आहे. त्यामुळे या वीकेंडला तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघू शकता. 

      तुम्हाला हा रिव्ह्यू (Article 370 Movie Review in Marathi) कसा वाटला आणि चित्रपट पाहिल्यानंतर तो आवडला की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच अनेक नवनवीन चित्रपटांचे रिव्ह्यू वाचण्यासाठी आमच्या “लेखकमित्र.कॉम” या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा सुद्धा जॉईन व्हा.!

धन्यवाद..!

1 thought on “आर्टिकल ३७० मुव्ही रिव्ह्यू l Article 370 Movie Review in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top