अष्टविनायक देवळांची यात्रा व आख्यायिका

WhatsApp Group Join Now

  गणपती हे महाराष्ट्राचे आद्य दैवत आहे. या देवताला पूजणारे असंख्य लोक महाराष्ट्रात आहे. त्यांची गणपतीवर  नितांत श्रद्धा आहे. गणपती उत्सव पण महाराष्ट्रात अत्यंत धामधुमीत साजरा केला जातो. गणपतीचे असंख्य देऊळ सुद्धा महाराष्ट्रात आहे. 

   अष्टविनायक हे महाराष्ट्र भूमीला लाभलेले परमेश्वराचे एक मोठे वरदानच आहे. अष्टविनायक म्हणजे आठ ठिकाणी असलेले गणपतीचे देऊळ. या ठिकाणचे गणपती हे स्वयंभू आहेत. प्रत्येक देवळाचा आणि मूर्तीचा एक इतिहास आहे. या देवळांना अतिशय मान आणि प्रतिष्ठा आहे. दगडावर कोरीव काम केलेल्या या गणपतीच्या मूर्ती स्वयंभू आहेत. त्या ठिकाणी देऊळ बांधण्यात आले. व या स्थानांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही यात्रा केल्यास मनातल्या इच्छा पूर्ण होऊन ईश्वराचे आशीर्वाद लाभतात अशी भक्तांमध्ये ख्याती आहे. त्यामुळे खूप भक्त ही यात्रा करतात. महाराष्ट्रातच नाही तर भारतभरातील भक्त ही यात्रा करायला येतात.

ashtavinayak Yatra and  its history in marathi या लेखामध्ये आपण यासंबंधीची माहिती बघू.

अष्टविनायक यात्रा कशी करावी?—

अष्टविनायक यात्रा खालील प्रमाणे केली जाते–

१) मोरगावचा श्री मोरेश्वर 

२) सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक 

३) पालीचा श्री बल्लाळेश्वर 

४) महडचा श्री वरद विनायक 

५) थेऊरचा श्री चिंतामणी 

६) लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक 

७) ओझरचा श्री विघ्नेश्वर 

८) रांजणगावचा श्री महागणपती

मोरगाव पासून सुरु केलेली यात्रा मोरगावला येऊनच पूर्ण करावी लागते असा याचा नियम आहे.

आता आपण प्रत्येक देवळाचा इतिहास बघू.

१)मोरगावचा श्री मयुरेश्वर—मोरगाव चा गणपती अष्टविनायका तला पहिला गणपती म्हणून ओळखला जातो. नावाप्रमाणेच या ठिकाणी पूर्वी भरपूर मोरांची वस्ती होती.आदिलशाही कालखंडात हे देऊळ बांधले गेले आहे. सुभेदार गोरे यांनी हे देऊळ बांधले आहे. हे देऊळ का*ळ्या दगडापासून बांधण्यात आले आहे. प्रशस्त गढी सारखे त्याला स्वरूप आहे.

आख्यायिका—आख्यायिकेनुसार मिथिला येथील राजा चक्रपाणी आणि त्याची पत्नी उग्रा यांना मूल नव्हते म्हणून त्यांनी सूर्याची उपासना केली. त्याच्या आशीर्वादाने तिला दिवस गेले. पण त्या गर्भाचे तेज ती पेलू शकले नाही व तिने त्याला नदीत सोडले. तिथे  तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. समुद्राने ब्राह्मणाच्या रूपात त्या पुत्राला राजाच्या हवाली केले.राजाने त्याचे नाव सिंधू असे ठेवले. सूर्य उपासनेने हा सिंधू राजा खूप बलशाली बनला व सगळ्यांवर आ*क्रम*ण करून तुरुंगात टाकले. तेव्हा सगळ्या देवांनी गणपतीची आराधना केली. त्याकरता गणपतीने त्रेता युगात पार्वतीचा पुत्र गणपती म्हणून जन्म घेतला आणि सिंधू राक्षसाचा व*ध केला.व मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर आला. म्हणून त्याला मयुरेश्वर असे म्हणतात. 

२) सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक–श्री विष्णूला सिद्धी मिळवून देणारा उजव्या सोंडेचा  हा एकमेव अष्टविनायकातला गणपती आहे. अष्टविनायकातला हा दुसरा गणपती आहे. अहमदनगर जिल्ह्यात हे देऊळ आहे. हा गणपती असलेली टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित आहे. या टेकडीला २१ दिवस २१प्रदक्षिणा मारल्यास इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

आख्यायिका —मुदगल पुराणानुसार जेव्हा विष्णू योगनिद्रेत होते तेव्हा त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवले व त्यातून श्री ब्रह्मदेव उदयास आले. त्यावेळी श्री विष्णूंच्या कानातील घाणीतून मधु आणि कैटभ हे दोन अ*सुर निर्माण झाले व त्यांनी ब्रह्मदेवांना सृष्टीच्या निर्मितीत त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे श्री विष्णू जागृत झाले. पण ते रा*क्षसांचा विनाश करू शकले नाही. त्यांनी शिवाला याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की  ल*ढा*ई अगोदर ते गणपतीला नमन करायला विसरले. अखेरीस श्री विष्णूंनी सिद्धटेक येथे श्री गणेशांची तपश्चर्या केली. श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी अनेक सिद्धी श्री विष्णूंना दिली व त्यानंतर त्यांनी दोन्हीही अ*सुरांचा नाश केला.

३) पालीचा श्री बल्लाळेश्वर—बल्लाळ नावाच्या गणपतीच्या भक्ताच्या नावाने हे देऊळ बांधलेले आहे. मुंबई गोवा महामार्गावरून अकरा किलोमीटरवर हे मंदिर आहे. मूर्तीच्या आजूबाजूला सिद्धी आणि रिद्धी आहेत. मूर्तीच्या बेंबी मध्ये हिरा जडलेला आहे. साधारण गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो पण श्री बल्लाळेश्वराला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. या मंदिराच्या मागे जो डोंगर आहे त्याच्याच आकाराची ही मूर्ती आहे. 

आख्यायिका —ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण  वाणी व बायको पत्नी इंदुमती राहायचे. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता तो खूप गणपती भक्त होता. एकदा गावाबाहेर एक मोठा धोंडा त्याला सापडला तो गावातील इतर मुलांना घेऊन त्याची गणपती म्हणून पूजा करू लागला बराच वेळ झाला तरीही मुलं घरी आली नाहीत म्हणून बाकीच्या मुलांचे आई-वडील कल्याण कडे आले. कल्याण खूप संतापला व तिथे येऊन त्याने तो धोंडा फेकून दिला. बल्लाळला खूप मारहाण केली.

आणि झाडाला बांधून ठेवले व त्याला सांगितले की बघू कोणता देव तुला आता वाचवतो. बल्लाळ ने गणपतीची आराधना केली. गणपती प्रसन्न झाले व तिथे एका ब्राह्मणाच्या रूपात प्रगटले. त्यांनी बल्लाळला स्पर्श केला त्याने बल्लाळची तहानभूक हरपली व त्याला शुद्ध आली. गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. त्याने सांगितले गणपतीला की  इथेच राहून सगळ्यांचे दुःख हरण कर. गणपतीने सांगितले की माझा एक अंश इथे राहील व मला बल्लाळ विनायक या नावाने सगळे ओळखतील. तोच हा पालीचा श्री बल्लाळेश्वर. कल्याण ने जो धोंडा फेकून दिला होता त्याला धुंडी विनायक असे म्हणतात गणपतीच्या आधी त्या धुंडी विनायकाची पूजा केली जाते.

४)महडचा वरदविनायक —हा गणपती रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे आहे. पेशवे रामजी बिवलकर यांनी १७२५ मध्ये त्याचा जिर्णोद्धार केला. गणेशाची मूर्ती १६२० मध्ये बाजूच्याच तलावात विसर्जित केलेली आढळली. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिरात एक दिवा आहे तो १८९२ पासून सतत जळतो आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी हत्तींच्या मूर्ती पहारा देतात आहेत. या देवळात भाविक गर्भागृहात प्रवेश करू शकतात. 

आख्यायिका —प्राचीन काळी एक भीम नावाचा राजा होता त्याला मूलबाळ झाले नाही म्हणून तो आपल्या राणी सह वनात गेला तिथे विश्वामित्र ऋषींनी एकाक्षर मंत्राचा जप दिला. राजाने तपश्चर्या केली व त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव रुक्मानंद. राजाने त्यालाही एकाक्षरी मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा तो वनात शिकारीला गेला असताना वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला तिथे त्यांची पत्नी होती तिचं नाव मुकुंदा ती रूक्मानंदा वर अभिषीक्त झाली. पण त्याने तिची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून तिने त्याला कुष्ठरोगी होशील म्हणून शाप दिला. शाप मिळताच त्याचे शरीर कुष्ठरोगाच्या दुःखानी विव्हळ झाले. तो वनात फिरू लागला. त्याला नारद वनात भेटले. त्याला कदंब वनामध्ये चिंतामणीची आराधना करायला सांगितली. त्यामुळे तो रोगमुक्त झाला. इकडे मुकुंदाची काम अवस्था पाहून इंद्र तीची इच्छा पूर्ण करायला गेला. इंद्रा पासून तिला ग्रुत्समद नावाचा पुत्र झाला. मोठा झाल्यावर ग्रुत्समदाची जन्माची कहाणी ऐकून सगळे त्याचा पाणउतारा करू लागले. त्यानंतर त्याने भद्रक वनात विनायकाची तपश्चर्या केली विनायकाने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने विनायकाला याच वनात तू वास्तव्य कर व भक्तांना आशीर्वाद दे असे सांगितले. हाच तो वरदविनायक.

५) थेऊरचा चिंतामणी–अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी. पुणे जिल्ह्यात थेऊरला हे देऊळ आहे. , मूर्ती स्वयंभू आहे तसेच तिचे तोंड पूर्वेकडे आहे व सौंड डावी आहे.. देवळा बाहेर एक भव्य घंटा आहे. श्री चिंतामणीच्या डोळ्यात दोन लाल मणी व हिरे आहेत.

आख्यायिका —-ब्रम्हदेवाने आपले मन स्थिर करण्यासाठी या ठिकाणी गणपतीची तपश्चर्या केली. या संदर्भात अजून एक कथा आहे. फार प्राचीन काळी राजा अभिजीत व राणी गुणवती यांचा मुलगा गुणा यांनी कपिल मुनींकडील चिंतामणी हे रत्न चोरले. तेव्हा कपिल मुलींच्या विनंतीनुसार गणपतीने ते रत्न गुणाचा व*ध करून कपिल मुनींना परत केले. कपिल मुनींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले त्यामुळे त्यांची चिंता दूर झाली म्हणून या गणपतीला चिंतामणी असे म्हणतात. जो सगळ्यांची चिंता हरण करतो.

६) लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक—लेण्याद्री बुद्ध लेणी हे पुण्याच्या जवळ जुन्नर या परिसरात वसलेले आहे. त्याच ठिकाणी अष्टविनायकातला श्री गिरिजात्मक या लेण्यांमध्येच वसलेला आहे. यातील आठव्या लेण्यांमध्ये गिरिजात्मकाचे देऊळ आहे. त्याला गणेश लेणी असेही म्हणतात. हे देऊळ एका अखंड दगडामध्ये तयार झाले आहे. 

आख्यायिका —गणेश पुराणात दिलेल्या कथेनुसार सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म दिला . त्याकरता लेण्याद्री पर्वतावर घोर तपश्चर्या केली. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी पार्वतीने स्वतःच्या अंगावरच्या मळाने मूर्ती बनवली. गणपतीने त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. सहा हात आणि तीन डोळे असलेला लहान मुलगा समोर आला.. गणपतीने तिथे  पंधरा वर्षे वास्तव्य केले होते. या काळात त्याने अनेक असुरांचा नाश  केला.

७) ओझरचा श्री विघ्नेश्वर–अष्टविनायकातला हा सातवा गणपती लेण्याद्रीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराच्या दाराशी चार द्वारपाल आहे दोन द्वारपालांच्या हाती शिवलिंग आहे. ते, गणपती आपल्या वडिलांचा खूप आदर करतात हे सुचित करतात. देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे आणि देवळाच्या भोवताली दगडी भिंत आहे.. गणेश चतुर्थी तसेच गणेश जयंतीला इथे अनेक उत्सव सुरू असतात. 

आख्यायिका —पुराण कथेनुसार अभिनंदन नावाचा एक राजा होता. त्याला इंद्रपद हवे होते. म्हणून यज्ञ सुरू केला. त्यामुळे संतापलेल्या इंद्राने  विघ्नहर नावाच्या अ*सुराला तिथे वि*ध्वंस करण्यास पाठवले. त्याने वि*ध्वंस चालू केला म्हणून पृथ्वीवरील लोक शंकराकडे गेले व गणपतीला मदतीची याचना केली. मदती करता गणपतीने पराशर ऋषींचा पुत्र म्हणून जन्म घेतला. विघ्नासुराचा नाश करून तिथे शांतता प्रस्थापित केली व त्या ठिकाणी विघ्नेश्वर म्हणून लोकांनी त्याची स्थापना केली.

८) रांजणगाव चा महागणपती—पुणे नगर रस्त्यावर महागणपतीचे देऊळ आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्यामधील काळात मूर्तीवर सूर्याची किरणे पडतील अशी व्यवस्था आहे. मूळ मूर्तीला महोत्कट असे म्हणतात. तिला वीस हात आणि दहा सोंड आहेत. मात्र ही मूर्ती तळघरात आहे आणि दुसरी मूर्ती पूजे करता ठेवलेली आहे. गाभारा पेशव्यांनी बांधला आहे.

आख्यायिका —त्रिपुरासुराने गणपतीची खूप आराधना केली. व शंकराशिवाय त्याचा व*ध कोणी करू शकणार नाही अशी गणपती कडे मागणी केली. त्रिपुरासूर खूप उन्मत्त झाला व सगळ्या देवांचा पराभव करून ऐटीत इंद्राच्या आसनाकडे वळला सगळे देव हिमालयामध्ये दडून बसले मग त्याने शंकराकडे कैलास पर्वताची मागणी केली. त्यानंतर शंकराने ब्राह्मणाचे रूप घेतले व त्रिपुरासुराकडे गेला. व मला ६४ कला येतात त्या तुला दाखवतो असे म्हटले. त्रिपुरा सुराने त्याला म्हटले की तुझी जर कला आवडली तर तू जे मागशील ते मी तुला देईन. ब्राह्मणाने तीन विमाने केली व त्रिपुरासुराला त्यामध्ये बसून कुठेही फिरण्यास सांगितले. त्रिपुरासुर ब्राह्मणावर खूप खुश झाला. त्याला दहा गावे बक्षीस दिली पण त्यानंतर यांच्यात मोठे युद्ध झाले. शंकराने गणपतीचे स्तोत्र म्हणून त्रिपुरासुराला एका बाणात मारले. तो दिवस कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा होता. त्यालाच त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. त्यानंतर शंकराने श्री गजाननाचे देऊळ बांधले .तो हाच महागणपती.

अष्टविनायक देवळांची यात्रा व आख्यायिका ashtavinayak Yatra and its history in marathi हा लेख आपल्याला कसा वाटला, हे नक्की कळवा व त्याकरता आमच्या लेखक मित्र या वेबसाईटला भेट द्या आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा जरूर शेअर करा. आमचे व्हाट्सअप चॅनेल पण जॉईन करा. 

धन्यवाद! 

7 thoughts on “अष्टविनायक देवळांची यात्रा व आख्यायिका”

  1. Ashwini Pandharikar.

    खूपच छान. अष्टविनायक यात्रा केल्या सारखे वाटले. 👌👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top