Atal Setu: मुंबईची नवी ओळख बनलेला देशातील सर्वात मोठा सागरी महामार्ग – अटल सेतू
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी देशातील सर्वात मोठ्या सागरी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये जाणे शक्य झाले आहे. तसेच मुंबईच्या शिरोपेचात आणखी एक मानाचे पान रोवण्याचे काम या निमित्ताने करण्यात आले आहे. या अटल सेतूच्या कामाबाबात आपण सुरुवातीपासून आजतागायत सर्वच बाबींची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
अटल सेतूचे संपुर्ण नाव काय?
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार नेहमीच देशाला प्रगतीपथावर नेणारे आहेत, त्यांनी त्यांच्या विविध कवितांमधून देशवासीयांना देशभक्तीचा संदेश दिला आहे. म्हणूनच देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे नाव ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ असे ठेवण्यात आले असून त्याला मुंबई ट्रान्स हर्बर लिंक Mumbai trans harbour link असेही म्हटले जाते.
अटल सेतू बांधण्यासाठी किती खर्च आला?
अटल सेतू बांधण्यासाठी 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असलेला हा सागरी महामार्ग ठरला आहे.
अटल सेतू बांधण्यासाठी किती कालावधी लागला?
देशातील सर्वात मोठा असलेल्या या सागरी सेतूच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम 24 डिसेंबर 2016 या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. तेव्हा पासून पाहता 13 जानेवारी 2024 या दिवशी सागरी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. तसे पाहता हा कालावधी 7 वर्षे 11 महिने इतका आहे परंतु 2020 मध्ये आलेल्या कोरोनाकाळात 2 वर्षे काम धिम्या गतीने सुरु असल्याने अटल सेतू बांधण्यासाठी 5 वर्षे लागल्याचे अभियंत्यांकडून सांगितले जाते. Mumbai trans harbour link
अटल सेतूचा विस्तार आणि लांबी किती आहे?
अटल सेतूची लांबी सुमारे 21.8 किमी असून तब्बल सहा लेन सेतू आहे, त्यापैकी सुमारे 16.5 किमी समुद्रावर आणि सुमारे 5.5 किमी जमिनीवर आहे. अभियंत्यांकडून अशी माहिती मिळते की, अटल सेतूच्या बांधकामात अंदाजे 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून 15 मीटर उंचीवर बांधण्यात आलेल्या या सागरी पूलाचे बांधकाम अत्यंत कठीण होते. इतकेच नाही तर समुद्री भागात प्रकल्प अभियंते आणि कामगारांना समुद्रात सुमारे 47 मीटर खोल खोदकाम करावे लागलेले आहे. म्हणूनच या मार्गाला या मार्गाला इंजिनिअरिंग मार्व्हल असेही म्हटले जात आहे. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधण्यात आलेला हा सागरी सेतू पुढील 100 वाहनचालकांना वापरता येणार आहे.
अटल सेतू वापरकर्त्यां वाहन चालकांना कोणत्या वाहनासाठी किती टोल द्यावा लागणार आहे? Mumbai trans harbour link
दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हर्बर लिंक म्हणजेच अटल सेतूचा वापर करण्यासाठी वाहनचालकांना पुढील पैकी वाहनाप्रमाणे टोल द्यावा लागणार आहे.
वाहन | एकवेळचा प्रवास | परतीचा प्रवास | दैनिक पास | मासिक पास |
कार | 250/- | 375/- | 625/- | 12500/- |
2 एक्सेल बस किंवा ट्रक | 830/- | 1245/- | 2075/- | 40250/- |
मिनी बस | 400/- | 600/- | 1000/- | 20000/- |
एमएव्ही एक्सेल वाहने | 905/- | 1360/- | 2265/- | 45250/- |
एमएव्ही 4 ते 6 एक्सेल वाहने | 1300/- | 1950/- | 3250/- | 65000/- |
मल्टी एक्सेल वाहने | 1580/- | 2370/- | 3950/- | 79000/- |
मालदीव की लक्षद्वीप क्लिक करा.
मुंबई अटल सेतूची वैशिष्ट्ये- Atal Setu features
भारतातील सर्वात मोठा सागरी महामार्ग असलेल्या या अटल सेतूने देशभरातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत, या सागरी महामार्गाची काही वैशिष्ट्ये आपण पुढे पाहणार आहोत. Atal Setu
· वाहन चालकांना टोलच्या रांगांचा त्रास नसेल:
बरेचदा आपण पाहतो की अशा पद्धतीच्या महामार्गांचा वापर करताना अनेक वाहने एकाचवेळी प्रवास करतात त्यामुळे टोल व्यवस्थेवर त्याचा परिणाम होते. मानवी पद्धतीने टोल स्वीकारताना लांबच लांब वाहानंच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे अटल सागरी सेतूचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना अत्यंत महत्त्वाची सोय करण्यात आली आहे ती म्हणजे येथे ओपन रोड टोलींग प्रणाली असणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत स्कॅनर वाहनांना स्कॅन करुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल करणार आहेत. त्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा टाळता येणार आहेत.
· ध्वनी प्रदूषणाला आळा:
अटल सेतूवरुन भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांचे ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी या ब्रिजला नॉईज सायलेन्सर आणि साऊंड बॅरिअर देखील लावण्यात आले आहेत. यामुळे सागरी जीवांना त्रास होणार नाही हा एक हेतू असून त्यामुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होण्यास मदत होणार आहे.
· ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक – Orthotropic steel deck
अटल सेतूचे बांधकाम करताना प्रथमच ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या सागरी महामार्गाला विस्तृत स्पॅन आणि मजबूती मिळाली आहे.
· रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स – Reverse circulation rig
सुरुवातीपासूनच पर्यावरण पुरक काम होण्याच्या दृष्टीने समुद्रातील जीवांना अटल सेतूमुळे आणि या सागरी महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांमुळे कोणतीही हानी होऊ नये यासाठी गाड्यांचा आवाज आणि व्हायब्रेशन कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स reverse circulation rig या अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर बांधकामात करण्यात आला आहे. या आधुनिक पद्धतीमुळे सागरी जीवांचे रक्षण होणार आहे.
· इलेक्ट्रिक कॅमेऱ्यांच्या दृष्टीक्षेपात –
देशातील सर्वात मोठ्या सागरी महामार्गावर म्हणजेच अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा Intelligent Traffic Management बसविण्यात आली आहे. प्रत्येक 100 मीटरवर आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. संपूर्ण महामार्गावर एकूण 130 सीसीटिव्ही कॅमेरे cctv camera बसविण्यात आले आहेत. 190 आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
· भूकंप रोधक डीझाईन –
अटल सेतू या ब्रिजचे काम संपूर्णपणे भूकंपरोधक बांधकामांतर्गत करण्यात आले असून. त्सुनामी असो किंवा भूकंप अशा धक्क्यांमुळे या सागरी महामार्गाला काहीच होणार नाही. सांगायचेच झाले तर 6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यातही हा ब्रिज समुद्राच्या मधोमध अगदी बळकटीने आणि मजबूतीने उभा राहू शकतो अशी या ब्रिजची बांधणी करण्यात आली आहे.
· इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले –
वाहन चालकांना मार्गदर्शन करणारे आणि रिअल-टाइम माहिती देण्यासाठी अटल सेतू या सागरी महामार्गावर ठराविक अंतराने इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य होणार आहे. तसेच एखादा अप*घात झाल्यास त्याबद्दल इतर वाहनचालकांना त्याची सूचना या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
· पर्यावरण पुरक प्रकाश योजना –
अटल सेतू या सागरी महामार्गावर प्रकाश व्यवस्था ही सागरी पर्यावरणाला अनुकुल ठरणारी अशा पद्धतीने करण्यात आली आहे. सौर ऊर्जा आणि समुद्रातील हवामान तसेच तापमानाचा विचार करता पर्यावरण पुरक ठरणारे दिवे या सागरी महामार्गावर लावण्यात आले आहेत.
· विशिष्ट अंतरावर स्पिडोमीटर्स –
अटल सागरी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी विशिष्ट अंतरावर स्पिडोमीटर्स बसविण्यात आले आहेत. अटल सेतूवर काही ठिकाणी 100 किमी प्रतितास तर काही ठिकाणी 80 व 60 किमी प्रतितास अशी वेग मर्यादा देण्यात आली आहे. वाहनचालकांचा अतीवेगाने अपघात टाळता यावा यासाठी या सागरी महामार्गावर वाहनाचा स्पीड मापणारी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्यामुळे अती वेगवान ड्रायव्हींग करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
अटल सेतूमुळे कोणाकोणाला फायदा होणार आहे?
मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना या सागरी महामार्गाचा अत्यंत उपयोग होणार आहे. त्यामुळे दक्षीण मुंबई ते नवी मुंबई हा रस्तेमार्ग पाहता तब्बल 2 तास लागतात आणि हेच 2 तासाचे अंतर या सागरी महामार्गामुळे फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कापता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे नक्कीच इंधनाची बचत होईल तसेच वाहतूक कोंडी कमी होईल. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईतील उद्योगांना चालना मिळेल. तसेच भविष्यात या अटल सेतूला इतर सागरी मार्गांना जोडण्यासाठी पुढील बांधकाम प्रकल्पांची देखील उभारणी करण्यात येत आहे.
विशालाक्षी प्रशांत चव्हाण ,पुणे
खूप छान, सविस्तर आणि मुद्देसूद लेख लिहिला आहे.
खूपच उपयुक्त माहिती दिलेली आहे.
खूप महत्त्वाची माहिती व सखोल विवरण सुंदर लेखन आणि सरळ शब्दात….
असंच लेखन लिहित जावा खूप जणांना याचा लाभ मिळेल.
धन्यवाद….
छान आणि सुंदर लेख आहे आपल्या लेखामुळे आम्हाला या अटल सेतूची विस्तृत अशी सुंदर माहिती मिळाली आहे
मस्त लेख आहे मयुरी.
मयुरी सुंदर लेख उत्तम संकलन आहे
खरंच अतिशय अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे… अटल सेतू ची सविस्तर माहिती मिळाली.
मस्त माहितीपूर्ण लेख
अटल सेतूची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारा लेख. खूप छान. उत्तम लेखन. लिहित रहा. धन्यवाद.
खूप छान माहिती विशालाक्षी.मी आवर्जून वाचत जाईन.
खूप छान माहिती